निसर्गाच्या गप्पा (भाग ११)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 13 October, 2012 - 04:19

"जगात नाही मित्र मिळाले तरी सृष्टीत आहेत. आपल्या घरी नाही मिळाले तरी बाहेर आहेत. देवाने आधीच तुम्हाला मित्र दिले आहेत. हे निळे निळे अनंत आकाश. ते नेहमी तुमच्यावरच पाखर घालीले. तारे तुम्हाला रमवतील. नद्या पाणी देतील. वारा गाणे गाईल. फुले सुगंध व सौंदर्य देतील. वृक्षलतावेली तुमच्यासमोर डोलतील, नाचतील. फार दु:ख नका करू. कोणी शिव्याशाप दिले तर वाईट नका वाटुन घेऊ. या निसर्गाकडे पहा आणि आनंदी रहा.
-सानेगुरूजी (सानेगुरूजींच्या गोड गोष्टी).
जिप्सी यांच्या सौजन्याने.

निसर्गाच्या गप्पांच्या ११ व्या भागाबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy

अरे वा.. छानच जोपासलं जाईल हे झाड आता..

मुंबई कडची झाडं नेहमी धुळीने भरलेली दिसतात.. फक्त पावसाळ्यातच त्यांना चमकदार हिरवा रंग मिरवता येतो Sad

वर्षू, कधी योग आला ना तर मुंबईच्या नॅशनल पार्क मधे जरुर जा. अजून बर्‍यापैकी वैभव टिकलेत तिथले.

याहू वरचे हे पेज उघडतेय का ते बघा. हे आहेत कॅलिफोर्नियाच्या डेथ व्हॅलीमधले चालणारे दगड.. ( रोलिंग स्टोन्स )
आपल्याकडे असते तर कधीच शेंदूर लागला असता !

http://www.grindtv.com/outdoor/blog/44126/tracking+the+rolling+stones+of...

आमच्या कॉलनीत बसस्टॉपजवळच पिंपळाचे झाड आहे. एका नाक्यावर वडाचे झाड रुजतेय. बायकांनी त्याला दोरा गुंडाळायला सुरवातही केलीय. म्हणजे आता त्यांची कत्तल होणार नाही. >>>> कुठला भाग आहे हा दिनेशदा ??

आणि हे रोलिंग स्टोन काय प्रकार आहे, ऑफिसमधे हे काही बघू शकत नाहीये, घरी गेल्यावरच पहाता येईल. कशामुळे रोल होतात हे दगड ?

मुंबईतला एस्टी चा डेपो ( नेहरुनगर, कुर्ला पूर्व ) ज्या शिवसृष्टी कॉलनीत आहे ती कॉलनी. आर सी एफ चे प्रियदर्शिनी ऑफिस आहे त्याच्या समोरचा भाग.

( अश्विनी भावेचे माहेर, शापित च्या कथाकार स्नेहलता दसनूरकर, गायिका उषा तिमोथी, एकपात्री कलाकार रंगनाथ पाठारे हे सगळे आमच्या कॉलनीचे रहिवासी.)

हे दगड आपोआप सरपटतात. प्रत्यक्ष सरपटताना कुणीच बघितले नाहीत, पण दगडामागे सरपटत गेल्याच्या
खुणा दिसतात.

हे दगड आपोआप सरपटतात. >>>> ते कसे काय? मध्यंतरी इथे मा बो वरच सौदी का तिथल्याच कुठल्यातरी भागातील (गल्फ कंट्रीजपैकी एक) एक मोठा तरंगणारा दगडाचा फोटो टाकला होता - मलाही त्यातले रहस्य/ विज्ञान जाणून घ्यायला आवडेल.
माबोवर अशा गोष्टींबद्दल टाकाटाकीच इतकी करतात की त्यामागील विज्ञान वगैरे बाजूलाच रहाते व नुसत्या कमेंट्सचाच धुमाकूळ चालतो मग....

तो तरंगणारा दगड मस्कतला पण बघितला होता. खुपच जाळीदार स्पंजसारखा असतो तो. ( आता त्याला रामाचे नाव जोडलेले असणार, हे साहजिकच आहे )

सौदीला आणखी एक दगडाचा उपयोग असतो. सपाट असतो तो. तो तव्यासारखा वापरतात. त्यावर कबाब भाजतात. आणखी एका प्रकारात शेकोटीतले गरम दगड प्राण्याच्या पोटात भरतात आणि प्राणी भाजतात.

त्या रोलिंग स्टोनचे रहस्य मात्र उकललेले नाही.

हे आपलं असंच सहज. घराच्या खिदडकीत लावलेल्या कुंड्यांमधे आलेली मखमली जांभळी फुलं. शेजारच्या कुंडीत कसलं झाड उगवलंय ते नाही कळलं आम्हाला. बघा कुणाला ओळखता येतय का.

jambhali fule.jpg

दिनेशदा, शशांक हे तरंगणारे दगड तर रामेश्वर आणि कन्याकुमारीलाही मिळतात बघायला. अर्थात , त्याला तिथे रामाच्या नावाची जोड आहे.

