उल्का वर्षावानी अवकाशात होणार रंगांची उधळण

Submitted by मी नताशा on 13 December, 2012 - 05:48

सकाळमधील बातमी

उल्का वर्षावानी अवकाशात होणार रंगांची उधळण
- उल्का वर्षाव पाहण्यासाठी सगळ्यात योग्य वेळ १४ डिसेंबर पहाटे पाच
- पूर्व दिशेला ही रंगांची किमया दिसणार
- कोणत्याही उपकरणाशिवाय उघड्या डोळ्यांनीही पाहता येणे शक्य

http://online3.esakal.com/esakal/20121213/5576900825325253597.htm

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आरती....दिनेश...महेश....उदयन...

मला तर आता असे वाटू लागले आहे की आपण आता उल्काचा नाद सोडून देवू या आणि नताशालाच पाह्यला जाऊ या..... ढगोबा वा धुकोबाचा प्रश्नच येणार नाही.

काय रे दैवा.. मी फक्त फोटू बघितलेत.. असले काही सुंदर दृष्य आपल्या आकाशात बघाय्चे स्वप्न कधी साकारणार......................

माझे आईबाबा त्यांच्या लहानपणी अर्धे आकाश व्यापुन राहिलेला धुमकेतू पाहिल्याचे नेहमी सांगत. तो धुमकेतू कोण होता देव जाणे, आईबाबांना तेव्हा धुमकेतूना नावे असतात हे काही माहित नव्हते.

कालांतराने हॅलेचा धुमकेतू आकाशात चमकणार ही बातमी आली, आईबाबांनी आमच्या मनात अर्धे आकाश व्यापुन राहिलेले काहीतरी चमकदार दिसणार ही आशा जागवली.......... पण नशीब फुटके, तो हॅले सगळ्यांना फसवून कुठे निघुन गेला पृथ्वीवासीयांना कळलेही नाही... आताही तसेच होते वाटते. Sad

>>एक ढ प्रश्न!!
>>मृग नक्षत्र कसे ओळखायचे?
आमच्याकडे तर असे अनेक गाढ व ढ प्रश्न आहेत ! अगदी शुक्रतार्‍यापासुन.
सुर्य चंद्र ओळखता येतात फक्त.

अर्धे आकाश व्यापुन राहिलेला धुमकेतू पाहिल्याचे नेहमी सांग >>>>>>>> असा अजुन पर्यंत एक ही धुमकेतु आला नाही Wink
.
.
कालांतराने हॅलेचा धुमकेतू>>>>>>>>>>>अरे हा तर चांगले ५ - ६ दिवस सतत दिसत होता.... तो इतका तेजस्वी होता की दुपारी ४-५ नंतर पश्चिमेला दिसत होतो ... क्षितीजा पेक्षा १० फुट उंच........आपण नाही बघितला ??????

एक गंमत............भारतातुन जसे आकाश दिसते.... तसे दक्षिण गोलार्धातुन नाही दिसत........... जरा वेगळे दिसते. तिथुन आकाशगंगेचा पट्टा सुध्दा दिसतो Wink

साधना,
अवकाश वेध वाल्या सचिनला बोलाव ना इथे. ( बरेच श्रम घ्यावे लागतील म्हणावं ! )

दक्षिण गोलार्धातून वेगळे दिसते खरे पण मला नाही बघता आले. अंगोला दक्षिण गोलार्धात असले तरी फार दक्षिणेला नाही. न्यू झीलंड आहे, पण मी जातो त्यावेळी मोठा दिवस असल्याने, अंधार पडायला खुपच उशीर होतो.

महेश,

माझ्या माहिती प्रमाणे शुक्र तारा हा एक तेजस्वी पांढ-या रंगाचा ग्रह आहे जो कधी सुर्योदयाच्या आधी तर कधी सुर्यास्तानंतर थोडा वेळ दिसतो.

हरवली होती का............. जाहीरात आली नाही "आपण यांना पाहिलेत का ? "म्हणुन Wink

उदय, तोच बहुतेक !
अवकाश वेध छानच साईट आहे. पण इथे खुपदा ढगांमूळे आकाशतलं काहीच दिसत नाही. आज सकाळपासून आतापर्यंत सूर्यच दिसलेला नाही.

