मला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिराती

Submitted by saavni on 21 July, 2008 - 02:20

तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वप्ना Lol कह॑र आहेस. पण तुझ्याशी सहमत.

ऐअरटेलची 'मेड फॉर यु' जहिरात फारच आवडली. माझ्या मैत्रिणीचं बुटिक होतं. तिला भेटायला गेले असताना असे नमुने चिक्कार पाहिले होते. त्याचीच आठवण झाली.

अरेच्च्या
मी प्रतिसाद देऊन विसरून गेलो इथे.
लोकहो,
१. प्रत्येक घामाचा वास वेगळा असतो.
२. कित्येकदा स्वतःच्या वासाचाही राग येऊ शकतो.
३. कामातुरणां न भयं न लज्जा, ना वास. असं एक्ष्टेन्शन काऊंटर मांडतो.
४. शरीरातील प्रत्येक गोष्टीस, विशेषतः स्त्रावांस एक 'वास' असतो. ती 'दुर्गंधी' नसते. 'स्टेल' झाल्यावर त्या वासाची दुर्गंधी होते.

मी फेरोमोन्स बद्दलच्या जितका आहे तितक्या अभ्यास/अनुभवातून लिहिलं होतं. त्यावर इतके पर्तिसाद येतील असं वाटलं नव्ह्तं.
रच्याकने: डास विशिष्ट फेरोमोन वाल्या लोकांना चावतात. इतरांना कमी. 'सिमिलर ऑब्जर्वेशन'!

डास विशिष्ट फेरोमोन वाल्या लोकांना चावतात. इतरांना कमी. >>>
कुणीतरी एक धागा काढला होता ना?? डास ठराविक लोकांनाच का चावतात?

डास कसा धागा काढेल निंबे, कोळी काढतात धागा आणि त्याचं जाळ विणतात...
>>
जोक मारायचा सुमार प्रयत्न, बाबु Sad

फ्लिपकार्ड ची..........कॅमेरा आणि लॅपटॉप चॉईस करायची अ‍ॅड भारी आहे...लहान मुलगी मख्ख पणे त्याला उत्तर देत राहते.......मस्त आहे......

नविन वोडाफोनची 'made for you' झक्कास आहे
त्या मुली , त्यांची बडबड आणि जाहिरातिचा एकंदर वेग मस्त

दक्षिणा, मी वर लिहिलं होतं या अ‍ॅडबद्दल. खुप छान फ्लो आहे. आणि त्या सगळ्या मुलीपण गोड आहेत. आपापला रोल फार छान केला आहे त्या सगळ्यांनी.

त्यातल्या त्यात मला ती क्रिसक्रॉस क्रिसक्रॉस, थोडासा घुंघरूवाली... आणि 'ऐसे करना ३ इंच रखना, मुझे ये टॅटू शो करना है वाल्या तिघी जाम भारी वाटतात. Happy

आयसीआयसीआय ची नविन लहान मुलीची जाहीरात मस्त आहे... शाळेतुन जवळच्या दुकानात जाऊन चॉकलेट घेत असती. म्हतारा दुकानदार खडुस असतो. शेवटी लहान भावाला घून येते पण खिसा फाटलेला असतो त्यामुळ पैसे पडुन जातात...वगैरे.... गाण पण मस्त आहे " टुकुश टुकुश..." अस काहीतरी

मला ही आवडली Happy

एक कशाची तरी जहिरात आहे.. ज्यात बायको म्हणाते घर चालवु शकते तर गाडि का नाही... आणी बरेच काही सुनावते.. मह गाडि चालु असताना कुणाचातरी फोन येतो.. मग "पहले क्यो नही बताया" असे..

फोनवर येणारा आवाज मला कधीच कळत नाही.. Uhoh

तो अ‍ॅनिव्हर्सरी/ वाढदिवस विसरलाय असं तिला वाटतं म्हणुन ते सगळं सुनावते पण कँडल लाईट डिनर कन्फर्म करण्यासाठीचा फोन येतो मग ती खुष होते.

अ‍ॅनिव्हर्सरी/ वाढदिवस विसरण्यावरुन सुमीत राघवनची डायमंड खरेदीची जहिरात आठवली. Men will be always Men ! त्या सगळ्याच जहिराती आवडतात मला. लिफ्टमधे एक ग्रेसफुल, साडी नेसलेली, बेब शिरते तीही अ‍ॅड खुप छान आहे. आणि अ‍ॅडसच्या बॅकग्राउंडला गझल्स ! मला खात्री आहे या धाग्यावर कुठे तरी याची चर्चा झालीच असेल.

हो दक्षे, तिचे एक्सप्रेशन्स सही ! आणि तो चालु गधडा जेव्हा एका फ्लोअरवर लिफ्ट थांबते तेव्हा इकडे तिकडे बघुन चुकीच्या फ्लोअरवर आल्याची अ‍ॅक्टिंग करतो तेही. दोन्ही फार मजेदार आहे.

Men will be always Men ! त्या सगळ्याच जहिराती आवडतात मला. +१

मित्राच्या बायकोची टूर कॅन्सल झाल्याची, काल जेवलो त्या हॉटेलचं नाव विचारण्यासाठी बायकोचं नाव आठवण्याची त्यापण मस्त आहेत.

नीधप | 1 November, 2012 - 18:47 नवीन
फ्लिपकार्टची 'शादी के पहले मैने भी आपका सिर्फ फोटोही देखा था' वाली अ‍ॅड मस्त आहे
<<

या वरून फ्लिपकार्टवरून घेतले ते 'पदरी पडले, पवित्र झाले' या न्यायाने गोड मानून घ्यावे लागते काय? :दिवे:

कॅड्बरी सेलेब्रेशनची हॅपी दिवाली वाली (अबे ऐसे नही यार, गले मिलो) खुप आवडली मला Happy
टुकुश टुकुश मस्तच! Happy

पुर्वीच्या वॉट अ‍ॅन आयडिया वाल्या अ‍ॅड्स पण मस्त होत्या
आताशा पुन्हा जुन्या अ‍ॅड्स लागायला लागल्यात Happy

"ईंपिरीयल ब्ल्यु - मेन विल बी मेन" च्या सगळ्या जाहिराती माझ्या निवडक दहात आहेत. Proud
मित्राच्या बायकोची टूर कॅन्सल झाल्याची जाहिरात कालच पाहिली. कस्सले मस्त एक्सप्रेशन्स दिलेत राव. Lol

Pages