युक्ती सुचवा युक्ती सांगा- ३

Submitted by पूनम on 8 October, 2012 - 05:41

स्वयंपाकघरातील युक्ती सांगण्यासाठी आणि सुचवण्यासाठी हा तिसरा बाफ.

नवीन प्रश्न विचारण्याआधी ह्याआधीचे दोन धागे पहायला विसरू नका :

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरदा, नुसते केले तर उग्र लागतात चवीला. त्यात भरपूर कांदा / पालक / क्रीम असे घालावे लागेल.

कसे लागतील ते असं कसं सांगणार? शांपल पाहिजे. सीम्स लाइक अ बॅड आयडिया दो.

ह्म्म्म, बघते काय काय घालता येईल ते. Happy

अमा, शांपल द्यायचं असलं तर अशा प्रयोगांचं नाही देणार तुम्हाला. मला खात्रीने जमणार्‍या पदार्थांचं देईन हां.

अल्पना,दिनेशदा,टुन्टुन्,मेधा आभारि आहे Happy Happy

मला वाटले,जेव्हा शेगडिवर एखादा खाद्यपदार्थ बेक करतो तेव्हा खाण्याचा सोडा वापरतात आणि ओवनमध्ये बेक करतो तेव्हा बेकिंग सोडा वेगळा असा वापरतात Happy माझे अज्ञान Sad
तर खाण्याचा सोडा आणि बेकिंग सोडा एकच असतात

नो, खाण्याचा सोडा आणि बेकिंग पावडर, असे शब्द वापरायचे. खाण्याचा सोडा यात एकच क्षार असतो तर बेकिंग पावडरमधे, काहि क्षार आणि स्टार्च यांचे कोरडे मिश्रण असते. त्यातल्या स्टार्च मूळे, ती वापरायचे प्रमाण जास्त असते. ( जास्त प्रमाणात वापरावी लागते ) खायच्या सोड्याचे बाकी उपयोग आहेत ( फ्रीजचा वास घालवण्यासाठी वगैरे ) पण बेकिंग पावडर फक्त त्याच कामासाठी वापरता येते.
पापडखार पण याच वर्गातला. तो मात्र जास्त तपमानाला कार्यरत होतो.

सोमवारी इंदुरी स्टाईलचे किंवा मध्य प्रदेश स्टाईलचे ''पहुवा'' (म्हणजे आपल्याकडचे फोडणीचे पोहे) कसे करतात ते पाहायला मिळाले व खायलाही मिळाले!

खूप छान पद्धत आहे त्यांची. एक तर कालीमूछ प्रकारचे तांदूळ असतात त्यांपासून बनवलेले हे सुंदर प्रतीचे सुवासिक पोहे असतात व त्यांची मूळ चवच अप्रतिम असते. त्याशिवाय कृतीतही थोडा वेगळेपणा आहे. परंतु मुद्दाम वेगळी पाककृती देण्याइतपत नाविन्य नाही, म्हणून इथेच त्यामागची युक्ती देत आहे. पोहे भिजवताना किमान अर्धा तास भिजवतात, त्या पोह्यांतच मीठ, साखर व हळद मिसळतात. एकीकडे आधणाचे पाणी एका जाड बुडाच्या पातेल्यात उकळत ठेवायचे. दुसरीकडे तेलाच्या फोडणीत मोहरी, चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा, दाणे वगैरे परतले की त्यात हे पोहे घालायचे व जरा परतायचे. नंतर पोह्यांची कढई आधणाच्या पातेल्यावर ठेवून पोहे परतून त्यांवर झाकण ठेवायचे व वाफ आणायची. किमान दहा मिनिटे झाकण ठेवून त्यांना आधणाच्या उकळत्या पाण्याच्या पातेल्यावर ठेवायचे. आवडते त्याप्रमाणे भरपूर कोथिंबीर घालायची. अशा प्रकारे केलेल्या पोह्यांचा दाणा अन् दाणा उमलतो, जराही वातड होत नाहीत, हळद अगोदरच घातल्याने रंग व स्वाद दोन्ही वेगळेच लागतात. पोहे ताटलीत वाढताना कायम कढईच्या तळातले वाढायचे. वरून हवे असल्यास लिंबू पिळायचे.

