Finally the wait is over!!!
Feels good to hold this sleek chick in my hand!!
iPhone 5!!!!!!!!!!!!!
---------------------------------------------------------------
* Congrats . . . .for getting ur SLIMMER life back. . . .
* Thats what we call a GEEK. a cool 45 K.
* Yep!!! Worth a spend
* i have already got one.. u just keep on waiting.. !!
* यार मुझे भी लेना था, कहा से ले रहा है..
*
*
*
मित्राने फेसबूकवर आपल्या नवीन फोनची जाहीरात केली आणि पाठोपाठ अभिनंदनाची रणधुमाळी सुरू झाली.
अभिनंदनाच्या पलीकडे ही एक वेगळीच चढाओढ सुरू झाली आणि तासाभरात पन्नास कॉमेंट पडल्या.
* आमच्याकडेही हा फोन आहे.. होता.. घ्यायचा आहे..
* माझा फोन यापेक्षाही किंचित भारी आहे..
* फोन नसला तरी आमची पण तेवढी ऐपत आहे...
* आमची ऐपत का नसेना पण मला या फोनमध्ये इतरांपेक्षा जास्त माहीत आहे...
*
*
*
* मध्येच एखाद्याचा आशावाद, एखाद्याचे स्वप्न - कधीतरी मी देखील हा फोन घेणार..
आजकाल बघावे तिथे ज्याच्या त्याच्या हातात काळ्या रंगाचे टचस्क्रीन फोनच दिसतात.
एखाद्याची गरज झाली आहेत हे फोन.
एखाद्याची महत्वाकांक्षा तर एखाद्याचे यशाचे परीमाण झाले आहेत हे फोन.
एकेकाळी घरात सर्वांसाठी म्हणून लॅंडलाईन फोन यायचा, एखाद्याच्या घरी वाडीतला पहिला कलर टीव्ही यायचा, तर कोणाच्या घरी थंड पाण्याची तहान भागवणारा फ्रीज यायचा..
काय ते कौतुक त्याचे, अहाहा...
जरी मोठेपणा म्हणून बघितले जायचे त्याला तरी होती ती खरी गरज..
आज मात्र मोठेपणाला गरज म्हणून बघितले जातेय..
बरे हे "स्टेटस" म्हणून मिरवणे आहे अश्यातलाही भाग वाटत नाही. स्टेटस शो ऑफ म्हणजे एखाद्याला गरज अशी फारशी नाही पण चार चौघांसमोर मोठेपणा म्हणून किंवा समोरच्याला बघताक्षणीच आपली हैसियत काय आहे हे समजावे यासाठी अश्या गोष्टींवर खर्च करणे ज्या आपल्याला परवडतात. पण हे मोबाईल आजकाल परवडण्यापलीकडलेही सहजगत्या घेतले जातात.
आमच्या वाडीतीलच वीस-बावीस वर्षांची मुले घ्या. कॉंट्रॅक्ट बेसिस वर इथे तिथे मार्केटींग, सेल्समन म्हणून सात-आठ हजार महिना मिळकतीवर गुजराण चालू असते. कोणी दहावी पास तर कोणी बारावी नापास. बरे लग्न अजून व्हायचेय म्हणून फिलहाल घरखर्चाचे टेंशन नाही, पण आयुष्यात स्थैर्य येण्यापासून अजूनही कोसो दूर. पण हे महागडे मोबाईल मात्र प्रत्येकाकडे. दिसायला सारे एकाच रंगरुपाचे. आकार तेवढा छोटा मोठा. कोणाचा ओरिजिनल ब्रांडेड कंपनीचा तर कोणाचा डुप्लिकेट. कोणाचा नोकीया तर कोणाचा क्योकिया. ते देखील दर चार-आठ महिन्याने जुना विकून नवीन लेटेस्ट मॉडेल बदलत राहणे. सोबतीला हॅंडसफ्री, हेडफोन, मेमरी कार्डसारख्या अॅक्सेसरीज. मोबाईल म्हणजे इंटरनेट हे देखील आज एक समीकरण झालेय. त्यामुळे सतत गेम्स, गाणी, वेगवेगळी अॅप्लिकेशनस डाऊनलोड करणे, फेसबूकवर ऑनलाईन राहणे.. थोडक्यात एखाद्या व्यसनासारखा याचा खर्च झालाय. मिळकतीतील एक बर्यापैकी हिस्सा या सार्यावर उधळला जातो.
या सार्याला फॅशन म्हणावे, एखाद्याचे पॅशन म्हणावे, की ही आजची टेक्नोसॅव्ही पिढी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत आपले छंद जोपासतेय असे समजावे माहीत नाही.
