Submitted by अ. अ. जोशी on 31 December, 2012 - 12:24
दर्शनाने नुसत्या जो पावलाय म्हणे..
देव माझ्या स्पर्शाने बाटलाय म्हणे...
भाट गब्बर गाभारी आजकाल दिसे
देव त्याच्या दिमतीला ठेवलाय म्हणे..
एकटी असली की भेटायचे म्हणते
एरवी भाव तिचाही वाढलाय म्हणे
लीलया गुंते सोडविलेस तू सगळे
जीव का माझ्यात अजुन गुंतलाय म्हणे
टोक आता नात्याचे आणखी रुतते
काटकोनाचा कर्णच वाकलाय म्हणे
एवढी का त्याने केली गहाण खतें
पोर आता शाळेला चाललाय म्हणे..
आजही त्याच्या आठवणीत माय नसे..
रोज त्याला घास जरी लागलाय म्हणे..
रंग आभाळाला भगवा कसा चढला
वाघ कोण्या हत्तिणिवर भाळलाय म्हणे
शीर तुटले सीमेवर, पण पुन्हा लढला
घाव पूर्वी प्रेमाचा सोसलाय म्हणे
वेदना उठते आपोआप, हृदय जळे ..
शेर त्याने रक्ताने घोटलाय म्हणे
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दर्शनाने नुसत्या जो पावलाय
दर्शनाने नुसत्या जो पावलाय म्हणे..
देव माझ्या स्पर्शाने बाटलाय म्हणे......वा
.
एकटी असली की भेटायचे म्हणते
एरवी भाव तिचाही वाढलाय म्हणे....क्या बात!
लीलया गुंते सोडविलेस तू सगळे
जीव का माझ्यात अजुन गुंतलाय म्हणे....आह!
टोक आता नात्याचे आणखी रुतते
काटकोनाचा कर्णच वाकलाय म्हणे...हासिले गझल!
शीर तुटले सीमेवर, पण पुन्हा लढला
घाव पूर्वी प्रेमाचा सोसलाय म्हणे......बढीया!
atishay sundar
atishay sundar gajhala.
kaatkon tar ......!!
सुंदर
सुंदर
असे काही वाचले की दिवस छान
असे काही वाचले की दिवस छान जातो
धन्स
एवढी का त्याने केली गहाण
एवढी का त्याने केली गहाण खतें
पोर आता शाळेला चाललाय म्हणे..
आजही त्याच्या आठवणीत माय नसे..
रोज त्याला घास जरी लागलाय म्हणे..
शीर तुटले सीमेवर, पण पुन्हा लढला
घाव पूर्वी प्रेमाचा सोसलाय म्हणे
<<<
आवडले. पोर आता शाळेला, उत्तम वाटला. धन्यवाद.
चांगली गझल... आवडली.
चांगली गझल... आवडली.
सुप्रिया, बैल छाप, अरविंद,
सुप्रिया, बैल छाप, अरविंद, वैभव, बेफिकीर, कैलास
धन्यवाद..!
@ सुप्रिया व बैल छाप जर्दा...
काटकोन आवडल्याबद्दल विशेष धन्यवाद..!
छान
छान
दर्शनाने नुसत्या जो पावलाय
दर्शनाने नुसत्या जो पावलाय म्हणे..
देव माझ्या स्पर्शाने बाटलाय म्हणे...
भाट गब्बर गाभारी आजकाल दिसे
देव त्याच्या दिमतीला ठेवलाय म्हणे..
टोक आता नात्याचे आणखी रुतते
काटकोनाचा कर्णच वाकलाय म्हणे
फार सुंदर गज़ल!!!
रंग आभाळाला भगवा कसा चढला
वाघ कोण्या हत्तिणिवर भाळलाय म्हणे>>> हा शेर नीट कळला नाही. समजवणार का?
अप्रतिम ,झाली आहे गझल
अप्रतिम ,झाली आहे गझल
सुंदर!! अतिशय सुंदर!!
सुंदर!! अतिशय सुंदर!!
वाह! बरेच शेर आवडले
वाह!
बरेच शेर आवडले
सुंदर!!
सुंदर!!
अमोल, मुग्धमानसी, अनिल,
अमोल, मुग्धमानसी, अनिल, प्राजु, रिया, श्रीवल्लभ...
सर्वांना धन्यवाद..!
@ मुग्धमानसी...
रंग आभाळाला भगवा कसा चढला
वाघ कोण्या हत्तिणिवर भाळलाय म्हणे>>> हा शेर नीट कळला नाही. समजवणार का?
(राजकारण....)
धन्यवाद जोशीजी. राजकारणात
धन्यवाद जोशीजी. राजकारणात गती जरा कमीच असल्याने कळला नाही शेर. पण आता व्यवस्थित कळला.
किती शेर कोट करावेत? तरीही हे
किती शेर कोट करावेत? तरीही हे त्यात्ल्यात्यात दिलखेच
भाट गब्बर गाभारी आजकाल दिसे
देव त्याच्या दिमतीला ठेवलाय म्हणे..>> वा, वा... अगदी बोचरे सत्य
एकटी असली की भेटायचे म्हणते
एरवी भाव तिचाही वाढलाय म्हणे>> मला आवडलाच हा...
लीलया गुंते सोडविलेस तू सगळे
जीव का माझ्यात अजुन गुंतलाय म्हणे>> काय बोलावे काय? मस्त मस्तच
टोक आता नात्याचे आणखी रुतते
काटकोनाचा कर्णच वाकलाय म्हणे>> भन्नाट!!!
शीर तुटले सीमेवर, पण पुन्हा लढला
घाव पूर्वी प्रेमाचा सोसलाय म्हणे>> हा अफाट आवडला सर... लाजवाब, खास खास
शाळेत चाललेला पोर लागलेला
शाळेत चाललेला पोर
लागलेला घास
प्रेमाचा घाव
ताकदीचे शेर, आवडलेच.
भाट गब्बर गाभारी आजकाल
भाट गब्बर गाभारी आजकाल दिसे
देव त्याच्या दिमतीला ठेवलाय म्हणे..
लीलया गुंते सोडविलेस तू सगळे
जीव का माझ्यात अजुन गुंतलाय म्हणे
एवढी का त्याने केली गहाण खतें
पोर आता शाळेला चाललाय म्हणे..
क्या बात! मस्त.
टोक आता नात्याचे आणखी
टोक आता नात्याचे आणखी रुतते
काटकोनाचा कर्णच वाकलाय म्हणे
एवढी का त्याने केली गहाण खतें
पोर आता शाळेला चाललाय म्हणे..
>>> व्वा!! व्व्वा!!
मलाही भाळण्याचा शेर कळला नव्हता ..आता कळाला.
एवढी का त्याने केली गहाण
एवढी का त्याने केली गहाण खतें
पोर आता शाळेला चाललाय म्हणे
मस्त शेर.