सुरक्षीत ड्रायव्हिंग व कार्स संबंधी इतर गोष्टी

Submitted by इब्लिस on 3 November, 2012 - 03:05

साजिरा यांच्या कोणती गाडी घ्यावी या धाग्यावर भुंगा यांनी त्यांना झालेल्या अपघाता विषयी लिहिले. त्यावरून सुरू झालेल्या चर्चेत सेफ्टी फीचर्स व सेफ ड्रायव्हिंगच्या संदर्भात मी खालील पोस्ट टाकली होती.

***
इब्लिस | 2 November, 2012 - 18:50
>>मधली लेन पासिंग लेन असते हेच ठाऊक नसतं<<

आर.टी.ओ. व कार डीलर्स /सर्व्हिस इंजि. ना बोलावून एकदा सेफ ड्रायव्हिंगवर वर्कशॉप अ‍ॅरेंज केला होता त्याची आठवण आली. तो कार्यक्रम फार लोकांना आवडलेला होता व उपयोगी आहे असा अभिप्राय भरपूर लोकांकडुन मिळाला होता.

यानिमित्ताने इथे चर्चा सुरू आहेच, तर एक सूचना करतो.

सेफ ड्रायव्हिंगवर एक धागा काढावा, व जाणकारांनी त्यात माहिती द्यावी.
यात,
१. रहदारीचे नियम.

२. गाडीच्या (मो.सा., चारचाकी) यांचे कोणते मेण्टेनन्स शिकून घेणे गरजेचे आहे? घरी काय काय करावे?
उदा. टायर बदलणे. ट्यूबलेसचे पंक्चर स्वतः काढता येतील अशा किट्स आजकाल मिळतात. कूलंट, पाणी, इंजिन ऑइल इ. कसे तपासावे?

३. हॉर्न/लाईट/इंडिकेटर्सचा वापर कसा करावा? (वळण्याची सूचना देण्यासाठी ऐवजी साईड देण्यासाठी इंडीकेटर आहे अशीही एक समजूत आढळते)

४. सोबत कागदपत्रे कोणती बाळगावीत. इन्शुरन्स कोणता चांगला? थर्ड पार्टी/कॉम्प्रिहेन्सिव्ह इ. थोडक्यात म्हणजे नुसती गाडी चालवणेच नाही, तर एक चांगला गाडीवान (च्याच्याकडे धन तो धनवान, या चालीवर) कसे व्हावे, याबद्दलचा बाफ निघाला तर उत्तम होईल.

५. याव्यतिरिक्त एक महत्वाचा विषय म्हणजे ड्रायव्हर नोकरीस ठेवणे. वेगवेगळ्या शहरात वेगळे पगार असतात. पण त्याला नोकरीस ठेवताना आपण काय काय चौकशा करणे गरजेचे असते? काहीवेळा आपली गाडी चालवून नेण्यासाठी अनुभवी व भरवशाचा माणुस टेंपररी बेसिसवर हवा असतो. तशा लोकांचे काही कॉण्टॅक्टस उपलब्ध असतील तर शेयर करणे इ. करता येईल.

६. इतर फुटकळ गोष्टी. जसे उन्हात रंग खराब होतो का? गाडीला अ‍ॅक्सेसरीज कोणत्या घ्याव्या? कोणत्या टाळाव्या? इ.

बघा विचार करून लोकहो.

