Submitted by सुप्रिया जाधव. on 29 December, 2012 - 05:10
धाडू नको आमंत्रणे, बेभानता नाही खरी !
उद्ध्वस्त होण्या वादळे नेतात का कोणी घरी
माझ्या-तुझ्या नात्यातले पावित्र्य सांभाळू असे
तू देव गाभा-यातला मी देवळाची पायरी !
तारूण्य, चुंबन वा मिठी... यातील काहीही नको
नुसत्या खयालांनी तुझ्या आरक्त व्हावी शायरी
घालू नको घेवू नको, शपथा निरर्थक वाटती
आजन्म देण्या साथ तू घे जन्म एखादातरी
जे व्हायचे असते जसे होवून जाते ते तसे
तेव्हा तसे का वागलो सांगू नको आत्तातरी
नाणे नकाराचे तुझ्या सर्रास तू खपवू नको
नाण्यास असती दोन बाजू एक झाकावी तरी !
-सुप्रिया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुप्रिया, प्रथम
सुप्रिया,
प्रथम वृत्तहाताळणीतील सहजता व खयालांमधील नावीन्यासाठी भरपूर अभिनंदन! अनेक दिवसांनी तुमच्या गझलेने ताजीतवानी मजा दिली.
धाडू नको आमंत्रणे, बेभानता नाही खरी !
उध्वस्त होण्या वादळे नेतात का कोणी घरी<<< दुसरी ओळ - वा वा
माझ्या-तुझ्या नात्यातले पावित्र्य सांभाळू असे
तू देव गाभा-यातला मी देवळाची पायरी !<<< सुंदर शेर
तारुण्य, चुंबन वा अलिंगन... यातले काही नको (तारुण्य, चुंबन वा मिठी यातील काहीही नको - केल्यास सुलभ व्हावे)
नुसत्या खयालांनी तुझ्या आरक्त व्हावी शायरी <<< मस्त खयाल.
घालू नको घेवू नको, शपथा निरर्थक वाटती
आजन्म देण्या साथ तू घे जन्म एखादातरी<<< दुसरी ओळ सुंदर
जे व्हायचे असते जसे होवून जाते ते तसे
तेव्हा तसे का वागलो सांगू नको आत्तातरी<<< उत्तम! सांगू नको आत्तातरी! वा वा
धन्यवाद!
(वर केलेली सुचवणी ही निव्वळ मैत्रीखात्यातील आहे. गैरसमज नसावा. हल्ली इमानदारीत प्रतिसाद देण्यावरही गझलक्षेत्रातील नामवंत तज्ञ गझल विभागावर धागे काढत सुटले आहेत हे पाहून ही टीप लिहावीशी वाटली).
-'बेफिकीर'!
क्या बात है, क्या बात
क्या बात है, क्या बात है.....
नखशिखांत अप्रतिम गजल..... जियो, जियो.....
सह्हीच!!!!!! सुप्रिया
सह्हीच!!!!!! सुप्रिया ताई.....
धन्यवाद बेफीजी, यतिभंग
धन्यवाद बेफीजी,
यतिभंग होण्यामुळे लय तुटत असल्याची खंत मलाही होतीच पण नेमकाले शब्द सुचत नव्हते .
शशांक , स्मितू आभार!
-सुप्रिया.
सुरेख!
सुरेख!
झक्कास
झक्कास
नुसत्या खयालांनी तुझ्या आरक्त
नुसत्या खयालांनी तुझ्या आरक्त व्हावी शायरी>> खूप आवडलं
आवडली!
माझ्या-तुझ्या नात्यातले
माझ्या-तुझ्या नात्यातले पावित्र्य सांभाळू असे
तू देव गाभा-यातला मी देवळाची पायरी !
मस्त शेर आहे.
गझल आवडली !
गझल आवडली !
व्वा.......!!!
व्वा.......!!!
सर्वांग सुंदर
सर्वांग सुंदर
माझ्या-तुझ्या नात्यातले
माझ्या-तुझ्या नात्यातले पावित्र्य सांभाळू असे
तू देव गाभा-यातला मी देवळाची पायरी !........
यात बरोबरीच्या अलवार नात्याला कुठेतरी धक्का लागतोय असे वाटले
तू कळस मंदिराचा मूर्त मी हृदयांतरी !......
असे काही वृतात गझलेच्या नियमात शब्दात उतरेल का ? मला पडलेला प्रश्न,कसलीही चिकित्सा नव्हे.
अप्रतिम गझल, निर्विवाद सुंदर भावनाविष्कार !
खुप सुंदर! मी तीन तीन वेळा
खुप सुंदर!
मी तीन तीन वेळा वाचली
पहिले तिन आणि शेवटचा शेर तर क्या बात है!
माझ्या-तुझ्या नात्यातले
माझ्या-तुझ्या नात्यातले पावित्र्य सांभाळू असे
तू देव गाभा-यातला मी देवळाची पायरी ! <<< मस्त शेर >>>
---गझल आवडली
माझ्या-तुझ्या नात्यातले
माझ्या-तुझ्या नात्यातले पावित्र्य सांभाळू असे
तू देव गाभा-यातला मी देवळाची पायरी !
घालू नको घेवू नको, शपथा निरर्थक वाटती
आजन्म देण्या साथ तू घे जन्म एखादातरी
जे व्हायचे असते जसे होवून जाते ते तसे
तेव्हा तसे का वागलो सांगू नको आत्तातरी
उत्तम.
माझ्या-तुझ्या नात्यातले
माझ्या-तुझ्या नात्यातले पावित्र्य सांभाळू असे
तू देव गाभा-यातला मी देवळाची पायरी ! व्वा
गझल आवडली
अहाहा..नितांत सुंदर
अहाहा..नितांत सुंदर !!
वादळाचा आणि पायरीचा शेर तर एकदम झकास !!
अत्यंत दर्जेदार, आशयघन व
अत्यंत दर्जेदार, आशयघन व गोटीबंद गझल! प्रचंड आवडली!
अत्तिशय सुंदर गझल!!
अत्तिशय सुंदर गझल!!
खुप खुप मनःपुर्वक आभार!
खुप खुप मनःपुर्वक आभार!
एक अतिशय नाविन्यपूर्ण गझल...
एक अतिशय नाविन्यपूर्ण गझल... सुरेख!
फार सुंदर!!! सर्वच शेर आवडले.
फार सुंदर!!! सर्वच शेर आवडले.
गझल आवडली ! सर्व शेर आवडले.
गझल आवडली ! सर्व शेर आवडले.
क्या बात है, सुंदर! आवडली.
क्या बात है, सुंदर! आवडली.
जबरदस्त ताकदीचं काव्य. खूप
जबरदस्त ताकदीचं काव्य.
खूप आवडलं
सुप्रियाताई, गझल नखशिखांत
सुप्रियाताई,
गझल नखशिखांत आवडली, त्यातही विषम (१, ३ आणि ५) शेर तर बेहतरीन! हॅट्स ऑफ! तुमच्या पुढील काव्यप्रवासाला (स्वार्थी) शुभेछा!
छान आवडली
छान आवडली
खूप सुंदर अर्थ आणि गझल!
खूप सुंदर अर्थ आणि गझल!
छान उतरलेय....आवडली
छान उतरलेय....आवडली
उध्वस्त >>> हा शब्द उद्ध्वस्त
उध्वस्त >>> हा शब्द उद्ध्वस्त असा लिहिला जायला हवाय ना! की गझलेत मात्रा इ. च्या सोयीसाठी ही सूट आहे?
Pages