"जगात नाही मित्र मिळाले तरी सृष्टीत आहेत. आपल्या घरी नाही मिळाले तरी बाहेर आहेत. देवाने आधीच तुम्हाला मित्र दिले आहेत. हे निळे निळे अनंत आकाश. ते नेहमी तुमच्यावरच पाखर घालीले. तारे तुम्हाला रमवतील. नद्या पाणी देतील. वारा गाणे गाईल. फुले सुगंध व सौंदर्य देतील. वृक्षलतावेली तुमच्यासमोर डोलतील, नाचतील. फार दु:ख नका करू. कोणी शिव्याशाप दिले तर वाईट नका वाटुन घेऊ. या निसर्गाकडे पहा आणि आनंदी रहा.
-सानेगुरूजी (सानेगुरूजींच्या गोड गोष्टी).
जिप्सी यांच्या सौजन्याने.
निसर्गाच्या गप्पांच्या ११ व्या भागाबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf
योगेश तुला न विचारता तू
योगेश तुला न विचारता तू दिलेले साने गुरुजींचे लेखन मी मुख्य पानावर टाकले आहे. तू रागावणार नाहीस हे माहीत आहे
एखादा सुंदर कोलाजही दे.
काही विकासवाद्यांनी
काही विकासवाद्यांनी ‘आइन्स्टाईनने असे म्हटल्याचे पुरावेच नाहीत,’ असे सांगून वादही घातले आहेत.
वाद घालणारे वाट्टेल ते बोलुन वात आणतात. पण मानव नावाचे काँग्रेस गवत पृथ्वीवरुन नष्ट झाल्याशिवाय निसर्गाला परत पुर्वीचे वैभव प्राप्त होणार नाही हे मात्र नक्की....
इजिप्तच्या राज्याला लवकर
इजिप्तच्या राज्याला लवकर स्वर्गात जायचे होते
येडं का खुळं????? या युगात जन्माला यायला हवा होता बिचारा आता इथेच स्वर्गप्राप्तीची सोय झालीय पाहुन आनंदला असता,,,,
हा पांढराशुभ्र बोका फोटोत जसा
हा पांढराशुभ्र बोका फोटोत जसा चमकतोय त्साच प्रत्यक्षही चमकतो. पण हा बर्फी आहे - मुका आणि बहिरा. आम्ही याच्या जवळ जाऊन याला हात लावेपर्यंट त्याला कळत नाही आम्ही आलोय ते. म्याव असा अभिनय करतो पण तोंडातुन आवाज अजुन कधी आला नाही. देवाने मुक बधिर केलेय पण काय रुप दिलेय त्याला. असा झळाळणारा पांढरा बोका कॉलेजात कुणी कधी पाहिलाच नाहीय. जोतो येतो तो त्याला उचलतो पण बोक्याने कधीच आवाज काढला नाही. इतर बोके-कुत्रे आम्ही आवाज दिला की निदान वळून तरी बघतात, पण याला कितीही आवाज दिला तरी कळतच नाही.
एक मांजर नेहमी याच्यासोबत असते. बहुतेक याची आई असावी. याला आम्ही कधीच एकटा पाहिला नाही. सोबत ही मांजर कायम अस्तेच असते. आम्ही याच्याशी खेळत असतो तेव्हा ती लांब जाऊन झाडाच्या मागे किंवा गाडीच्या खाली लपुन आमच्याकडे बघत बसते. तिची नजर कधी हटतच नाही याच्यावरुन. ती मांजर जरा म्हातारी वाटते त्यावरुन ती याची आई असणार असा तर्क आम्ही काढला.,
परवा हा चुकुन कॉलेजच्या बाहेरच्या रस्त्यावर आला. गाड्यांच्या गर्दीत र्स्त्यावरुन फिरत होता पण त्याला गाड्यांचे हॉर्न ऐकुच येत नव्हते. नशिबाने याला रस्त्यावर पाहुन गाड्यांचा स्पिड कमी झाला तोवर आम्ही त्याला उचलुन परत आत आणले. रस्त्यावर त्याला बघुन प्रत्येकजण 'इतनी सफेद बिल्ली' म्हणत होता.
