उजळ कांती हवी

Submitted by webmaster on 3 June, 2008 - 00:45

"उजळ कांती हवी" या विषयावर पूर्वी झालेलं हितगुज इथे वाचा
http://www.maayboli.com/hitguj/messages/103387/107548.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नीपध
d.jain आणि dr.jain मध्ये माझा थोडा गोंधळ झाला.म्हणुन विचारले.

मि काल रानडे रोड पुर्ण शोधला पण मला प्द्म्शाली आयुर्वेदिक दुकान मिळाले नाहि.पटव्र्धन आयुर्वेदिक भांडार भेटले.
लाझुर सोपहि दादरमध्ये मिळाला नाहि.कोणाला माहीत आहे का?दादरमध्ये कोठे मिळेल ते कृपया सांगा.

कोणी आहे कि नाहि?
प्रतिसाद द्या.

माझ्या पायवर लहानपणाचे काहि पडल्याचे,भाजल्याचे डाग आहेत ते कसे जातिल? काहि क्रिम किंवा कुम्कुमादि तेलाने जातिल का?कोणाला काहि उपाय माहित असेल तर कृपया सांगा.

हाय,

मी इथे नवीन सभासद आहे. Happy

खाली दिलेलि लिन्क चेक करा. इथे बहुतेक सर्व प्रोड्क्ट्स आहेत जे या लेखनात डिस्कस केले आहेत.
http://www.healthbyayurveda.in/

मि काल रानडे रोड पुर्ण शोधला पण मला प्द्म्शाली आयुर्वेदिक दुकान मिळाले नाहि

भानुपद्म म्हणायचे का तुम्हाला?

साधना मी प्द्म्शालि आयुर्वेदिक दुकानाची चौकशी केली.भानुपद्म मला आठवलच नाहि. Uhoh
ठिक आहे पटव्र्धन आयुर्वेदिक भांडारच्या आसपास आहे का भानुपद्म? कृप्या सांगा.मी बरोबर गल्लिम्ध्ये गेलि होति ना?
मी लाझुर सोप पण शोधत होते स्र्वोद्य बाझारम्ध्ये (दादर) बघितला नाहि मिळाला.

मला वासु कंपनीचे कुम कुलादि नामक कुम्कुमादि तेल मिळाले आहे ते चांगले आहे का? कोणाला माहित असेल तर लवकर सांगा प्लिज.... Happy

ज्या रस्त्यावर ग्राहक पेठ भरते, पेठे आणि वैद्य सोनारांची दुकाने आहेत त्या रोडवर, या सोनारांची दुकाने आहेत त्याच बाजुला, पेठ्यांचे दुकान आहे त्याच्या आधीच्या गल्लीत भानुपद्म आहे. गल्लीच्या तोंडाशी उभे राहुन पाहिले तरी आतल्या रस्त्यावरचे दुकान दिसते. त्याच्या आधीच एक खाउची गाडीही उभी असते. (हुश्श्या... इतका डिटेल पत्ता माझ्या घरचाही सांगता येणार नाही मला Happy )

भानपद्ममध्येही मिळेल कुंकुमादी तैलम. त्यांचे स्वतःचे प्रॉडक्टसही चांगले असतात. मी एकदा विचारलेले तेव्हा उर्जिता जैनच्या पावडरी अगदी वस्त्रगाळ असतात आणि आमच्या तितक्या नसतात हे उत्तर त्यांनी दिलेले. मला तरी फार फरक वाटला नाही. पण जास्वंद जेल, कोरफड जेल, मेंदी वगैरे मी उर्जिता जैनचेच घेईन. बाकी कोणावरही विश्वास ठेवणार नाही.

मला वासु कंपनीचे कुम कुलादि नामक कुम्कुमादि तेल मिळाले आहे ते चांगले आहे का?

