Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20
या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कस्टर्डचं बघते. नाताळ आलाय पण
कस्टर्डचं बघते.
नाताळ आलाय पण काळा गूळ आला नाहीये अजून असं कळलंय. विपु बघा
चिऊ, विपूत कसं करायचं याची
चिऊ, विपूत कसं करायचं याची कृती देते.
नीरजा कस्टर्ड + केकचे तुकडे +
नीरजा कस्टर्ड + केकचे तुकडे + आईस्क्रीम स्कूप + फळांचे तुकडे + जेली असा प्रकार देखील जबरी लागतो चवीला. कस्टर्ड, जेली, फळांचे काप हे करायला लागेल. बाकी फक्त असेंबल करणे व देणे.
जेली... दॅट गिव्हस मी अ होल
जेली... दॅट गिव्हस मी अ होल न्यू आयडीया... जेलो शॉटस....
नो बेक मॅन्गो पाय करुन पाहा.
नो बेक मॅन्गो पाय करुन पाहा.
ही पाकृ कुठे मिळेल?
ही पाकृ कुठे मिळेल?
ख्रिस्मस येत आहे ... ह्या
ख्रिस्मस येत आहे ... ह्या वेळेस मला अगदी औथेंटिक ख्रिसमस मेनु खायचा आहे .. जसे रोस्ट टर्की,
Cranberry sauce, Turkey gravy, केक वगैरे ...
मुंबइ मधेय कुठे मिळेल ?? specially bandra hill road etc ..
घरगुती कुणी बनवत असेल व पार्सेल मिळत असेल तरी चालेल ..
नीधप, इथे आणि इथे पाहा. मी
नीधप, इथे आणि इथे पाहा.
मी करते त्या मॅन्गो पाय मध्ये क्रीम चीज सुद्ध घालते. (रेसिपि गुगल साभार.)
pie crust मिळत नसेल तर नुसते एका बेकिग डिश मध्ये सेट करुन ठेवा. मग वरुन किवी फ्रुट चे काप लावायचे.
चिऊ: थोडेसे कोरडे पण टिकाउ
चिऊ:
थोडेसे कोरडे पण टिकाउ असे पदार्थ पण बाळंतिणिला खूप सोयीचे होतात. उदा. वेगवेगळे लाडू, सांजाच्या वा खव्याच्या पोळ्या. माझ्या आईने खारीक, बदाम, अळीव, खसखस याची भरड पूड, त्यात वेलदोडा पूड, केशर घालून फ्रिज मध्ये "खिर्-मिक्स"करून ठेवल होत. पाहीजे तेव्हा गरम दुधात, चवीपुरती साखर घालून प्यायच. खूप उपयुक्त होत.
तुरीच्या शेंगांचे काय प्रकार
तुरीच्या शेंगांचे काय प्रकार करता येतील?
पिवळ्या रंगांची फुले होती (आता हाताशी फोटो नाहिये), बहुतेक तुरीच्या शेंगाच असाव्यात असा अंदाज आहे
तुरीच्या शेंगा मीठ घालून
तुरीच्या शेंगा मीठ घालून कुकरमध्ये उकडून खायच्या. मस्त लागतात.
तुरीच्या दाण्यांची आमटी करता येते. स्वप्नानी कालच रेसेपी टाकलिये. दाणे परतून ठेचून त्याचं पिठलं पण करतात. भोगीच्या वेळच्या मिक्स भाजीमध्ये पण घालतात तुरीचे दाणे.
कुणाला गुळ घालुन मोरावळा कसा
कुणाला गुळ घालुन मोरावळा कसा करतात ते माहीती आहे का?
जुन्या माबो वर मोरावळ्याची रेसीपी आहे पण ती साखर वापरुन आहे. मला गुळ वापरुन करायचा आहे.
गाजराची भाजी कशी करायची?
गाजराची भाजी कशी करायची? पाककृती हवी आहे.
सँडविचला लावण्यासाठी खोबरं
सँडविचला लावण्यासाठी खोबरं आणि शेंगदाणे न वापरता होतील अशा २-३ चटण्या सुचवा(च) कृपया..
सध्या मी मिरच्या आणि कोथिंबिर इतकंच घालून चटणी केली आहे, लौकरच त्याचा कंटाळा येईल.
कोथिंबीर-पुदिना समप्रमाणात
कोथिंबीर-पुदिना समप्रमाणात त्यात लसूण, आलं, हि मि, मीठ आणि चिमूटभर साखर.... मिक्सर गर्रर्रर्र.. चटणी तयार.
टोमॅटो चटणी चालतेय का? माझी रेस्पी टाकेन दोन-चार दिवसात.
नी, तेल घालावं लागत नसेल तर
नी, तेल घालावं लागत नसेल तर टोमॅटो चटणी चालेल.
कैरीची लाल चटणी, पुदिन्याची
कैरीची लाल चटणी, पुदिन्याची चटणी, इडलीची डा़ळ्याची चटणी, पालकाची चटणी, गाजराची चटणी, कच्च्या टोमॅटोची चटणी, दुधीच्या सालीची चटणी, दोडक्याच्या शिरान्ची चटणी, कढीपत्त्यची चटणी.