दिनेशदा, शशांक हे तरंगणारे दगड तर रामेश्वर आणि कन्याकुमारीलाही मिळतात बघायला. >>>> काही फोटो वगैरे नाहीयेत का ? आणि याच्यामागील विज्ञान काय आहे ?

शकुन, कदाचित सूर्यफूलाचे झाड असू शकेल.

शशांक, विज्ञान एवढेच कि त्या दगडात बरीच हवा ट्रॅप झालेली असते. आर्किमिडीजच्या तत्वानूसार तो तरंगतो.
आपल्याकडे अंग घासायला जे प्यूमिस स्टोन मिळतात, तसाच दिसतो तो. पण प्यूमिस पाण्यावर तरंगत नाही, हा तरंगतो.

गुगलवर फोटोसाठी 'रोलिंग स्टोन' म्हणुन सर्च केलं तर फक्त संगीत ,गाणी आणि अल्बम हेच दिसलं..

अनिल, ती वरचीच लिंक बघ.
त्या वाळवंटात असे काही दगड आहेत, फार मोठे नाहीत. साधारण पावाची लादी असते तेवढेच. पण त्यांच्यामागे सरपटत गेल्याच्या खुणा आहेत. हे माग कधी समांतर तर कधी एकमेकांना छेद देणारे आहेत.
कधी कधी तर त्या मागांचा शोध घेतला तर त्याच्या टोकाशी दगडच नसतो.
एका जागी कॅमेरा ठेवून त्यांचे चित्रीकरण केले पाहिजे, पण अडचण अशी आहे कि ते नेमके कधी "चालतात" ते माहीत नाही. कधी कधी वर्षानुवर्षे एकाच जागी स्थिर असतात. तर कधी एकाच रात्री "चालतात."

सध्या तरी पाऊस, पूर, वादळ अशी कारणे वाटताहेत.

निसर्गात अशा ब-याच गोष्टी आहेत ज्याचे मानवाला आकलन झाले नाहीय.

आता गंमत अशी आहे की गेल्या १०० वर्षात जेवढे आकलन झाले तेवढे गेल्या कित्येक शतकांत झाले नव्हते आणि त्याचबरोबर गेल्या १०० वर्षात निसर्गाची जेवढी हानी झालीय त्याची टक्केवारी काढली तर गेल्या कित्येक शतकांतल्या हानीपेक्षा ती जास्त भरेल. निसर्गाची गुपिते माणसाने शोधुन काढली आणि त्याच्या -हासाला सर्वाधिक कारणीभुतही माणुसच आहे.

रविवारी ठाण्याच्या सरस्वती हायस्कुल मैदानावर ऑर्गॅनिका हा ऑर्गॅनिक शेती करणा-यांचा मेळावा आहे. वेळ सकाळी १०-८ ही आहे. ज्यांना ऑर्गॅनिक तांदुळ आणि इतर कडधान्ये इ.इ. गोष्टींमध्ये रस आहे त्यांनी जरुर भेट द्या.

आता गंमत अशी आहे की गेल्या १०० वर्षात जेवढे आकलन झाले तेवढे गेल्या कित्येक शतकांत झाले नव्हते आणि त्याचबरोबर गेल्या १०० वर्षात निसर्गाची जेवढी हानी झालीय त्याची टक्केवारी काढली तर गेल्या कित्येक शतकांतल्या हानीपेक्षा ती जास्त भरेल. निसर्गाची गुपिते माणसाने शोधुन काढली आणि त्याच्या -हासाला सर्वाधिक कारणीभुतही माणुसच आहे.>>>>अगदी अगदी! ...अगदी मनातलं बोललीस!!
जो, ती लिंक भन्नाट हं!

दिनेशदा, शशांक हे तरंगणारे दगड तर रामेश्वर आणि कन्याकुमारीलाही मिळतात बघायला. >>>> काही फोटो वगैरे नाहीयेत का ? आणि याच्यामागील विज्ञान काय आहे ?>>>>>असेच काही दगड (?) आम्हाला कोरलई किल्ल्याजवळील समुद्रकिनारी बघायला मिळाले. हा त्याचा फोटो. मित्राने अगदी एका बोटावर तोलुन धरला होता Happy

जिप्स्या मस्तच रे फोटो.. वजन काय आहे त्या एका बोटावर असणार्‍या दगडाचं??

वॉव्..शंखात जिवंत आहे ना किडा???

हे पाचगणीच्या 'संजीवन' विद्यालयाच्या आवारातले प्राचीन झाड..

आई ने मुलाला कवटाळून धरल्यासारखं दिसलं मला..

क्लोजप

वर्षूदी - मॅच स्टिक - हे त्याचे नाव, आमच्याही बागेत आहे हे -
Common name: Match Stick Plant, Gamos Bromeliad
Botanical name: Aechmea gamosepala Family: Bromeliaceae (Pineapple family)

Pages