Submitted by पुरंदरे शशांक on 8 November, 2012 - 22:28
फुले किती बागेत उमलली
फुले किती बागेत उमलली
गोड गोडशी कितीतरी
फुलपाखरु होउनी जावे
गुंजत र्हावे फुलांवरी
रंग वेगळे किती किती ते
देतो यांना कोण बरे
वा-यावरती डोलत असता
भान हरपुनी मी निरखे
जाई जुई पांढरी शुभ्रसी
जास्वंदी ही लाल किती
केशरदेठी पारिजात हा
गंधित झाला परिसरही
गर्द जांभळी गोकर्णी ही
गुलाब फुलले कोमलसे
शेवंतीही पिवळी पिवळी
उन कोवळे पसरविते
ऊंचाउनिया मान केवढी
निशीगंधही उभा दिसे
मंद सुगंधी झुळका येता
मन मोहवुनि टाकतसे
छानछानशी फुले पाहता
मस्त वाटते किती मला
गाणे गाते मनही माझे
हळु हाति घेताच फुला...
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तच ! छानछानशी फुले
मस्तच !
छानछानशी फुले पाहता
मस्त वाटते किती मला
गाणे गाते मनही माझे
हळु हाति घेताच फुला... >>>>
कित्ती सुरेख ! ही बाल पेक्षा
कित्ती सुरेख !
ही बाल पेक्षा थोडी मोठ्या ८-९ वर्षाच्या मुलीसाठी कविता