यंदा विद्रोही साहित्य संमेलन बीडमध्ये भरणार आहे असे ऐकले. २२ व २३ डिसेंबर रोजी होणार्या ११ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाला कोण कोण असेल हा विचार मनात आला. महाराष्ट्रात एवढ्या चांगल्या परंपरा असताना विद्रोही नावाचे साहित्य संमेलन का व्हावे? असा प्रश्न पडला. या साहित्य संमेलनाची बातमी वाचताना सत्यशोधक असाही उल्लेख सापडला. या उल्लेखामुळे, "ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या" असे ठासून सांगणार्या आणि अद्वैतवादाचा प्रसार भारतभर करणार्या आद्य श्रीशंकराचार्यांची आठवण लगेचच झाली. मात्र, आता हे विद्रोही साहित्यिक त्यांना मानत असतील का? असाही प्रश्न मनात आला. खरेतर, मी विद्रोही साहित्याबद्दल फारसे काही वाचलेले नाही. त्यामुळे अनुमान काढणे सध्यातरी मला शक्य नाही. मात्र, याबाबत चर्चा होणे जरूरीचे आहे असे मला वाटले म्हणून मी हा धागा टाकला. कारण, विद्रोह हा शब्दच एकसंध समाजाला घातक आहे. पण असे का व्हावे याचा फारसा इतिहास मला माहित नाही. आपणाला, याबाबत माहिती असल्यास चर्चा करावी. मीही मिळविण्याचा प्रयत्न करतोच आहे.
माझे प्रश्न हे आहेत की,
१) विद्रोही साहित्य संमेलनामध्ये कोणत्या साहित्य संस्था सहभागी होतात किंवा कोणाला परवानगी असते?
२) अ.भा. मराठी साहित्य संमेलनात ज्या संस्थांचा सहभाग असतो, त्या असतात का? नसतील तर का?
३) विद्रोही साहित्य संमेलनात सहभागी होणार्या साहित्य संस्था, अ.भा. साहित्य संमेलनात असतात का? नसतील तर का?
४) विद्रोही साहित्य संमेलनाचे मूळ उद्दीष्ट काय?
५) या साहित्य संमेलनामध्ये नेमके काय घडते? म्हणजे त्याचे स्वरूप वगैरे?
६) या साहित्य संमेलनाला विद्रोही असे का म्हटले जाते?
असे काही प्रश्न माझ्या मनात आहेत. यावर चर्चा व्हावी असे वाटले म्हणून हा धागा.
आम्ही कुठल्याही साहीत्य
आम्ही कुठल्याही साहीत्य संमेलनाला जात नाही त्यामुळे प्रचंड सुखी आहोत. संस्था काढणे आणि चालवणे हे सोपे नाही असं मी या विषयावरच्या एका बाफवर म्हटलं होतं. पण त्या आणि अन्य काही बाफवर मतदारांची रचना आणि पद्धत हे पाहीलं कि ज्याला अखिल भारतीय म्हटलं जातं त्यातून लोक का फुटून निघत असावेत असा प्रश्न पडतो. अशा प्रकारे वेगळी साहीत्य संमेलने ( ग्रामीण साहीत्य संमेलन, विचारवेश, विद्रोही, मुस्लीम मराठी आणि इ.इ. ) भरत असल्याचं दु:खं जुन्या संस्थेला वाटते का हे काही कळले नाही. तसे असल्यास एकत्र राहूयात म्हणून काय प्रयत्न केले हा बाफचा विषय असता तर चागल्या चर्चेची अपेक्षा करता आली असती. सध्या तरी दुखावलेल्यांचे संमेलन तसाच हा बाफ असं वाटतंय.
सामान्य माणसाला अशा वादांचं काहीही घेणंदेणं नाही. अगदी स्पष्ट शदात सांगायचं झालं तर या संमेलनांचा सध्याच्या जगात उपयोग आहे का ही चर्चा व्हायला हवी.
http://www.manogat.com/node/8
http://www.manogat.com/node/8116
<विद्रोही नावाचे साहित्य
<विद्रोही नावाचे साहित्य संमेलन>
संमेलन 'विद्रोही' नसून 'विद्रोही साहित्या'शी संबंधित असलेल्यांचे ते संमेलन आहे. विद्रोही साहित्याचीच गरज नाही असे तुमचे म्हणणे असू शकते.
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम हे आद्य विद्रोही मराठी साहित्यिक आहेत असे आणखी कुणाचे मत असू शकते.
