मॉडर्न टॉयलेट रेस्टॉरेंट

Submitted by वर्षू. on 8 January, 2013 - 07:48

काय मित्रांनो.. चमकला ना हे शीर्षक वाचून???
मला पण अस्सच वाटलं जेंव्हा एका लोकल मासिकात वाचून ,लेक मागेच लागली या आगळ्यावेगळ्या नावाच्या रेस्टॉरेंट मधे घेऊन जायला..

मागच्या वर्षीच क्वांग चौ मधे उघडलेल्या या रेस्टॉरेंट चं नाव वाचून ' ई>> शी>>>' करून झालं होतं, त्याची पुनरावृत्ती करून पाहिली पण लेक बधली नाही.. त्यामुळे नाईलाजाने आम्ही गेलोच पण रस्ताभर बजावत गेले तिला कि मी तिला दारातच सोडून देईन म्हणून..पण प्रत्यक्षात तिथे पोचल्यावर मी ही आत गेलेच.. आतमधे कायकाय पाहायला मिळेल याबद्दल मलाही उत्सुकता वाटतच होती की!!!

साधारणपणे बाथरूम आणी जेवण याचा परस्पर संबंध लावायचा विचार ही डोक्यात कधीच येत नाही नै?? पण तायवानीज ,' चियांग मू' च्या डोक्यात हा विचार आला आणी त्याने ही अफलातून कल्पना प्रत्यक्षात आणली. तायवान मधे लोकांचा जोरदार पाठिंबा मिळाला त्याच्या या अनोख्या थीमच्या रेस्टॉरेंट ला आणी बघता बघता चीनमधे त्याने १४ शाखा उघडल्या..

या रेस्टोरेंट मधे प्रवेश करताच एका मोठ्या बाथरूम मधे शिरल्याचा भास झाला. प्रत्येक टेबल फुल्ल होतं. एक टेबल मिळवून आम्ही बसलो. बसायला खुर्चीऐवजी टॉयलेट सीट होती. मधल्या काचेच्या टेबलाखाली वॉशबेसिन दिसत होतं. आजूबाजूच्या भिंतींवर बाथरोब,टूथ ब्रश स्टँड, नॅपकिन हँगर्स लटकावलेले होते


..
मागवलेल्या चिप्स , लहानशा बाथ टब मधे आल्या

मी मागवलेलं सूप चक्क पॉटीत.. Uhoh अगदी प्रयत्नपूर्वक दुर्लक्ष करत खाल्लं..

जब ओखली मे सर दिया तो मूसल से क्या डरना .. Proud

सिंक मधे स्टीक

लास्ट बट नॉट द लीस्ट..

किसको हिंमत है ये आईसक्रीम खाने की???

(आम्ही खाल्लं.. कारण खूप टेस्टी होतं.. अर्थात सर्विन्ग डिश कडे न पाहता.. )

हा!!! संपला बाबा एकदाचा हा विचित्र अनुभव...

मात्र माणसाच्या रिवर्स्ड सायकॉलॉजीचा भरपूर उपयोग करून या धंद्यात अफाट यश मिळवणार्‍या ,'चियांग मू' चं कौतुक वाटल्यावाचून राहवलं नाही!!!! Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवघड आहे खरच. जपानात पण असे रेस्टॉरंट होते म्हणे. तैवान मधे आहे. http://en.rocketnews24.com/2011/05/23/modern-toilet-restaurant-from-bowe...

आईस रेस्टॉरंट बद्दल पण ऐकले आहे जिथे सगळेच बर्फाचे बनवलेले असते. भिंती, ग्लास, टेबल, खुर्ची, बार. मुंबईमधे फॅरनहाईट नावाने आहे म्हणे.

You are brave वर्षू!
This is sick.. Sad विचार पण नाहि करू शकत. Sad यक्क.. सूप आणि ice cream तर Sad

अररारारा Happy फोटो बघून कसतरीच वाटतय . वर्षु तुझ्या हिमतीला दाद द्यावी लागेल Happy रेस्टारंन्ट च डेकोरेशन बघा. जिकडे तिकडे कमोड लावलेत. खायचं टेबल मात्र टेबलाच्या आकाराच कस ?ते फ्लश च्या आकारच पाहिजे होत Lol

आयला, काय भारी चमत्कारिक प्रकार आहे! यावरून मनी एक कल्पना आली. पंचतारांकित उपाहारगृहाची रचना आपण रस्त्यावर उभं राहून खातोय अशी वाटणारी करता येईल काय? म्हणजे मध्यवर्ती टेबल हातगाडीसारखे. आसने सार्वजनिक बागेतल्या बाकड्यांसारखी, शेजारी सिमेंटचा ढीग, बनवत उकिरडा, वगैरेवगैरे.

-गा.पै.

<< यावरून मनी एक कल्पना आली. >> गा.पै.जी मलाही ' टॉयलेट'ला मॅचिंग अशी एक कल्पना सुचली होती पण बायकोने डोळे वटारले म्हणून नाही पोस्ट केली !!! Wink

बराच सीक दिसतोय ब्रर्थ डे केक. मला अश्या गोष्टीत काही कप्ल्पकता वाटत नाही. जेवताना चांगले फीलिंग असणे जरूरी असते.
उलट, वाईट बातम्या एकत एकत जेवू सुद्धा नये . अगदी सायंटीफीक कारण आहे त्यामागे वाचलेले.
(क्लिनिक कॅफे आयडिया बेकार.. युरीनरी बोल मध्ये सूप.. वगैरे कहर आहे... )

>>उलट, वाईट बातम्या एकत एकत जेवू सुद्धा नये . अगदी सायंटीफीक कारण आहे त्यामागे वाचलेले>>>> काय कारण आहे? खरंच माहित नाही असं काही असेल असं म्हणून कुतुहलाने विचारत आहे.

तो केक - ज्याने आणला/डिझाईन केला त्यालाच त्यामधे डुबवा. भयंकर आहे. Happy

'पाणी कश्यात देत होते प्यायला?',... हां ते विसरले सांगायला..
पाणी, मॉकटेल्स, जूसेस इ. लिक्विड्स ,टिशू रोल होल्डर्समधे सर्व करतात.

@ कांदापोहे- पहिलं वरिजनल तायवान मधेच उघडलं होतं मू ने!!

तो वरचा बर्थ डे केक... ओएम्जी!!!!!!!!!
सुन्या.. घरून ताटवाटी घेऊन जायचे तरी कष्ट का रे करावेत माणसाने..

मला ही पुनश्च इथे जाण्याचे धाडस होईलसे वाटत नाही.. हीही!!!!!

वर्षु ताई...

तुझी विपु पाहिली... त्या वरुन अर्थ बोध होइना... इकडे बघते तर बापरे !!!!!

सकाळी सकाळी हे दर्शन!!!! ते आइसक्रीम हॉरीबल आहे.... पण मला नाही आवडणार तिकडे जाणे... एकदा एक अनुभव म्हणुन ठीक आहे... बाकी .... तो वरचा केक म्हण्जे अगदीच भयानक.... सिक आहे.....

वरचा केक नाही खाता येणार. 'वेगळ्या' दिसणार्‍या डिशेसमधे अन्नासारखं दिसणारं अन्नं वेगळं आणि टॉयलेटसारखा दिसणारा केक वेगळा.
म्हणजे माझी कपॅकिटी तिथे संपते Happy

''वेगळ्या' दिसणार्‍या डिशेसमधे अन्नासारखं दिसणारं अन्नं वेगळ''.. र्राईट , नी... Happy

Pages