क्लूलेस - ८

Submitted by गजानन on 26 October, 2012 - 13:21

क्लूलेस - ८ च्या चर्चेसाठी हा धागा.

खालील दुव्यावरून या खेळाला सुरुवात करता येईल.

http://ahvan.in/ahvan/ahvan12/klueless8/specter/justclicktogo.asp

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोण पवित्र वल्ली? अ‍ॅक्चुअली त्याचे उत्तर बरेच लांबवरचे कनेक्शन आहे. तुला मूळ दुर्दैवी घटना मिळाली का? ज्याने त्यासंदर्भात काहीतरी केले आहे त्याचीच दुसरी रचना आणि त्यात जी व्यक्ती आहे तिची नातेवाईक व्यक्ती असा संदर्भ आहे.

'पवित्र' 'वल्ली' म्हणजे त्या घटनेत गेलेली एक कलाकार व्यक्ती.
त्या घटनेवर एक गाणं मिळालं, त्याचा लेखक मिळाला. (ज्याचं स्वत:चं, त्याच्या बाबांचं आणि बाबांच्या बाबांच नाव एकच होतं). बरोबर? आता त्याची दुसरी रचना का? त्यासाठी काही क्लू दे ना.

श्रद्धाला ए आणि मला अहो म्हटले म्हणुन Happy सारखी डोक्याला कल्हई होतेय, त्यात जरा मजा Happy जस्ट किडिंग Happy
बरं मला त्या २० च्या पाच पायर् यांनद्दल जरा क्लयु द्या बरं, तुम्ही दोघं. अाज सहावी ते विसावी असा जरा हेक्टिक प्रवास केला. आता डोकं भंजाळलय Wink

अवल, सहावी ते विसावी म्हणजे खरंच बाजी मारलीत.

अहोबद्दल - तुमच्या मायबोलीवरच्या लिखाणातून तुम्ही माझ्यापेक्षा वयाने, अनुभवाने ज्येष्ठ आहात असे जाणवले, म्हणून आदरपूर्वक अहो-जाहो लिहिले जाते.

विसावीला पुढे तीन फाटे फुटतात,

१) २०.अ --> २० ब --> २१
२) २०.क --> २० ड --> २१
३) २० इ --> २० फ --> २१

तीनापैकी कोणताही एक मार्ग घेतला तरी २१वर पोचता येते. तुम्ही कोणता घेतला आहे?

हो बरोबर. त्याच्या विकिपेजावर इंट्रोमध्ये ज्या दोन गाजलेल्या रचना दिल्यात त्यापैकी एक क्लूतून मिळते. उरलेली दुसरी.
३१पासून पुढे गेलास तर इथे ़क्लू टाकून ठेव. Happy ३९पर्यंत गेलास तर आगाऊ अभिनंदन.

अवल, पाचही सोडवण्याची गरज नाही.

अरे Happy
पण मला मेेत्रीत ए म्हणले तर अावडते Happy अाता मेेत्री करायची की नाही ते तू ठरवायचे Happy
अन हे काय? मी टिनटिनची चाहती अाहे

श्रद्धा, धन्यवाद. Happy

पंचवीस सुटली. टायटलचा संबंध कळला नाही पण. या दोन दिवसात सगळ्या सुटल्या तर बरे होईल... पण माहीत नाही कसे कसे जमतेय ते.

अवल, Happy

त्या सोंगाचं नाव, आणि चित्राचं नाव, आणि चित्रातली अक्षरं गूगल कर. तू मृतपुरुषाजवळ जाशील, त्यात शीर्षक टाकलेस तर एका बैठ्याखेळासंबंधातली रोचक घटना वाचायला मिळेल, आणि तिथून अजून पुढे वाचत जा.

श्रद्धा, २९ वर ती गाणी मी शोधली, (पण खात्री नाही.) इतर क्लू वाचून ती व्यक्ती म्हणजे मिशीवाला बावा असावा असे वाटतेय. हे बरोबर असेल तर पुढे सरकण्यासाठी जरा क्लू दे ना.

गजानन, मिशीवाला बाबा? मीपण आधी गाणी शोधली, मग बरोबर येईनात म्हणून बाकी क्लूंवरून ताडले. तुला ते फेमस वाक्य कळले का? त्याच्याशी संबंधित एका व्यक्तीचे नाव म्हणजे उत्तर आहे.

आजचा अपडेटः हॉऑफे भरला असून स्पर्धा अधिकृतरीत्या संपली आहे. यंदा अभ्यासामुळे फार लक्ष देता आले नाही.)थोडी अजून बैठक मारली आसती तर हॉऑफे कदाचित गाठता आला असता. पुढच्या वर्षी टीम बनवून खेळायला हवं.

असो. Happy ३२.

... आणि मी ३० वर..
श्रद्धा, धन्यवाद.. Happy मी तो वादविवाद कितीदा उघडला.. पण कंटाळ्याचा कंटाळा केला.. Lol
इथे असं झालं की उलटे सुलटे क्लू वाचून भरकटत गेलो..

स्पर्धा संपली?
म्हणजे? आता पुढच्या लेव्हलस खेळता नाही का येणार?

मी ११ वीतच.
वेळ नाहिये हा एक मोठा प्रॉब्लेम.

खेळता येतील की! स्पर्धा संपली म्हणजे हॉऑफे भरला. Happy
बाकी के१पासूनची सगळी व्हर्जन्स कधीही खेळता येतात.

यावेळॅस जरा जास्तच लेव्हल आहेत पण. ३९!!!! Uhoh पण मस्त आहेत.
मी ३४वर.

३९!!!! अ ओ, आता काय करायचं पण मस्त आहेत.
मी ३४व>> बापरे.

हॉल ऑफ फेममध्ये किती लोक्स असतात?
की स्पर्धा सुरु होउन काही दिवसच सुरु असते?

भारीय राव ह्यो गेम Happy
मला माहीतच नव्हतं. परवा दिवशी सुरुवात केली कालपर्यंत कसाबसा १८ वर येवुन पोचलोय, इथल्या हिंट्स वापरत. कालपासुन मात्र १८ वरच आहे Sad

२०० Happy

मंडळी कुठवर आलात? Happy

श्रद्धा, ३३ मध्ये दोन चित्र आणि एक कागदपत्र मिळालंय. कागदपत्रातले क्रमांक कोणत्या शृंखला माळतायत काय कळंना. आता हॉऑफे भरलं म्हणजे ते लोक ब्लॉगावर उत्तरं देत न्हाईत जणू. काल मी एक प्रश्न विचारला तर संपादनासाठी न थांबता तो सरळ ब्लॉगावर दिसला.

बारावीत त्या फेनॉमेनन च नाव कळालं.
पण ते टायपुन उत्तर येत नाहिये.
उत्तर नंबर आहे अस ब्लॉगवर कळतय पण नेमका कसला नंबर आणि त्या फेनॉमेनन चा संबन्ध लावता येत नाहिये.

Happy

मी अजून २० वरच, फार वेळमिळत नाहीये. अन थोड्या वेळात ती विसावी काय झेपत नाहीये Happy
वा श्रद्धा, ३४. गजानन ३३ दोघे लागोपाठ आहात की Happy
झकास >>>कितव्यान्दा तरी सोपी माहिती आणि उत्तर कॉम्प्लीकेट करुन घेतलं <<<हो रे; हिच तर क्ल्युलेसची गंमत आहे Happy

Pages