मु. पो. तेर्से बांबार्डे, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग.. ! पुन्हा एकदा भेट ! गेल्यावर्षी उन्हाळ्यात जाउन आलो होतो नि इथे फोटो डकवले होते.. आता निमित्त होते गणेशचतुर्थीचे... गणपतीत गावी जायचे म्हटले की लगेच मन हलके हलके वाटू लागते.. कोकणातला बाप्पा तर तन-मनात भिनलेला असतो.. शिवाय डोळ्यासमोर भातशेतीचे लांबच्या लांब हिरवे पट्टे उभे राहतात... कानांमध्ये भजनांचा आवाज दुमदुमू लागतो.. एकदम आल्हाददायक वातावरण निमिर्तीचा भास होतो... उगीच नाही गणपतीला कोकणात जाणार्या गाडया फुल असतात.. अगदी नोकरी-धंद्याची वा बॉसच्या फायरींगची पर्वा न करता गणपतीत कोकण गाठणारे कोकणवेडे असतात.. त्यासाठी मग शेवटच्या क्षणी कोकण रेल्वेचा जनरल डबादेखील चालून जातो.. मग कितीही जीवघेणी गर्दी असुदे.. कोकणातील गणपतीची ओळख झाली असेलच.. खरच गावची ओढ सगळ्या अडचणींवर मात करण्यास समर्थ असते..
उन्हाळी सुट्टी संपवून जेव्हा गावावरून मुंबईला निघतो तेव्हा गावच्या लोकांचा एकच प्रेमळ सांगणा..
'आता कधी ? गणपतीत येवा मगे '
उन्हाळ्यात काजी-फणस-आंबा स्वागतासाठी उभे असतात.. तर गणपतीत संपुर्ण निसर्गसृष्टी आपले सहर्ष स्वागत करत असते... केव्हाही या.. कोकणातल्या अगदी छोटया छोटया गोष्टींमध्ये वा छोटया छोटया कोपर्यामध्ये मन रमलेच समजा... त्यासाठी पर्यटन स्थळेच हवीच असा हटट नसावा... जो माझा कधीच नसतो.. म्हणून एकदा तेर्से बांबार्डे गाठले की बस्स तिथून बाहेर पडवत नाही. (अपवाद- यावेळी भटके मायबोलीकर - इंद्रा व रोहीत एक मावळा हे कोकणभेटीवर [घरमुक्काम - आंबोलीचा सुन्या, कुडाळजवळ मी व मालवणजवळ मसुर्याला गिरिविहार] आले असल्याने भरपुर फिरलो.. खासकरुन मालवण जवळ असलेल्या मायबोलीकर - गिरिविहार च्या मसुर्याच्या गावी.. ) . फिरुन फिरुन पोट भरत नाही... नदीकाठी तासनतास बसले तरी कंटाळा येत नाही.. पक्ष्यांचे गुंजन मनाला मोहीत करतेच.. रानफुलांशी खेळताना दंग होउन जातो.. तर गुरांसोबत मूक गप्पा करण्याची मजाही काही औरच.. त्यात सोबतीला कॅमेरा असेल तर वेळ जात नाही म्हणायला कारणच उरत नाही... यंदाच्या मोसमात टिपलेल्या काही निवडक प्रचिंची पोथडी आपल्यासाठी उघडत आहे...
प्रचि १ : अंगणातील तुळस नि त्यात पेरलेला भात !
प्रचि २: अंगणातील फुले.. यातपण जास्वंदीचे बहरलेले झाड बघणे नेहमीच सुखावह..
प्रचि ३: पाऊलवाट कोकणातली..
गावी गेलो की चप्पल घालायचे भान राहत नाही.. सुरवातीला पायाखाली येणार्या दगडांचा थोडा त्रास होतो पण एकदा सरावलो की अनवाणीच फिरायचे.. मग पाउलवाटेत पालापाचोळ्यांचा चिखल पण असो.. आपलेच सोबती म्हणत त्यातून पुढे जायचे..
