उठला दुरावा दोन टोकाच्या मनांचा
पाऊसही पडला हिशेबी आसवांचा
बोलाविताना हातचा राखून होती
तो बांध फुटला भेटल्यावर काळज्यांचा
होतीस तू इतकी जवळ? कळलेच नाही...
मी घेतला आस्वाद माझ्या भाकऱ्यांचा
उपहास, चेष्टा, वल्गना मी जोजवीतो
आहे तुझा, आहे तसा मी वेदनांचा
चमकून जाते वीज कडकड सांजवेळी
धिक्कार होतो आजही प्रेमी जनांचा
धरणे नको बांधू प्रवाही भावनांवर
सुटलाय केंव्हा प्रश्नही निष्कासितांचा ...?
गोडी कशी देऊ मनाच्या वावरातुन
जळलाय सारा ऊस माझ्या भावनांचा
नाते कसे जुळते पहा विराहातसुद्धा
प्रत्येक अश्रू होत होता पापण्यांचा
नाती नव्याने रंगवा, सजवा कितीही ..
राहून जातो माग ढलपे पोपड्यांचा
शत्रूस केले ठार, पण जखमा चिघळल्या
सोसू न शकलो वार साधा आतल्यांचा
तुटल्यावरी कोठे पुन्हा जुळतात नाती ?
नसतेच जीवन खेळ पत्ते-बंगल्यांचा
न्यायालयी फिर्याद केली फसविल्याची
झालो सखा मी हेलपाटे घातल्यांचा
बोलू नका, रागे भरा की वाद घाला...
तोडू नका विश्वास अपुल्या माणसांचा
स्वातंत्र्य जे होते हवे मागू न शकलो
वर्षाव जो झाला गुलाबी बंधनांचा
ठेवीत नाही नोंद आता भेटल्याची
भोगीत आहे त्रास पूर्वीच्या खुणांचा
वाहूनही अस्तित्व नसणे चूक नाही
सागर किनारी थांग असतो का नद्यांचा ..?
मैत्री नि प्रेमाची कशी तूला करू मी ?
श्रुंगार जो केलास दोन्ही पारड्यांचा
चुकणार निश्चित मार्ग अन बुडणार नौका
राखू न शकली मान जर ठरल्या दिशांचा
माणूस आहे एवढे आहे पुरेसे
भक्तीत यावा प्रश्न का संबंधितांचा ?
दुथडी भरे जो आमची पिकवून सोने
जमवीत आहे मेळ पुढच्या तारखांचा
बांधून मंडप काय मोठे साध्य होते..?
हृदयांत गाभारा असे ज्या देवतांचा...
माणूस जगतो की कुणी जगवीत असते...
की खेळ आहे फक्त हलत्या बाहुल्यांचा ..?
होतास प्रामाणिक तसा अजुनी रहा तू..
होतो अजय, केंव्हा विजय खोटारड्यांचा
-------------------------------------------------
मद्यालये भरली रिकाम्या माणसांनी
काबाडकष्टी राहिला मालक भुकांचा
हृदयांत मी आहे तुझ्या, चिंता कशाला..?
का उठविला तू प्रश्न नसत्या स्मारकांचा ?
स्वातंत्र्य, समता काय असते हे समजले..
पाहून अश्रू जाळलेल्या पुस्तकांचा ...
बघ, उंच गझलांची सुरू झाली कहाणी
संयम किती तगडा असे या वाचकांचा
प्र क टा आ
प्र क टा आ
उठला दुरावा दोन टोकाच्या
उठला दुरावा दोन टोकाच्या मनांचा
पाऊसही पडला हिशेबी आसवांचा
धरणे नको बांधू प्रवाही भावनांवर
सुटलाय केंव्हा प्रश्नही निष्कासितांचा
गोडी कशी देऊ मनाच्या वावरातुन
जळलाय सारा ऊस माझ्या भावनांचा
ठेवीत नाही नोंद आता भेटल्याची
भोगीत आहे त्रास पूर्वीच्या खुणांचा
स्वातंत्र्य, समता काय असते हे समजले..
पाहून अश्रू जाळलेल्या पुस्तकांचा ...
हे शेर आवडले....
स्वयंसंपादित......
स्वयंसंपादित......
कैलास, धन्यवाद..!
कैलास,
धन्यवाद..!
स्वयंसंपादित.....
स्वयंसंपादित.....
एकंदरीत छान वाटली गझल...