तो लहन असता तर मी त्याला बॅगेत घालुन घरी आणले असते. पण मग तो घरी आला तर आमचा एस ट्रॉमामध्ये जाईल...
खालची दोन बदके गेल्या वर्षी आमच्या कॉलनीत आलेली आणि दोन-तिन महिन्यानी गडपलेली. काल परत आलीत. यांची जात कोणती????
कसला चमकतोय तो बोका ... एकदम
कसला चमकतोय तो बोका ... एकदम फेअर ऍंड हॅंडसम
दिनेश्दांच्या खजिन्याची कवाड
दिनेश्दांच्या खजिन्याची कवाड त्यांनी उघडल्यामुळे हे भाग पळताहेत. (तुझे खरेय जागू). त्यात तु, साधना, शशांक (स्पत्नीक) जिप्सी तुम्ही पण सगळे सहभागी आहातच
मायबोली वर बहुदा लवकरच निसर्गबोली असा स्वतंत्र विभाग जाहीर होणार
पिंक पिजन बद्दलची माहिती
पिंक पिजन बद्दलची माहिती सहीच..
बोका अन बदकं... कित्ती छान...
कसला चमकतोय तो बोका ... एकदम
कसला चमकतोय तो बोका ... एकदम फेअर ऍंड हॅंडसम >>>> येस्स, अगदी खरंय...
आमच्याकडेही नेहेमीप्रमाणेच एक माऊ आहे... शांकली किंवा मुली टाकतीलच तिचे फोटो इथे.... ही माऊ जरा जास्तच हुशार कम आगाऊ आहे. आम्ही सर्वांनी बोललेले तिला बरोब्बर कळते, जरा रागावले की बाईसाहेब तोर्यात घराबाहेर जाऊन बसतात... आणि जरा वेळाने प्लॅस्टिकची पिशवी चुरगळल्याचा आवाज केला की लगेच घरात धाव घेतात - कारण प्लॅस्टिकच्या पिशवीतून बाईसाहेबांना मासे मिळतात ना - तो आवाज आठवला की कुठूनही धावत पळत येतात मग....
अवलकरता "पिण्याचे पाणी" या
अवलकरता "पिण्याचे पाणी" या सदराखाली गुगलत असताना हे वाचायला मिळाले -
Rolling revision of the WHO Guidelines for drinking-water quality
Health risks from drinking demineralised water By F. Kozisek
Awareness of the importance of minerals and other beneficial constituents in drinking water has existed for thousands years, being mentioned in the Vedas of ancient India. In the book Rig Veda, the properties of good drinking water were described as follows: “Sheetham (cold to touch), Sushihi (clean), Sivam (should
have nutritive value, requisite minerals and trace elements), Istham
(transparent), Vimalam lahu Shadgunam (its acid base balance should be within normal limits)“ (Sadgir and Vamanrao 2003).
चक्क ऋग्वेदाचा उल्लेख केलाय या मंडळींनी.... आणि पिण्याच्या पाण्याबाबत आपले पूर्वज किती जागरुक होते त्याचे वर्णनही केलंय....
झरबेरा, मस्त लिहिलय. मुके
झरबेरा, मस्त लिहिलय. मुके प्राणी खरेच मुके असू शकतात, याची कल्पनाच नव्हती केली कधी.
जिप्स्या, मी पण आताच वाचला तो लेख.
शांकली, छान वाटले ती माहिती वाचून. अमर्याद शिकारीने तिकडचा डोडो पक्षी, कायमचा नष्ट झालाय. पुर्वी तिथे मोठी मोठी कासवे पण होती ( जगात सगळ्यात जास्त जगलेले एक कासव १७० वर्षांचे आहे ) उत्खनन केल्यावर त्यांचे अवशेष सापडले. पण सध्या ती नाहीत. त्यामूळे एक प्रयोग म्हणून, तसेच हवामान असणार्या
सेशल्स मधून ती आणली. कासवे जमिनीलगतची / जमिनीवर पडलेली पक्व फळे खाऊन, बीजप्रसाराचे महत्वाचे काम करतात.
