Submitted by गोगो on 26 December, 2012 - 04:54
मला बँगलोरमध्ये टू व्हीलर घ्यायची आहे कुठली टू-व्हीलर चांगली आहे? काय काय बाबींचा विचार करून घ्यावी? कृपया मार्गदर्शन करावे.
(या विषयावर आधिच धागा असेल तर हा डिलीट करेन... मला दिसला नाही.)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सायकल घ्या.. सगळ्यात मस्त..
सायकल घ्या.. सगळ्यात मस्त..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
:दिवे:
टू व्हिलर घेताना तिला दोन
टू व्हिलर घेताना तिला दोन चाकं आहेत की नाही ते तपासुन घ्या, नसल्यास घेऊ नये, ब्रेक असण महत्वाचं, एक्सिलेटर मुठीत असावा पायाखाली असल्यास घेऊ नये.
ACTIVA GHYA
ACTIVA GHYA
बरे झाले धागा काढला. मला
बरे झाले धागा काढला. मला सांगा हल्ली १६ वर्षे पुर्ण झाल्यावर लायसंस मिळते ना? नॉनगियर गाडिचे.. यात कुठल्या गाड्या येतात? लिस्ट प्लीजच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला माहीत असलेलं - १६
मला माहीत असलेलं - १६ वर्षावरील पण १८ वर्षाखालील लोकांकरता नॉनगीयर गाडीचं लायसंस मिळतं, पण अट अशी असते की गाडी ५० सीसी पेक्षा वरच्या पॉवरची नको! आता असली गाडीच मिळत नाही!!!
गोगो - आधी हे सांगा की
गोगो -
आधी हे सांगा की कुठल्या टाईपची गाडी हवी आहे?
सर्वसाधारणपणे कुठल्या वापराला घेणार आहात? किती लोक त्यावरून रोज जाणं येणं करणार?
स्कूटर की बाईक
पॉवर किती पाहीजे आहे? १००/१२५/१५०/ का अजून वर
बजेट?
सर्वांत महत्त्वाचं शक्यतो गाडी एकाहाती वापरावी - हे मा वै म...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कृपया हा धागा वाहने आणि वाहक
कृपया हा धागा वाहने आणि वाहक
ह्या ग्रूप मध्ये हलवणार का? ह्या ग्रूप मध्ये धागा चालू करण्यासाठी/ग्रूप मधले धागे दिसण्यासाठी त्या सदस्यत्व घ्यावे लागेल.
तुम्हाला जर फक्त सिटितच
तुम्हाला जर फक्त सिटितच चालवायची असेल तर http://www.yobykes.in/ हा पर्याय कसा वाटतो.
No maintenance. No Fuel cost. Light. Approximately upto 55kmg max speed.
बाकी प्रत्येक मॉडेल प्रमाणे एव्हरेज व इतर गोष्टी बदलतात.
पर्यार कसा वाटला ते सांगा?
मपल्याकडे पल्सर है. १५०
मपल्याकडे पल्सर है. १५० सीसी.
मस्त एकदम.
थँक्स सगळ्यांना. योकु,
थँक्स सगळ्यांना. योकु, लेकीला शाळेत पोचवणे-परत आणणे, बाजारहाट इत्यादी लहान अंतरांसाठी हवी आहे, जेणेकरून रिक्षावाल्यांची दाढी धरायला लागणार नाही आणि बस सर्विस वर चिडचिड होणार नाही...सध्या तरी गरज लहान अंतराकरताच वाटते आहे... कधी २चाकी चालवली नसल्याने अजुन कॉन्फिडन्स नाही, पण नन्तर लांब जाण्यासाठी पण वापरता येइल...
निंबुडा, मी तो ऑप्शन चेक केला आहे. आता दिसतोय का धागा वाहने आणि वाहक ग्रूप मध्ये??? मला नीट माहित नाही... सॉरी...
अभिजीतः हा विचार केला नव्हता... लेट मी थिन्क...