<महाराष्ट्रात एवढ्या चांगल्या परंपरा असताना> या विधानात दारूगोळा भरलेला असू शकतो.
चक्रमचाचा <अगदी स्पष्ट शदात
चक्रमचाचा <अगदी स्पष्ट शदात सांगायचं झालं तर या संमेलनांचा सध्याच्या जगात उपयोग आहे का ही चर्चा व्हायला हवी.> अनुमोदन...
>>> तसे असल्यास एकत्र राहूयात
>>>
तसे असल्यास एकत्र राहूयात म्हणून काय प्रयत्न केले हा बाफचा विषय असता तर चागल्या चर्चेची अपेक्षा करता आली असती.
<<<<
नेमके कोणी कोणाशी चर्चा करायला पाहिजे होती हे मला माहित नाही. मात्र, मला असे वाटते की, जमेल त्यावेळी साहित्य संमेलनांना हजेरी लावायला हवी. तेथे काहीच घडत नाही असे नाही. जे कोण आयोजक असतात त्यांच्या माहितीनुसार किंवा ओळखीनुसार परिसंवाद / चर्चा यांच्यासाठी लोक ठरत असतील कदाचित. पण आपण केवळ न जाऊन त्यावर टीका करू शकत नाही.
माबोवर हजारों लोक येतात / जातात. यातले किती लोक साहित्य संमेलनाला जात असतील माहित नाही. संमेलनाला जाऊन फार काही साध्य होत नाही असे म्हटले तरी न जाऊन काय साध्य होणार? केवळ मजा म्हणून साहित्य लिहिले / वाचले जात असेल तर त्या साहित्याला टाकाऊच म्हटले पाहिजे. जर साहित्य निर्माण करण्यापूर्वी किंवा निर्माण झाल्यानंतर निर्माण करणार्याचा जर काहीच हेतू नसेल किंवा मनाशी काहितरी खूणगाठ बांधून त्याने लिहिले नसेल तर ते साहित्य टाकाऊच म्हटले पाहिजे. साहित्य संमेलनात हजेरी लावून मोठेपणा मिळत नाही हे जरी खरे असले तरी आपल्यासारखेच अनेक साहित्यिक तेथे भेटतात. त्यांच्याशी समोरासमोर चर्चा करता येतात. त्यासाठी संमेलनाचा मंच वापरण्याची आवश्यकता नाही. आपण इथे जसे इंटरनेटच्या माध्यमातून चर्चा करतो तशी समोरासमोरही होवू शकते. त्यामुळे शक्य असेल त्यांनी साहित्य संमेलनांना हजेरी लावावी असे मला वाटते.
माझा मुद्दा असा होता की विद्रोही का काय ते साहित्य संमेलन बीडमध्ये भरणार आहे. तेथे सर्वांना जाता येते का? की त्यासाठी कोणाची परवानगी लागते? लागत असेल तर का? याची माहिती कोणाला असेल तर त्यावर चर्चा झाली असती.
विद्रोही साहित्यच मुळात का निर्माण व्हावे? असाही एक प्रश्न आहे. मात्र हे लोक ज्याला विद्रोही म्हणतात ते खरोखरच विद्रोही आहे काय हेही तपासायला हवे. कारण,
>> संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम हे आद्य विद्रोही मराठी साहित्यिक आहेत असे आणखी कुणाचे मत असू शकते. << असे भरत मयेकरांनी म्हटले आहे.
मयेकर, असे कोणाला का वाटावे? हा प्रश्न आहे. संत ज्ञानेश्वर हेच आद्य विद्रोही असे कोणाला का वाटेल? तुमच्या मते विद्रोही कोणाला म्हणतात? हे समजले तर बरे होईल. त्याचप्रमाणे,
<<<महाराष्ट्रात एवढ्या चांगल्या परंपरा असताना> या विधानात दारूगोळा भरलेला असू शकतो.>>
असे आपणांस का वाटते?
विद्रोह हा शब्दच एकसंध
विद्रोह हा शब्दच एकसंध समाजाला घातक आहे.
अतिशय चुकीचं मत.... विद्रोह नसेल्तर वाइटाची मोनोपॉली होते, जी जास्त घातक असते.