आणि कासवांनी हे काम अत्यंत प्रामाणिकपणे केले, एरवी काहिही खाणार्या कासवांनी, तिथली कोवळी रोपे
अजिबात न खाता, त्यांची जोपासनाच केली. कुठून आले असेल हे ज्ञान त्यांना ?
शशांक, पाण्याची माहिती छानच. पुढच्या पोस्टमधे तूम्हा दोघांसाठी काहितरी खास लिहितोय !
काल आमच्या भाजीबाजाराच्या
काल आमच्या भाजीबाजाराच्या वाटेवर मला काही रवांडन मुले भेटली. आमच्या बाजारात मोजक्याच भाज्या मिळतात. त्यामूळे खरेदी फारशी नसतेच.
वाटेत खुप शेवग्याची झाडे लागतात. भर्पूर शेंगा लागलेल्या होत्या आणि त्याही अगदी हाताने तोडता याव्यात
अशा. इथे त्या कुणीच खात नाहीत, त्या मूलांपुढे मी ज्ञान पाजळले, म्हणालो या शेंगा घ्या आणि सूपमधे घाला, छान लागतात. तर ती मुले म्हणाली, आम्हाला माहीत आहेत, आम्ही खातो. मग मी विचारले, काय म्हणता याला ? तर ते म्हणाले " मोरिंगा " !!!
आहे कि नाही मजा, मूळ तामिळ शब्द रवांडा सारख्या एका सर्व बाजूनी इतर देशांनी घेरलेल्या देशांत पण पोहोचला. अशा लॅंड लॉक्ड देशांचा एक प्रश्न असतो तो म्हणजे, सागरी वाहतुकीसाठी बंदराच्या उपलब्धततेचा.
आंतरराष्ट्रीय व्यापाराशिवाय आता कुठल्याच देशाचे चालत नाही. पण अशा मालवाहतुकीसाठी त्यांना इतर देशांची मदत घ्यावीच लागते ( नेपाळ, स्विस, युगांडा हे असेच देश आहेत.) आता रवांडात शेवग्याचे झाड पोहोचले असेल तर ते केनया किंवा टांझानिया मार्फतच. त्या झाडाबरोबर तो शब्दही आला.
पण तरी अंगोलात ते झाड कसे आले, हे नाहीच कळले. वार्यामार्फत प्रसार झाला असेल तर अंतर फार आहे. शिवाय मधे काँगोचे घनदाट जंगल आहे. मानवामार्फत आले असेल, तर खाण्यासाठी उपयोग का नसावा ? कधी काही कळले तर नक्की लिहितो.
आम्ही बाजारात गेल्यावर त्या मूलांना मी चिंचा घ्यायला लावल्या ( त्या खातात, किंवा कशा खायच्या हे त्यांना माहीत नव्हते, हे पण नवलच. ) त्या देताना भाजीवालीने छोट्या प्लॅस्टीकच्या पिशवीत दिल्या.
त्यावर तो मुलगा म्हणाला, आमच्या देशात अजिबात अशा पिशव्या मिळणार नाहीत. पूर्ण बंदी आहे.
हा मला आश्चर्याचा धक्का होता.
वांशिक दंगलीत होरपळून निघालेला ( ८ लाख लोकांची कत्तल ) एक छोटासा देश, इतका वैचारीक निर्णय घेतो
आणि तो राबवतो देखील, हे किती कौतूकाचे आहे. ही बंदी पूर्ण आहे. दंड / मायक्रॉन साईझ अशी सूट देखील नाही.
इथे एक छान लेख आहे. http://thedeliciousday.com/environment/rwanda-plastic-bag-ban/
त्यांच्या देशात धुम्रपानाला पण बंदी आहे !!
मोरिंगा - मस्तच... या रवांडन
मोरिंगा - मस्तच...
या रवांडन हत्त्याकांडावर मी पूर्वी एक सिनेमा पाहिला होता - समव्हेअर / समटाईम्स इन एप्रिल -असं काहीसं नाव होता - भयंकर अंगावर येणारा पण वस्तुस्थितीला धरुन कळल्यावर फारच वाईट वाटत होतं - अजूनही अंगावर काटा येतो...