मी देखील या पैकीच एक आहे तरीही मला यात रस नाही. अद्याप तरी नाही.
पण या दिवाळीनिमित्त माझा जुना चार वर्षांपूर्वीचा मोबाईल बदलायची वेळ झालीय हे लक्षात आल्यावर माझीही शोधक नजर जेव्हा चौकशी साठी आजूबाजूला फिरली तेव्हा आमच्याच दुकानात काम करणार्या पोरांच्या हातातील अश्याच एक दोन एल-जी अन सॅमसंग कंपनीच्या मॉडेलवर पडली आणि मनात विचार आला, घेऊन बघावा का आपणही एखादा.... काळ्या रंगाचा चकाकणारा टचस्क्रीन मोबाईल...!!
- आनंद
(No subject)
घ्या की. मौका भी है दस्तूर
घ्या की. मौका भी है दस्तूर भी! तो प्री लिबरलायझेशन जमाना गेला आता. नॉस्टॅल्जिक लेख लिहिण्यापुरताच बरा वाटतो. मला पण स्मार्ट फोन जाम आवड्तात. मस्त फोन घ्या आणि मजा करा.
मामी +१ मित्रा, वाचन वाढव.
मामी +१
मित्रा, वाचन वाढव. लिहिण्याची शैली चांगली आहे. पण विषय आणि मांडणी यात प्रगल्भता येणे आवश्यक. अनाहूत सल्ल्याबद्दल क्षमस्व.
>> नॉस्टॅल्जिक लेख
>> नॉस्टॅल्जिक लेख लिहिण्यापुरताच बरा वाटतो.
+१
> मित्रा, वाचन वाढव > वाचन
> मित्रा, वाचन वाढव > वाचन करताय्त की ते फेसबुकचे.
मी देखील या पैकीच एक आहे
मी देखील या पैकीच एक आहे तरीही मला यात रस नाही. अद्याप तरी नाही. <<<
होलियर दॅन दाऊ!
सॅमसंग गॅलॅक्सी नोट टू घ्या.
सॅमसंग गॅलॅक्सी नोट टू घ्या. लै भारीये!
मामी सहमत. माझ्याकडे तोच आहे
मामी सहमत. माझ्याकडे तोच आहे
मामी प्रॉडक्ट रिव्यू डिटेल
मामी प्रॉडक्ट रिव्यू डिटेल मध्ये लिव्हा. साधारण किंमत कळेल का?
मी सध्या एक साधा ब्लॅ़कबेरीच वापरते पण तरीही फोन वर तुमच्या रोजच्या अॅक्टिविटीज इंटिग्रेट करणे फार सोपे जाते. मुंबईच्या जीवनात तर योजनाबद्ध पद्धतीने राहण्यासाठी फोनचा फार उपयोग होतो आहे. मला जेवताना वाचायची सवय आहे, इको टाइम्स म्हणजे लंच मेट . पण तो विसरला तर फोन वरून वाचन करता येते.
जुन्याकाळी ज्यांच्याकडे फोन व एस्टीडी सुविधा असे ते फार भाव खात. घरी फियाट किंवा अँबॅसॅडर पण असे बहुतेक. त्यांच्याकडे विचारून फोन करायला जाणे, पीपी नंबर देणे केले आहे का? पोस्टात जाऊन कॉल बुक करणे? बोलताना मध्येच प्लीज एक्स्टेंड प्लीज एक्स्टेंड म्हणणे? त्यामानाने आताचा फोनचा सुळसुळाट खरेच बरा वाट्तो. स्मार्ट फोन तर आपल्याहूनही स्मार्ट आहे असेच मला मनातून वाट्त असते. शिवाय ही सर्व साधने आहेत. संवाद सुरू राहिला पाहिजे. स्मार्ट फोन असूद्या नाहीतर डमी.
तू ठीकाहेस ना? आणि लव्ह यू कोणत्याही मार्गाने म्हणता यायला हवे.
माझ्याकडे आयफोन ४ आहे. कित्ती
माझ्याकडे आयफोन ४ आहे.
कित्ती मस्त उपयोग होतो सांगू शकत नाही. खास करून मुलांचे फोटो एका मिनिटात क्लिक करून वॉट्स अॅप वरून त्यांच्या आजी आजोबा मामा आत्त्या मावशीला बघायला मिळतात. शूटिंग पाठवता येते.
आईवडिलांचे रिपोर्टस स्कॅन करून बघता येतात.
सगळ्यात भारी म्हणजे माझी आज्जी जायच्या दोन दिवस अगोदर तिने माझ्यासाठी पाठवलेले आशीर्वाद लाईव घेता आले.
अजुन काय पाहिजे.