स्कूटर हवी आहे, बाईक नाही
स्कूटर हवी आहे, बाईक नाही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नमस्कार ज्याअर्थी तुम्ही असं
नमस्कार
ज्याअर्थी तुम्ही असं म्हणताय की २चाकी कधी चालवली नाहीये, त्याअर्थी असं धरून चालूयात की तुम्हाला, नॉनगीअर स्कूटर चालेल.
माझ्यामते नॉनगीअर स्कूटर मधे अॅक्टीवा बेस्ट. थोडी जड आहे, पण मग बाकी सगळ्याच बाबतीत मक्खन आहे ती! ५५-६०के मधे होंडा चं एंजीन, दणकट मेटल बॉडी आणि सूपरस्मूद राईड. हा पण गाडी हातात मिळेपर्यंत काही महिने थांबाव जरूर लागेल...
हीरोची प्लेजर पण ट्राय करू शकता. यात एकच प्रॉब्लेम - बॅटरी अॅक्सेस करायला बरेच प्रयास पडतात.
बाकी स्कूटर चा मला म्हणावा तेवढा अनुभव नाही.
मी स्वतः यूनिकॉर्न चालवतो.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आणि हो, याच रेंज मधे असलेली
आणि हो, याच रेंज मधे असलेली टीवीएस ची वेगो, होंडाची एवीएटर, डिओ पण पहा. १२५ सीसीत, अॅक्सेस, महिन्द्रा ची फ्लाईट मिळू शकेल.
महिन्द्रा ची फ्लाईट माझ्या दादांकडे (आजोबा) आहे. अजीबात चांगला अनुभव नाही. तुलनेने बरच पेट्रोल खाते....
यो बाइकच्या नावात जरी बाइक
यो बाइकच्या नावात जरी बाइक असले तरी ती बाइक नसुन स्कुटी आहे. क्रुपया ती लिंक उघडुन एकदा सगळ्या मॉडेल्सवर नजर टाका. अजुन पन एक आहे http://www.ezipp.co.in
व्हेस्पा चे नविन रेट्रो मॉडेल
व्हेस्पा चे नविन रेट्रो मॉडेल पण एकदा बघून या....
पण योकु ने लिहिल्याप्रमाणे अॅक्टिवा मस्तच आहे. घरच्या घरी, जवळपास वापरायला मस्त. मुलांना न्यायला आणायला, बाजारहाट यासाठी योग्य. स्त्रियांना वापरायला पण कंफरटेबल पडते. पण जरा जुनी झाले कि अॅव्हरेज कमी होतो.
अॅक्सेक नक्की ट्राय करुन
अॅक्सेक नक्की ट्राय करुन बघा.. अॅक्टीव्हा पेक्षा चांगली आहे... मुख्य म्हणजे कमी जड आहे
माझ्याकडे महिंद्राची रोडिओ
माझ्याकडे महिंद्राची रोडिओ आहे. बेस्ट एकदम. मध्ये एकदा बॅटरीनेप्रॉब्लेम केलेला पण कंपनी वाल्यांनी दुरूस्त करून दिला फुकटात.
१.अगदी हलकी.
२.माझ्यासारख्या पाच फुटांच्या बाईचे दोन्ही पाय वर बसून आरामात जमिनीला टेकतात.
३. की होल लॉक करता येतं .
४. पेट्रोल भरायला सीट उघडायची गरज नाही की उल ट्या दिशेला फिरवली की समोर असलेल्या टाकीचा नॉब आपोआप उघडतो. याने पेट्रोल्पंपावर अगदी जेंटस बाईक चालविल्याचा स्टायलिश फिल येतोच पण मुलं आणिशॉपिगच्या पिशव्या साम्भाळत बाईक थांबवा, टाकी उघडा असं करावं लागत नाही.
५. बटण स्टार्टआहे
६. अॅवरेज ४०-४५ म्हंजे बरंच आहे.