प्लॅस्टिक पिशव्यांबाबत - आम्ही नेहेमी भाजी - दूध्-किराणा ज्याच्याकडून घेतो तो मारवाडी आता स्वतः कापडी पिशव्या देतो - कोणाजवळ प्लॅस्टिक पिशवी नसेल तर - अर्थात दहा रु चार्जही करतो दर पिशवीमागे - गिर्हाईकाने नाराजी व्यक्त केली तर उद्या ही पिशवी परत आणा, मी दहा रु परत देईन म्हणून सांगतो. जेव्हा त्याने ही सिस्टिम अमलात आणली तेव्हा मला आवर्जून बोलवून सांगितले हे - कारण मी त्याला कायम सौम्य शब्दात -ते प्लॅस्टिक पिशवी देणे बंद कर म्हणून सांगायचो- एक तरी दुकानदार बदलला या प्लॅस्टिक पिशवी संदर्भात -यामुळे मला प्रचंड आनंद झाला.
धूम्रपान - माझ्या बर्याच मित्रांनी हे सोडून दिले आहे -त्यांच्या स्वतःच्या अथक प्रयत्नानंतर - पण मला खूप आनंद झाला - मी कायम त्यांना प्रोत्साहितच करतो की तुमचे मनोबल खरंच खूप प्रचंड आहे की या विचित्र सवयीपासून तुम्ही स्वत:ला सोडवू शकलात....
मी पणजीत होतो त्यावेळी पण
मी पणजीत होतो त्यावेळी पण तिथे बंदीच होती. भाजीवाले कागदात भाज्या बांधून देत असत. शिवाय हातात प्लॅस्टिकची पिशवी दिसली तर ५०० रुपये दंड होता.
रवांडात ती बंदी असली, तरी केनयात ती शक्य नाही. केनयात दूधाचा उद्योग जोरात आहे आणि ते प्लॅस्टिकच्या पिशव्यातूनच वितरीत करतात. तिथे पिशव्या निर्माण करणारे उद्योग जोरात आहेत. समजा एक कारखाना दिवसाला २ ते ५ टन उत्पादन करत असेल, तर तेवढाच कचरा, दिवसाला निर्माण होतो. दूधाबरोबर पावासाठी पण या पिशव्या लागतात. केनयन माणूस दिवसाकाठी किमान अर्धा लिटर दूध आणि एक पाव घेतोच.
०००००
माझे अनेक सहकारी रवांडाच्या वांशिक दंगलीत होरपळले आहेत. एकाचे सर्व कुटुंबीय त्यात मारले गेले, दुसरा एक म्हणतो, मी महिनाभर जंगलात एकटाच भटकत होतो. मी विचारले भिती नाही वाटली ( त्यावेळी तो ७/८ वर्षांचा होता. ) तो म्हणाला जंगलापेक्षा, शहरातील माणसांची भिती जास्त होती. शिवाय जंगलात उपासमारी
व्हायची शक्यता नव्हती, खाण्याजोग्या अनेक वस्तू होत्या.
तो म्हणाला जंगलापेक्षा,
तो म्हणाला जंगलापेक्षा, शहरातील माणसांची भिती जास्त होती. शिवाय जंगलात उपासमारी
व्हायची शक्यता नव्हती, खाण्याजोग्या अनेक वस्तू होत्या. >> टच्च्कन डोळ्यात पाणी आणणारे वाक्य आहे हे
माणुस माणसाच्याच नजरेत एवढ्या खालच्या लेव्हलला गेलाय.
तो म्हणाला जंगलापेक्षा,
तो म्हणाला जंगलापेक्षा, शहरातील माणसांची भिती जास्त होती. >>> अरेरे.. किती माणुसकी सोडून वागतोय माणूस...... आणि अजूनही काही धडा घेतील अशा घटनातून तर तो माणूस कुठला ?? अजूनही कुठे ना कुठे या वांशिक म्हणा धार्मिक म्हणा प्रांतिक म्हणा पण दंगली चालूच...
