Submitted by सुप्रिया जाधव. on 29 December, 2012 - 05:10
धाडू नको आमंत्रणे, बेभानता नाही खरी !
उद्ध्वस्त होण्या वादळे नेतात का कोणी घरी
माझ्या-तुझ्या नात्यातले पावित्र्य सांभाळू असे
तू देव गाभा-यातला मी देवळाची पायरी !
तारूण्य, चुंबन वा मिठी... यातील काहीही नको
नुसत्या खयालांनी तुझ्या आरक्त व्हावी शायरी
घालू नको घेवू नको, शपथा निरर्थक वाटती
आजन्म देण्या साथ तू घे जन्म एखादातरी
जे व्हायचे असते जसे होवून जाते ते तसे
तेव्हा तसे का वागलो सांगू नको आत्तातरी
नाणे नकाराचे तुझ्या सर्रास तू खपवू नको
नाण्यास असती दोन बाजू एक झाकावी तरी !
-सुप्रिया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूप सुंदर अर्थ, गझल आवडली !
खूप सुंदर अर्थ, गझल आवडली !
रणजित, वैशाली आणि निवडक १०
रणजित, वैशाली आणि निवडक १० साठी विशेष आभार !
-सुप्रिया.
कालगंगा वृत्ताच्या आधी एक गा
कालगंगा वृत्ताच्या आधी एक गा जास्त जोडला आहे.
... कालगंगा फॅन
आहो का.फॅ. ...नाही!.....
आहो का.फॅ. ...नाही!..... शेवटचाच उचलून आधी लावलाय :अओ:.. माझे वैयक्तिक निरीक्षण!!
Pages