मु. पो. तेर्से बांबार्डे, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग.. ! पुन्हा एकदा भेट ! गेल्यावर्षी उन्हाळ्यात जाउन आलो होतो नि इथे फोटो डकवले होते.. आता निमित्त होते गणेशचतुर्थीचे... गणपतीत गावी जायचे म्हटले की लगेच मन हलके हलके वाटू लागते.. कोकणातला बाप्पा तर तन-मनात भिनलेला असतो.. शिवाय डोळ्यासमोर भातशेतीचे लांबच्या लांब हिरवे पट्टे उभे राहतात... कानांमध्ये भजनांचा आवाज दुमदुमू लागतो.. एकदम आल्हाददायक वातावरण निमिर्तीचा भास होतो... उगीच नाही गणपतीला कोकणात जाणार्या गाडया फुल असतात.. अगदी नोकरी-धंद्याची वा बॉसच्या फायरींगची पर्वा न करता गणपतीत कोकण गाठणारे कोकणवेडे असतात.. त्यासाठी मग शेवटच्या क्षणी कोकण रेल्वेचा जनरल डबादेखील चालून जातो.. मग कितीही जीवघेणी गर्दी असुदे.. कोकणातील गणपतीची ओळख झाली असेलच.. खरच गावची ओढ सगळ्या अडचणींवर मात करण्यास समर्थ असते..
उन्हाळी सुट्टी संपवून जेव्हा गावावरून मुंबईला निघतो तेव्हा गावच्या लोकांचा एकच प्रेमळ सांगणा..
'आता कधी ? गणपतीत येवा मगे '
उन्हाळ्यात काजी-फणस-आंबा स्वागतासाठी उभे असतात.. तर गणपतीत संपुर्ण निसर्गसृष्टी आपले सहर्ष स्वागत करत असते... केव्हाही या.. कोकणातल्या अगदी छोटया छोटया गोष्टींमध्ये वा छोटया छोटया कोपर्यामध्ये मन रमलेच समजा... त्यासाठी पर्यटन स्थळेच हवीच असा हटट नसावा... जो माझा कधीच नसतो.. म्हणून एकदा तेर्से बांबार्डे गाठले की बस्स तिथून बाहेर पडवत नाही. (अपवाद- यावेळी भटके मायबोलीकर - इंद्रा व रोहीत एक मावळा हे कोकणभेटीवर [घरमुक्काम - आंबोलीचा सुन्या, कुडाळजवळ मी व मालवणजवळ मसुर्याला गिरिविहार] आले असल्याने भरपुर फिरलो.. खासकरुन मालवण जवळ असलेल्या मायबोलीकर - गिरिविहार च्या मसुर्याच्या गावी.. ) . फिरुन फिरुन पोट भरत नाही... नदीकाठी तासनतास बसले तरी कंटाळा येत नाही.. पक्ष्यांचे गुंजन मनाला मोहीत करतेच.. रानफुलांशी खेळताना दंग होउन जातो.. तर गुरांसोबत मूक गप्पा करण्याची मजाही काही औरच.. त्यात सोबतीला कॅमेरा असेल तर वेळ जात नाही म्हणायला कारणच उरत नाही... यंदाच्या मोसमात टिपलेल्या काही निवडक प्रचिंची पोथडी आपल्यासाठी उघडत आहे...
प्रचि १ : अंगणातील तुळस नि त्यात पेरलेला भात !
प्रचि २: अंगणातील फुले.. यातपण जास्वंदीचे बहरलेले झाड बघणे नेहमीच सुखावह..
प्रचि ३: पाऊलवाट कोकणातली..
गावी गेलो की चप्पल घालायचे भान राहत नाही.. सुरवातीला पायाखाली येणार्या दगडांचा थोडा त्रास होतो पण एकदा सरावलो की अनवाणीच फिरायचे.. मग पाउलवाटेत पालापाचोळ्यांचा चिखल पण असो.. आपलेच सोबती म्हणत त्यातून पुढे जायचे..
प्रचि ४ :
रान Spiral Ginger वनस्पतींचे...
प्रचि ५:
प्रचि ६ : आमच्या घराजवळची देवळी (फरक जाणून घेण्यासाठी आधीच्या भागाची लिंक बघावी )
प्रचि ७: आमचे घर (मागच्या बाजूने)
प्रचि ८: कवडसा...
नि मग त्यात आमचा टाइमपास..
प्रचि ९: घरची चूल..
आता कोकणाती बहुतांशी घरे नव्याने बांधलेली आहेत.. त्यामुळे गावपणाची मजा कुठेतरी कमी होतेय असे वाटते.. पण आमचे घर अजुनही जुन्या पद्धतीतच राहीले आहे.. तोपर्यंत तरी जुनेपणाचा आस्वाद घेणार
प्रचि १०: स्वयंपाक खोली..
