खिद्रापूर - कोपेश्वर मंदिर

Submitted by रंगासेठ on 6 December, 2012 - 11:21

कोल्हापूर जिल्ह्यात 'खिद्रापूर' या ठिकाणाबद्दल ऐकले होते. ऐतिहासिक लेणी आणि महादेवाचे मंदिर 'श्री कोपेश्वर' असलेले हे ठिकाण पर्यटन विभागाच्या नकाशावर नुकतेच आले. अगदी लहानपणापासून जायचे जायचे असं ठरवत या वर्षी मुहूर्त आला. Happy

खिद्रापूरला जाण्यासाठी एक रस्ता कोल्हापूरमधून जातो, तो मला माहिती नाही Happy आम्ही नरसोबाची वाडी-कुरुंदवाड-सैनिक टाकळी मार्गे गेलो होतो. वाडीपासून ३२ कि.मी. आहे. नुकतेच MTDC ने दिशाफलक लावल्यामुळे रस्ता सापडतो. गावात गेल्यावर हे मंदिर असे लगेच दिसत नाही. अनोळखी माणसे २-३ चकरा मारल्यावरच सरळ स्थानिकांना विचारण्याचा सोपा मार्ग अवलंबवतात. ग्रामपंचायतीच्या इमारतीजवळच हे मंदिर आहे आणि कसलीही भव्यता अथवा उठून दिसेल असे काही नसल्यामुळे प्रवेशदारापाशी निराशा झाली. पण एकदा का आत प्रवेश केला की मग किती वेळ आत घालवला जातो हे कळतच नाही. अतिशय सुंदर आणि मोहक कलाकुसर असलेले हे मंदिर भग्नावस्थेत आहे Sad

असे मानण्यात येते की इ.स. ११०९-११७८ दरम्यान गांधारादित्य. विक्रमादित्य व भोज-२ या शिलाहार राजांच्या कारकिर्दित हे मंदिर बांधण्यात आले. शैव आणि वैष्णव या दोघांनी मानलेल्या मोजक्या ठिकाणांपैकी एक असे हे स्थान. 'कोपेश्वर' या नावामागची पौराणिक कथा रंजक आहे. शिवाने सती बरोबर विवाह केला हे तिच्या पित्याला, दक्ष राजाला आवडले नाही आणि म्हणून एका यज्ञात दक्षाने शंकराचा अपमान केला. हे सहन न झाल्याने सतीने यज्ञात उडी मारून आत्मदहन केले, तेव्हा क्रोधित होऊन शंकराने, वीरभद्रास दक्षाचे डोके उडवण्यास सांगितले. तेव्हा त्याचा राग शांत करण्यासाठी महादेवास या ठिकाणी आणले गेले. 'कोप्'+'इश्वर' अर्थात महादेव Happy

भग्नावस्थेत असले तरी मंदिर बर्‍यापैकी टिकून आहे, हत्ती, नक्षीदार खांब व रामायण, महाभारतातील प्रसंग, बारा राशींची चिन्हे, निसर्ग यांच्या कलाकुसरतेने अक्षरशः मढले आहे. प्रवेशद्वारातच वर्तुळाकार मोकळे छत आहे आणि त्याला आधाराला असलेल्या खांबांवर देवदेवतांच्या मूर्ती आहेत. नंतर सभामंडप, गाभारा लागतो जो अंधुक आहे आणि शिवलिंगाचे दर्शन होइल इतपतच प्रकाशमय आहे.

असं म्हणतात की मोगलांच्या नासधुसीमुळे मंदिराला अशी अवस्था आली आहे. ही अवस्था बघून वाईट वाटतं तसेच पर्यटन विभागाच्या कारभाराचा राग येतो.

काही प्रचि Happy

प्रचि १

_MG_5147

प्रचि २

_MG_5149

प्रचि ३

Khidrapur

प्रचि ४

_MG_5163

प्रचि ५

_MG_5154

प्रचि ६

_MG_5171

प्रचि ७

_MG_5263

प्रचि ८

_MG_5244

प्रचि ९

_MG_5231

प्रचि १०

_MG_5257

प्रचि ११

_MG_5219

प्रचि १२

_MG_5229

प्रचि १३

_MG_5223

प्रचि १४

_MG_5222

प्रचि १५

_MG_5261

प्रचि १६

_MG_5226

प्रचि १७

_MG_5249

प्रचि १८

_MG_5212

प्रचि १९

_MG_5207

प्रचि २०

_MG_5213

प्रचि २१

_MG_5217

प्रचि २२

_MG_5176

प्रचि २३

_MG_5179

प्रचि २४

_MG_5159

प्रचि २५

_MG_5210

तळटीप : वॉटरमार्क कसेही पडलेत, तेव्हढं सांभाळून घ्या ही विनंती Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तिथले जे कुणी विश्वस्त वै असतील त्यांचे दगडावर भगवा किंवा इतर ऑईलपेंट न मारल्याबद्दल अभिनंदन.
सुंदर प्रचि. आम्ही कधी स्वनेत्रे पाहू की नाही ठाऊक नाही, दाखविल्याबद्दल धन्यवाद!