***
यास अनुसरून बर्‍याच माबोकरांनी वेगळा धागा सुरु केल्यास चांगले असे अनुमोदन दिले. म्हणून हा धागा सुरू करीत आहे.
आपले अनुभव / एक्पर्टाईज इथे कृपया शेयर करा.
धन्यवाद!
(यासंदर्भातले प्रतिसाद इकडे हलविले जातील असे हिम्सकूल यांनी सांगितले. संपादकांनाच ते करता येईल. तसे करावे ही विनंती. लेखन कुठे टाकावे ते समजत नव्हते, म्हणून तंत्र आणि मंत्र मधे समावेश केला आहे. कार्स संबंधी धाग्यांचा वेगळा ग्रूप केला तरी चालेलसे वाटते)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हायवेवर ट्रकवाले, जड वाहने नेहमी उजव्या बाजूनेच का चालवतात्?.... हॉर्न, लाइट वगैरे देउनसुद्धा डाव्या लेनमध्ये जात नाहीत.... आणि मग कंटाळून डाव्या साईडने ओव्हर्टेक करावे लागते Sad आणि मग हळूहळू तशीच पद्धत पडते आणि माझ्यासारखा एखादा तरीही साईड मागण्यासाठी लाइट, हॉर्न देत राहीला की लोक माझ्याकडे "काय बावळट आहे" अश्या नजरेने बघत पुढे निघून जातात Sad

आपण पाळत नसलेले / माहिती नसलेले काही वाहतूक नियम.

RTO.jpgरोड साईन्स : आर.टी.ओ.पुणे यांची वेबसाईट.

यावेबसाईट वरील कॉशनरि साईन्सची लिंक गंडली आहे - शेअर रिक्षाच्या टेरिफ कार्डकडे ती जाते. Wink म्हणून त्या फक्त खाली डकवतो आहे.

रोड साईन्सच्या फलकाचं त्रिकोणी असणं / गोल असणं काय सूचित करतं कुणाला माहिती आहे का?

मला आठवतेय त्याप्रमाणे त्रिकोणी चित्रात माहिती असते, सावधानीची सुचना असते आणि गोल चित्रात प्रतिबंध असतो, जो न पाळल्यास दंड होऊ शकतो.

म्हणजे वर जे काही दिलेय ते सगळे त्रिकोणी आहे, रस्त्यावर पुढे काय आहे त्याची माहिती आहे. पण तेच नो पार्किंग असेल तर ते गोलात लिहिलेले असते.

गुड वन इब्लिस..... !!!

जमेल तसं वाचत आणि लिहित जाईनच इथे.... आणि लिहिलेलं आणि वाचलेलं पालनही करेन Proud Wink

धाग्याला अनुसरून कारचालकांसाठी मराठीत प्रतिज्ञा :

गाडी चालवणे हा माझा धर्म आहे.
सारे गाडीचालक माझे बांधव आहेत.
माझे माझ्या गाडीवर नितांत (बायकोपेक्षाही जास्त) प्रेम आहे.
माझ्या देशातील विविध आकारतील अनेकानेक गाड्यांचा मला अभिमान आहे.
माझे माझ्या देशातील रस्त्यांवर (मग ते कसेही का असेनात) आणि नियमांवर प्रेम आहे.
या नियमांचा पायिक होण्याची पात्रता माझ्या अंगी बाणावी यासाठी मी सदैव प्रयत्न करेन.
इतर गाडीचालकांनी त्याला सुरूंग लावले तरी ते हाणून पाडायचा प्रयत्न करेन.
मी माझ्या बाजुच्या लेनमधल्या गाडीचालकाचा मान ठेवेन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझी गाडी, रस्ते आणि इतर गाडीचालक यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करत आहे.
त्यांचे सुरक्षित घरी पोचणे आणि त्यांचा सुखरूप प्रवास यातच माझे सौख्य सामावलेले आहे.

जय हिंद जय महाराष्ट्र...!!!

Happy

छान आहे धागा, मी आणि माझे (देशोदेशीचे) चालक, असे काहितरी लिहावेसे वाटतेय.. पण इथे नाही लिहित.

एक फिरता समस :

India is a place where .... anyone driving faster than you is "साला मरणार एकदा "
Anyone driving slower than you is " साला गाडी काय बागेत चालवतो का रे "
and anyone driving parallel to you is... "आता काय बापाशी रेस लावतो का रे तू" Happy Wink Light 1

जनहित मे जारी Proud

चांगला धागा आहे.

काही महिन्यांपूर्वी मला कळलेली नवी माहिती. टायर फुटणे हा प्रकार कमी हवा भरल्यामुळे होतो, जास्त भरल्यामुळे नाही. कारण समजले ते असे: टायरची साईड वॉल नरम असते. ती कमी हवेमुळे सारखी दबून तापते आणि टायर फुटते.

