निसर्गाच्या गप्पा (भाग १०)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 July, 2012 - 14:54

निसर्गाच्या गप्पांचा १० वा भाग सुरु होत आहे हो$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$

(मधला हार गुंफलेला फोटो शोभा कडून साभार)

मूलं भुजङ्गै:, शिखरं प्लवङ्गै:
शाखा विहंगै:, कुसुमानि भृङ्गै: |
नास्त्येव तच्चन्दनपादपस्य
यन्नाश्रितं सत्वभरै: समन्तात ||

हे आहे सुगंधी चंदनवृक्षाचं लेकुरवाळं चित्र; त्याच्या मुळांना सर्पाचं वेटोळं आढळतं. खोडाच्या टोकाकडे मर्कटवर्गीयांच्या लीला, पानापानात दडलेले पक्षीगण आणि फुलांवर रुंजी घालणारे भुंगे.

- डॉ. हेमा साने (वृक्ष - एक आधारवड, निसर्गायन, ऑक्टो. २०११)
(शशांक पुरंदरे यांच्याकडून)

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग ९) http://www.maayboli.com/node/35557?page=35

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शशांक, मला ते विकसित न झालेले अंडे वाटायचे..

अँडिज मधल्या वाळवंटात तर पाणी अजिबात नाही, तिथले प्राणी पक्षी, झाडावरचे दंव पिऊन आपली तहान भागवतात. जीवनेच्छा बलियेसी !

कॉलेजमधे झूलॉजी शिकवायला आम्हाला रानडे म्हणून एक सर होते त्यांनी सांगितलेल्या काही गमती जमती - (या सगळ्या करुन बघितल्या आहेत)

१] झुरळाच्या शरीरावर सूक्ष्म छिद्रे असतात ज्यातून ते हवेमधील ऑक्सिजन घेते त्यामुळे साबणाच्या फेसात/पाण्यात झुरळ अडकले तर काही सेकंदात मरते (ऑक्सिजनअभावी).

२] झुरळाचा मेंदू आपल्या सारखा विकसित नसल्याने मेंदूशिवायही ते जगू शकते -
प्रयोग - झुरळ अलगद पकडून त्याच्या डोक्यामागे गळफास द्यायचा पण तो असा की ती गाठ एकदम न मारता हळुहळू घट्ट करायची जेणेकरुन त्याचा रक्तस्त्राव जोरात न होता फक्त डोके अलगद बाजूला व्हायला पाहिजे. - हे करताना त्याचे रक्त त्याठिकाणी गोठत जाते व अतिरिक्त रक्तस्त्रावाने मृत्यू टळतो - चार्-पाच झुरळे मेल्यावर मग हे टेक्निक जमते (काहींना एका फटक्यातही जमू शकेल). असे डोके विरहित (बिनडोक नाही हां) झुरळ काही दिवसही जगते.(मुंग्या लागू नयेत म्हणून काळजी घ्यावी लागते). पुढे खायला काही न मिळाल्याने ते मरते (भूकबळी). कारण त्याचे डोके काढताना त्याचे तोंडही सहाजिकच निघून जाते ना, त्यामुळे भूकबळी....

अजून गमती जमती नंतर टाकतो...

शशांक, झुरळे मला अगदी सर्व देशात दिसली. न्यू झीलंडमधे घरे बहुतेक लाकडाची असतात आणि तिथल्या हिवाळ्यात सगळीकडे ओल असते, म्हणून झुरळांचे चांगलेच फावते, असे म्हणावे तर दुबई / मस्कत मधे देखील भरपूर झुरळे आहेत. तिथे एक नवीन किटकनाशक विकायला आले होते, त्यावेळी सर्वात वजनदार झुरळ पकडायची स्पर्धा होती !

ओ वॉव.. जिप्स्या.. सुपर्ब रे !! सापाला आजपर्यन्त पाणी पिताना पाहिलं तर सोड.. ऐकलंही नव्हतं..
रिअली रेअर दृष्य आहे!!!

कॉलेजमधे झूलॉजी शिकवायला आम्हाला रानडे म्हणून एक सर होते त्यांनी सांगितलेल्या काही गमती जमती - ...... पुढे चालू ........