प्रचि ११: कोयतो
प्रचि १२:
प्रचि १३: चुडतं.. वापर कराल तसा आहे.. खालच्या प्रचितील चुडतं पावसात चिखलामुळे घसरु नये म्हणून दरवाज्यासमोर पसरवतात..
प्रचि १४: गणपतीत गावी आलो की साहाजिकच मोर्चा 'तवशेच्या(मोठी काकडी) आडाळी'कडे वळतो.. . लोंबकळणारी 'शिराळा' (दोडकी) पण भेटतातच..
प्रचि १५:विहीर
प्रचि १६: कचकचून चावणारे हुमले
प्रचि १७:
प्रचि १८: घरासमोरच भातशेतीमध्ये दिसणारी हरणा...
कोकण म्हटले की भातशेती आलीच.. गर्द हिरव्या रंगात नटलेली ही भातशेती बघून डोळे दिपून जातात.. उन-सावलीत भातशेतीचा समुद्र तर बघेबल असतो... रंगाच्या वेगवेगळ्या छटाच .. ऊन गेले की गर्द हिरवा रंग... ऊन आले की डोळ्यांवर ताण पडेल इतका तेजस्वी पोपटी रंग.. नि मावळतीच्या ऊनात पिवळसर सोनेरी रंग.. याच हिरवाईमुळे कोकणातील सृष्टी नटून जाते.. जिथे उन्हाळ्यात जमिन ओसाड असते त्याचजागी पावसाळ्यात डौलदार पिक उभे राहीलेले दिसते..
प्रचि १९ :
प्रचि २० :
प्रचि २१:
प्रचि २२:
प्रचि २३:
प्रचि २४:
प्रचि २५: याच भातशेतींमधून फिरताना आडवे आलेले दोन मुंगूस (घराच्याभवती पण कोंबडया गटटम करण्यासाठी गस्त घालत असतात)
प्रचि २६: मागच्या भागातील फोटो आठवतोय का ?
प्रचि २७: भातशेतींमधून जाणारी वाट मस्तच..
हीच वाट पुढे नारळा-केळीच्या झाडांच्या गुहेत शिरली की नक्कीच तिथे घर सापडते..
प्रचि २८:
प्रचि २९:मावळतीच्या ऊनात धारण केलेली छटा
प्रचि ३०: स्वप्नवत असे काही..
प्रचि ३१ :
प्रचि ३२: मायबोलीकर भ्रमर (मिलिंद माईणकर) याचे पण हेच गाव.. त्याच्या घराकडे जाताना दिसलेली 'धनेश गरुड' (हॉर्नबील) ची जोडी..
प्रचि ३३:
प्रचि ३४: ये हे क्रिकेट.. गणपतीत गावी आलो की आम्हा भावंडाचे आवडते मैदान (माळरान)...
प्रचि ३५: सुगरणीचे घरटे.. (मायबोलीकर 'गिरीविहार' च्या घरच्या अंगणात (गाव - मसुरे, मालवण) तर भरपूर घरटी पाहिली..तिकडचे फोटो इंद्रा-गिरी कडून येतीलच)
प्रचि ३६ : गावाकडची नदी (वेळ संध्याकाळ)
प्रचि ३७: सांजसंध्या..
प्रचि ३८: धुकेमय प्रभात (दोन दिवस खूपच दाट धुके पडले होते.. गावी सकाळी थंडी वाजतेच.. हिंवाळाच पाहिजे असे नाही..)
प्रचि ३९:
प्रचि ४०: आमच्या घराजवळून जाणारा.. NH-17 (मुंबई - गोवा हायवे)
प्रचि ४१: जवळचे 'झाराप' रेल्वे स्टेशन (याचे नामकरण आधी 'तेर्से बांबार्डे' असेच होणार होते..सध्या दिवा पॅसेंजर थांबते)
प्रचि ४२ : कोकण रेल्वे..
प्रचि ४३ : भरदुपारी नदीवरची होडी..
प्रचि ४४: रामेवश्वर व रवळनाथ मंदीर परिसर..
प्रचि ४५: कोकणात आलात तर असे मंदीर दिसेलच..
प्रचि ४६: घराकडे गणपती वा सत्यनारायणची पूजा असली की माडाला वा झाडाला लटकणारे लाउडस्पिकर्स.
प्रचि ४७:
प्रचि ४८:
प्रचि ५०: पाउस येतो तेव्हा..
प्रचि ५१:
प्रचि ५२:
आता पुरे... रानफुलांचे फोटो वेगळेच देइन म्हणतोय.. आतापर्यंतचे फोटो पाहून कोणाचा जळफळाट होत असेल तर त्यांच्यासाठी हा खास मालवणी स्टाईलमधला फोटो...
प्रचि ५३ :
नि कोणाला गावी जाउन आल्यासारखे वाटले तर तिकीटप्रवासाचे भाडे पाठवून देणे..