आता विकत घेतलेले आहेच तर वापरुन बघण्याशिवाय दुसरा मार्ग नाहीय ना?? Wink

आभारी आहे साधना
मी उद्या जाणार आहे दादरला.लाझुर सोप नव्र्यासाठि आणि मला जास्वंद जेल, कोरफड जेल आणायला.माग्च्या वेळि गेलि आणि रिकाम्या हाताने आली.आता तरि नवरोबाच्या राकट् त्वचेसाठि लाझुर मिळु दे

उरण ते दादर हे अंतर जास्त आहे ना! म्हणुन विचारते अजुन काहि उत्पाद्ने असतिल तर सुचवावे

अगं तु उरणला राहात असशील तर मग तुला लाझुर सोपसाठी एवढ्या लांब जायला नको. तुझ्या आजुबाजुला कुठे अनिरुद्ध बापुंचा आश्रम असेल तर तिथे मिळेल लाझुर सोप-. असेल तर इथ लिही. मी नवी मुंबईतल्या माणसाचा नंबर देईल. त्याला उरणमधल्याची माहिती असेलच.

उर्जिता जैनचे प्रॉडक्ट आधी नव्यामुंबईत अजिबात मिळत नव्हते. काहितरी डिस्ट्रिब्युटरचा घोळ होता. आता सर्रास सगळीकडे मिळतात. तु तुझ्या भागातल्या केमिस्टाकडे विचार.

साधना
मी काल जास्वंद जेल,कुम्मुमादि तेलम आणि लाझुर सोप आणला दादरहुन.मला भानुप्द्मचे दुकानहि भेटले.लाझुर सोप मला साठ रुपयांना मिळाला आणि सोबत ओल्व्हियाचे चंदन पेक आणि स्रबरहि आणले बघु नवर्याच्या चेह्र्याम्ध्ये आणि माझ्या केसांम्ध्ये जास्वंदि जेल आणि पायांच्या व्रणांना कुम्मुमादि तेलम काय जादु करते ते.... Happy

मी लाझुर सोपवाल्यांना फोन केला होता तेव्हा मला त्यांनी मला नेरुळचा पत्ता दिलेला तो तेथिल अनिरुद्ध बापुंचा आश्रमाचा होता वाटत मी त्या मठात गेले होते एकदा....पण मला तेव्हा नेमक कळल नाहि नेमक कुठे ते.म्ह्णुन मी सरळ दादरचा रस्ता धरला.... उर्जिता जैनचे प्रोड्क्ट उरणमध्ये मिळतात पण d.jain आणि dr.jain च्या घोळमुळे मी दादरला गेले तेथिहि मला d.jain च मिळाले बघु आता....

विको WSO क्रिम सगळ्यात बेस्ट आहे. आयुर्वेदिक असल्याने गेली २ वर्ष रोज वापरते माझ्या चेहर्‍यावर पिंपल्समुळे काळे डाग होते त्याचे प्रमाण कमी झाले शिवाय त्वचेचा रंगही उजळला आहे

माझ्या पत्नीच्या हातापायावर एलेर्जीमुळे काळे डाग झाले आहेत ते खूप खाजवतात बरेच उपाय केले पण
तेवढ्यापुरत फरक पडतो ....डॉक्टर केडे गेले कि हि तपासणी करा ती तपासणी करा असे सागतात सगळ्या
तपासण्या झल्या .. कशात दोष नाही......तरी आयुर्वेदिक उपाय सुचवावा

मला माझ्या मुलांसाठी बालाजी ताम्बेचे बालामृत औषध हवे होते.....बरेच ठिकाणी चौकशी केली पण
बालामृत आहे पण ते वेगळ्या कंपन्याचे आहे .....बालाजी ताम्बेचे बालामृत औषध याबाबत काही माहिती असेल तर पत्ता ,
फोन सागावे ...

माझा मुलगा ६ वर्षाचा आहे त्याच्या चेहर्‍या वर सफेद डाग आले आहेत क्रुपया उपाय सुचवा. टिपके आहेत

पालक आणि इतर पालेभाज्या खायला लावा मुलाला.
मुळात सगळ्या भाज्या खाल्ल्याच पाहिजेत ही शिस्त लागली तर जनरली स्किनवर पांढरे डाग येत नाहीत लहानपणी.

