मायबोली क्विझ

Submitted by दक्षिणा on 18 October, 2012 - 05:31

मायबोलीवर घडत असलेल्या ज्वलंत घटनांमधुन पास्ट प्रेझेंट फ्युचर कुठुनही एखादा टॉपिक उचलायचा आणि त्यावर प्रश्न तयार करायचा.

उदा. - सतत धार्मिक गोष्टींवर बीबी काढणारा आयडी कोणता?
किंवा जागूने शेवटची रेसिपी कधी टाकली होती? किंवा शाकाहारी पाय ही रेसिपी माबोवर कुणी टाकलिये. इ.

त.टि. - जुन्या मायबोलीवर माणूस या आयडीने हा बीबी काढला होता. बरिच धमाल होती त्या बीबीवर. म्हणून पुन्हा इथे काढला. पहिल्या दोन ओळी त्या बीबीवरून जशाच्या तश्या घेतल्यात.

प्रश्न लिहिताना थोडा सारासार विचार व्हावा, कुणिही दुखावले जाऊ नये याची खबरदारी घ्यावी ही विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या निरागस प्रश्नावर वाट्टेल ते आक्षेप घेतल्याबद्दल विश्ल्या कुलकर्णी यांचा तिव्र निशेढ.
किरनभाउंचे सग्ले प्रश्न एक्दम झनझनीत.
सर्वात जास्त रेंगाळलेली कथा - हा मान लवकरच साजिरा यांच्या 'गाज'ला मिळणार आहे.

आगावा,
टण्याची वारी, नंदिनीची मोरपिसे, शोनूची ’एका वर्षाची गोष्ट’ यानंतर मग ’गाज’ चा नंबर लागतो बरं का.. (या तिन्हींचा क्रम माहित नाही Happy )

दक्षिणा,

काय सुंदर कल्पना आहे ? मला वाटत नविन इंग्रजी वर्ष सुरु होताना जशी वर्तमान पत्रे / मिडीया मागील वर्षातल्या ठळक घटनांचा आढावा घेतात तसा उपक्रम सुरु करण्यास हरकत नाही.

उदा.

१) या वर्षातील उत्तम प्रतिसाद मिळालेली कथा/कविता/लेख इ.
२) या वर्षातील उत्तम प्रतिसाद मिळालेली रेसीपी
३) या वर्षातील उत्तम प्रतिसाद मिळालेली .......

यावरुन एक जसा झी सिनेमा पुरस्कार मिळतो तसा प्रत्येक उपक्रमाला मिळावा.

मामे, मी नाही हो तसला !

बॅक्टेरियाबाईंचे गर्भारपण नऊ महिन्याचे नसते... हे वाक्य शोधून बघा बरं.

शोनूची ’एका वर्षाची गोष्ट’ टण्याची वारी, नंदिनीची मोरपिसे, असा योग्य क्रम आहे.
साजिर्‍याची गाज यामधे कुठे बसते बरे?

विचारतळे उत्तर कुणालाच आठवत नाहीये का? शोध सुविधा वापरून बघा काही सापडतय का?

चांगला टीपी आहे. ईबे, जंगली, फ्लिपकार्ट, स्टारसीजे अशा ऑनलाईन शॉपिगची सवय लागली कि वेळ छान जातो पण सारखं काहीतरी स्वस्तात खरेदी करत रहावं असं वाटत राहतं. त्यापेक्षा असे खेळ आर्थिक नुकसान तरी वाचवतील Lol

का. ना. = कायदेशीर नातेवाईक = इन-लॉज् Happy>> सशल थँक्स .. काड्या घालणारे नातेवाईक असा ही एक अर्थ काढला होता मी ( स्मित )

Pages