७. मोबाईल चार्जर सॉकेट आहे
एकच ड्रॉ बॅक की डिजिटल डिसप्ले आहे आणि ते बंद प डलं तर दुरूस्त होत नाही.
इलेक्ट्रिक बाइक तळमजल्यावर रहात असाल तरचचार्जिग करता येते रोजच्या रोज नाहीतर ते वायर एक्सटेम्शनबोर्डची झंझट कोण करणार?
इलेक्ट्रिक बाइकमध्ये सिम्गल सिटर आणि डबल सीटर असे ऑप्शन आहेत.रेटमध्ये १५ -२०००० चा डिफरंस आहे.
सिम्गल सिटरला कर्नाटकात तरी लायसन आणि आर टी ओ रजिस्ट्रेशन लागत नाही पण तुम्हाला मुलाबाळाना घेउन शॉपिंग करायला उपयोगी नाही. डबल सीटर जराशी जड आणि तिला आर टी ओ रजिस्त्रेशन नी लायसंस लागते.
गोगो , तुम्ही वरील मुद्द्याम्चा विचार करा. जवळच्या दोनतीन शोरूमात जाऊन गाडीवर बसुन फील घेऊन बघा.
जी कंफर्टेबल असेल ती बाइक घ्या. ़आजतागायत तुम्हि टु व्हिलर चालवलि नसेल तर गाडी तुम्हाला कंफर्टेबल आणि मॅनेजेबल ' वाटणं' जरूरीचं आहे.
गोगो तुम्ही स्त्री आहात कि
गोगो
तुम्ही स्त्री आहात कि पुरूष ? तुम्हाला वजनाला हलकी गाडी हवी आहे का ? सेल्फ स्टार्टवालीच हवी का ? इलेक्ट्रिक बाईक्स (स्कूटर्सचे ) पर्याय पण उपलब्ध आहेत. जड चालत असेल तर HONDA च्या अॅक्टीव्हा आणि इतर स्कूटर्स चांगल्या आहेत. बाजारहाट करायची असेल तर मग हिरो होंडाची स्कूटरेट घ्या.
व्हेस्पाचा पर्याय पण आहे. तुमचं बजेटही महत्वाचं आहे.
व्हेस्पा चे नविन रेट्रो मॉडेल
व्हेस्पा चे नविन रेट्रो मॉडेल पण एकदा बघून या.... >> ह्याचे लुक्स जबरी आहेत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गोगो तुम्हाला स्कुटरेट उपयोगी आहेत. नॉनगीअर्ड स्कुटर घ्या.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सायकल येत असेल तर गाडी चालवणे सोपे आहे.
माझ्याकडे स्कूटी आहे गेले १०
माझ्याकडे स्कूटी आहे गेले १० वर्षे वापरत आहे. आता ती काढून नवीन घ्यायची आहे.
माझे रोजचे रनींग फार नाही सधारण १२-१५ कि.मी. असते. त्यामुळे पेट्रोल बचत हा महत्वाचा मुद्दा नाही.
खालील मुद्दी जास्त महत्वाचे आहेत.
प्लीज एखादी गाडी सुचवा. नवीन स्कूटी पेप कशी आहे?
स्कुटी पेप चांगली आहे.
स्कुटी पेप चांगली आहे. माझ्यकडे २ स्कुट्या आहेत. माझी गेली ८ वर्षे उत्तम चालली आहे. मुलीचीही उत्तम. वजनाला हलकी व नियमित ठरलेल्या वेळेत सर्व्हिसिंग केले की टकाटक रहाते.
नताशा स्टॅबिलिटी च्या
नताशा स्टॅबिलिटी च्या दृष्टीकोनातून मला वाटतंय की अॅक्टिव्हा किंवा अॅक्सेस १२५ या दोन गाड्या उत्तम आहेत. गाडी जड वगैरे असं काही नसतं, अॅक्सिलरेटर दिला की राजदूत सारखी गाडी सुद्धा पिसासारखी हलकी होते. अर्थात पंक्चर झाल्यावर मात्र मग स्कुटी सुद्धा जडच वाटते. असो... स्पेस डिकी वगैरे यासाठी अॅक्टिव्हा उत्तम. (अॅक्टिव्हाच्या डिकित हेल्मेट मावते) स्कुटी शेजारून जड वाहन गेल्यावर थोडी हलते (माझा अनुभव) अॅक्टिव्हाचे तसे होत नाही.
