नमस्कार मित्रानो ,
थोड्याच दिवसात क्रिकेट टी २० २०१२ विश्वचषक सुरू होतोय .
या वेळी जवळ ज॑वळ सगळ्याच टीम "फेवरीट" आहेत अन नाहीत ही .
नेहमीचे ताकदवान लोक थोडे ढासळलेत , ऑस्ट्रेलीया सावरायचा प्रयत्न करतेय , इंग्लंड KP एपिसोड मधे गंडलय ,
भारताकडे पहिले ४ गोलंदाजच नाहीत , सगळेच 5th bowlers
त्याचवेळी नेहमी कमकुवत समजले जाणारे विंडीज आणी न्युझिलंड (कागदावर तरी) चांगले दिसतायत .
पाकिस्तान नेहमीप्रमाणेच कसा खेळेल हे त्या दिवसापर्यंत कुणीच सांगू शकत नाही
एकूणच सुपर ८ च्या मॅचेस ना धमाल येणार आहे (माझ्या मते गट १ , गट २ पेक्षा थोडा कमकुवत असला तरी)
त्यामुळे थोडा या स्पर्धतला Interest वाढला होता .
आणी त्याचवेळी उदयन यांच्या धाग्यावरील देवचार यांची पोस्ट पाहिली आणी कॉलेज ला असताना खेळलेल SuperSelector आठवल . दिवस दिवस वेगवेगळ्या stratergy वापरून आणी Calculation करून (काय करणार एकूण Points मर्यादीत असतात ना , अर्थात हीच तर त्यातली खरी मजा आहे ) बनवलेल्या टीम्स , वेळोवेळी केलेली substitutions , माझी टीम ढापलीस म्हणून मित्राबरोबर केलेली भांडणे , अमुक एक खेळाडू घेण्यामागच माझ Logic कस बरोबर होत यावरून झालेले वाद (जाता जाता Travis Freind नावाचा एक Zimbabwe चा allrounder होता , खूप कमी किमतीत खूप गुण मिळवून दिले त्याने ) , रोजच प्रत्येकाच लीगमधल आणी एकूण रँकींग बघण , सगळ सगळ आठवल .
नंतर झाल काय तर , दोन टीम्स मधे सीरीज असेल तरी SuperSelector असायच , त्यामुळे त्यातली मजाच निघून गेली .
आज बर्याच दिवसानी तिथे गेलो तर एकदम भारी वाटल . एक म्हणजे पर्याय इतके आहेत की तुम्ही एका दमात काय १०-१२ वेळा प्रयत्न करूनही स्वतःलाच Perfect वाटेल अशी टीम करू शकणार च नाही . प्रत्येक वेळी कुणी ना कुणी तरी राहीलाच अस वाटेल . मी जवळ जवळ ३ तास डोक खर्च करून माझी टीम बनवली आणी मग वाट्ल की आपल्या माबोकरांचीही एक लीग तयार करावी .
यासाठी मी MaayboliT20 नावाची लीग तयार केली आहे .
League PIN: 5303 आहे .
तुमचीही टीम तयार करा आणी या लीग मधे सामील व्हा . पाहूया कुणाची अंदाज आणी Stratergy बरोबर ठरतेय ते
नियम
http://espncricinfo.fantasyleague.com/Article.aspx?id=101
स्कोरींग
http://espncricinfo.fantasyleague.com/Article.aspx?id=103
आज संध्याकाळपासूनच स्पर्धा सुरू होतेय . शक्य झाल्यास त्या आधीच टीम बनवा .
अर्थात भरपूर संघ असलेल्या स्पर्धेत थोड्या उशिरा सामील झाले तर फारसा फरक पडत नाही (उदा : माझ्या टीममधे एक ही लंका किंवा झिम्बाब्वेचा खेळाडू नसल्याने आजच्या मॅचचा मला डायरेक्ट फरक पडत नाही)
तरीही सुरूवातीपासूनच असलेले कधीही चांगलेच .
तेव्हा शक्य तितक्या लवकर टीम बनवा आणी सामील व्हा
उदयन +१.. मी पण नाइलाज म्हणून
उदयन +१.. मी पण नाइलाज म्हणून हसन रझाला घेतलो. बजेटच शिल्लक नव्हते. आज वॅटसन परत एकदा भरभरून देणार असं दिसतंय. आपल्या मॅचसाठी फक्त रोहित आहे टीममध्ये. हफीज आणि रझा पाककडून.. आत फक्त वेळेवर योग्य कॅप्टन बदलणं एवढंच करायचं
वॉटसन रजनीकांत आहे २०-२० चा .
वॉटसन रजनीकांत आहे २०-२० चा . दुसरी उपमाच नाही .