बालाजी ताम्बेचे बालामृत औषध याबाबत काही माहिती असेल तर पत्ता ,
फोन सागावे ...
>>>
रवि,
तुम्ही कुठे राहता? ठाण्याला एक बाई आहेत. त्यांची गायत्री आयुर्वेद नावाची एजन्सी आहे. त्यांच्या कडे बालाजी तांब्यांचे प्रॉडक्ट्स मिळतात.
त्या शिवाय तुमच्या एरीयात कोण आहेत, ह्याची माहिती इथल्या pdf मध्ये मिळेल.

http://www.santulan.in/Dealers.pdf

तोंडावरचे डाग म्हणजे व्हायटामिन डिफि. आणि नखावरचे पांढरे डाग म्हणजे कॅल्शियम डिफि. असंच ऐकलं होतं. आपल्याकडे डॉक्टर्स पण तेच सांगतात. इथल्या डॉक्टरांनी मात्र नखाला आत काही इजा झाली तर पांढरे डाग येतात असं सांगितलेलं. तोंडावरचे पांढरे डाग उन्हामुळे येतात म्हणे. बॅक्टेरियल की फंगल इन्फेक्शनमुळे पण येऊ शकतात.

तोंडावरचे पांढरे डाग >>>सोरायसिस नावाच्या विकारामध्ये ही असे होते ना!
डो. कडे नेऊन एकदा दाखवून आणा मुलाला. नक्की कसले डाग आहेत ते कळल्याशिवाय कुणी उपचार तरी कसे सुचविणार!

इथे अमेरिकेत कोणी परमनंट हेअर रिमूव्हल केले आहे का चेहर्‍यावरच्या केसांसाठी? कोणाला अनुभव/ माहिती असल्यास सांगा प्लीज...

माझ्या वडिलांना (वय ६२) पाठीवर आणि पोटावर खूप मस आले आहेत. दिवसागणिक ते वाढताहेत. मस कश्यामुळे होतात? त्यांचे वाढणे कसे थांबवावे? हे प्रश्न नक्की कुठल्या बाफ वर विचारावे हे न कळल्याने इथे विचारत आहे. कृपया मदत करा.

स्वप्ना,मस होमियोपेथी ने जातात्.त्यात वरुन लावायला लिक्विड व औषधी गोळ्या [४-४ चा डोस] देतात .त्याने २ महिन्यात पूर्ण आराम होतो..मस गळुन पडतात व नवे होत नाहीत्..एस्.एन्.डी.टी.च्या कॅनॉल रोड वर हो.डॉ.आहे.माझ्या डेन्टल डॉ .मैत्रीणीला दोन्ही तळपायाला मस्से होत होते व दुखायचे.ती ने याच डॉ.कडुन ट्रीटमेन्ट घेतली.

अमृता, तुम्ही एकदातरी एखादे प्रॉडक्ट वापरुन त्याचा अहवाल लिहा बुवा..... तुम्हाला नुस्ते प्रश्नच पडताहेत... Wink Light 1

साधना
मि कधि लिपस्टिक ,केसांचे,त्वचेचे वेगवेगळे प्रोडक्ट वापरले नाहित म्हणुन विचारते???

अहवाल लिहा बुवा.>>>>

हिमालयाचे फेसपक आणि फेसवाश वापरले थोडा फरक जाणवला
लाजुर सोपनेहि नवर्याच्या चेहर्यावर थोडा फरक जाणवला दिसण्या इतपत नाहि.कुमकुमादि तेलम हि रात्रि लावतात पण दिसण्याइतपत फरक जाणवत नाहि.
कारण त्यांचे काम फिरण्याचे आहे कोणते क्रिम त्यांना प्रोटेक्शन देइल????(परत पर्श्न Happy )

Pages