काय मित्रांनो.. चमकला ना हे शीर्षक वाचून???
मला पण अस्सच वाटलं जेंव्हा एका लोकल मासिकात वाचून ,लेक मागेच लागली या आगळ्यावेगळ्या नावाच्या रेस्टॉरेंट मधे घेऊन जायला..
मागच्या वर्षीच क्वांग चौ मधे उघडलेल्या या रेस्टॉरेंट चं नाव वाचून ' ई>> शी>>>' करून झालं होतं, त्याची पुनरावृत्ती करून पाहिली पण लेक बधली नाही.. त्यामुळे नाईलाजाने आम्ही गेलोच पण रस्ताभर बजावत गेले तिला कि मी तिला दारातच सोडून देईन म्हणून..पण प्रत्यक्षात तिथे पोचल्यावर मी ही आत गेलेच.. आतमधे कायकाय पाहायला मिळेल याबद्दल मलाही उत्सुकता वाटतच होती की!!!
साधारणपणे बाथरूम आणी जेवण याचा परस्पर संबंध लावायचा विचार ही डोक्यात कधीच येत नाही नै?? पण तायवानीज ,' चियांग मू' च्या डोक्यात हा विचार आला आणी त्याने ही अफलातून कल्पना प्रत्यक्षात आणली. तायवान मधे लोकांचा जोरदार पाठिंबा मिळाला त्याच्या या अनोख्या थीमच्या रेस्टॉरेंट ला आणी बघता बघता चीनमधे त्याने १४ शाखा उघडल्या..
या रेस्टोरेंट मधे प्रवेश करताच एका मोठ्या बाथरूम मधे शिरल्याचा भास झाला. प्रत्येक टेबल फुल्ल होतं. एक टेबल मिळवून आम्ही बसलो. बसायला खुर्चीऐवजी टॉयलेट सीट होती. मधल्या काचेच्या टेबलाखाली वॉशबेसिन दिसत होतं. आजूबाजूच्या भिंतींवर बाथरोब,टूथ ब्रश स्टँड, नॅपकिन हँगर्स लटकावलेले होते
..
मागवलेल्या चिप्स , लहानशा बाथ टब मधे आल्या
मी मागवलेलं सूप चक्क पॉटीत.. अगदी प्रयत्नपूर्वक दुर्लक्ष करत खाल्लं..
जब ओखली मे सर दिया तो मूसल से क्या डरना ..
सिंक मधे स्टीक
लास्ट बट नॉट द लीस्ट..
किसको हिंमत है ये आईसक्रीम खाने की???
(आम्ही खाल्लं.. कारण खूप टेस्टी होतं.. अर्थात सर्विन्ग डिश कडे न पाहता.. )
हा!!! संपला बाबा एकदाचा हा विचित्र अनुभव...
मात्र माणसाच्या रिवर्स्ड सायकॉलॉजीचा भरपूर उपयोग करून या धंद्यात अफाट यश मिळवणार्या ,'चियांग मू' चं कौतुक वाटल्यावाचून राहवलं नाही!!!!
कल्पनेपलिकडचे! मध्यंतरी
कल्पनेपलिकडचे!
मध्यंतरी कुठेतरी वाचलेले नव्याकोर्या करकरीत बेडपॅन मध्ये अगदी स्वादिष्ट आम्रखंड खयला दिले तर!!! ते खाण्याची कल्पनाच करवली नाही!! हे तर प्रत्यक्ष छे! अतीच!!!
अयाई गं..धन्य तुम्ही
अयाई गं..धन्य तुम्ही ....खानेवाले और खिलानेवाले दोनों भी
Pages