काय मित्रांनो.. चमकला ना हे शीर्षक वाचून???
मला पण अस्सच वाटलं जेंव्हा एका लोकल मासिकात वाचून ,लेक मागेच लागली या आगळ्यावेगळ्या नावाच्या रेस्टॉरेंट मधे घेऊन जायला..
मागच्या वर्षीच क्वांग चौ मधे उघडलेल्या या रेस्टॉरेंट चं नाव वाचून ' ई>> शी>>>' करून झालं होतं, त्याची पुनरावृत्ती करून पाहिली पण लेक बधली नाही.. त्यामुळे नाईलाजाने आम्ही गेलोच पण रस्ताभर बजावत गेले तिला कि मी तिला दारातच सोडून देईन म्हणून..पण प्रत्यक्षात तिथे पोचल्यावर मी ही आत गेलेच.. आतमधे कायकाय पाहायला मिळेल याबद्दल मलाही उत्सुकता वाटतच होती की!!!
साधारणपणे बाथरूम आणी जेवण याचा परस्पर संबंध लावायचा विचार ही डोक्यात कधीच येत नाही नै?? पण तायवानीज ,' चियांग मू' च्या डोक्यात हा विचार आला आणी त्याने ही अफलातून कल्पना प्रत्यक्षात आणली. तायवान मधे लोकांचा जोरदार पाठिंबा मिळाला त्याच्या या अनोख्या थीमच्या रेस्टॉरेंट ला आणी बघता बघता चीनमधे त्याने १४ शाखा उघडल्या..
या रेस्टोरेंट मधे प्रवेश करताच एका मोठ्या बाथरूम मधे शिरल्याचा भास झाला. प्रत्येक टेबल फुल्ल होतं. एक टेबल मिळवून आम्ही बसलो. बसायला खुर्चीऐवजी टॉयलेट सीट होती. मधल्या काचेच्या टेबलाखाली वॉशबेसिन दिसत होतं. आजूबाजूच्या भिंतींवर बाथरोब,टूथ ब्रश स्टँड, नॅपकिन हँगर्स लटकावलेले होते
..
मागवलेल्या चिप्स , लहानशा बाथ टब मधे आल्या
मी मागवलेलं सूप चक्क पॉटीत.. अगदी प्रयत्नपूर्वक दुर्लक्ष करत खाल्लं..
जब ओखली मे सर दिया तो मूसल से क्या डरना ..
सिंक मधे स्टीक
लास्ट बट नॉट द लीस्ट..
किसको हिंमत है ये आईसक्रीम खाने की???
(आम्ही खाल्लं.. कारण खूप टेस्टी होतं.. अर्थात सर्विन्ग डिश कडे न पाहता.. )
हा!!! संपला बाबा एकदाचा हा विचित्र अनुभव...
मात्र माणसाच्या रिवर्स्ड सायकॉलॉजीचा भरपूर उपयोग करून या धंद्यात अफाट यश मिळवणार्या ,'चियांग मू' चं कौतुक वाटल्यावाचून राहवलं नाही!!!!
.
.
अय्यो.. मज्जाच खरी..
अय्यो.. मज्जाच खरी..
अरारा.... जाउन बसायला ठिक
अरारा....
जाउन बसायला ठिक आहे पण जेवायचे म्हणजे....
अशी भानगड आहे होय. मला अगोदर
अशी भानगड आहे होय. मला अगोदर वाटल कि या रेस्टॉरंट मधे मॉडर्न टॉयलेट आहे. आयडीयेची कल्पना छान आहे.
(No subject)
अरारा.......... हमनाम तो ये
अरारा.......... हमनाम तो ये है तुम्हारे सेहद का राज अॅटोमॅटीक डायटींग
प्रकाश.. गंमत म्हणजे हे एका
प्रकाश.. गंमत म्हणजे हे एका मॉल मधे स्थित असल्यामुळे रेस्टॉरेंट मधे टॉयलेट नाही..
बरच झालं न्हायतर लोकांची गल्लत व्ह्यायची..
रोहन .. एक अनुभव म्हणून खरंच
रोहन .. एक अनुभव म्हणून खरंच हरकत नाही रे..
हाय रामा... खुप भुक लागली
हाय रामा...
खुप भुक लागली असेल आणि दुसरा ऑप्शनच नसेल तरच इकडे जेवता येइल.
नुसतं बघ्यायला ठीक आहे.
आइसक्रीम खायची हिमंत नाय होणार...
फोटु छान
अयाईईईईईई.. ईथे प्रयत्न
अयाईईईईईई.. ईथे प्रयत्न करुनही मला खायला जमणार नाही... मला माझी मानसिकता बदलावी लागेल
वर्षूतै ये मैने क्या देखा?
वर्षूतै ये मैने क्या देखा?
काय चमत्कारीक कल्पना आहे.
काय चमत्कारीक कल्पना आहे.
