तोरणा - किल्ला, रानफुलं, इंद्रवज्र, वगैरे....

Submitted by हर्पेन on 30 November, 2012 - 11:54

दोनेक वर्षांपूर्वी आम्ही ज्या कोणत्या वेळेला तोरण्याला जायचे नक्की केले जायला निघालो होतो ती वेळ म्हणजे खरोखरच एक उत्तम मुहुर्त असावा. त्या मुहुर्तावर ठरवलेले कुठलेही कार्य निर्विघ्नपणे, विनाविलंब, विनासायास, सफल संपूर्ण झालेच असते.....

सगळे कसे जुळून आले होते.

सकाळी ५ ला निघायला ठरवून आणि एकूण १०-१२ जणं वेगवेगळीकडून येणार असतानासुध्दा निघायला अजिबात न झालेला उशीर...

पावसाळा असताना देखिल पावसाने न दिलेला त्रास.....

खूप म्हणजे खूप प्रमाणावर फुललेली रानफुलं....

आणि या सगळ्यावर कडी म्हणजे अत्यंत अनपेक्षितरित्या दिसलेले इन्द्रवज्र....

बघा ही प्रकाशचित्रे आवडताहेत का ते!

प्रचि १
DSC09110.JPG

प्रचि २
DSC09112.JPG

प्रचि ३
DSC09118.JPG

प्रचि ४
DSC09120.JPG

प्रचि ५
DSC09132.JPG

प्रचि ६
DSC09138.JPG

प्रचि ७
DSC09143.JPG

प्रचि ८
DSC09155.JPG

प्रचि ९
DSC09160.JPG

प्रचि १०
DSC09162.JPG

प्रचि ११
DSC09164.JPG

प्रचि १२
DSC09168.JPG

प्रचि १३
DSC09169.JPG

प्रचि १३
DSC09170.JPG

प्रचि १४
DSC09183.JPG

प्रचि १५
DSC09185.JPG

प्रचि १६
DSC09188.JPG

प्रचि १७
DSC09189.JPG

प्रचि १८
DSC09193.JPG

प्रचि १९
DSC09202.JPG

प्रचि २०
DSC09213.JPG

प्रचि २१
DSC09221.JPG

प्रचि २२
DSC09226.JPG

प्रचि २३
DSC09232.JPG

प्रचि २४
DSC09240.JPG

प्रचि २५
DSC09243.JPG

प्रचि २६
DSC09248.JPG

प्रचि २७
DSC09260.JPG

प्रचि २८
DSC09263.JPG

प्रचि २९
DSC09264.JPG

प्रचि ३०
DSC09268.JPG

प्रचि ३१
DSC09270.JPG

प्रचि ३२
DSC09274.JPG

प्रचि ३३
DSC09276.JPG

प्रचि ३४
DSC09278.JPG

प्रचि ३५
DSC09282.JPG

प्रचि ३६
DSC09292.JPG

प्रचि ३७
DSC09298.JPG

प्रचि ३८
DSC09312.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतीशय सुंदर. बाकी चित्रीकरण मस्तच आहे, पण तो गोगलगाईचा फोटो विशेष आवडला. एकदम सहज. असेच नेत्रसुखद पर्यटन करा आणी इथे फोटो टाकत रहा.

सुंदर.

हायला ! लई भारी !!! नशीबवान आहात रे. जल्ला आम्हाला अजून दर्शन नाही मिळालं. पण प्र.चि. बद्दल कोटी कोटी धन्यवाद!

अश्या वातावरणात गडावर गेल्यावर गेल्यावर मला एकच प्रश्न पडतो...

आपल्याला जर एक दिवस इथे जाउन इतका सुखद अनुभव मिळत असेल तर त्याकाळी कायम गडावर वास्तव्य करणार्‍यांना काय मस्त वाटत असेल ना.. खास करून ह्या अश्या पावसाळी वातावरणात. Happy

आपल्याला जर एक दिवस इथे जाउन इतका सुखद अनुभव मिळत असेल तर त्याकाळी कायम गडावर वास्तव्य करणार्‍यांना काय मस्त वाटत असेल ना..

>>> its a grass on the other side... Happy

छान Happy

मस्त

सुंदर...
मला एकच प्रश्न पडतो... >> सेम पिंच.. कुठल्याही गडावर गेल्यावर मला तोच प्रश्ण पडतो..

प्रतिसादांसाठी धन्यवाद...

मी तर ह्याकाळातसुद्धा कायमस्वरूपी गडावर रहायला तयार आहे, विकांताला शहरात यायचे...(फक्त घरच्यांसारखे, आणि मग पोटापाण्याचे काय म्हणून विचारू नका) Happy

छान प्रकाशचित्रे!!
इतर फोटोप्रमाणे ते इंद्रवज्राचे फोटो तेवढे स्पष्ट का नाही आले.

सुंदर फोटो आहेत.