बेडुक हा किडे-मकोडे मटकावणारा प्राणी म्हणून आपल्या सर्वांना माहित आहेच - मग एखादे अज्जिबात हालचाल न करणारे (अगदी पायही न हलवणारे) मेलेले झुरळ त्यासमोर टाकून पहा - तो बेडुक त्याकडे ढुंकूनही पहाणार नाही - कारण - अगदी सोपे व साधे - त्याची नैसर्गिक जाणीव त्याला सांगते - फक्त हलणारे/ वळवळणारेच मटकावयाचे ..... बाकीचे आपले खाद्य नाही - विश्वास बसत नसेल तर एक प्रयोग करा -
संध्याकाळी दिव्यामुळे आकर्षित झालेले किडे खायला काही टोड्स येतात -त्यांच्या पुढ्यात अगदी छोटासा कागदाचा बोळा दोर्‍याने बांधून हळुहळू असा ओढा की तो त्या टोडच्या नजरेच्या टप्प्यात असेल. नैसर्गिक जाणिवेमुळे तो टोड लगेच तो हलणारा बोळा मटकावेल - त्या बिचार्‍याला काय माहित असणार आपला हा प्रयोग ????

तर असे हे रानडेसर पुस्तकी ज्ञानाव्यतिरिक्त खूप काही ज्ञान देणारे.....

मी कॉलेजमधे असताना (१९७६ ते ८३) आमच्या बॅचला एक मुलगी होती. त्यावेळेस मुली सर्रास साड्यांमधेच असत.... क्वचित एखादी शर्ट-पँटमधे तर एखादी स्कर्ट ब्लाऊज. तर ही एक साडीवाली (नाव आठवत नाहीये) सॉलिड डेअरिंगवाली - झूलॉजीत डिसेक्शनसाठी एका मोठ्या लोखंडी ड्रममधे बेडुक ठेवलेले असत - त्या ड्रममधे बिन्धास्त हात घालून बेडुक काढून द्यायची - अगदी मुलांनाही ....
गरवारे कॉलेजची जी मुख्य इमारत आहे तिथे दुसर्‍या मजल्यावर झूलॉजी डिपार्टमेंट होते. रस्त्याच्या साईडला वा मुख्य प्रवेशदाराच्यावरतीच या डिपार्टमेंटच्या खिडक्या येत असत.
एका बेडुक डिसेक्शनच्या वेळेस -एका अर्धवट फाडलेल्या बेडकाने (त्याला क्लोरोफॉर्मचा डोस बहुधा पुरेसा मिळाला नव्हता) दुसर्‍या मजल्यावरुन जे खिडकीतून खाली उडी मारली ती थेट खाली मुलामुलींच्या घोळक्यातच ....

पुढील प्रसंगाचे वर्णन करायची गरज आहे का ?????

शशांकजी,
नविन माहिती बद्दल धन्यवाद ...

झुरळांची संख्या सर्वत्र वाढलेली दिसते,पुर्वी मला वाटायचं कि शहरात, चकाचक फ्लैट मध्ये (लपायला जागा मिळणार नाही म्हणुन) तर झुरळ असणार नाहीत,पण सध्या अनुभव घेतोय.
ही झुरळे जोरात चावतात पण ते माणसाचं रक्त पितात का ?

रानडे सर म्हणजे MES मधले का? जरा स्थूल आणि चष्मा? >>> हो मृनिश, गरवारे मधलेच - त्यांचे टि स्मा ते पेरुगेट पोलिसचौकी रस्त्यावर सराफी दुकानही होते तेव्हा....
....अ‍ॅज फार अ‍ॅज सर्क्युलेटरी/नर्व्हस्/डायजेस्टिव्ह सिस्टिम ऑफ फ्रॉग इज कन्सर्ड.... अशी त्यांची पेटंट वाक्ये असायची.....

ही झुरळे जोरात चावतात पण ते माणसाचं रक्त पितात का ? >> चावतात पण रक्तपिपासू नसतात - ते काम डासांचे, पिसवांचे, गोचिडांचे.....

Periplaneta americana हे झुरळाचे शास्त्रीय नाव तर
Rana tigrina हे बेडकाचे.

हो मृनिश, गरवारे मधलेच - त्यांचे टि स्मा ते पेरुगेट पोलिसचौकी रस्त्यावर सराफी दुकानही होते तेव्हा....
>> सराफ दुकान.हम्म..मग वेगळे आहेत वाटते..मी म्हणतेय ते सेनादत्त पोलिस चौकीच्या लेन मध्ये रहायचे..त्यांचे दुकान असल्याचे आठवत नाहिये

नायजेरीयात, कारली, दुधी, शिराळी अशा भाज्या जंगलात आपोआप होतात. ते लोक खात नाहीत ( शिराळ्याच्या शिरांचा अंग धुण्यासाठी आणि कोरलेल्या दुधीचा पाणी साठवण्यासाठी मात्र उपयोग करतात. ) माझ्या मेडला मी त्या आणायला सांगायचो मी. हे खातोस तू ? असे आश्चर्याने विचारायची ती मला.

