निसर्गाच्या गप्पा (भाग ११)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 13 October, 2012 - 04:19

"जगात नाही मित्र मिळाले तरी सृष्टीत आहेत. आपल्या घरी नाही मिळाले तरी बाहेर आहेत. देवाने आधीच तुम्हाला मित्र दिले आहेत. हे निळे निळे अनंत आकाश. ते नेहमी तुमच्यावरच पाखर घालीले. तारे तुम्हाला रमवतील. नद्या पाणी देतील. वारा गाणे गाईल. फुले सुगंध व सौंदर्य देतील. वृक्षलतावेली तुमच्यासमोर डोलतील, नाचतील. फार दु:ख नका करू. कोणी शिव्याशाप दिले तर वाईट नका वाटुन घेऊ. या निसर्गाकडे पहा आणि आनंदी रहा.
-सानेगुरूजी (सानेगुरूजींच्या गोड गोष्टी).
जिप्सी यांच्या सौजन्याने.

निसर्गाच्या गप्पांच्या ११ व्या भागाबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मारुती चितमपल्ली यांच्या सहस्रचंद्रदर्शनानिमित्त खास सोहळा मंगळवारी पुण्यात होतो आहे. त्यानिमित्त हा उजाळा..
http://www.loksatta.com/vishesh-news/special-occasion-to-remember-maruti...
जयंत कर्णीक या माझ्या मित्राचा हा लेख लोकसत्तात आला आहे. वाचा.

वर्षू बराच खजिना जमा केलाय कि. ते धान्य चवळी प्रकारतलेच आहे. हे दाणे ओले असताना भातात घातले तर भाताला निळा रंग येतो.

त्या लाल फुलांना एक खास नाव आहे. यात बरेच रंग पण असतात, आपल्याकडे मात्र केवळ लालच दिसतो.

ओ.. माहीत असतं तर आणले असते बरोबर...
खजिना?? नाही नाही.. माझ्या आणी कॅमेर्‍याच्या अल्पबुद्धीला झेपतीलसे फोटो आणलेत्..इतकंच Lol

आणी त्या खालच्या फुलांच नाव???

ती फुले जरा दुर्मिळ आहेत. त्या प्रकारच्या झाडांना क्वचितच फुले येतात. एरवी शोभेचे झाड म्हणूनच असते ते.

Natural World - Seychelles Jewels Of A Lost Continent
http://www.youtube.com/watch?v=cyXPxdpZP2Y&feature=related

सेशल्स हा देश आपल्याला माहित नसतो सहसा. ( मला वाटत; एक हिंदी सिनेमा तिथे चित्रित झाला होता. तिथे बरेच भारतीय लोक आहेत. ) आफ्रिकेपासून भारतीय उपखंड वेगळा पडला, त्यावेळी त्याला
जोडलेला मादागास्करचा भाग होता. पण मादागास्कर थोड्याच कालावधीत भारताच्या उपखंडापासून वेगळा
झाला. मादागास्करही अनेक वर्ष़ बाकीच्या जगापासून अलग राहिला. तिथले अनेक प्राणी / किटक / वनस्पति
जगात इतरत्र कुठेही नाहीत. ( डिस्नेचा या नावाचा अ‍ॅनिमेशनपट होता.)

पण हे दोन खंड वेगळे होताना, मधे आणखी एक बारीकसा देश वेगळा झाला, तोच सेशल्स. हवाई सारखी बेटं, हि तिथल्या तिथे समुद्राखालच्या ज्वालामुखीने तयार झाली पण सेशल्स मात्र, असा दोन खंडाच्या मधेच तयार झाला. आणि तिथेच स्थायिक झाला. त्यामूळे तिथल्या सर्वांचाच जगाशी संपर्क तूटला ( अर्थात हे वेगळे होणे काही एका दिवसात घडत नाही. याचा वेग आपली नखे ज्या वेगात वाढतात, तेवढाच असतो.)

तिथले अनोखे नारळ, तूम्हाला वरच्या माहितीपटात दिसतील. पण सगळ्यात अनोखे आहे ते तिथल्या
पक्ष्यांचा जीव घेणारे एक झाड. तिथे कबुतरापेक्षा थोडे छोटे असे पक्षी आहेत. त्यांना घरटे बांधता येत नाही ( कारण पुढे येतेय ) आडव्या फांदीवर पाने ठेवून, ते आपला निवारा करतात. तिथेच एक झाड वाढते. त्याची फळे किंवा तूरा म्हणूया, हा त्या पक्ष्यांसाठी सापळा ठरलाय. या तूर्‍याला काटे असतात. आणि ते पक्षी त्या तूर्‍याजवळ आले कि त्यात अडकतात. एकदा का ते अडकले कि त्यातून सुटका नाहीच. जसजसे ते सुटायचा
प्रयत्न करतात तसे ते त्यात गुंतत जातात. मग ते उडूही शकत नाहीत. काहीजण सुटकेसाठी समुद्राच्या
पाण्यात शिरतात, पण त्यानेही सुटका होत नाहीच. त्यातच त्यांचे मरण ओढवते.
( हे सगळे वरच्या माहितीपटात आहे.) कदाचित या झाडाचा धसका घेतल्यानेच, ते घरट्यासाठी काड्या
शोधत नसावेत. पण आपल्या बीजप्रसारासाठी झाडाने, पक्ष्यांचा जीवच घ्यावा !