प्रचि ४ :
रान Spiral Ginger वनस्पतींचे...
प्रचि ५:
प्रचि ६ : आमच्या घराजवळची देवळी (फरक जाणून घेण्यासाठी आधीच्या भागाची लिंक बघावी )
प्रचि ७: आमचे घर (मागच्या बाजूने)
प्रचि ८: कवडसा...
नि मग त्यात आमचा टाइमपास..
प्रचि ९: घरची चूल..
आता कोकणाती बहुतांशी घरे नव्याने बांधलेली आहेत.. त्यामुळे गावपणाची मजा कुठेतरी कमी होतेय असे वाटते.. पण आमचे घर अजुनही जुन्या पद्धतीतच राहीले आहे.. तोपर्यंत तरी जुनेपणाचा आस्वाद घेणार
प्रचि १०: स्वयंपाक खोली..
प्रचि ११: कोयतो
प्रचि १२:
प्रचि १३: चुडतं.. वापर कराल तसा आहे.. खालच्या प्रचितील चुडतं पावसात चिखलामुळे घसरु नये म्हणून दरवाज्यासमोर पसरवतात..
प्रचि १४: गणपतीत गावी आलो की साहाजिकच मोर्चा 'तवशेच्या(मोठी काकडी) आडाळी'कडे वळतो.. . लोंबकळणारी 'शिराळा' (दोडकी) पण भेटतातच..
प्रचि १५:विहीर
प्रचि १६: कचकचून चावणारे हुमले
प्रचि १७:
प्रचि १८: घरासमोरच भातशेतीमध्ये दिसणारी हरणा...
कोकण म्हटले की भातशेती आलीच.. गर्द हिरव्या रंगात नटलेली ही भातशेती बघून डोळे दिपून जातात.. उन-सावलीत भातशेतीचा समुद्र तर बघेबल असतो... रंगाच्या वेगवेगळ्या छटाच .. ऊन गेले की गर्द हिरवा रंग... ऊन आले की डोळ्यांवर ताण पडेल इतका तेजस्वी पोपटी रंग.. नि मावळतीच्या ऊनात पिवळसर सोनेरी रंग.. याच हिरवाईमुळे कोकणातील सृष्टी नटून जाते.. जिथे उन्हाळ्यात जमिन ओसाड असते त्याचजागी पावसाळ्यात डौलदार पिक उभे राहीलेले दिसते..
प्रचि १९ :
प्रचि २० :
प्रचि २१:
प्रचि २२:
प्रचि २३:
प्रचि २४:
प्रचि २५: याच भातशेतींमधून फिरताना आडवे आलेले दोन मुंगूस (घराच्याभवती पण कोंबडया गटटम करण्यासाठी गस्त घालत असतात)
प्रचि २६: मागच्या भागातील फोटो आठवतोय का ?
प्रचि २७: भातशेतींमधून जाणारी वाट मस्तच..
हीच वाट पुढे नारळा-केळीच्या झाडांच्या गुहेत शिरली की नक्कीच तिथे घर सापडते..
प्रचि २८:
प्रचि २९:मावळतीच्या ऊनात धारण केलेली छटा
प्रचि ३०: स्वप्नवत असे काही..
प्रचि ३१ :
प्रचि ३२: मायबोलीकर भ्रमर (मिलिंद माईणकर) याचे पण हेच गाव.. त्याच्या घराकडे जाताना दिसलेली 'धनेश गरुड' (हॉर्नबील) ची जोडी..
प्रचि ३३:
प्रचि ३४: ये हे क्रिकेट.. गणपतीत गावी आलो की आम्हा भावंडाचे आवडते मैदान (माळरान)...
प्रचि ३५: सुगरणीचे घरटे.. (मायबोलीकर 'गिरीविहार' च्या घरच्या अंगणात (गाव - मसुरे, मालवण) तर भरपूर घरटी पाहिली..तिकडचे फोटो इंद्रा-गिरी कडून येतीलच)
प्रचि ३६ : गावाकडची नदी (वेळ संध्याकाळ)
प्रचि ३७: सांजसंध्या..