डॉ. कैलास गायकवाड इतर कितीतरी
डॉ. कैलास गायकवाड
इतर कितीतरी ठिकाणी (वेबसाईट्स) यावर चर्चा झाली असेल . कदाचित अनेकवेळा. पण प्रत्येक ठिकाणचे लेखक / चर्चा करणारे वेगळे असू शकतात. त्यामुळे कृपया आपले मत दिलेत तर बरे होईल. नाहीतर माबोवर ही चर्चा होणारच नाही. आपण दिलेल्या संकेतस्थळावर सुरू होईल. मग ती माबोवाल्यांना कशी दिसणार?
फक्त साहित्यविषयक विचारच फक्त
फक्त साहित्यविषयक विचारच फक्त मांडले जात असतील तर जिल्हावार, जातवार, संस्थावार, धर्मवार साहित्यसंम्मेलने होण्यात कांहीच गैर नाही. त्यामुळे अधिक लोकांना व्यक्त होण्याची संधि मिळते व त्यांतूनच वरवरच्या दर्जाचे साहित्यिक पुढे येऊ शकतात. पण केवळ उखाळ्यापाखाळ्या, आणि द्वेषानिर्मिति करणारी कोणत्याही स्तरावरील सासं वर्ज होत.
विद्रोही लोकं वाट चुकलेले
विद्रोही लोकं वाट चुकलेले आहेत
मी_भास्कर, >>> पण केवळ
मी_भास्कर,
>>>
पण केवळ उखाळ्यापाखाळ्या, आणि द्वेषानिर्मिति करणारी कोणत्याही स्तरावरील सासं वर्ज होत.
<<<
मला माहित नाही की कोणत्या साहित्य संमेलनात एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढल्या जातात. मी ज्यांना हजेरी लावली आहे त्यात असे काही नव्हते. त्यात फक्त साहित्यावरच चर्चा होती. विद्रोही चे मला माहित नाही. कारण मी अजून गेलो नाही. पण जायची इच्छा आहे.
अ. अ. जोशी | 16 November,
अ. अ. जोशी | 16 November, 2012 - 09:29 नवीन
मी_भास्कर,
>>>
पण केवळ उखाळ्यापाखाळ्या, आणि द्वेषानिर्मिति करणारी कोणत्याही स्तरावरील सासं वर्ज होत.
<<<
विद्रोही चे मला माहित नाही. कारण मी अजून गेलो नाही. पण जायची इच्छा आहे.
<<
या आधीच्या विद्रोही बाबत माहिती घ्या. आवश्य तिथे जा. स्वतःच काय ते मत बनवा
विद्रोह म्हणजे जुलूमी
विद्रोह म्हणजे जुलूमी व्यवस्थेच्या विरोधात उठाव करणे. मग विद्रोही साहित्य म्हणजे काय? तर ... प्रस्थापितांच्या विरोधात साहित्याच्या रुपाने उठाव उभा करणे. आज पर्यंत सर्वत्र मिळमिळत साहित्य लिहले गेले त्या पेक्षा हे साहित्य वेगळे आहे हे अधोरेखीत करण्यासाठी व ते प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात आहे हे दाखविण्यासाठी या साहित्याचे नाव विद्रोही साहित्य असे आहे.
समकालीनचे संपादक सुहास कुलकर्ण्यांचा यावर एक सुंदर लेख वाचला होता. अनूभव मध्ये की आजून कुठे ते मात्र आठवत नाही.
मग हा साहित्यातला विद्रोह
मग हा साहित्यातला विद्रोह रेग्युलर साहित्यसंमेलनातून व्यक्त करता येत नाही का? त्यासाठी वेगळी चूल कशाला हवी. की मसापच्या सासं मध्ये स्थान नसणार्यांचे सम्मेलन? एखादा राजकीय पक्ष फुटावा तसे का? तृणमूल काँ. सारखे?
यात फक्ट विद्रोह करणार्या साहित्यावरच चर्चा होते की इतर सौंदर्यवादी साहित्यावरही करायला 'परवानगी' असते. उदा चन्द्र , तारे, वारा युक्त कविता. आरक्त गाल, घायाळ नजरयुक्त कथा., इनोदी गिरामीन?
लालशाह, आपण जे विद्रोही
लालशाह,
आपण जे विद्रोही साहित्याबाबत मत मांडलेत, त्यात मुळातच केवळ **प्रस्थापितांच्या विरोधी ** असा सूर का असावा. केवळ असे असेल तर ते साहित्य अयोग्यच आहे. कारण, दुसर्यापेक्षा मी कसा वेगळा आहे असे सांगून पुन्हा वेगळ्यांच्यात प्रस्थापित होवू पाहणे हा दांभिकपणाच म्हणावा लागेल.