दुसरी महत्वाची माहिती म्हणजे, स्पीड मध्ये चालवताना हातातील चाक दोन्ही हातांनी नीट धरणे आवश्यक आहे. टायर फुटले तर काय करायचे हे १० वेळा मनात घोकणे पण आवश्यक आहे. साधारण पाने असे काही झाले की आपण नकळत ब्रेक दाबतो. पण हे घातक आहे, त्याऐवजी उलट वेग किंचित वाढवावा (हे तेंव्हा सुचणे अवघड आहे, पण घोकून सवय करता येते), तसे न केल्यास ब्रेकमुळे गाडी हमखास उलटते आणि डीवायडर च्या पलीकडे जाऊन येणाऱ्या वाहनावर आदळू शकते. असे खूप अपघात झालेले आहेत.

आंतरजालावर यावर खूप माहिती उपलब्ध आहे. युट्युब वर प्रत्यक्ष चालत्या गाडीच्या टायरला टायमर आणि स्फोटके लावून केलेले प्रयोगही पाहता येतील.

मी रोड सेफ्टि मध्ये काम करतो. स्पेसिफिक पश्न असतील तर उत्तरे द्यायचा प्रयत्न करेन.

मला आठवतेय त्याप्रमाणे त्रिकोणी चित्रात माहिती असते, सावधानीची सुचना असते आणि गोल चित्रात प्रतिबंध असतो, जो न पाळल्यास दंड होऊ शकतो. >>> +१

त्रिकोणी चित्रे सावध करतात, गोल चित्रे order देतात. जेवढ्या जास्त बाजु तेवढी ती सुचना जास्त महत्वाची ठरते. म्हणुन गोल चिन्हे order देतात (infinite sides for circle)

माझेही दोन पैसे---
१. हल्लीच्या सर्व गाड्यांमधे सीट बेल्ट असतात. बहुतेक गाड्या ५ सीटर असतात. म्हण्जेच ५ सीट बेल्ट. जेव्हडे बेल्ट तेव्हडेच पॅसेंजर असावेत आणि सगळ्यांनी-- मागील सीट्वर बसलेल्यासुद्धा-- सीट्बेल्ट बांधावेत. जे बांधण्यास तयार नसतील त्यांना गाडीत बसू देऊ नये. मी अगदी कटाक्षाने हा नियम पाळते. यासाठी वाद घालावे लागतात, पण हे त्यांच्याच सुरक्षेसाठी आहे हे ठासून सांगावे. अपघातानी होणार्‍या जास्तीत जास्त इंजुरीज, धक्क्याच्या इंपॅक्ट्नी शरीराची जी आपटाआपटी होते, त्यानी होतात हे लक्षात असूदे.
२. आपली गाडी आणि पुढील गाडी यात सुरक्षित अंतर राखावे. म्हणजेच साधारण १ ते २ गाड्या मावतील एव्हढे. असं केल्याने इतर गाड्या कट करुन जायची शक्यता असते, पण जाऊदेत त्यांना. वर नीधप ने म्हट्ल्याप्रमाणेच अ‍ॅटीट्युड असावा. तोच जास्त सेफ वाट्तो.
३. ब्लाइंड स्पॉट = अपघाताला आमंत्रण. भारतात तिन्ही मिरर मधे बघून ही समस्या सोडवतात म्हणे. मिररमधे बघावेच पण ओव्हर द शोल्डर मान वळवून, त्या बाजूच्या लेन मधल्या गाड्यांचा अंदाज घेणे ही अगदी योग्य व सेफ पद्धत वाटते. एक गाडी पुष्कळदा घरातल्या २--३ जणांकडून चालवली जाते. प्रत्येकाच्या हाईटप्रमाणे मिरर अ‍ॅड्जेस्ट करावा लागतो. त्यामुळे मिररची बदलाबदली फार होते. म्हणून पुन्हा एकदा , त्यावर अवलंबून राहू नका. लेन बदलताना , मान वळवून बघण्याची सवय लावून घ्या.