अशा प्रकारे केलेले ''पहुवा'' मध्य प्रदेशात तुम्हाला कोणत्याही ढाब्यावर, उपाहारगृह किंवा खानपानसेवेच्या ठेल्यांवर डोंगर करून रचलेले दिसतील. खास करून सकाळी. आणि त्यांवर सजावटीसाठी भुरभुरलेले किसलेले सुके खोबरे! सोबत गरमागरम केशरी-लाल इम्रती आणि लोखंडी कढईत उकळलेले वाफाळते शक्कर मिलायके दूध!

वेका, थँक्स! फोडणीच्या पोह्यांसाठी वापरतो तसेच जाडे पोहे होते हे. पण गुणवत्ता, सुवास व चव यांमध्ये सरस वाटले. Happy

>>सोमवारी इंदुरी स्टाईलचे किंवा मध्य प्रदेश स्टाईलचे ''पहुवा'' (म्हणजे आपल्याकडचे फोडणीचे पोहे) कसे करतात ते पाहायला मिळाले व खायलाही मिळाले!>><<
माझ्या आजोळी बनतो हा प्रकार... पोह्याची चवच वेगळी असते.
तसाच तांदूळाचा प्रकार कलकत्याला मिळतो.. कालाजीरा तांदूळ. मस्त असतो हा भात व त्याचे पोहे.

पोहे भिजवताना किमान अर्धा तास भिजवतात, त्या पोह्यांतच मीठ, साखर व हळद मिसळतात. >> हे असे नेहमीच्या कांदेपोह्यांना पण करू शकता. आय मीन मी कायम असेच करते. यामुळे पोह्यांना छान रंग येतो. मीठ साखर पोह्यांना नीट लागतं शिवाय फोडणीमधे हळद जळण्याची शक्यता पण कमी होते.

पहिल्यांदाच मेदूवडे करणार आहे. काही टिप्स? तळायचे कुठल्या आंचेवर? तरला दलाल च्या http://www.tarladalal.com/Medu-Vada-%28-South-Indian-Recipe%29-32683r रेसिपीने करतेय. (निळी शाई गंडली आहे Sad )

मुख्य शंका म्हणजे, अंगठ्याने भोक पाडून घ्या असं लिहिलंय. पीठ थोडं तरी घट्ट हवं दहीवड्यापेक्षा, तर मग कमित कमी पाणी घालून नीट वाटलं जातं का? मी आमटीची एक वाटी सपाट भरून भिजत घातली आहे डाळ. प्रयोगच आहे म्हणून ७-८ वड्यांचं प्रमाण आहे साईटवर ते तसंच ठेवलंय. तर मग किती पाणी लागेल? अगदी चमचाभर पाण्यात त्याचं सार नाही ना व्हायच? अगदी बेसिक आहे हे, पण मी इडली-डोश्यासाठी पीठ वाटायला सरावले आहे, हे पीठ नंतर तळ्णीत पडायचं असल्यामुळे शंकाच फार!

भरत, तिथे ढाब्यांवर, उपाहारगृहांमध्ये जिथे तिथे जो पोह्यांचा डोंगर रचलेला दिसतो त्यावर किसलेले सुके खोबरेच होते. परंतु मी ज्या काकूंच्या हातचे पोहे खाल्ल्ले त्यांनी त्यावर तिखट रतलाम शेव घालून ते खायला दिले. आहा!! Happy

अकु, तरीच इंदुरी लोक अभिमानाने म्हणतात, पोहे खावे तर त्यांच्याकडचेच ( बेळगावी पण तसेच म्हणतात. )

प्रज्ञा, डाळ वाटताना पूर्ण निथळून वाटायची. भिजलेली असते त्यामूळे वाटली जाते. अगदी मिक्सर जाम झाला तरच चमचाभर पाणी घालायचे. अंगठ्याने भोक पाडायचे पण पिठ अगदी घट्ट लाडू वळण्यासारखे नसते.