एकंदरीत छान वाटली गझल...
माझा आधीचा प्रतिसाद आपण
माझा आधीचा प्रतिसाद आपण वाचलात आता त्याचे काम संपले यास्तव काढून टाकला आहे
काही शेर बरे आहेत अनेक मिसरे छान आहेत याबद्दल मी म्हणालो ते विसरलात!!
...............ओके ; असो !
अनेक शेर आवडले. गझल आवडली.
अनेक शेर आवडले. गझल आवडली.
न्यायालयी फिर्याद केली फसविल्याची
झालो सखा मी हेलपाटे घातल्यांचा
हा सर्वात आवडला.
गझलेच्या लांबीवरून फिराक गोरखपुरींच्या काही गझला आठवल्या. फिराकच्या काही गझला बर्याच मोठ्या आहेत.
अ.अ. जोशी गझल दीर्घ आहे हे
अ.अ. जोशी
गझल दीर्घ आहे हे खरंच. सुरुवातीचे तीन चार शेर वाचून मतल्यावर जसजसा विचार केला तसतसा त्याच्या अर्थाने नि:शब्द होत गेलो. जबरदस्त !!!!!! सध्या त्याच्याच आनंदात आहे. पुढचे पुढे..
'दुरावा उठला' हे समजले
'दुरावा उठला' हे समजले नाही.
तेवढे सोडले तर मतला जबरदस्त!
दुसरी ओळ फारच आवडली.
उपहास, चेष्टा, वल्गना मी
उपहास, चेष्टा, वल्गना मी जोजवीतो
आहे तुझा, आहे तसा मी वेदनांचा
सुंदर खयाल.. सानी मिसऱ्यात शब्दरचना अजून थोडी प्रभावी हवी होती..असे वाटले
धरणे नको बांधू प्रवाही भावनांवर
सुटलाय केंव्हा प्रश्नही निष्कासितांचा
गोडी कशी देऊ मनाच्या वावरातुन
जळलाय सारा ऊस माझ्या भावनांचा
उत्तम शेर..
ठेवीत नाही नोंद आता भेटल्याची
भोगीत आहे त्रास पूर्वीच्या खुणांचा
हा हि आवडला..
शुभेच्छा..
वैभव.... आपला प्रतिसाद पळून
वैभव....
आपला प्रतिसाद पळून गेल्याने मीही शस्त्र म्यान केले आहे. पण.... मी काही गोष्टी विसरत नाही.
असो.
धन्यवाद..!
बेफिकीर, >>>> गझलेच्या
बेफिकीर,
>>>> गझलेच्या लांबीवरून फिराक गोरखपुरींच्या काही गझला आठवल्या. फिराकच्या काही गझला बर्याच मोठ्या आहेत. <<<
खरेतर, मोठी गझल व्हावी असे काही मनात नव्हते. मात्र, ११ शेर झाल्यावर एक विचार मनात आला की, आपण अरदीफ गझल करीत आहोत आणि काफियाही लवचिक आहे. त्यामुळे आणखीही काही सुचते आहे, तर आपल्या मनातल्या भावना यात सहजपणे माडू शकतो. काफिया घोळत आणखी दोन दिवस थांबलो आणि अशी उंच गझल झाली. झाली म्हणजे माझा संयम संपला आणि मी ती प्रकाशित केली. अन्यथा, आणखीही शेर सुचले होते. पण, तो खयाल वेगळ्या पद्धतीने अधिक चांगला मांडता येईल असे वाटल्याने दुसर्या एखाद्या गझलेत येईल. असो.
धन्यवाद...!
अरविंद, किरण, आनंदयात्री,
अरविंद, किरण, आनंदयात्री, वैभव फाटक धन्यवाद...!
@आनंदयात्री,
दुरावा उठणे समजले नाही याचे आश्चर्य वाटते....
@वैभव फाटक
>>>>
उपहास, चेष्टा, वल्गना मी जोजवीतो
आहे तुझा, आहे तसा मी वेदनांचा
सुंदर खयाल.. सानी मिसऱ्यात शब्दरचना अजून थोडी प्रभावी हवी होती..असे वाटले
<<<<
शब्दरचनेचा विचार करता मला ती योग्य वाटली. काही सुचले होते. मात्र, कृत्रिम सुंदरता आणण्यापेक्षा जे सहज आहे ते लिहावे असे वाटले. प्रभावीपणाबद्दल म्हणाल तर, नि:शब्दताही केंव्हा केंव्हा प्रभावी ठरते. कारण शब्दांपेक्षा भावना पोचल्या पाहिजेत असे वाटते. असो.