सह्हीच आहे. पण ते आईस्क्रीम
सह्हीच आहे.
पण ते आईस्क्रीम नसतं ब्वा खाववलं. वर्षुताई, तुझ्या हिंमतीबद्दल तुला दाद द्यायलाच पाहिजे.
>> वर्षुताई, तुझ्या
>> वर्षुताई, तुझ्या हिंमतीबद्दल तुला दाद द्यायलाच पाहिजे.>>> +१
माझ्या मुलीला आवडेल. तिला
माझ्या मुलीला आवडेल. तिला टॉयलेट मधे चहा घेउन प्यायला आवडत.
मागे डिस्कव्हरीवर पाहिला होता
मागे डिस्कव्हरीवर पाहिला होता कार्यक्रम 'टॉयलेट थीम' असलेल्या रेस्टॉरंटबद्दल.
बाथटब किंवा बेसिन ठीक आहे पण कमोडमध्ये समोर आलेलं खाणं म्हणजे हिंमत पाहिजे
रेस्टॉरंटच्या आत त्यांनी मुद्दामच टॉयलेट ठेवलं नसणार किंवा ठेवलेच तर ते एखाद्या डायनिंग हॉलसारखी रचना असणारे हवे. म्हणजे कसे ते विचारु नका
(No subject)
अरे बाप्रे मी गेले असते इथे
अरे बाप्रे
मी गेले असते इथे तर माझ्या रिअॅक्शन्स पाहून दुसर्यांना पण खावसं वाटलं नसतं
एखाद्या डायनिंग हॉलसारखी रचना
एखाद्या डायनिंग हॉलसारखी रचना असणारे
शिट! आता मला आइस्क्रीम खाताना
शिट!
आता मला आइस्क्रीम खाताना हे समोर दिसेल
पण कल्प्कतेची दाद द्यावीच लागेल
बाकी ठिक आहे पण आईसक्रिम नाही
बाकी ठिक आहे पण आईसक्रिम नाही खाता येणार...
तायडे... I must say u r a
तायडे... I must say u r a brave lady
मू काकांना ही आयडीया टॉयलेट मधेच सूचली असणार बघ ...
इथे अमर्याद जेवण थाळी नक्कीच
इथे अमर्याद जेवण थाळी नक्कीच नसणार .....
"...जब ओखली मे सर दिया तो
"...जब ओखली मे सर दिया तो मूसल से क्या डरना ...."
~ क्या बात है ! मझा आ गया, वर्षू...! मस्तच.
आपल्या मराठीत 'मेलं कोंबडं आगीला भीत नाही....' ची आठवण झाली. बाकी चायनीज कल्पकतेला दाद द्यावी तितकी कमीच म्हणा. खर्या अर्थाने 'मॉडर्न' म्हटले पाहिजे. उद्या तिथे 'मॉडर्न क्रीमेटोरिअम रेस्टॉरंट' निघाले तरी आश्चर्य वाटायला नको....तिथे गेल्यावर मेनू कार्ड घेऊन येणारा वेटर म्हणजे हाडाचे सापळेच असतील....अन् डिशमध्ये मुंडकीच.
बाकी वर्णन आणि सारे फोटो नंबरी आल्येत.
अशोक पाटील
अचरट थीमचं खतरा रेस्टॉरेंट!
अचरट थीमचं खतरा रेस्टॉरेंट!
एरवी टीव्हीसमोर बसून खात असताना टीव्हीवर टॉयलेट्क्लीनरची जाहिरात आली तर हातातला घास खावासा वाटत नाही.
प्रचंड यक्क आहे
प्रचंड यक्क आहे
<<<एरवी टीव्हीसमोर बसून खात
<<<एरवी टीव्हीसमोर बसून खात असताना टीव्हीवर टॉयलेट्क्लीनरची जाहिरात आली तर हातातला घास खावासा वाटत नाही. >>> +१
कल्पक्तेला दाद....
इथे शेयर केल्याबद्दल धन्यवाद..
बागु, प्रसादपंत तुम्हीही
बागु, प्रसादपंत तुम्हीही काही कमी कल्पक नाय..
ईईइइइइइइइइइइइ!!! एरवी
ईईइइइइइइइइइइइ!!!
एरवी टीव्हीसमोर बसून खात असताना टीव्हीवर टॉयलेट्क्लीनरची जाहिरात आली तर हातातला घास खावासा वाटत नाही.>>>> +१ मी आणि माझा भाउ ती अमन वर्माची अॅड लागली की उठून आधी चॅनल
बदलायचो, त्यात वेळेवर रिमोट सापडला नाही तर टीव्हीवरचे कवर खाली सरकवायचो
अयाईईईईईई.. ईथे प्रयत्न
अयाईईईईईई.. ईथे प्रयत्न करुनही मला खायला जमणार नाही... मला माझी मानसिकता बदलावी लागेल >>> +१
Pages