सेना,
गडावरचे जीवन त्या काळात कष्टप्रदच असणार. शेतीवाडी / गुरेढोरे काही नसणारच. सगळेच आणायचे खालच्या
गावातून. बलुतेदार जरी असले तरी त्यांचा कच्चा माल खालूनच आणावा लागत असणार.
पदरी घोडे असणारे खुप कमी, बाकी अनेकांना पायी जाण्याशिवाय गत्यंतर नसणार. बायकांना तर जास्तच त्रास असणार. बाजारहाट / पै पाहुणा / यात्रा / देवदर्शन.. सगळ्यासाठी गडाखाली जावेच लागत असणार.

पण तूला कधी, गडावरच्या मालाच्या किंमती भरमसाठ असू नयेत, असे थोरल्या महाराजांचे आदेश आहेत, असा उल्लेख, सापडला का ?. त्यांनी नक्कीच याचा विचार केला असणार.

पण तूला कधी, गडावरच्या मालाच्या किंमती भरमसाठ असू नयेत, असे थोरल्या महाराजांचे आदेश आहेत, असा उल्लेख, सापडला का ?. त्यांनी नक्कीच याचा विचार केला असणार.
>>> नाही लगेच काही आठवत नाहिये पण अ.रा. कुलकर्णीच 'शिवकालीन महाराष्ट्र' बघतो पुन्हा. त्यात बरेच संदर्भ मिळतील नक्की. Happy

एक नक्की.. माल स्वराज्याच्या हद्दीत आला की त्याची किम्मत सरसकट एक असे. गडावरचे चीज-वस्तु महाग आणि पायथ्याच्या स्वस्त असे काही नाही. मुळ कर जो लागायचा तो पेठेच्या ठिकाणी नाहीतर बंदराच्या ठिकाणी.

मी पण आधी विचार केला नव्ह्ता. पण हिरकणीसारख्या गवळणी गावातला रतीब आणि गडावरचा रतीब, एकाच भावाने घालत असतील का ? महाराजांचा थोरपणा बघता, त्यांनी कदाचित तिला चढा दर दिला असता, किंवा गडावरचा रतीब घालण्यासाठी, काही खास वेगळा मेहनताना दिला असता.

प्र चि २४ अप्रतीम, मला - विठुराया सारखा तो कडा वाटला ---- फक्त विठुराया म्हणा किंवा छत्रपती म्हणा ---- फोटो बघता क्षणी फक्त ह्याच आणि ह्याच भावना जाग्या झाल्या Happy

मार्को पोलो - धन्यवाद, माझीपण ती २ प्रचित्रे आवडती आहेत.
विजय आंग्रे - सतत बदलत्या पार्श्वभूमीमुळे (ढग यायचे जायचे खरंतर ढगदेखिल म्हणता येणार नाही, धुकंच होते ते अत्यंत तरल, असे तुषारांसारखे सतत येऊन जाणारे बाष्प होते ते) असे झाले असावे.
shrushti14@gmail.com , प्रिति १ - धन्यवाद
सेनापती - 'एक नक्की.. माल स्वराज्याच्या हद्दीत आला की त्याची किम्मत सरसकट एक असे. गडावरचे चीज-वस्तु महाग आणि पायथ्याच्या स्वस्त असे काही नाही. मुळ कर जो लागायचा तो पेठेच्या ठिकाणी नाहीतर बंदराच्या ठिकाणी' ह्याला अनुमोदन...
दिनेशदा - "हिरकणीसारख्या गवळणी गावातला रतीब आणि गडावरचा रतीब, एकाच भावाने घालत असतील का ? महाराजांचा थोरपणा बघता, त्यांनी कदाचित तिला चढा दर दिला असता, किंवा गडावरचा रतीब घालण्यासाठी, काही खास वेगळा मेहनताना दिला असता." अगदी आत्ता-आत्तापर्यंत दळणवळणाची / वाहतुकीची साधने उपलब्ध नसल्याने, मावळ - कोकणासारख्या डोंगराळ भागांमधे डोंगर चढणे उतरणे हे नित्यकर्मच होते. व त्याचे विशेष कौतुक होत नसे. त्यामुळे हिऱकणीला वेगळा मेहनताना मिळत असेलसे वाटत नाही.
१५-२० वर्षांपूर्वी सिंहगडावरदेखिल खाण्यापिण्याच्या सर्व गोष्टी पुण्याच्याच किंमतीत मिळायच्या...
रायबागान - प्रचि २४ हे इंद्रवज्राचे आहे, त्याबद्दलचा लेख खालील दुव्यावर बघु शकता.
http://www.maayboli.com/node/39123 Happy

मला नाही वाटत चढा दर मिळत असेल म्हणून... खाली तर ह्यापेक्ष स्वस्त मिळते मग तु इथे महाग का विकतेस? असे कोणीही तिला विचारू शकले असेल कारण गड उतरून-चढून येणे यात त्याकाळी फार मोठी गोष्ट नसेल. Happy

उलट गडावर येउन वस्तु विक्रीसाठी तिला परवाना वगैरे लागायची शक्यता अधिक असावी. पण आपण आणलेले दुध संपणार याची खात्री असल्याने अनेकजणी आठवडी बाजाराला वर येतही असतील.

होळीच्या माळासमोर असणार्‍या बांधकामाशी (ज्यास बाजारपेठ समजले जाते) या बाजाराचा संबंध जोडू नये.. Happy

Pages