धन्यवाद..!
सध्या छान एवढेच सांगतो. गझल
सध्या छान एवढेच सांगतो. गझल सावकाश वाचून प्रतिक्रिया देईन. मायबोलीवरच मी नवीनच आलोय.
आहे तुझा, आहे तसा मी
आहे तुझा, आहे तसा मी वेदनांचा...व्वा!
कातिल मिसरा!
नाती नव्याने रंगवा, सजवा कितीही ..
राहून जातो माग ढलपे पोपड्यांचा...क्या बात!
न्यायालयी फिर्याद केली फसविल्याची
झालो सखा मी हेलपाटे घातल्यांचा......सही!
बोलू नका, रागे भरा की वाद घाला...
तोडू नका विश्वास अपुल्या माणसांचा...अफलातून
वाहूनही अस्तित्व नसणे चूक नाही
सागर किनारी थांग असतो का नद्यांचा ..?.. आवडलाच!
गझल चांगली आहे. प्रत्येक
गझल चांगली आहे. प्रत्येक कडव्यातील दुसरी ओळ अर्थपूर्ण वाटली. पु.ले.शु.
गझल फार आवडली, बर्याच
गझल फार आवडली, बर्याच दिवसांनी अजयजी पुन्हा भेटल्यासारखे वाटले.
पहिले नऊ शेर सलग आवडले नंतर थोडे वर-खाली होत राहिलो.
मद्यालयाचा शेरही मस्त आहे, त्याला कुंपणाच्या पलीकडे का म्हणून ठेवलाय?
धन्यवाद!
मोरेश्वर, सुप्रिया, मिरींडा,
मोरेश्वर, सुप्रिया, मिरींडा, विजय धन्यवाद..!
@ विजय दिनकर पाटील..
मद्यालयाचा शेर कुंपणापलिकडे यासाठी आहे, की काहींना तो टीकात्मक वाटू शकेल.
धरणाच्या शेरात "?"
धरणाच्या शेरात "?" प्रश्नचिन्ह द्यायचे राहिले होते, ते दिले आहे.
नाते कसे जुळते पहा
नाते कसे जुळते पहा विरहातसुद्धा
प्रत्येक अश्रू होत होता पापण्यांचा
तुटल्यावरी कोठे पुन्हा जुळतात नाती ?
नसतेच जीवन खेळ पत्ते-बंगल्यांचा
ठेवीत नाही नोंद आता भेटल्याची
भोगीत आहे त्रास पूर्वीच्या खुणांचा
चुकणार निश्चित मार्ग अन बुडणार नौका
राखू न शकली मान जर ठरल्या दिशांचा
माणूस जगतो की कुणी जगवीत असते...
की खेळ आहे फक्त हलत्या बाहुल्यांचा ..?
होतास प्रामाणिक तसा अजुनी रहा तू..
होतो अजय, केंव्हा विजय खोटारड्यांचा
मद्यालये भरली रिकाम्या माणसांनी
काबाडकष्टी राहिला मालक भुकांचा
हृदयांत मी आहे तुझ्या, चिंता कशाला..?
का उठविला तू प्रश्न नसत्या स्मारकांचा ?
>>>>
हे सगळे शेर आवडले..
बघ, उंच गझलांची सुरू झाली कहाणी
संयम किती तगडा असे या वाचकांचा
>>>>
रसप, धन्यवाद...!
रसप,
धन्यवाद...! स्मायलीसकट.....
आवडेश
आवडेश
होतीस तू इतकी जवळ? कळलेच
होतीस तू इतकी जवळ? कळलेच नाही...
मी घेतला आस्वाद माझ्या भाकऱ्यांचा
अतिशय सुंदर शेर आहे.
जयश्रीताई, समीर धन्यवाद..!
जयश्रीताई, समीर
धन्यवाद..!
खुप छान गझल बघ, उंच गझलांची
खुप छान गझल
बघ, उंच गझलांची सुरू झाली कहाणी
संयम किती तगडा असे या वाचकांचा >>>>> + १०००००००
मोल, आपण उधृत केलेला शेर
मोल,
आपण उधृत केलेला शेर पाहून आनंद वाटला. पटला असल्यास....
छान
छान