पाऊस पडून गेला, कि ती आनंदाने खुरपे घेऊन बाहेर पडायची. तिला मोठमोठ्या स्नेल्स मिळायच्या.

त्यानंतर कुठलाही प्राणी दाखवून, हे खाता तूम्ही असे मी तिला विचारायचो तर जंगलातले एखादे फळ मला दाखवून, हे खातोस का तू, असे ती मला विचारायची.. कधी कधी एकमेकांना, अनपेक्षित होकारार्थी उत्तरे मिळायची !!!

पण फळाच्या बाबतीत मात्र काही अनोख्या चवीची फळे, मला तिने खायला शिकवली. त्यापैकी अचीचा ( केशरी रंगाचे, मेणासारखे दिसणारे आणि चवीला, ऊसासारखे लागणारे फळ, मात्र पोर्ट हारकोर्ट सोडल्यास, नायजेरीयात,
इतर कुठेही मला मिळाले नाही.)

इथे अंगोलात पण तो सिलसिला चालू आहे.

<<<गरवारे कॉलेजची जी मुख्य इमारत आहे तिथे दुसर्‍या मजल्यावर झूलॉजी डिपार्टमेंट होते. रस्त्याच्या साईडला वा मुख्य प्रवेशदाराच्यावरतीच या डिपार्टमेंटच्या खिडक्या येत >>> हो शशांकजी, मी पण गरवारे कॉलेजची पण कॉमर्स साईड. आम्हाला त्यावेळी ह्या विषयी किस्से ऐकायला मिळत. ते आठवले. Happy

श्री.चितमपल्लींच्या चकवाचांदणमधे साप आवाज करतो असा पण उल्लेख आहे. दाट जंगलात त्यांना मोटारसायकल चालल्यासारखा टर्रर्र.. असा आवाज येतो; पण इतक्या दाट जंगलात बाईक कुठून येणार? तेव्हा त्यांना माधवराव पाटलांनी सांगितलं होतं की ही घोणस ओरडतिये म्हणून! साप इतक्या मोठ्याने ओरडतात हे ऐकून त्यांना नवल वाटलं होतं. माधवराव पाटील त्यांना म्हणाले की, 'सर्पज्ञान गूढ आहे!'...... हे मात्र खरंच आहे.

त्यानंतर कुठलाही प्राणी दाखवून, हे खाता तूम्ही असे मी तिला विचारायचो तर जंगलातले एखादे फळ मला दाखवून, हे खातोस का तू, असे ती मला विचारायची.. कधी कधी एकमेकांना, अनपेक्षित होकारार्थी उत्तरे मिळायची !!!>>>>>>>>> Lol

दिनेशदा, 'अचीचा '' बहुतेक इथेही मिळतं.. पण आतूनही मेणासारखं टेक्श्चर आहे.. सध्या मिळतंय.. घेऊन येईन इथे फोटू टाकायला..

'त्यानंतर कुठलाही प्राणी दाखवून, हे खाता तूम्ही असे मी तिला विचारायचो तर जंगलातले एखादे फळ मला दाखवून, हे खातोस का तू, असे ती मला विचारायची.. कधी कधी एकमेकांना, अनपेक्षित होकारार्थी उत्तरे मिळायची !!!>>>>>>>>>'' Rofl
खरंय तुम्ही राहात असलेला प्रदेश आमच्याकरता इतका नवलाईपूर्ण आहे कि बस नाही!!!!
अंगोला बद्दलच्या इतर माहितीचीही वाट पाहतोय.. Happy

दिनेशदा, जवळ जवळ सगळं जग फिरून झालं असेलना एव्हाना. जुन्या रंगीबेरंगीतही बरेच देश लिहून झालेत.

शशांक प्राणी-पुराण मस्तच.

त्यानंतर कुठलाही प्राणी दाखवून, हे खाता तूम्ही असे मी तिला विचारायचो तर जंगलातले एखादे फळ मला दाखवून, हे खातोस का तू, असे ती मला विचारायची >> Lol

शशांक, झुरळ, उंदीर, माशी वहैरे आपल्याला उपद्रवी वाटणारे प्राणी, जीवनात खुपच यशस्वी झाले आहेत, असे नाही वाटत ? अगदी कुठल्याही परिस्थितीत ते तग धरु शकतात.

अंगोलाबद्दल, लिहितोच सावकाशीने !