असो आपल्या कृरपणाच्या कल्पना, निसर्गाला मान्य नाहीत. पण हे दृष्य बघून मनाला त्रास होतो एवढे नक्की. ( पण बघाच, अगदी बघवत नाही असेही नाही. )

सुदुपार!!!

वर्षु-नील, आमच्याकडे याला "काळे पोलिस" म्हणतात. पुणे-वाई-सातारा पट्ट्यात होणारे कडधान्य. "काळा घेवडा" असेही म्हणतात.

भिजत घालून, उकडून याची उसळ छान होते. नुसते उकडलेले देखील छान लागतात. याची सालासकट डाळ्सुद्धा मिळते. डाळीची आमटी करता येते.

भरपूर पोषण्मूल्य असलेले हे कडधान्य आणि त्याची डाळ ठराविक भागातच मिळते. याचे दाणे दाखवून दुकानदाराला विचारले एकतर राजमा देतात नाहीतर त्यांना माहीतच नसते.

माझ्याघरी सगळ्यांना खूप आवडते. "महालक्ष्मी सरस, मुंबई" प्रदर्शनात काही जणांकडे मिळते.

'पुणे-वाई-सातारा पट्ट्यात होणारे कडधान्'... मधु मकरंद , अगदी बरोबर.. मी पण याच भागांत पाहिलेले हे धान्य..
काळे पोलिस.. Happy
दिनेश दा.. हो ना अडुसोल मधे इतकी साखर असते कि डायबेटिक्सना प्रचंड अपायकारकच...

वर्षु-नील, आमच्याकडे याला "काळे पोलिस" म्हणतात. पुणे-वाई-सातारा पट्ट्यात होणारे कडधान्य. "काळा घेवडा" असेही म्हणतात. >>>> हां हां तेच ते काळे पोलिस, काळे शिपाई, काळा घेवडा - पण याचे बोटॅनिकल नाव कोणी सांगू शकेल का / गुगलताना काय टाईपावे लागेल ???????????

दिनेशदा - ती सेशेल्सवरची फिल्म आता घरी पाहीन. अडुळशाची पाने एवढी कडू असतात का ?

दिनेशदा,
सेशल्स बद्दलची भन्नाट माहिती आवडली.
वर दिलेली लिंक घरी पाहणार आहे
पक्ष्यांचा जीव घेणार्‍या झाडाबद्दल वाचल्यानंतर शाळेत पुस्तकात वाचलेल्या घटपर्णीची माहिती आठवली.

वर्षु,
छान फोटो, लिंक सुद्धा पाहिली.
आमच्याकडेही याला "काळा घेवडा" अस म्हणतात,प्रुवी हे घरी हे शिजवुन मीठ टाकुन,याची उसळ खाल्याचे आठवतं ..

शशांकजी,
आपल्याकडॅ अडुलसा हा मोठ्या प्रमाणात आढळतो अस दिसतं..

अगदी कडूजार नसतात पण साखरेशिवाय तो काढा पिणे कठीण !

शशांक, कदाचित जानेवारीमधे पुण्यात येईन. एखाद्या हार्ड डिस्कची सोय होऊ शकेल का ? म्हणजे या आणि आधीच्या फिल्म्स कॉपी करुन देईन. तारीख ठरली कि कळवतोच.

साधना, दिनेश - कमळाच्या त्या फुलाला लक्ष्मीकमळ म्हणतात. कंबोडियामधे सगळीकडे लक्ष्मीकमळ बघायला मिळतो. कमलकाकडी कुठेही विकायला मिळते. बुद्धाला कंबोडियन लक्ष्मीकमळाचा गुच्छ वाहतात.

त्या काळ्या दाण्यांना ईंगजीत ब्लॅक बीन्स असे सोपे नाव आहे. रेड बीन्स, ग्रीन बीन्स, ब्लॅक बीन्स ही रंगावरुन आलेली नावे आहेत बियांची.

बी, त्या लोकांच्या बीन नूडल्स पण असतात ना ? त्यापण याच बीन्सच्या ना ?