मोनाली / शशांक या एकाच
मोनाली / शशांक
या एकाच दंगलीवर हॉटेल रवांडा / किनयारवांडा / समटाईम्स इन एप्रिल, असे तीन चित्रपट आलेत. ते बघून सुन्न व्हायला होते. मी लिहिले होते या चित्रपटांबद्दल, पण फक्त एकच प्रसंग लिहितो.
हॉटेल रवांडा मधे जीवावर उदार होऊन, ओस पडलेल्या हॉटेलमधे, तिथला मॅनेजर अनेक लोकांना आश्रय देतो.
त्यांच्या खाण्याची व्यवस्था करण्यासाठी तो भल्या पहाटे गाडी घेऊन बाहेर पडतो, परतीच्या वाटेवर दाट धुक्यामूळे रस्ता दिसत नाही, तरीही तो अंदाजाने गाडी चालवत राहतो, अचानक गाडीला आचके बसू लागतात. गाडी चालवणे अशक्य होते, तो रस्ता चुकलो कि काय, हे बघायला गाडीबाहेर पडतो, तर रस्त्यावर मृतदेहांच्या राशी असतात ( त्या प्रत्यक्ष दिसत नाहीत ) केवळ त्याच्या मुद्राभिनयातून हे कळते..
आणि तरीही तिथला निसर्ग अप्रतिम आहे, हे वांशिक भेदाचे खूळ त्यांच्या डोक्यात युरप मधले, वसाहतवादी भरवून गेले. आज तो देश सावरतोय, याचा मला खुप आनंद होतोय.
१९९४ साली मी केनयातच होतो. आजच्यासारखा मिडिया नसतानादेखील, तिथून येणार्या बातम्या भयानक होत्या.
अरेरेरेरे - काय भोगले असेल
अरेरेरेरे - काय भोगले असेल त्या लोकांनी !!!
पण
<<आज तो देश सावरतोय, याचा मला खुप आनंद होतोय.>>> आम्हाला सगळ्यांनाही होतोय तोच आनंद....
गौरी, शांकली फोटो
गौरी, शांकली फोटो मस्तच.
शशांक निरुपण मस्तच होते. अजूनही येउ द्यात.
पण मानव नावाचे काँग्रेस गवत पृथ्वीवरुन नष्ट झाल्याशिवाय निसर्गाला परत पुर्वीचे वैभव प्राप्त होणार नाही हे मात्र नक्की >> +१
झरबेरा, बदकं मस्त आहेत.
फाईव्ह डेज ऑफ वॉर - हा पण
फाईव्ह डेज ऑफ वॉर - हा पण अस्लाच अंगावर येणारा सिनेमा - युरोपातही तीच स्थिती - फक्त नावं बदला - दंगली, युद्धं चालूच सगळीकडे !!!!
रंकाळ्यातल्या जलपर्णीचा विषय
रंकाळ्यातल्या जलपर्णीचा विषय त्या बीबीवर निघाला होता. लहानपणापासून तो बघतोय आणि मग त्यावरचे जलपर्णीचे आक्रमणदेखील बघितले. गुरे पण ती खात नाहीत, केनयात पाणघोडे मात्र त्यावर नियंत्रण ठेवतात. त्यांना ती चालते...
ही जलपर्णीची बेटे बघून मला मेक्सिकोमधल्या तरंगत्या बागा आठवल्या. ( मीना प्रभूंच्या मेक्सिकोपर्व मधे वर्णन आहेच, शिवाय अराऊंड द वर्ल्ड इन ८० गार्डन्स या माहितीपटांच्या मालिकेत, प्रत्यक्ष दर्शनही आहे. )
दलदलीच्या सरोवरात, काठ्या रोवून, मातीचा भराव टाकून लागवडीयोग्य वाफे तयार केले. पुर्वी ते तरंगतेच होते पण या वाफ्याच्या कडांना मोठी झाडे लावून, आता ते एका जागी स्थिर केले आहेत. आणि त्यावर खास करुन झेंडूंची लागवड केली आहे. मेक्सिकोमधे मृताम्यांच्या सणासाठी हि फुले खुप मोठ्या प्रमाणात लागतात.