मी यु.के. ला ड्रायव्हिंग शिकल्यानंतर कळाले की मला किती चुकीच्या सवयी आहेत. भारतात असतांना एक्सपर्ट सारखी गाडी चालवायचो पण ईथे ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्यासाठी २ रा प्रयत्न करावा लागला.

माझ्या प्रशिक्षकानी दिलेल्या काही महत्त्वाच्या टिप्स आठवल्या..

१. कोणतेही वळण (डावे ऊजवे) घेतांना वेग हा जास्तीत जास्त २० ते ३० कि.मी. किंवा त्याहुन कमी असावा.
२. ड्राय कंडीशनमध्ये (उन्हाळी) कमीत कमी २ गाड्यां ईतके अंतर २ गाड्यां मध्ये असावे.
३. वेट कंडीशनमध्ये ( पावसाळी) कमीत कमी ३-४ गाड्यां ईतके अंतर २ गाड्यां मध्ये असावे.
४. ब्रेक मारण्यापुर्वी, लेन चेंज करण्यापुर्वी, वेग कमी / जास्त करण्यापुर्वी ३ मिरर चेक करायला विसरू नये त्यामुळे ईतर वाहनचालक नेमके काय करताहेत ह्याची साधारण कल्पना येते.
५. कोणत्याही मुर्खपणा करत असलेल्या वाहनचालकाकडे दुर्लक्ष करावे, स्वतःला आणि सोबतच्या प्रवाश्यांना सुरक्षित करावे, कारण मुर्खपणा करत असलेल्या वाहनचालक स्वत: सकट इतरांना ही धोक्यात टाकत असतो.
६. वाहतुकीचे नियम पुर्णपणे पाळावे, नियमानुसार गाडी चालवल्यास ईतर आपल्याला हसतील याची तमा बाळगू नये, कारण घरी तुमची वाट पाहणारे कोणीतरी असते ह्याची नोंद घ्यावी.
७. लांबच्या प्रवासाला (साधारणत: ३ तासांपेक्षा जास्त) निघण्याआधी, ईंधन, हवा, ब्रेक्स , ईजिन ऑईल ई) ची चेकिंग नीट करून घ्यावे, वेळ सांगून येत नाही.
८. दर २ तासांनी १०-१५ मिनिट आराम करावा अन्यथा गुंगी येण्याचा दाट संभव असतो.

बाकी जसे अजून आठवेल तसे पोस्टतो.

- वळणावळणाच्या अरुंद रस्त्यांपेक्षा सरळ आणि प्रशस्त रस्त्यावर ड्रायव्हरला गुंगी येण्याचा जास्त संभव असतो.
- आपण नियम पाळले म्हणजे अपघात होणार नाही असे नाही. समोरच्यानेही ते पाळायला हवेत..
- आपला जीव सर्वात महत्वाचा. मी शिस्त पाळतोय मग समोरून येणा-या बेशिस्त वाहनाला साइड का देऊ असा (पुणेरी) विचार धोकादायक आहे. जीव गेल्यानंतर कोण बरोबर होतं याला फारसं महत्व उरत नाही. रस्त्यावर कमीपणा घ्यायला शिका.
- रात्रीच्या वेळी डीपरचा अर्थ नीट समजावून घ्यावा.