कमळाची लागवड मी थायलंड मधे, प्रत्येक देवळाच्या बाहेर बघितली. तलाव असेल तर ठिकच नाहीतर मोठ्या
कुंडीमधे पण केलेली असते.
तू एक फोटो टाकला होतास बघ, त्या कमळाच्या कळीच्या पाकळ्या आत दुमडून, एक सुंदर आकार देतात त्याला. बहुतेक कंबोडीया मधला होता. अजून आठवतोय तो. त्यांच्या देवळावर पण ते कोरलेले असतेच.

दिनेशदा, हो इथे बीन नूडल्स, राईस नूडल्स दोन्ही मिळतात. ह्या लोकांचे खाणेपिणे बघून आपले खाणेपिणे फार भिन्न आहे असे वाटते. पण हर्बल गोष्टी मात्र त्यांच्या नि आपल्या सारख्याच. इथे चिनी हर्बल खूप चांगले मिळतात. ताजे असतात. जसे की इथे ओली हळद बारोमास मिळते. आवळे बारोमास मिळतात. ज्येष्टमध भरपुर मिळतो. केसर उत्तम मिळत. विड्याची पाने वेलीसकट विकतात. शतावरीची जुळी मिळते. बासिल, रोझमेरी हेही मिळतं. ओल नारळ, नारळाच दुध, सोयाबिन्सचे दुध हे विपुल प्रमाणात मिळत. अनेक प्रकारचे भोपळे, कोहळे मिळतात. थाई, मलय, ईंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझिलॅन्ड, चायना, भारत, श्रीलंका, बांगलादेश अशा सगळ्या देशातून माल इथे येतो. त्यामुळे वैविध्य खूप खूप आहे. काय घ्याव नि काय नाही असे होऊन जाते. बाजारात लवकर गेल तर स्वस्तात मस्त भाज्या मिळतात.

ह्म्म... बी , छान माहिती सांगतोयेस.. Happy
इथे हिरव्या आख्ख्या मुगापासून केलेले नूडल्स मिळतात.. ते दिनेश दा ला मिळतीलच जानेवारीत Happy

इन्डोनेशिया त सोयाबीन चं दूध वापरून केलेले पदार्थही मस्त असतात.. तोफू, तेंपे इ.

ओली हळद मात्र इथे ' थाय' भाज्या विकणार्‍या दुकानातच मिळते फक्त!!

चिनचे वैद्यकशास्त्र आपल्यासारखेच अनेक वर्षे जतन केलेले आहे. पण त्यांना सगळे लिहून ठेवायची सवय होती, त्यामूळे त्यांच्या औषधी आजही सापडू शकतात / ओळखू येतात. आपल्याकडे मात्र मौखिक परंपरेमूळे, ते झाले नाही.

आमच्याकडे पण चिनी आणि व्हीएटनामी लोक खुप आहेत. इतक्या लांब येऊन त्यांनी आपल्याला स्थिरस्थावर केले आहे. तांदूळ खुपदा व्हीएटनामचाच असतो. बाकि चिनी लोकांचे पदार्थही मिळतात. आपलेच मिळत नाहीत.

आज खूप दिसांनी गप्पा मारायला आलोय. बरच वाचाव लागणार आहे.

http://www.loksatta.com/vishesh-news/special-occasion-to-remember-maruti...

हा मारुती चितमपल्लींवरचा लेख छान आहे.

वर्षूतै, तू जो फुलांचा फोटो दिलाएसना तो बहुधा ड्रेसिनाच्या फुलांचा असावा. पण मी जरा शोध घेऊन तुला नक्की सांगू शकेन. दोन तीन वर्षापूर्वी मी अशीच फुलं बघितली होती. पण तेव्हा त्या झाडाचं नाव माहीत नव्हतं. महाजनसरांच्या विदेशी वृक्ष मधे त्या झाडाचं नाव ड्रेसीना असं दिलंय. तुझा फोटो बघून मग मी त्यांचा ताळमेळ घातला.:स्मित:

चितमपल्लींवरचा लेख मस्तच!
दिनेशदा, पक्ष्यांचा जीव घेणारी झाडंही असतात!! वाचून शहारेच आले.

ड्रेसिना काय ती फुलं.. खरोखरंच 'ड्रेसी' दिसतं झाड ही फुलं ल्यावून Happy

शांकली.. दिनेश दा ने सांगितल्याप्रमाणे पाचगणी ला खरोखरच पूर्वी कधी न पाहिलेली झाडं, फुलं पाहायला मिळाली.. अनफॉर्चुनेटली त्या बोटेनिकल गार्डन मधे जायला वेळ मिळाला नाही..
पण माप्रो च्या अंगणात बरीच फुलझाडं पाहिली.. याशिवाय 'संजीवन' विद्यालयात तर प्राचीन ,वयोवृद्ध झाडांची भरमार होती
त्यातील हा बांबू.. असा रेघा आखलेला बांबू तिथेच दिसला. या बांबूंचं छोटसं बनच होतं तिथे.

Pages