उद्ध्वस्त होण्या वादळे नेतात का कोणी घरी

Submitted by सुप्रिया जाधव. on 29 December, 2012 - 05:10

धाडू नको आमंत्रणे, बेभानता नाही खरी !
उद्ध्वस्त होण्या वादळे नेतात का कोणी घरी

माझ्या-तुझ्या नात्यातले पावित्र्य सांभाळू असे
तू देव गाभा-यातला मी देवळाची पायरी !

तारूण्य, चुंबन वा मिठी... यातील काहीही नको
नुसत्या खयालांनी तुझ्या आरक्त व्हावी शायरी

घालू नको घेवू नको, शपथा निरर्थक वाटती
आजन्म देण्या साथ तू घे जन्म एखादातरी

जे व्हायचे असते जसे होवून जाते ते तसे
तेव्हा तसे का वागलो सांगू नको आत्तातरी

नाणे नकाराचे तुझ्या सर्रास तू खपवू नको
नाण्यास असती दोन बाजू एक झाकावी तरी !

-सुप्रिया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उध्वस्त आणि उद्ध्वस्त या दोन्हीच्या मात्रा समानच आहेत, पण अचूक शब्द जो तुम्ही लिहिला आहेत तोच आहे.

'उद्ध्वस्त'! Happy

तारूण्य, चुंबन वा मिठी... यातील काहीही नको
नुसत्या खयालांनी तुझ्या आरक्त व्हावी शायरी

व्वा व्वा..!

सुंदर खयाली गझल..!

मला नको देवपण, आणि ना तू पायरी ही |
प्रेम खरे तर हवी सोसायची ही तयारी ||

घाबरुन वादळांना सोडलेस तू मला |
नाव बुडाली माझी, तू राहिलि किनारी ||

नाही सोंग येत मला घेता खोट्या प्रेमाचे |
नाही समर्पण, ( तर ) काय देऊळ काय पायरी ||

नको गोष्टी जन्मांतरीच्या, निरर्थक वाटती |
हीच ती वेळ आहे, नाही आत्ता कुणी घरी ||

सुप्रिया, सुंदर गझल. सगळेच शेर आवडले... तरीही, खयालाचा शेर एकदम कातिल Happy
समोर बसून बोलल्यासारखी गझल....
मजा आया.

तारूण्य, चुंबन वा मिठी... यातील काहीही नको
नुसत्या खयालांनी तुझ्या आरक्त व्हावी शायरी >>> हा आणि 'नाणे' वाला शेर विशेष आवडले.

व्वा सुरेख गझल... ही माझी राहिलीच होती वाचायची

पायरी-शायरी फार सुंदर शेर... माझ्यामते तुमचे आत्तापर्यंतचे सर्वोत्तम शेर आहेत हे

मिल्या आपल्या अभ्यासपूर्ण प्रतिक्रियेच्या प्रतिक्षेत असते गझल. Happy

धन्यवाद!

सुशांत, राजीव..

खुप खुप आभार !

-सुप्रिया.

व्वा, फार सुंदर गझल आहे. मतला, पायरी, शायरी आणि नाणे हे विशेष आवडले. ( थोडक्यात सगळीच आवडली. `जन्म एखादातरी' हा सुध्दा आवडला पण हा खयाल तसा जुना आहे म्हणून कदाचित जास्त नसावा भावला )
मतल्यात बेभानता नाही `खरी' च्या ऐवजी `बरी' चालेल का? का तुम्हाला `खरी' हाच अर्थ अपेक्षित आहे? .....

मस्तच अप्रतिम गझल...!!!

फक्त खयालांनी शब्द जरा खटकला विचारानी सारखा चपखल मराठी शब्द असताना तुम्ही उर्दू शब्द का वापरलात हे नाही कळाले. खयाल या शब्दाला वेगळे वजन आहे हे मान्या पण तेवढीच एक ओळ बाकी गझले सारखी ओघवती उतरत नाही असं मला वाटलं.
येवढी बडबड केली या वरुन गझल अप्रतिम आहे हे वेगळ सांगायलाच नको...

<<<मतल्यात बेभानता नाही `खरी' च्या ऐवजी `बरी' चालेल का? का तुम्हाला `खरी' हाच अर्थ अपेक्षित आहे? >>>.....

'बरी' चच बदलून 'खरी' केलय Happy Happy

सत्यजित ,

तोच शब्द जास्त भावला Happy

निविन प्रतिसादकांचेही मनःपुर्वक आभार.

-सुप्रिया.

Pages