माझ्या रेस्पीत थेंबभरच तेल
माझ्या रेस्पीत थेंबभरच तेल आहे. टाकेन रेस्पी.
दक्षिणा, (पित्त होत नाही हे
दक्षिणा, (पित्त होत नाही हे गृहीत धरून), तेल नको म्हणून टाळत असलीस तरी शेंगदाण्याची चटणी आवश्य खा. माहिती असलेल्या, सँडविचसाठी ओल्या चटण्या, खोबरं-शेंगदाणे नवापरता:
-डाळं-चिंच-कढीलिंब चटणी,
-वाळलेल्या टोमॅटोची चटणी
-बदाम-हिरव्या मिर्च्या-पुदिना चटणी
-हमस (यात कोथंबीर्/मनुका/लालमिर्च्या वगैरे घालून व्हेरिएशन्स)
-सिमला मिर्चीचे, भाजून, कुस्करून, चक्क्यात मिसळलेले तुकडे-तीळ याचं एक स्प्रेड.
-याच चक्क्यात हव्या तश्या बारिक चिरलेल्या भाज्या, कांदा, किंवा वाटलेली कोथिंबीर्-मिर्ची घालून स्प्रेड.
-वाफवलेले ताजे मटारदाणे, त्यात लिंबाचारस, हिरव्या मिर्च्या, ताजं आलं वाटून.
सोनाली, गाजर- मटर भाजी
सोनाली, गाजर- मटर भाजी http://www.maayboli.com/node/39584
दक्षिणा: आंब्याच्या लोणच्याचा
दक्षिणा: आंब्याच्या लोणच्याचा खार.
काल चायनीज वडापाव खाल्ला.
काल चायनीज वडापाव खाल्ला. आवडला. कुणाला रेसिपी माहित असेल तर शेअर करा
नी, नंदिनी, मृण्मयी रेस्पी
नी, नंदिनी, मृण्मयी रेस्पी लौकर द्या.
अमा खारात तेल असेलच ना?
मी गौरी> गेल्यावर्षी मी हायपर
मी गौरी>
गेल्यावर्षी मी हायपर सिटी मधुन रोस्टेड टर्की आणलेली. पण टर्की बरीच मोठी आसते आकाराने. संपता संपत नाही. भरपुर माणस असतील तरच गो फॉर इट. नाहीतर सरळ ख्रीसमस बुफेला घेउन जा सगळ्यांना.
दक्षे, कशाची रेसिपी हवी
दक्षे, कशाची रेसिपी हवी आहे?
रूचिरा आहे का तुझ्याक्डे? त्यात या बहुतेक चटण्या आहेत. मात्र, परतून घेताना नॉनस्टिकपवर परतून घे. अजिबात तेल वापरू नकोस. (ओगले आजी डावभर तेल वगैरे सांगतात.)
दक्ष, तळवलकर- कॅम्पमधे खाली
दक्ष, तळवलकर- कॅम्पमधे खाली त्यांचा स्नॅक्-ज्युस बार आहे. तिथलं सॅन्डविच फार मस्त लागतं, म्हणुन मी तिथल्या बाईला रेसिपी विचारली होती. पालक, मिरची, लसुण, कोथिंबीर, एखादा चमचा कोणतंही मोडाचं धान्य ( थिकनेस साठी), हवं तर आलं, अशी हिरवीगार पेस्ट लावतात ते. मग सॅन्डविचमधे नेहमीच्या गोष्टी घालुन ती ग्रील करायची. फार टेस्टी असतात. ( बटाटा, बटर आणि चीज अजिबात नसुनही. )
अशी चटणी बनवायची कोथिंबीर ,
अशी चटणी बनवायची कोथिंबीर , पुदीना, हिरवी मिरची, आलं, लिंबू रस, बेसिल. मग ह्याची पेस्ट लावायची एका बाजूला.मग त्यावर काकडी ,काकडीवर चाट मसाला, मग टोमॅटो,बीट्,चाट मसाला, अवाकडो, मग पालक. थोडं चीज(कधी तरी) मस्त लागते.
सफरचंदाची चटणी पन मस्त लागते.
हि रेसीपी नाही( टिप आहे)
नंदिनी आहेत माझ्याकडे ओगले
नंदिनी आहेत माझ्याकडे ओगले आजी (चांगल्या दोन दोन)
ते ही रेफर करीन. धन्यवादच.
लक्षातच आलं नै माझ्या
धन्यवाद अल्पना
धन्यवाद अल्पना
दलियाची ़ खीर करायची आहे.
दलियाची ़ खीर करायची आहे. दलिया थोडा वेळ भिजवून गुळ घालून प्रेशर पॅन मध्ये शिजवता येइल ना?
शिजवताना गुळाचे प्रमाण किती घ्यावे? याहून सोपी कृती आहे ़ का?
Pages