बाकी यू आर द बेस्ट जज्ज.
हो स्कुटीशेजारून जड गाडी गेली
हो स्कुटीशेजारून जड गाडी गेली की ती हलते. लांबचा प्रवास अभिप्रेत असेल तर नको घेऊस. पण हेल्मेट स्कुटीतही मावते व शहरातल्या ट्रॅफिकमधे स्टॅंडवर लावताना काढताना वजन कमी असलेली गाडी सोयीची पडते.
Yamaha Ray चा अनुभव कुणाला
Yamaha Ray चा अनुभव कुणाला आहे का?
मला looks wise ती खुप आवडली आहे.
व्हेस्पा मस्त आहे. अॅव्हरेज
व्हेस्पा मस्त आहे. अॅव्हरेज सध्यातरी ४५च्या आसपास मिळतं आहे.
बरं झालं हा धागा वर आलाय ते.
बरं झालं हा धागा वर आलाय ते.
मला साधारण पाच ते सहा किमी अंतराच्या रनिंगसाठी (लेकीची शाळा आणि बाजार)यासाठी गाडी घ्यायची आहे. रनिंग गावातल्या रस्त्यांवरून होणारं असल्याने ट्राफिकचा प्रश्न नाही. पण अटींमधे मेंटेनन्स कमी हवा कारण आमच्या गावात गॅरेज नाही..
ऑप्शन देताना ऑन रोड गाडी कितीला पडेल तेपण सांगा, कारण बजेट जास्त जात असेल तर स्कूल व्हॅनचा पण विचार करता येईल.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला सनी ठाण्यात चालवण्याचा
मला सनी ठाण्यात चालवण्याचा अनुभव आहे, सद्ध्या पुण्यात पद्मावतीला रहाते. ऑफिस हडपसरला आहे. सायकल चालवण्याचा अनुभव शून्य. विचारात असलेल्या गाड्या: Activa, Access125, Wego. फारसा अनुभव नसल्याने गाडीच्या वजनाची भीती वाटते (स्वत: वजनदार असून सुद्धा). गाडी घेतली आणि मी चालवली नाही तर नवरा तरी चालवेल असा हिशेब आहे. त्याचा कल पहिल्या २ पर्यायांकडे आहे, ३रा सुद्धा नाही. अनुभव नसल्याने गाडीच्या वजनाची जास्तच चिंता वाटते. योग्य सल्ला हवाय.
प्लेझर नामक गाडी पंक्चर होत
प्लेझर नामक गाडी पंक्चर होत नाही.
काहीतरी टेक्नॉलॉजी आहे टायरची वेगळी. आपोआप पंक्चर सील करते ती गाडी. ४ वर्षे झाली घेऊन. हवा देखिल भरलेली नाहीये आजपर्यंत.
स्पेस साठी ओन्ली स्कूटी. एकदम सुंदर. ग्यास सिलिंडर मावेल अशी एकमेव गाडी. हीपण आहे अजूनही घरी.
अॅक्टिवा जड आहे, अन ओव्हर-हाईप्ड आहे.
ज्या अर्थी मुंबई, पुणे, ठाणे,
ज्या अर्थी मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण, नाशिक, नागपूर, औ.बाद; या सारख्या शहरांत अॅक्टिवांचा सुळसुळाट आहे, त्याअर्थी ती गाडी ओवरहाईप्ड नक्कीच नाही!!
अगदी अगदी. आ*** बापू, अ***
अगदी अगदी. आ*** बापू, अ*** बापू, इ.इ. च्या भक्तांचाही सुळसुळाट दिसतो मला बर्याच शहरांत..
Pages