मायबोली क्विझ

Submitted by दक्षिणा on 18 October, 2012 - 05:31

मायबोलीवर घडत असलेल्या ज्वलंत घटनांमधुन पास्ट प्रेझेंट फ्युचर कुठुनही एखादा टॉपिक उचलायचा आणि त्यावर प्रश्न तयार करायचा.

उदा. - सतत धार्मिक गोष्टींवर बीबी काढणारा आयडी कोणता?
किंवा जागूने शेवटची रेसिपी कधी टाकली होती? किंवा शाकाहारी पाय ही रेसिपी माबोवर कुणी टाकलिये. इ.

त.टि. - जुन्या मायबोलीवर माणूस या आयडीने हा बीबी काढला होता. बरिच धमाल होती त्या बीबीवर. म्हणून पुन्हा इथे काढला. पहिल्या दोन ओळी त्या बीबीवरून जशाच्या तश्या घेतल्यात.

प्रश्न लिहिताना थोडा सारासार विचार व्हावा, कुणिही दुखावले जाऊ नये याची खबरदारी घ्यावी ही विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माबोवर शेवटची चांगली गझल/कविता केंव्हा लिहिली गेली? >>>>

अ‍ॅडमिन, कृपया या वादग्रस्त प्रश्नाकडे गंभीर लक्ष द्या. 'आगाऊ' हा आयडी 'त्यांच्या स्वतःच्या मते' काड्या लावण्यासाठी विख्यात आहे Lol 19.gif19.gif24.gif24.gifsmiley-music028.gifsmiley-music028.gifwave_0.gifwave_0.gifwave_0.gifwave_0.gifwave_0.gifwave_0.gifwave_0.gifwave_0.gifwave_0.gif

माबोवर शेवटची चांगली गझल/कविता केंव्हा लिहिली गेली? >>. त्यापेक्षा मायबोलीवर सर्वात जास्त वाद कुठे होतात? असे विचारायचे असते. Happy

महेश, राहिलं का नाव ?

दक्षिणा, झक्की, सई, अनिलभाई, प्रिया, नंदिनी वगैरे आयडी इंग्रजीतून, मराठीत आले तरी बदलले नाहीत. दक्षिणेचा आयडी मी किमान ९ वर्षे बघतोय.

सर्वात जास्त रेंगाळलेली कथा, म्हणजे Beti ची, इदं न मम... बेटीच्या आईचे अ‍ॅडमिनला पत्र, असा पण एक बीबी होता.

झकासा, मंडळाचे सदस्य सांगत होतास ना?>> Proud

केदारने लालभाइ विषयी विचारल आहेच.
मलाही हा बीबी वाचताना व्ही & सी बीबी आठवला. Happy
लालभाइ आणि संतु हे दोघेही आठवले होते.

विकु देखील आठवले, ते तर नवीन माबोवर देखील कार्यरत आहेत.

लालभाइ आणि संतु गायबलेत.

दक्षिणा, झक्की, सई, अनिलभाई, प्रिया, नंदिनी वगैरे आयडी इंग्रजीतून, मराठीत आले तरी बदलले नाहीत<<< यात मी पण Happy मागची ५ वर्ष हाच आय्डी आहे माझा Happy

आयटी गर्ल आय्डीण आता दुसर्‍या नावाने कार्यरत आहे Happy ओळखा बरे कोण?????

युनिकोड यायच्या आधी, आम्ही \dev2 अशी टॅग वापरुन लिहायचो. तसे लिहून पोस्ट केल्यानंतरच ते देवनागरीत वाचता यायचे. चूका असतील तर एडीट करताना, परत रोमन लिपीत दिसायचे.
मग थेट शिवाजी फाँन्ट वापरून, इतरत्र लेखन करायचे आणि ते \shiv02 टॅग वापरुन, थेट इथे पोस्टायचे अशी पण सोय झाली... आता त्यावेळचे फार लोक राहिले नाहीत, त्यामूळे प्रश्न विचारला असता, तरी उत्तर मिळाले नसते.

ओ दिनेशदा, मला पण टाका तुमच्या लिस्टीत.
मी तर माबोवरच नव्हे सगळ्याच मराठी सायटींवर सातीच आहे.

(तुम्हाला माहिती नसेल म्हणा तुमच एकही माबासं- मायबोली बाह्य संस्थळसंबंध मी तरी पाहिला नाही. Wink )

णवा प्रश्ण Wink

माबासं या शब्दाचा अर्थ काय व याचा जनक/जननी कोण?

याच प्रकारच्या विबासं चा अर्थ काय?

विबासंवरच्या फेमस लेखाच्या कर्त्याचे नांव काय?

धमाल धागा...

नंतर वे काढून सगळे प्रश्न वाचेन..पण तूर्तास माझा एक सोप्पा प्रश्न...

युक्ती सुचवा युक्ती सांगा आणि अशा प्रकारच्या प्रश्नांच्या धाग्यांवर युनिक प्रश्न विचारणारा आय डी कोण? या आय डीच्या प्रश्नांमुळे नुस्ती ज्ञानात भर पडते असचं नाहीतर तमाम मंडळींचा विरंगुळाही होतो... Wink

माझे उत्तर : दक्षिणा Happy (जगातले सगळे प्रश्ण दक्षीलाच का पडतात?...असे काहितरी वाचल्याचे आठवते :P)

विबासं चा अर्थ लावला, पण माबासं?

१. माबोवरचे पहिले भांडण कुणाकुणात झाले आणि कशावरून ? त्याची परिणती कशात झाली ?
२. माबोवरचा आद्य कळलावू आयडी कोणता होता ?
३. अ‍ॅडमिनच्या विपूत पहिली तक्रार कुणी केली ? (पहिली तक्रार हे शीर्षक राखून ठेवत आहे )
४. माबोवरचा सर्वज्ञ आयडी कोण ?
५. माबोवरील सर्वात पहिले आत्मचरित्र कुणी लिहीले ?
६. माबोवरच्या घडामोडींचं रेकॉर्ड ठेवणारा आयडी कोण ?

हे प्रश्न विचारायचे होते पण भोंडल्याचा खेळ संपल्यावर येईन. Wink

सर्वात जास्त सुपरहीट धाग्यांचं रेकॉर्ड दक्षिणाच्या नावावर जाईल असा माझा अंदाज आहे. या धाग्यासाठी शुभेच्छा ! पदार्पणातच सेंच्युरी येणेप्रमाणे गाणे ओळखा धाग्याचा मान मामींकडे जाईल. चुभूदेघे.

किरण, विक्रम / वेताळासारखे अवघड प्रश्न आहेत !

रच्याकने हा शब्द नंतर रुढ झाला, पण याची पहिली झलक मी आमच्या पहिल्या वर्षाविहाराच्या वेळीच
अनुभवली. त्यावेळी सिंहगडावर भेटलो होतो आम्ही आणि त्या बीबीवर, रस्त्याच्या कडेकडेने जा बरं का, असे
कुणीतरी लिहिले... सिंहगडावर आणि कडेकडेने जायचे ? असा प्रतिसाद आला होता.

त्या व.वि. ला अजय, नीधप, दक्षिणा, मयूरेश, सत्यजित, संपदा असे बरेच जण होते. मी आदल्या दिवशीच मुंबईहून निघून, सईकडे राहिलो होतो.

Pages