पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20

या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज्ञाती, मी दलिया कुकरला (भाताप्रमाणे)शिजवुन घेते, त्यानंतर पॅन मध्ये थोडस तुप घालुन दलिया, आणी गुळ घालते, गुळ विरघळला की त्यात दुध आणि वेलची पावडर वैगरे घालते.

हो दलियाच्या निम्मा गुळ हे प्रमाण बरोबर आहे, पण ईकडे कधी कधी गुळ थोडा अगोड असतो त्यामुळे पाऊण वाटी प्रमाण मी घालते.

विद्याक, बनाना नट ब्रेड मिक्स आणायच. त्यात एक कप रात्रभर ऑरेंज ज्यूसमध्ये भिजवून ठेवलेले x-mas fruits, resins घालायचे. आणि मिक्समध्ये ज्या प्रमाणात पाणी सांगितलं असेल त्याप्रमाणात हा ज्यूस घालायचा. एकदम फक्कड फ्रूट केक होतो.

ज्ञाती,दलिया भाजुन दुप्पट पाणी घालुन कूकरमधे २ शिट्या देवुन शिजवायचा नंतर त्यात दुध मिसळुन खिर करायची..गुळ दलियाच्या अर्धा पुरतो.दुध जितके घालाल तितके जिरते..

ज्ञाती, मी ही खीर स्लो कुकर मध्ये करते नेहमी. अजिबात लक्ष द्यावं लागत नाही. चव ही मस्त आटीव लागते.

धन्यवाद आर्च! बनाना नट ब्रेड मिक्स ऐवजी दुसरे कोणते मिक्स घेता येइल? कारण फ्रुट केक ला बनाना ची चव मला नको आहे. डार्क चॉकलेट केक मिक्स् घेतले तर चालेल का? पाण्याऐवजी ज्युस ची आयडिया मस्त आहे.

विद्या, रम इसेन्स घालता येइल जर रम नको असेल तर. पण फ्रूट केक मधील स्ट्फ रममध्ये भिजविलेला असतो त्याचीच वेगळी चव अस्ते बहुतेक. व्हेगन साइट्स वर रेसिपी मिळतील. जसे वेगन थँक्स गिविग असते तसे सर्च मारता येइल.

विद्याक, अजिबात बनाना चव लागत नाही. o.j. असतो आणि इतर x-mas fruits असतात. मी स्टोअरमध्ये मिळणारी mixed x-mas fruits घेते. एकदा करून बघ. नेहेमी करशील. हवं तर थेंबभर व्हॅनिला इसेन्स घाल. खरं तर अजिबात गरज नाही. मी पिकान्सपण तुकडे करून घालते.

आर्च, तु सांगतेस एवढे ठामपणे तर करतेच तसा. मी mixed x-mas fruits, walnuts आणलेत. आता बनाना मिक्स कोणत्या कंपनीचा घेऊ?? Betty Crocker चे चालेल का? कि कोणत्याही कंपनीचे चालेल?
अश्विनीमामी, बरोबर आहे तुझे सगळे mixed x-mas fruits रम मधेच भिजवतातच आणी केक तयार झाल्यावर त्यावर रम टाकुन नंतर तो रम मधे भिजवलेल्या चिजक्लॉथ मधे गुंडाळुन ठेवतात.

विद्यक, Betty Crocker चं चालेल. x-mas fruits बरोबर nuts पण ऑरेंज ज्यूसमध्ये भिजव. आवडला का ते जरूर सांग.

अश्विनीमामी, मी प्रयत्न जरुर करेन. कधी मायबोली वर लिहीली नाही.
आर्च, तु एवढे सांगीतलेस तर चांगलाच होईल. मी नेहमी ठरवते पण कधी केला नाही. म्हणुन जरा भिती वाटते. ह्यावेळी ऑफीस मधे घेउन जायचा आहे. बनाना ब्रेड मी घरी नेहमी करते पण अगदी अंदाजाने सर्व साहीत्य घेते. ऑनलाईन मी काही रेसिपी पाहील्या.. पण बनाना ब्रेड मिक्स वापरुन केलेली रेसिपी काही मिळाली नाही. पण जितका मैदा तितकेच ड्रायफ्रुट्+फ्रुट घ्यायचे हे समजले. पण किती वेळ बेक करु कळत नाही. ३०० टे.वर २ तास करु का?

