मॉडर्न टॉयलेट रेस्टॉरेंट

Submitted by वर्षू. on 8 January, 2013 - 07:48

काय मित्रांनो.. चमकला ना हे शीर्षक वाचून???
मला पण अस्सच वाटलं जेंव्हा एका लोकल मासिकात वाचून ,लेक मागेच लागली या आगळ्यावेगळ्या नावाच्या रेस्टॉरेंट मधे घेऊन जायला..

मागच्या वर्षीच क्वांग चौ मधे उघडलेल्या या रेस्टॉरेंट चं नाव वाचून ' ई>> शी>>>' करून झालं होतं, त्याची पुनरावृत्ती करून पाहिली पण लेक बधली नाही.. त्यामुळे नाईलाजाने आम्ही गेलोच पण रस्ताभर बजावत गेले तिला कि मी तिला दारातच सोडून देईन म्हणून..पण प्रत्यक्षात तिथे पोचल्यावर मी ही आत गेलेच.. आतमधे कायकाय पाहायला मिळेल याबद्दल मलाही उत्सुकता वाटतच होती की!!!

साधारणपणे बाथरूम आणी जेवण याचा परस्पर संबंध लावायचा विचार ही डोक्यात कधीच येत नाही नै?? पण तायवानीज ,' चियांग मू' च्या डोक्यात हा विचार आला आणी त्याने ही अफलातून कल्पना प्रत्यक्षात आणली. तायवान मधे लोकांचा जोरदार पाठिंबा मिळाला त्याच्या या अनोख्या थीमच्या रेस्टॉरेंट ला आणी बघता बघता चीनमधे त्याने १४ शाखा उघडल्या..

या रेस्टोरेंट मधे प्रवेश करताच एका मोठ्या बाथरूम मधे शिरल्याचा भास झाला. प्रत्येक टेबल फुल्ल होतं. एक टेबल मिळवून आम्ही बसलो. बसायला खुर्चीऐवजी टॉयलेट सीट होती. मधल्या काचेच्या टेबलाखाली वॉशबेसिन दिसत होतं. आजूबाजूच्या भिंतींवर बाथरोब,टूथ ब्रश स्टँड, नॅपकिन हँगर्स लटकावलेले होते


..
मागवलेल्या चिप्स , लहानशा बाथ टब मधे आल्या

मी मागवलेलं सूप चक्क पॉटीत.. Uhoh अगदी प्रयत्नपूर्वक दुर्लक्ष करत खाल्लं..

जब ओखली मे सर दिया तो मूसल से क्या डरना .. Proud

सिंक मधे स्टीक

लास्ट बट नॉट द लीस्ट..

किसको हिंमत है ये आईसक्रीम खाने की???

(आम्ही खाल्लं.. कारण खूप टेस्टी होतं.. अर्थात सर्विन्ग डिश कडे न पाहता.. )

हा!!! संपला बाबा एकदाचा हा विचित्र अनुभव...

मात्र माणसाच्या रिवर्स्ड सायकॉलॉजीचा भरपूर उपयोग करून या धंद्यात अफाट यश मिळवणार्‍या ,'चियांग मू' चं कौतुक वाटल्यावाचून राहवलं नाही!!!! Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर्षूताई Lol तरी तो बाथ टब बरा वाटतोय. बाकीचं विचारुच नकोस !

नशिब, प्यायचं पाणी हवं असल्यास मागचा फ्लश दाबून जवळपास लावलेल्या कॉकमधून पाणी घ्यायचं नाहिये Rofl

मला माझी मानसिकता बदलावी लागेल <<
ओके,पण मी माझी मानसिकता का बदलू??? हा मुख्य प्रश्न आहे.
<<
इफ इट लुक्स लाईक चिकन..
शेवटचा फोटू बघा Sad फुटका टॉयलेट् बोल कुणी तरी त्या च्यांग्मूच्या बोडक्यात मारून फोडलेला दिसतोय. तसाच फेविक्विकने चिकटवून वापरतो आहे असं दिसतंय. टॉक्सिसिटि टेस्ट वगैरे केल्त्या का त्याच्यावर?

जेवण टेस्टी असेल तर मी खाऊ शकेन.
केवळ शेप आणि रंग आहेत डिशेसचे टॉयलेटची आठवण करून देणारे. पण हायजिनिक असणारच ना. Happy

Biggrin
टोटल आचरटपणा आहे. इंटेरियरमधे ड्रेनेज पाईप्सचं पार्टिशन आणि युरिनलमधले लायटींग जबरी Lol

सह्हीये Happy
कल्पक्तेला दाद.... इथे शेयर केल्याबद्दल धन्यवाद..>>>+१

पण ईथे काहीही खाऊ शकणार नाही.>>>>राजेश, मी पण. Happy

ईईईईईईईईईईईईई किती घाण!!! यक्क!! अगदी ओ** येते आहे नुसत्या कल्पनेनं!!
वर्षु नील --- साष्टांग दंडवत!! इथे जाऊन चक्क अन्न खाऊ शकलात तुम्ही!! सलाम!!

पण आयड्या सही आहे. Happy

LOL! काहीपण सुचतं लोकांना. मीपण इथे खाऊ शकणार नाही अजिबात. माझा नवरा आणि मुली खाऊ शकतील पण Happy

आयडीया चांगली आहे पण ते जेवण सुद्धा पुढ्यात आणताना तश्याच आकारातून ... Sad

एके काळी मला सफेद प्लेटस सुद्धा नको वाटायच्या. माझी आजी आजारी असायची तेव्हा सारखे हॉस्पिटल मध्ये जावून जावून नकोसे झाले होते ते पांढरे बोल बघून.

आईसक्रीम तर बिलकूल खाउ शकणार नाही.. त्यात ते सादरीकरण आईसक्रीमचे.. अरे देवा.. Sad

पाणी कश्यात देत होते प्यायला?

शेवटी मानसिकता दूर करायला इथे रोज रोज जावे लागणार तर Proud

मला आधी वाटलं की 'वाट' बघायला लागू नये म्हणून प्रत्येक टेबलाजवळ एक टॉयलेट की काय....कठीण आहे तिथे जाऊन नुसतंच खाणं :-).

माबोकरबी लैच कल्पक.
प्रतिसादातच दोन आयडया बाहेर आल्यात.
एक कम्प्लीट न्यु थीम. (अशोकमामा)
आणि एक त्याच थीम मध्ये मॉडिफिकेशन. (पिण्याच पाणी बाय अश्विनी के)
दोघेही लक्ष ठेवुन रहा बरं रॉयल्टी मागा सरळ कुणी आयडिया ढापली तर.

अयाईईईईईई.. ईथे प्रयत्न करुनही मला खायला जमणार नाही... मला माझी मानसिकता बदलावी लागेल Proud <<< +१ :खिकः

Lol
भारी आयडिया आहे.... मला काही प्रॉब्लेम नाही इथे जेवायला. शेवटी सगळे आपल्या मनाचे खेळ असतात.

आशू, प्यायच्या पाण्यासाठी फ्लश Rofl

भारीच Lol

Pages