पण एखाद्या प्रकाशप्रदूषण मुक्त भागात गेलो, तर एक दोन उल्का रोजही दिसू शकतात !

खरेतर उल्कावर्षावाचा इतका गाजावाजा करूच नये. लोकांना वाटतं पाउस पडतो तशा उल्का पडणार! शिवाय शहरातून बघत असलात तर light polution मुळे जास्त काही दिसणं अवघड आहे. त्यासाठी अंधारी जागा हवी.

अवांतरः उदयन, तुला बहुतेक Magellanic Clouds म्हणायचय, ते फक्त दक्षिण गोलार्धातून दिसतात. त्या छोट्या अनियमित दिर्घिका असून आकाशगंगेभोवती फिरतात. आकाशगंगेचा पट्टा उत्तर गोलार्धातुन देखिल दिसतो. पण अगदी अंधारी जागा हवी. मी शाळेत असताना महाराष्ट्रात blackout झालेला. तेंव्हा बघितल्याचे आठवतंय.

हो इंग्लिश मधे..............मिल्कीवे असे काहीतरी नाव आहे.........उत्तर गोलार्धातुन..नाही दिसत.. जास्त करुन ब्राझील च्या अ‍ॅमेझोन भागातुन व्यवस्थीत दिसते

सॅम, मी पण लहानपणी आकाशगंगा मुंबईतून बघितल्याचे आठवतेय. ( लाईट्स गेले होते त्यावेळी किंवा १९७१ चा ब्लॅक आऊट असणार. )

कुणाचं काय तर कुणाचं काय !

२१ तारखेला मोठी उल्का पडणार आहे आणि त्यातनं तूम्हाला आकाशातला बाप(च) वाचवणार आहे, अशा जाहिराती मला आता इथेच, ( माबोच्या पानावर ) दिसायला लागल्या आहेत.

सुर्य चंद्र ओळखता येतात फक्त. >>> महेश .. Lol बरीच प्रगति आहे म्हणायची की!

सॅम, मी पण लहानपणी आकाशगंगा मुंबईतून बघितल्याचे आठवतेय. ( लाईट्स गेले होते त्यावेळी किंवा १९७१ चा ब्लॅक आऊट असणार. )
>>> आकाशगंगा नाही पाहिली. पण १९७१च्या ब्लॅकआऊटच्या वेळी बंगल्याच्या गच्चीवर आईबाबांच्या मांडीवर बसून खूप विमानं पाहिली. उल्काही बर्‍याचदा पाहिल्यात.

पुढे १२-१३ वर्षांच्या वयात विज्ञानकथा वाचायला लागल्यावर अभ्यासाच्या निमित्ताने गच्चीत जाऊन दुपारभर उडत्या तबकड्याही शोधल्या आहेत. Proud

भाप्र क्र. १
कुकुहोहै म्हंजे कोन्ता पिच्चर?

भाप्र क्र. २
उल्का पहायला अंधार्‍या जागी म्हंजे पलंगा खाली गेलो तर चालेल का?

अंधार्‍या जागी म्हंजे पलंगा खाली गेलो तर चालेल का? >>>>त्यापेक्षा बाथरुम मधे लाईट न लावता बसा........ लय भारी दिसतात राव Wink

अमेरिकेत कधी, कुठल्या दिशेला दिसतील ह्या उल्का? प्लीज सांगा की जरा!

अवांतरः वरती मेन्शन केलेला हॅलेचा धूमकेतू दर ७५ वर्षांनी दिसतो. सर्वात कमी मार्जीननी दिसणारा तो एकमेव धूमकेतू आहे. असो.
तर, उल्का प्लीज!

इथे पहा. : Geminid Meteors to Peak the Night of Dec. 13th

[अवांतरः उदयन आकाशगंगा म्हणजेच Milky Way. हे आपण ज्या दिर्घिकेत (galaxy) आहोत त्याचे नाव आहे. आणि वर सांगितल्याप्रमाणे ती उत्तर गोलार्धातूनही दिसते]

Pages