अपघात टाळण्यासाठी काही अभिनव सुचना
1)गर्लफ्रेन्ड किंवा बायको फारच स्टनिंग, सेक्सी ,सुंदर वगैरे असल्यास, ड्रायविंग करताना तिला पाठीमागे बसवावे ,शेजारी बसवु नये ,लक्ष विचलीत होऊ शकते.
2)ड्रायव्हींग करताना समोर लक्ष ठेवावे ,आजुबाजुची 'हिरवळ' बघण्याच्या नादात तुमचा अपघात होऊ शकतो.
3)बेटर हाफशी भांडणे झाल्यास लगेच गाडी चालवु नये. थोडे थंड घ्यावे ,मगच 'रथचक्र' हातात धरावे.
4)बायको किंवा गर्लफ्रेंड यांनी फोनकरुन बोलवल्यास पाचच मिनिटात येतो असे पुचाट आश्वासन देऊन गाडी दामटु नये, व्यवस्थीत वेग ठेऊनच यावे.
5)बायको किंवा गर्लफ्रेन्ड गाडी चालवणार असेल तर उंच टाचांचे सँडल्स, जबरी आकाराच्या अंगठ्या ,गोगो गॉगल्स काढण्यास सांगावे . फायदाच होईल.
6)खाणे आणि बडबडणे हा बायकांचा स्थायीभाव असल्याने त्यांच्यात सामिल होऊन ड्रायव्हींगकडे दुर्लक्ष करु नये.
7) गाडी ही स्त्रीलिंगी असली ,तरी रस्ता हा पुलिंगी आहे, त्याच्या शिवाय तिचे काहीच चालत नाही हा आत्मविश्वास बाळगावा .
धन्यवाद.

शुगोल,
देशातल्या ट्रॅफिक मुरांब्यात दुसरा मुद्दा मर्यादित प्रकारातच शक्य आहे.
तसेही इथे शहरात दिवसाढवळ्या चालवताना (वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे वगैरे सोडल्यास) ४०-६० किमीचा स्पीड हा मॅक्झिमम वगैरे मिळतो. तोही काही सेकंदापुरता. एरवी आपली खुडुक बुडुक करतच चालवावी लागते. दोन गाड्यांइतके अंतर ठेवायचे ठरवले तर आपण कधीच पुढे जाऊ शकणार नाही.
जिथे वेग असतो तिथे (एक्स्प्रेस हायवे वगैरे) दोन गाड्यांइतके अंतर ठिके.

दोन गाड्यांमधील अंतरांबाबत : तुम्ही म्हणताहात ते बरोबर @ नीधप.
त्यांनी म्हटले ते हायवेवरील (तेही परदेशी) ड्रायव्हिंगबद्दल म्हणत आहेत.
दुसरे म्हणजे इतके अंतर राखून चालण्यासाठी ओव्हरटेक करायचा असेल तर गाडी पॉवरफुल लागते. मारूती, इंडीका इ. गाड्यांना एस.टी./आयशर/४०७ ट्रकवाले ओवरटेक करताना खूप त्रास होतो. एकतर वेग वाढवून पुढे जायचा प्रयत्न करे पर्यंत समोरून गाडी आलेली असते. अन दुसरे म्हणजे ड्रायव्हर मॅनिया. बाजूचा ओव्हरटेक करतो आहे हे पाहिलं की शिस्तीत साईड न देता आता पर्यंत रमतगमत चालणारा स्पीड वाढवून त्रास देणार.
पण सेफ ब्रेकिंग डिस्टन्स म्हणून तो सल्ला अतीशय योग्य आहे.

सीट बेल्ट.
हा आयटम व्यवस्थीत काम करतो आहे की नाही हे तपासून पहाणे गरजेचे असते. बर्‍याचदा लॉकिंग खराब झालेले असते. गुंडाळायची स्प्रिंग बरोबर काम करीत नसते. सीटबेल्टची हलचाल नीट होत नसते.
याच्याबद्दल विस्ताराने थोड्या वेळाने लिहितो. सध्या थोडा बिझी.

सेफ ब्रेकिंग डिस्टन्स <<
हे त्या त्या ट्रॅफिकच्या वेगावर अवलंबून असायला हवे ना?
मला फिजिक्स कमी कळते पण हे साधे लॉजिक आहे ना की वेग जेवढा जास्त तेवढे सेफ ब्रेकिंग डिस्टन्स जास्त.