समाजाला क्लेशकारक ठरणार्या व्यवस्थेबद्दल बोलणे / लिहिणे योग्य. केवळ, प्रस्थापितांच्या विरूद्ध लिहिणे गैर आहे.
अजून एक शेणखा. जुने , सिनियर
अजून एक शेणखा.
जुने , सिनियर विद्रोही नव्या विद्रोहींना सादरीकरणाचा " चानस " देतात का?
प्रस्थापित विद्रोही नवीन
प्रस्थापित विद्रोही नवीन विद्रोही असे काही असेल का?
माझीही हीच शंका.
अ.अ. तसं नाहिये, महाराष्ट्रात
अ.अ.
तसं नाहिये, महाराष्ट्रात सांस्कृतीक व सामाजिक उठाव झाला तो ज्योतिबा फुले यांच्यापासून. त्याचं मुळ कारण होतं जातियवाद. त्या नंतर कर्वे,रानडे, आगरकर पासून प्रबोधनकार ठाकरे पर्यंत अनेक लोकानी प्रस्थापित(म्हणजे प्रतिगामी) व्यवस्थेविरुद्ध लढा पुकारला. हा प्रतिगाम्यांच्या विरोधातील लढा ज्यानी त्यानी त्यांची बलस्थानं ओळखून व त्या त्या क्षेत्रात लढला. पुढे याच लढ्याला प्रतिगामी वि. पुरोगामी असे नाव पडले. प्रतिगामी सर्व बाबतीत आपल्या संस्कृतीला अभेद्य मानायचे अन पूरोगामी मात्र त्या पिढ्यान पिढ्याच्या अभेद्य संस्कृतीला खिंडार पाडत राहिले. याची सुरुवात पुण्यातूनच झाली.
पुढे सावरकर नावाचे वादळ आले आणी त्यानी हिंदुच्या या प्रतिगामी वृत्तीवर घणाघाती हल्ले केले(क्ष किरण वाचावे). याच काळात एक यूग प्रवर्तकाचा उदय झाला ते म्हणजे आंबेडकर ज्यानी हा लढा मोठ्या त्वेषाने लढाला. ते एक हिंदू गुहस्थ होते पण प्रतिगाम्यांच्या हट्टापायी धर्मांतर केला व ही पूरोगामी चळवळ पुढे आंबेडकरी चळवळ म्हणून ओळखल्या जाऊ लागली. खरे तर ही चळवळ पुण्यातील फुले-कर्वे-रानडे-आगरकर अशी यांच्या अविरत कष्टातून उभी झाली होते.
नंतरच्या काळात सावरकरानी याचे सुत्र हाती घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या स्थानबद्धतेमुळे मर्यादा आल्या.
अन अस्पृश्य समाजातील आंबेडकर नावाची वादळ ही चळवळ खेचून नेली आणी धर्मांतरा नंतर ती आंबेडकरी चळवळ झाली.
याचा पुढचा टप्पा होता तो म्हणजे तळगळातला प्रत्येक व्यक्ती जो स्वतःला शोषीत समजतो तो आंबेकरी चळवळीकडे मोठ्या आशेनी पाहू लागला. ईथे जे जे साहित्याच्या रुपात जन्माला आले ते प्रतिगाम्याच्या विरोधातील पूरोगामी साहित्य होते. तळागळातला समाज या बॅनरखाली एकवटत गेला व पुढे पुढे या चळवळीने साहित्यिक विद्रोह पुकारला. अशी झाली सुरुवात. हा प्रस्थापितांच्या विरोधातला विद्रोह होता. त्या नंतर सत्यशोधक, समता परिषद, ते अगदी हल्लीचे खेडेकर कंपू पर्यंत सगळेचा या मांडवाखाली उभे झाले. थोडक्यात हा लढा अभिजन विरुद्ध बहूजन असा होता. यातले विद्रोही साहित्य म्हणजे बहूजनांचे साहित्य.
लालशाह, समर्पक लिहिले
लालशाह,
समर्पक लिहिले आहे...आवडलं आणि पटलं!
छान
छान
लालशाह चळवळीचा आढावा घेण्याचा
लालशाह
चळवळीचा आढावा घेण्याचा एक चांगला प्रयत्न केलात.