जग नाही अजून फिरलो. अमेरिका राहिलीय ! पण गेलो तर दक्षिण अमेरिकेला जायची खुप इच्छा आहे.

शशांक, झुरळ, उंदीर, माशी वहैरे आपल्याला उपद्रवी वाटणारे प्राणी, जीवनात खुपच यशस्वी झाले आहेत, असे नाही वाटत ? अगदी कुठल्याही परिस्थितीत ते तग धरु शकतात. >>>> यात झुरळाचा नं फारच वर लागतो - एक म्हणजे उत्क्रांतीचा आतापर्यंतचा काळ लक्षात घेता तग धरु शकलेला वा स्वतःला आजूबाजूच्या परिस्थितीशी अ‍ॅडॅप्ट करुन घेऊ शकलेल्या अतिशय दुर्मिळ प्रजातींपैकी झुरळ एक आहे व दुसरे असे की समजा मानवाने अविचाराने अणुस्फोट घडवून पृथ्वीवरील सजीव (बर्‍यापैकी) नष्ट झाले तर शास्त्रज्ञ म्हणतात - फक्त झुरळच वाचेल (आतापर्यंतची त्याची वाटचाल बघता....). एवढे महत्व आहे झुरळाला....

विकिपीडियावर उपलब्ध असलेला हा एक झुरळाचा फोटो - ४०-५० मिलियन (१०००००० = १ मिलियन) वर्षापूर्वीचे हे झुरळ एका बाल्टिक अंबर / अँबर मधे सापडलेले .....

220px-Baltic_amber_inclusions_-_Cockroach_%28Pterygota%2C_Neoptera%2C_Dictyoptera%2C_Blattodea%29.jpg

या झुरळावरुन एक प्रसंग आठवला - १२वीनंतर माझा एक मित्र सुनील याने अ‍ॅग्रीकल्चर कॉलेजला अ‍ॅडमिशन घेतली. पहिल्या वर्षी त्यांना १०० एक वेगवेगळ्या जातीचे कीटक गोळा करायचे होते (अभ्यासक्रमाचा भाग म्हणून) - आम्ही दोघे लगेच उत्साहाने या कामगिरीवर बाहेर पडलो.
तेव्हा पहिल्यांदाच प्रेईंग मँटिस / प्रार्थना कीटकाचे दर्शन घडले. तो डेंजरस वाटणारा कीटक आमच्या बाजूलाच होता आणि त्याच्या थोडेसे पुढे एक भले मोठे झुरळ. आम्हाला काही कळायच्या आत त्या मँटिसने त्या झुरळावर झडप घातली व त्याच्या पुढील दोन दातेरी पायात त्या झुरळाला गच्च पकडले - काही मिनिटातच अतिशय निर्दयपणे त्याने त्या झुरळाचा करकर आवाज करत फन्ना उडवला.... तेव्हा कळले हा मँटिस किती जातिवंत शिकारी / भक्ष्यक असतो ते.....

Picture 271.jpghttp://www.maayboli.com/node/24610 हा मँटिसवर लिहिलेला माझा एक लेख.

खरंय तुम्ही राहात असलेला प्रदेश आमच्याकरता खुप नवलाईपूर्ण आहे ..!
अंगोला बद्दलच्या इतर माहितीचीही वाट पाहतोय..

वर्षु,
पुर्ण अनुमोदन !

अनिल, अजून मुरायचे आहे अंगोलात !

प्राणीजीवनात आपल्या क्रूरपणाच्या, बीभत्सपणाच्या कल्पना नाही लावता येत, ते सर्व जीव आपापले जीवन निष्ठेने जगत असतात.

शशांक्..झु- - पुराण संपलं ना आता??? हुश्श!!!!

मँटिस वरचा लेख खूप आवडला होता... Happy

पालीची शेपटी पडलेली भाजी खाऊन पूर्ण कुटुंब वरती गेलं वगैरे बातम्या लहानपणी खूप ऐकल्या होत्या.. पण तू म्हणतोस कि पाल विषारी नसते.. आता मी कन्फ्यूज्ड आहे.. खुलासेवार सांग बघू..

हे झुडूप बागेत कुंपणापाशी लावलेले बर्‍याचदा दिसते. नाव माहिती नाही; पण बहुधा आपण जे इन्शुलीन प्लँट बघतो त्याच प्रकारातलं असावं असं वाटलं. त्याचे फोटो इथे देतिये...

Image1071.jpg

आणि हा फुलांचा दांडोरा.....

Image1067.jpg

पान जरा जवळून..याच्या शिरा जरा पिवळसर रंगाच्या असतात.

Image1066.jpg

Pages