आणि असे हजारो वाफे, आजही फुलते आहेत.
वर साधनाने शंका विचारलीय, पण एकंदर दक्षिण अमेरिकेत आणि इजिप्तमधेही, मृत्यूनंतरच्या जीवनाबद्द्लचे आकर्षण फारच होते. आपण वर्षातून फक्त १५ दिवस त्यासाठी राखून ठेवले आहेत. आजची सर्वपित्री अमावस्या
पार पडली, कि आपण सण साजरे करायला मोकळे.
एक वैयक्तीक बाब म्हणजे, माझ्या वडीलांच्या तिथीला, वहीनी मला फोन करुन, कावळ्याला पान ठेवायची
आठवण नेहमीच करुन देते, पण इथे अंगोलात तर कावळेच नाहीत. मी मित्रांना जेवण देऊन तो दिवस साजरा केला.
आमच्याकडेही नेहेमीप्रमाणेच एक
आमच्याकडेही नेहेमीप्रमाणेच एक माऊ आहे... शांकली किंवा मुली टाकतीलच तिचे फोटो इथे.... >>>> घ्या हे फोटो...
मी पण उद्या मांजरपुराण टाकणार
मी पण उद्या मांजरपुराण टाकणार आहे एक.
शांकली तो अनिल अवचटांचा पूर्ण
शांकली तो अनिल अवचटांचा पूर्ण लेखच मस्त आहे..मी वाचला होता तेव्हा. मला वाटतं आपल्याकडची मुलं (की एक मुलगी) तिथे मॉरिशसला अभ्यासासाठी राहते याचाही उल्लेख होता.
दिनेशदा, शेवग्याच्या शेंगांवरून आठवलं इतक्यात एक स्नेही हवाईला जाऊन आले तिथेही लोकं या शेंगा खात नाहीत असं स्थानिकांशी ही मंडळी बोलली तेव्हा कळलं. आणि यांच्या मते इतक्या शेंगा होत्या की झाड अक्षरश: भरुन गेलं होतं शेंगांनी.
हे फूलं आहे का पानं? सुप्रभात
हे फूलं आहे का पानं?
सुप्रभात लोक्स !
हे फूलं आहे का पानं? - सुकि -
हे फूलं आहे का पानं? - सुकि - हे नेचे (फर्न) आहे ना ?
हे नेचे (फर्न) आहे ना
हे नेचे (फर्न) आहे ना ?>>>>>>> वाळलेल्या फर्न सारखं दिसतय..
हे नेचे (फर्न) आहे ना
हे नेचे (फर्न) आहे ना ?>>>>>>> वाळलेल्या फर्न सारखं दिसतय.. >>>> सूर्यकिरणांमुळे ???? (हलके घ्या...)
शशांक
शशांक
नवरात्रौत्सवाच्या हार्दिक
मातृशक्तीचे प्रतीक म्हणून नवरात्रात अनेक छिद्रांच्या मातीच्या मडक्यात ठेवलेला दीप किंवा दिवा पूजला जातो. स्त्रीच्या सृजनात्मकतेचे प्रतीक म्हणून नऊ दिवस पूजल्या जाणार्या ‘दीपगर्भ’मधल्या ‘दीप’ शब्दाचा लोप होऊन गर्भ-गरभो-गरबो किंवा गरबा असा शब्द प्रचलित झाला.
(आंतरजालहुन साभार)
दिनेशदा, आफ्रिका माझ्यासाठी
दिनेशदा, आफ्रिका माझ्यासाठी बराचसा डार्क कॉंटिनेंटच आहे. तुमच्या पोस्टमधून वेगळीच माहिती मिळते तिथल्या एक एक देशाची.
खिडकीमधली मनिमाऊ मस्तच ... बेरकी दिसते आहे.
सूर्यकिरण, हे वाळलेल्या नेच्यासारखं दिसतंय. आम्ही त्याला ‘संजीवनी’ म्हणायचो. उन्हाळ्यात पूर्ण वाळून गेल्यासारखं दिसणारं हे झाड पाऊस पडला की परत हिरवंगार होतं.
Pages