प्रचि ३८: धुकेमय प्रभात (दोन दिवस खूपच दाट धुके पडले होते.. गावी सकाळी थंडी वाजतेच.. हिंवाळाच पाहिजे असे नाही..)
प्रचि ३९:
प्रचि ४०: आमच्या घराजवळून जाणारा.. NH-17 (मुंबई - गोवा हायवे)
प्रचि ४१: जवळचे 'झाराप' रेल्वे स्टेशन (याचे नामकरण आधी 'तेर्से बांबार्डे' असेच होणार होते..सध्या दिवा पॅसेंजर थांबते)
प्रचि ४२ : कोकण रेल्वे..
प्रचि ४३ : भरदुपारी नदीवरची होडी..
प्रचि ४४: रामेवश्वर व रवळनाथ मंदीर परिसर..
प्रचि ४५: कोकणात आलात तर असे मंदीर दिसेलच..
प्रचि ४६: घराकडे गणपती वा सत्यनारायणची पूजा असली की माडाला वा झाडाला लटकणारे लाउडस्पिकर्स.
प्रचि ४७:
प्रचि ४८:
प्रचि ५०: पाउस येतो तेव्हा..
प्रचि ५१:
प्रचि ५२:
आता पुरे... रानफुलांचे फोटो वेगळेच देइन म्हणतोय.. आतापर्यंतचे फोटो पाहून कोणाचा जळफळाट होत असेल तर त्यांच्यासाठी हा खास मालवणी स्टाईलमधला फोटो...
प्रचि ५३ :
नि कोणाला गावी जाउन आल्यासारखे वाटले तर तिकीटप्रवासाचे भाडे पाठवून देणे..
तेव्हा समाप्त
मस्तच
मस्तच
सहीच तिकीटप्रवासाचे भाडे
सहीच
तिकीटप्रवासाचे भाडे चेकने पाठवून देते ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त वाटलं , जुन्या आठवणी
मस्त वाटलं , जुन्या आठवणी ताज्या झाल्या
फोटो वांगडाक खरंच गावी जाउन
फोटो वांगडाक खरंच गावी जाउन इलंयसा वाट्टा हा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
४९ नक्की माहेरी फुनवा चालू असणार हो ना यो ?
यो... सिंपली ऑसम.. 'नि कोणाला
यो... सिंपली ऑसम..
![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
'नि कोणाला गावी जाउन आल्यासारखे वाटले तर तिकीटप्रवासाचे भाडे पाठवून देणे''
शेवटचा फोटो तर हायलाईट आहे..
एवढे सगळे वैभव
एवढे सगळे वैभव पाहिल्यावर....
जळतत मेले>>> म्हणजे काय, जळणारच. दुसरा काही इलाज आहे का.
चक्षुर्वैसत्यं कोकण दर्शन करवलयस. फार प्रसन्न वाटल. प्रचि तर बेहद्द आवडली.
अफलातुन
अफलातुन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
यो सगळे फोटो मस्त.. घरान
यो सगळे फोटो मस्त.. घरान जुनेपणा टिकवन ठेवल्यान म्हणान आजुन गाव वाटता.
अतिशय सुरेख. इतकं सुंदर गाव
अतिशय सुरेख.
इतकं सुंदर गाव सोडून तू मुंबईत राहतोस कसा, असा प्रश्न पडला मला.
मला बांबार्ड्याला जायचंय
मला बांबार्ड्याला जायचंय !
मस्त फोटो...सुंदर गाव !
योग्या काय बोलू समाजना नाय..
योग्या काय बोलू समाजना नाय.. काय एकेक फोटो मेल्या!! तुका सा. दं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>जळतत मेले>>> म्हणजे काय, जळणारच. दुसरा काही इलाज आहे का.>> +१००
प्रचि ४९ खासम खास![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
५२ हुकमी पत्ते + १ पावरबाज
५२ हुकमी पत्ते + १ पावरबाज जोकर ! डोळ्याचं पारणं फिटलं !!!