तेव्हा समाप्त
यो.. सुंदर लेख अन
यो.. सुंदर लेख अन प्रचि...
बोल किती झब्बु देऊ....:-), तुर्तास एकच झब्बु देतो.. हे साहेब तुम्ही गेल्या नन्तर दुसरया दिवशी सकाळी घरमागच्या माडावर बसुन भुपाळी गात होते...
मस्त सौ यो रॉक्स पण रॉक्स बरं
मस्त
सौ यो रॉक्स पण रॉक्स बरं का!
मस्तच रे
मस्तच रे
लै भारी फोटु हाईत..... गाव बी
लै भारी फोटु हाईत..... गाव बी लै भारी...
लै भारी!!!
लै भारी!!!
धन्यवाद सगळ्यांचे.. गिरी..
धन्यवाद सगळ्यांचे..
गिरी.. झब्बू भारी.. भूपाळी नि काय ते एकदम टाका रे पक्ष्यांचे फोटो..
मस्त फोटो. पावसाचा फोटो
मस्त फोटो. पावसाचा फोटो प्रचंड आवडला.
मस्त फोटोज...
मस्त फोटोज...
घरासमोरच भातशेतीमध्ये दिसणारी
घरासमोरच भातशेतीमध्ये दिसणारी हरणा...
माका नाय गमाक हरणा... का पिवळा कायतरी गमताहा त्याकाच हरणा हुनतत??????
बाकी फोटो एकदम झकास... गावाक एक फेरी मारुक व्हयीच आता......
आता नरटां फोडूक नांय
आता नरटां फोडूक नांय जातलंस???? ..म्हणजे थंडीतलेंव फोटो गावतले.. कांय मेलो मार्केटींग करतांहा बांबार्ड्याचो!!...
का पिवळा कायतरी गमताहा
का पिवळा कायतरी गमताहा त्याकाच हरणा हुनतत????? >> साधना.. हो.. माका पण आधी समजणाच नाय.. मगे काकीने सांगितला तसा..
हेमा..
मस्त रे यो... तुझ्या गावाक
मस्त रे यो... तुझ्या गावाक मजा इलि...
हेमंत... मेल्या, नजार कशाक
हेमंत...
मेल्या, नजार कशाक लावतहं???...
कदी न्हंय ते कोकणचां मार्केटींग करणारे गावलेसत... करुंदेत जरां वांयच मार्केटिंग...
ह्येची सुरुवात मात्र 'जिप्श्या'न केलेली... लक्षात आसा?...
मी पण तेर्से बांबार्डे या
मी पण तेर्से बांबार्डे या गावाचा आहे. मी वेंगुर्लेकर वाडी मध्ये राहत होतो...
वेंगुर्लेकर यांच्या घराच्या बाजूला एक घर होते माझ्या आज्जीचे. सरमळकर हे आज्जीचे आड नाव.
पण आता आज्जीही नाही आणि ते घरही कोसळले त्या मुळे आम्ही तिकडे जाणे झाले नाही हल्ली.
पण प्राची कधी गेलीस तर जा तिकडे वेंगुर्लेकर वाडी मध्ये.... आंनी तिकडले पण फोटो टाक
बरे वाटेल
योगल्या, एकापेक्षा एक सरस अशी
योगल्या, एकापेक्षा एक सरस अशी प्र.चि. बघुन डोळे निवले रे !
मस्तच खुप छान.. आवडलं.. यंदा
मस्तच खुप छान.. आवडलं..:)
यंदा मिसलय आता next time नक्की.. शनिवारी (४थ्या दिवशी) मी आलो होतो पण सावंतवाडीला परतायच्या घाइने भेटु शकलो नाही..:(
झकास तिकीटप्रवासाचे भाडे
झकास
तिकीटप्रवासाचे भाडे पाठवेन म्हणतोय जल्ला अकाउंट नंबर दे
लय भारी गाववाल्यानु!आवाडला
लय भारी गाववाल्यानु!आवाडला माका ...................
दगडू, मस्त हिरवेगार फोटो मी
दगडू, मस्त हिरवेगार फोटो मी त्या एका फोटोत हरणं कुठे दिसतायत बघत होते.
शिरां पडो. जल्लां, फोटु
शिरां पडो. जल्लां, फोटु म्हणायचे का काय हे? माका तिकीट धाडून दी आदी. नायतर तुझ्या घरकारणीक फेसबुकार गाठतंय.
अफलातुन ... भारिच...
अफलातुन ...
भारिच...
मस्तच
मस्तच
अरे व्वा ...BEAUTIFULLLLL आहे
अरे व्वा ...BEAUTIFULLLLL आहे गाव तुझ ..
अफलातुन ... भारिच... खुपच
अफलातुन ...
भारिच...
खुपच अप्रतिम आलेत रे सगळे फोटो....
लगेचच गावला जायला पाहिजे असे वाटतेय
Pages