शेवटी ही एक सोय आहे, डिंग्या मारायला वापरायची की नाती जोपासायला हे व्यक्तिच्या स्वभावावर अवलंबुन आहे.
सगळ्यात मोठा फायदा तर मायबोलीवर वाट्टेल तेव्हा हुंदडता येण्याचा आहे.
अंड्या, 'साधी रहाणी आणि उच्च
अंड्या, 'साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी' या थोतांडातुन बाहेर या. उच्च राहणी ,झकपक कपडे आणि संवेदनाहिन विचारसरणी यांचा अवलंब केलात तर बरेच पुढे जाल, गो अहेड.
बागुलबुवा मित्रा, वाचन वाढव.
बागुलबुवा
मित्रा, वाचन वाढव. लिहिण्याची शैली चांगली आहे. पण विषय आणि मांडणी यात प्रगल्भता येणे आवश्यक. अनाहूत सल्ल्याबद्दल क्षमस्व.
>>>>>>>>>>>>>>>>>>
सल्ल्याचे ठाऊक नाही, आपला अंदाज परफेक्ट.. वाचनाबाबत मी ठणठणगोपाळ आहे.. तसेच शब्दसंपदाही फार तोकडी आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास "अनाहूत सल्ला" यामधील "अनाहूत"चा नेमका अर्थही माहीत नाही ..
मात्र आपल्याकडून पुर्ण सल्ला अपेक्षित आहे. काय कुठून वाचायला घेऊ ते ही सांगा जमल्यास विचारपूसमध्ये.
अवतार,
वाचन करताय्त की ते फेसबुकचे.
>>>>>>>>>>>>>>>>>>>
थांब आजच फेसबूक अकाऊंट उडवून टाकतो..
मामी, अश्विनीमामी,
विचार चालूय ग्ग, एखादा स्वस्तातला डुप्लिकेट नाहीतर सेकंड हँड घेऊन मला खरेच आवड आहे की नाही चेक केले पाहिजे, अन्यथा खर्चा करूनही तो फोन फक्त बोलण्यापुरताच वापरायचो.
साळसूद,
अंड्या, 'साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी' या थोतांडातुन बाहेर या.
>>>>>>>>>>>>>
असे खरेच काही नाहिये माझे एवढेच बोलेन, हे जे वर लिहिलेले वाचून जर तुमचा तसा समज झाला असेल तर... आपली रहाणी आपल्या आवडीची असावी, जगाच्या नाही एवढेच मत आहे माझे. मग साधी असो वा स्पेशल..
साती,
तुम्ही तर फोन फूल टू वसूल करता की राव..
साती वॉट्सअॅप काय आहे? आणि
साती वॉट्सअॅप काय आहे? आणि शूटींग कसे पाठवता?
वॉट्सअॅप हे याहू
वॉट्सअॅप हे याहू मेसेंजरसारखे एक मेसेंजर अॅप्लिकेशन आहे, व ते क्रॉसप्लॅटफॉर्म आहे. म्हणजे सर्व प्रकारच्या स्मार्ट मोबाईलवर चालते. वरून तुम्हाला आयडी करत बसावी लागत नाही. तुमचा मोबाईल नंबर हीच आय डी असते. त्यात फोटो, व्हिडिओ इ. शेअर करता येतात, जसे जीटॉक, याहू इ.वर करतो तसेच. फक्त ही सर्विस तुलनेने खूपच फास्ट आहे.
ओह म्हणजे दुसर्या पार्टीकडे
ओह म्हणजे दुसर्या पार्टीकडे पण स्मार्टफोन पाहिजे तर
अंजली, बरोबर. पण नुसते
अंजली, बरोबर. पण नुसते अँड्रॉईड नव्हे, तर इतर प्लॅटफॉर्म साठी ही आहे. नोकिया स्टोअर, आयफोन अॅप्स इ. मधेही ते आहे. अधिक माहिती इथे मिळेल.
आमच्यात. कुनाला मेसेज
आमच्यात. कुनाला मेसेज पाथवायचा अस्ल तर आम्हि ढोल्वाल्याला साण्गतो. तो जसा मेसेज असल तसा आवाज काडतो. तो आवाज दोन मैल जातो. तिथ्ला ढोलवाला तसले आवाज काडतो. अस दोन दोन मैलाव्र मेसेज जात जात देशात कुटपन जातो.
आम्हाला पन असच मेसेज येतो. बेटरि बिटरि लागत नाहि. दिवालिला क्वारटर दिलि कि ब्येस्त सर्विस मिलते.
आयव्हरी लाना मधे रहाता वाट्टं
आयव्हरी लाना मधे रहाता वाट्टं तुम्ही, वेताळराव
न्हाई. गुजरात
न्हाई. गुजरात