चमचाभर पाण्यात त्याचं सार नाही ना व्हायच?>> नाही, मिक्सरमधे वाटायला लागलीस की अंदाज येइल तुला. पण सुरूवातीला पाणी घालूच नकोस. तशीच भिजलेली डाळ फिरवून घे. मग अगदीच वाटलं तर एखादा चमचा पाणी घाल.

रूब्बीमधे वाटताना अजिबात पाणी घालावे लागत नाही.

अरुंधती, तू लिहिल्याप्रमाणे काल मी केले बरं का 'पहुआ'. एकदम मस्त टीप तू शेअर केलेली आहेस, त्याबद्दल तुला अनेक अनेक धन्यवाद. काल पोहे फोडणीला टाकल्यावर ढवळून अख्खी कढईच डबल बॉयलरला ठेवली Wink एरवी पाहुण्यांसाठी पोहे करताना कोरडे होऊ नयेत किंवा घशाला लागू नयेत म्हणून तेल जरा जास्तच घालावं लागतं. पण हे अश्या पद्धतीने करताना तेल अजिबात जास्त घालावं लागलं नाही. मस्त अगदी गिल्ट फ्री पोहे झाले.
मंडळ आपलं मनःपुर्वक आभारी आहे Wink

मला टोस्टर बद्दल प्रश्न आहे. आता कुठे विचारावे कळेना म्हणुन इथे विचारतेय.
टोस्टर घ्यावा का?
किती उपयोग होतो?
फिलिप्स की मॉर्फी रिचर्ड?

टोस्टर ऐवजी सॅन्डविच मेकर असा ऑप्शन असु शकतो का?

प्रज्ञा९ | 14 December, 2012 - 15:15 नवीन
ओके!
जमला प्रयोग तर फोटो टाकेन
<<

शेप जमलाच पाहिजे असं टेन्शन न घेता करा वडे.
भजी केलीत तरी चालतील. चव ती आली पाहिजे फक्त Wink

टोस्टर ऐवजी सॅन्डविच मेकर असा ऑप्शन असु शकतो का? >> नाही. दोन्हीचा परपज वेगळा आहे. माझ्याकडे टोस्टर पडुन आहे. क्रिस्प टोस्ट पेक्षा आम्हाला स्टफ्ड सॅन्डविच किंवा नुसत्या बटर लावलेल्या खरपुस भाजलेल्या स्लाइसेस जास्त आवडतात. टोस्टर पेक्षा सॅ. मेकर मला जास्त उपयोगी वाटतो.

मनिमाऊ ला अनुमोदन.
माधवी
हा असा दिसतो सॅ.मे.

sandwich_maker.jpg

यात प्रसंगी आपण पोळीत भाजी घालून सुद्धा ते सॅ सारखं खाऊ शकतं. स्टार सी जे वर तर यात ऑम्लेट आणि कबाब करून दाखवतात. Uhoh

मनी इज राइट. टोस्टर मध्ये फक्त आणि फक्त ब्रेड उत्तम टोस्ट करून बटर, मार्मलेड लावून खायचे.
सँ मेकर मध्ये तर्‍हे तृहेचे सँडवीचेस बनविता येतील. दोन्ही घ्या.

धन्स मनिमाऊ,दक्षिणा, अमा;
दक्षिणा फोटो दिसत नाहिये.
अमा - दोन्ही घ्या >> Happy

म्हणजे सॅ मे मधे पण ब्रेड टोस्ट होऊ शकतो ना? मला फार आवडतो भरपुर बटर लावून टोस्ट केलेला ब्रेड Happy

दक्षिणा आता दिसतोय फोटो

दक्शिणा माझ्याकडे अशाच प्रकारचे सँ मेकर आहे पण ब्रेड मध्ये फिलिंग टाकले कि ते बंदच होत नाहि
जबरदस्ति बंद करण्याचे प्रयत्न केला तर सँ.मधुन सगळे फिलिंग बाहेर येते

Pages