विद्याक, मिक्स वरचं टेम्प आणि सेटींगच वापरायच. पण वेळ दिलेल्यापेक्षा जास्त लागतो. नेहेमी केक झाला की नाही जसं चेक करतो तसच चेक करायचं, केकच्या खालपर्येंत.

सँडविच चट्ण्यांचा बाफ आधीच आहे का?
डायबेटीस + हार्टपेशंट अशा व्यक्तीला चालणार्‍या सॅ. चटण्या, स्प्रेड सुचवा प्लिज. म्हणजे पटकन ब्रेडला लावुन देता येईल. रोज रोज धीरडी , ओटमिलचा कंटाळा आलाय.

कारळाची, अळशीची, लसणाची ( बिन खोबर्‍याची), पालक + आंबट चुका + मिरची, कोथिंबीर + मिरची,
कढीपत्ता, पडवळाच्या बिया, भोपळ्याच्या साली, डाळं यांच्या कोरड्या चटण्या. बिनसायीच्या दह्यात मिसळून.
मेतकूट पण कांद्याबरोबर मिसळून देता येईल.

ब्रेडपण होलमील असावा.

या काही लो कॅल चटण्या. सँडविचसोबत कशा लागतील माहीत नाही, शक्यतो ताज्या करूनच खाव्यात.

गाजर+लसूण+तिखट+मीठ+लिंबाचा रस मिक्सरमध्ये बारीक करून, वरून अगदी कमी तेलातली मोहरीची फोडणी अशी चटणी.

पुदिना, कोथिंबीर, मिरची, लिंबाचा रस / कैरी, कांदा यांची चटणी

पुदिना - कैरी - कांदा चटणी

लाल / हिरव्या टोमॅटोची चटणी

खजुराची चटणी

मुळा+पुदिना+कोथिंबीर+मिरची+दही+मीठ यांची चटणी.

कैरीचा छुंदा

आवळ्याचे लोणचे.

ओली हळद + आवळा + आले + आंबेहळदीचे घरगुती कमी तेलाच्या फोडणीतले लोणचे.

आमसुलाची चटणी

घोसाळे / पडवळ / दोडक्याचे दह्यातले रायते किंवा साऊथ इंडियन स्टाईलची वरून उडीद डाळ, लाल मिरची, मोहरी, हिंगाची फोडणी घालून चटणी.

भेंडीचे रायते

मेतकुटाचे डांगर.

याशिवाय वेगवेगळ्या भाज्यांच्या देठांच्याही चटण्या केल्या जातात. मला त्यांच्या रेसिपी माहीत नाहीत. पण येथील पाकनिपुण अवश्य सांगू शकतील.

दिनेशदा, अकु, धन्यवाद.
करुन पहाते.
खजुर, लोणचे, छुंदा चालणार नाहीत. इतर बघते.
हो ब्रेड होलवीट ब्रेडच आणते.

सावली, ऑलिव्ह ऑइलमधे ( कोमट करुन ) कच्चा लसूण + मिरी पावडर + लिंबाचा रस असे घालून ठेवायचे.
पावाच्या स्लाईसेस ना तेल तूप न लावता ते भाजायचे आणि मग वरच्या मिश्रणाचा पातळसा थर द्यायचा.
एकदम हेल्दी.

पांढरा रस्सा कसा करतात?
ओपल मधे शाकाहारी पांढरा रस्सा पण असतो. तो म्हणे चिकन/ मटण ब्रॉथ ऐवजी दुध्याच्या रसाचा असतो.
माहीतीये का पाकृ?

नी, लालुच्या रेसेपीमध्ये पुढे प्रतिक्रियेमध्ये दिलंय तिनं शाकाहारी करायचं असल्यास व्हेज ब्रॉथ घाला म्हणून.

आई पांढरा रस्सा करते, तेंव्हा त्यात चिकन /मटणचे तुकडे घालत नाही. ते सुकंच ठेवते आणि चिकन ब्रॉथ किंवा कधीकधी साधं पाणी घालते रस्स्यात.

Pages