हा फटू सगळ्यात कातिल, अन त्याहून कातिल ती दगड कातण्याची कला. ग्रेटच!

>>तिथले जे कुणी विश्वस्त वै असतील त्यांचे दगडावर भगवा किंवा इतर ऑईलपेंट न मारल्याबद्दल अभिनंदन. >>> अगदी अगदी...

सुंदर प्रचि. आम्ही कधी स्वनेत्रे पाहू की नाही ठाऊक नाही, दाखविल्याबद्दल धन्यवाद!>>>>>+१

अशक्य भारी कोरीवकाम! फारसे प्रसिध्द नसलेल्या या खिद्रापूरबद्दल माहिती व प्रचित्रे इथे टाकल्याबद्दल कोटी कोटी आभार...

अजूनही अशा काही वेगळ्या देवळांबद्दल माहीती असेल तर बघायला / वाचायला नक्कीच आवडेल...

मस्तच एकदम. पुढच्या वेळी कोल्हापुरजवळ जाताना नक्कीच भेट द्यायला आवडेल. कोल्हापुरच्या देवळाप्रमाणेच इथेही सगळ्या मुर्तींचे हात पाय शीर तोडलेले दिसत आहे. Sad

धन्यवाद Happy नक्की भेट द्या. मी भर उन्हाळ्यात गेलो होतो. त्यामुळे रखरखाट जाणवत होता. पण आत्ता मस्त असेल वातावरण.

बाकीच्या अशासारख्या कमी परिचित स्थानांबद्दल तर भटके लोकच जास्त माहिती देतील Wink (जिप्सी / यो रॉक्स Happy ). पुण्याजवळपण नगर रोडवर 'निघोज' , सोलापूर रोडवरील 'भुलेश्वर मंदिर' पण सुरेख आहेत. आणि जिप्सीच्या कर्नाटक दौर्‍यातपण अशीच सुंदर मंदिरे पाहायला मिळाली.

अप्रतिम फोटो Happy

हे मंदिर म्हणजे एक बार देखा है और एक बार देखनेकी चाहत है कॅटेगरीत आहे माझ्यासाठी.
ह्या डिशेंबरात जमवतोच.

फोटो छानच.

२ वर्षांपूर्वी ह्या मंदिराला भेट द्यायचा योग आला. भग्नावस्थेत असूनही त्याची भव्यता, कोरीवकाम सगळ आवडलं.
पण माझे फोटो नाही इतके चांगले आले.
आणि मला गाभारा जरा नाही जास्तच अंधारा वाटला.

मस्त आहेत सर्व फोटो. काही काही अँगल्स छान घेतले आहेत. आम्ही खिद्रापूरला गेलो होतो तेव्हा रस्ता इतका बेक्कार होता की गाडी रस्त्यातून चालली आहे की शेतातून असा प्रश्न पडावा.

http://www.maayboli.com/node/15085 हा घ्या आमचा झब्बू.

हे मंदिर इतके सुंदर असूनदेखील इथे प्रशासनाचे अजिबात लक्ष नाही; हे सर्वात खेदाची बाब. इथे मंदिराची माहिती सांगाय्ला गाईड नाही, स्थानिकांना माहिती विचारली की ते पुस्तक विकत घ्या म्हणून सांगतात. आजूबाजूला एकही छोटेसे का होइना पण हॉटेल नाही. वॉशरूमदेखील नाही. Sad

मनसोक्त दर्शन झाले. त्या मंडपाला वर गोलाकार झरोखा आहे ना ? त्याचा नाही का एखादा फोटो.
खुप वेळा मी चौकशी केली, तर कोल्हापूर खिद्रापूर गाडी बंद झालीय, असेच सांगत. जायला मिळालेच नाही.
पावसाळ्यात तर जायची काहीच सोय नसते, असे सांगतात.

दिनेशदा, त्या गोलाकार मंडपाचा फोटो नाही काढला Sad आत्ता परत गेलो तर काढेन. आणि कुरुंदवाड पासून दोन रस्ते जातात एक शॉर्टकट जो नदीकाठा शेजारून शेतातून जातो जो खतरनाक आहे आणि दुसरा चांगला डांबरीकरण झालेला आहे, या रस्त्यामुळे ५-६ कि.मी. जास्त जावे लागते पण वेळ तेव्हढाच लागतो.

सुविधांबद्द्ल नंदिनीला अनुमोदन, काहीही सोय नाहीये. म्हणून कोल्हापूर केंद्रबिंदू धरून इथे यायचा प्लॅन करावा. हो वाटेत कुरुंदवाडचे पेढे खायला विसरू नका Happy

सुंदर Happy

मस्तच मित्रा...
कोरीव काम पण अफलातुन आहे.
प्रचि ८ तर तुफान आहे..
थोडासा sharpness जास्त झाल्यासारखा वाटतोय का?

Pages

Back to top