सीटबेल्ट ही मान कापायची सुरी आहे. अर्थात सुरीखाली जाड टॉवेल ठेवून वापरता येतो.
मला सीटबेल्टशिवाय गाडी चालवायला कम्फर्टेबल होत नाही.
इथल्या छोट्या हॅचबॅक ज्या आहेत त्यात मागच्या सीटवर तीन व्यवस्थित आकाराची माणसे बसल्यावर सीटबेल्टची गरजही उरणार नाही असे पॅक होते सगळे. मधल्या माणसाचा सीट बेल्ट हा केवळ पोटावरून येतो त्याची मान लचकू शकतेच. Happy

@ नीधप, इब्लिस >> दोन गाड्यांमधील अंतरांबाबत मी जे लिहीले आहे ते अर्थातच फ्री वे / हाय वे ड्रायव्हिंग विषयी आहे. भारतात नेहमीच्या रस्त्याला एवढे अंतर म्हणजे एक जोकच होईल, याची मला पूर्ण कल्पना आहे.

@नीधप, त्यात मागच्या सीटवर तीन व्यवस्थित आकाराची माणसे बसल्यावर सीटबेल्टची गरजही उरणार नाही असे पॅक होते सगळे. >>> तुम्ही म्हणता हे खरे असले तरी अपघाताच्या इंपॅक्टनी काचा फुट्तात, दरवाजे उघडतात व आतिल व्यक्ती बाहेर फेकल्या जातात आणि त्यामुळे गंभीर इजा वा जीवित हानी होते. तसेच बाहेर फेकल्यामुळे रस्त्यावरच्या इतर ट्रॅफिकपासूनही धोका असतोच. तस्मात गाडीच्या आतमध्ये कितीही "पॅकींग" जॅम असले तरी त्याचा अपघात झाल्यावर काहीच फायदा नसतो. तसेच शोल्डर बेल्ट असो वा पोटावरचा, इंपॅक्ट्नी मान लचकणे(विप लॅश) हे दोन्हीला अपरिहार्य आहे. फक्त बेल्टेड असताना बहुतेक वेळा एवढ्यावर व बारीकश्या इजांवर भागते.

तुम्ही म्हणता हे खरे असले तरी अपघाताच्या इंपॅक्टनी काचा फुट्तात, दरवाजे उघडतात व आतिल व्यक्ती बाहेर फेकल्या जातात आणि त्यामुळे गंभीर इजा वा जीवित हानी होते. तसेच बाहेर फेकल्यामुळे रस्त्यावरच्या इतर ट्रॅफिकपासूनही धोका असतोच. <<<
इथेही वेगाचा मुद्दा येतोच.

सीटबेल्ट लावू नये किंवा त्याचा आग्रह चुकीचा आहे असं माझं म्हणणं नाहीये.

सगळ्यांनाच एक विनंती आपण नियम, काळजी, खबरदारी याबद्दल लिहिताना कश्या प्रकारचा रस्ता, देश, वेगमर्यादा हे तपशील लिहावेतच. कारण अनेक गोष्टी या तपशीलांच्याप्रमाणे बदलू शकतात.

एअर बॅग्ज खरेच कितपत उपयोगी असतात, गरज नसताना अचानक उघडल्या जाऊ शकतात का ?
मी एक किस्सा ऐकला होता की एकदा एक गाडी जरा खराब रस्त्यावरून जात असताना धक्क्यांमुळे अचानक एअर बॅग उघडली जाऊन चालकाचा गोंधळ उडाला आणि अपघात होणार होता, पण तो कसाबसा टाळता आला.
कोणाचे काही अनुभव असतील तर शेअर करावेत.

एक गाडी जरा खराब रस्त्यावरून जात असताना धक्क्यांमुळे अचानक एअर बॅग उघडली जाऊन <<<
जराश्या धक्क्यामुळे नाही उघडत.
तेवढा जोरदार इम्पॅक्ट असायला लागतो.

आपण पुष्कळ नियम पाळू हो पण इतरांनी नियम नाही पाळले तर तुमच्या नियम पाळण्याला तसा काही अर्थ उरत नाही. तुमची सुरक्षितता इतरांच्या नियम पाळण्यावर अवलंबून राहते. कधी कधी तर तुम्ही नियम पाळण्यामुळे अडचणीत येता.

Pages