पाहिलाय मी बिबवणं, झारापी, तेर्से बांबार्डे परिसर .. हुबेहूब असाच !!! नशीबवान अहात झालं !
अतिशय सुंदर...
अतिशय सुंदर...
आता कोकणाती बहुतांशी घरे
आता कोकणाती बहुतांशी घरे नव्याने बांधलेली आहेत.. त्यामुळे गावपणाची मजा कुठेतरी कमी होतेय असे वाटते>>>++++++१११११११११
मस्त फोटो..............
झकास इलेसंत सगळेच फोटो.
झकास इलेसंत सगळेच फोटो. बांबार्ड्याक जाऊक होया!
(No subject)
प्रचि फारच सुरेख आहेत. कस्लं
प्रचि फारच सुरेख आहेत. कस्लं स्वप्नातल्यासारखं सुंदर गाव आहे तुमचं! .. खरंच हेवा वाटण्यासारखंय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच !!!!!!!!
मस्तच !!!!!!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गणपतीत गावी जायचे म्हटले की
गणपतीत गावी जायचे म्हटले की लगेच मन हलके हलके वाटू लागते.. >>>>>>>>> खरच जरि नाही जायला मिळाल ना गावी तरि तुमचे फोटो पाहिले ना कि ति उणिव सुद्दा भरुन निघते. अप्रतिम फोटोग्राफि.
योग्या, खूप मस्त!!
योग्या, खूप मस्त!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
झक्कास ! ......
झक्कास ! ......
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त वाटलं फोटो बघून.. हे
मस्त वाटलं फोटो बघून.. हे झाराप गाव येताजाता बसमधून बघत असे मी !
मस्तच रे!
मस्तच रे!
जळतत मेले>>> म्हणजे काय,
जळतत मेले>>> म्हणजे काय, जळणारच. दुसरा काही इलाज आहे का. >> इलाज एकच... दिवा पॅसिंजर पकडायची नी 'झाराप'ला उतरायचा...
जल्ला ५००च्या वर फोटो काढलेत... पण कोकणच्या हिरवाईची सर त्या फोटोना कशी येणार... प्रत्यक्ष जाऊन बघाच.
योग्या... _/\_...
योग्या...
_/\_... तुका...
फोटो क्र. ४९ वर - कुछ खास है...
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मी मात्र जळांचंय नाय... कारण बहुतेक दर-म्हयन्याक माझी एक तरी फेरी होताच, आणी या रस्त्यावरसून मोटार-सायकल घ्येवन फिरणां होता... सतत ३-४ वर्षां कॉलेजचे फेर्ये याच रस्त्या वरसून केलेले आसत...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मेxx... पयल्या भागाची लिंक द्येवक काय झालेलां तुका?... नव्या मेंबरांनी खंय म्हणान तुझ्या लेखनाचो पयलो भाग शोधुचो?...
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
धन्यवाद ऑल ! डॅफो पण
धन्यवाद ऑल !
डॅफो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण कोकणच्या हिरवाईची सर त्या फोटोना कशी येणार... प्रत्यक्ष जाऊन बघाच. >> +१
मास्तरांनु.. पहिल्या वाक्यातच लिंक दिली आसय..
नितांतसुंदर फोटो व वर्णन तर
नितांतसुंदर फोटो व वर्णन तर झकासच.
रुपये २९७ आपल्या खात्यात जमा
रुपये २९७ आपल्या खात्यात जमा करणेत येतील. खात्याचे तपशील त्वरित धाडून देणे.
दगडूभावा, मस्तच आहेत सर्व
दगडूभावा, मस्तच आहेत सर्व फोटू.
लयी म्हणजे लयी म्हणजे लयी
लयी म्हणजे लयी म्हणजे लयी भारी रे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला कोकण ज्याच गाव आहे, आजोळ आहे अशांचा खुप हेवा वाटतो.
जळत मात्र नाय हां..
योग्या नेक्स्ट टैम मला बी घेवुन चल रे तुझ्या गावाला.
Pages