Watson now has most runs, most wickets, most sixes and most MOMs for this tournament
कॅलिस , डुमनी, डिव्हिलिअर्स
कॅलिस , डुमनी, डिव्हिलिअर्स ने निराशा केली खरच चोकर्स आहेत ..भिक्करडे.........आजची मॅच हारले की स्पर्धे बाहेर
खरच चोकर्स आहेत . > +१ आमला,
खरच चोकर्स आहेत . > +१
आमला, कॅलीद , एबी सारखे फलंदाज , बोथा आणी पीटरसन सारखे टी२० स्पेशालिस्ट स्पिनर आणी त्याहूनही स्टेन - मॉर्केल सारखे गोलंदाज असताना अफ्रिकेच अस का व्हाव हे अनाकलनीय आहे .
वॅटसन Worlc Cup Aus ने
वॅटसन Worlc Cup Aus ने जिंकला तर तसे म्हणण्यापेक्षा वॅटसनने जिंकला म्हणावे लागेल.
SA batting did not clicked really. Duminy, Amala etc with due respect, are players who can accumulate at 100+ strike rates. But they have only single real game changer in de'villers. Levi was utter disappointment. Kallis as usual unexplicibly slows down as tournament progresses (check last couple of years of IPLs.)
खूप आ नंद होतोय, माझ्या टिम
खूप आ नंद होतोय, माझ्या टिम मध्ये एकही आपला खेळाडू अॅड करायला चांस मिळाला नाही बदल कर तांना लक्षात नाही आले पण मनापासून ईच्च्छा होती की आजची लढत भारत जिंकावा भले -१००० गुण झाले तरी चालतील.
आजचे गोलंदाज ऑसम, आणि विराट सेहबाग तर बॅटनेच बोलताहेत, झोडपून काढा म्हणावे त्या पाकड्यांना....
मी कंटाळुन अश्विन ला
मी कंटाळुन अश्विन ला काढला...........आता चालायला लागला....... असो दोन्ही बाजुने माझाच फायदा आहे
एक च पाकड्याला नाईलाजाने घेतले भाव कमी म्हणुन....थोडाफार चालला.........
कोहली कॅप्टन आहे.......... पॉईंट्स भरपुर मिळतील......
सेहवाग बर्यापैकी चालला .
सेहवाग बर्यापैकी चालला . कोहली त्याच्यापेक्षा १००% जास्ती चांगला खेळणार माहीत असूनही त्याला घेऊन कॅप्ट्न केला होता आपल्यातर्फे फूल ना फुलाची पाकळी म्हणून
भारत जिंकत असेल तर ... त्याच्यासाठी कायपण
हुर्रे जिंकला भारत अभिनंदन
हुर्रे जिंकला भारत अभिनंदन
कोहली बेस्टच खेळला..... या
कोहली बेस्टच खेळला..... या मॅचला एक प्रयोग म्हणून त्याच्या जागी इर्फानला कॅप्टन केले होते मी
पण पाकिस्तानला हरवल्याचा आनंद काही औरच आहे
पाकडे काय आपल्याविरूद्ध
पाकडे काय आपल्याविरूद्ध वर्ल्डकपमध्ये जिंकत नाय्त! बेष्ट बेष्ट! अभिनंदन लोकहो!
आज इकडं कोणिच कसं फिरकलं नाही
आज इकडं कोणिच कसं फिरकलं नाही अजून?
आज कॅप्टन बदलता न आल्यानं गेलचे डबल मिळणारे पॉइंटस नाही मिळणार आता
इंग्लंड गेला न्युझीलंड
इंग्लंड गेला न्युझीलंड गेली.................माझ्या टीम मधे न्युझीलंड चे कोणीच नव्हते... इंग्लंड चा पन एकच होत..
उद्याची मॅच झाल्यावर परत अनलिमिटेड बदल करायला मिळणार
श्रीलंका आणि वेस्ट इंडीज सेमी मधे पोहचल्यात... बाकी दोन राहिलेत
मलिंगा जयवर्धने गेल आणि सॅम्युअल फेवरेट मधे आहेत
आज ऑझी जिंकावे अशी आशा करायला
आज ऑझी जिंकावे अशी आशा करायला लागणार बाबा वॅटो , एवढ्या मॅचेस जिंकल्यास , एवढी एक पण जिंकून दे रे बाबा !
पण आज वॅटोच्या खेळण्याने
पण आज वॅटोच्या खेळण्याने कुणाच्या रँकींगमध्ये फारसा फरक पडणार नाही कारण जवळपास सगळ्यांच्याच टीममध्ये वॅटो आहे आणि तोच बहुतेकांचा कॅप्टन आहे
आजपण आपल्या टीममध्ये एकपण पाकी नाहिये.... तो एक जॉर्ज बेली कधीचा घेउन ठेवलाय पण त्याने एखाद्-दुसर्या कॅचशिवाय जास्तीचा एकपण पॉइंट दिलेला नाही
आज हॉग आणि बेलीसाहेब पावावेत
स्वरूप , मी वॅटो ला खेळ
स्वरूप , मी वॅटो ला खेळ म्हणालो ते पाकडे हरावे म्हणून . बाकी वॅटो ला कॅप्टन न करणार्याला भविष्य बघता येत असले पाहिजे
पाकडे हरायला पाहिजेत कारण
१) भारताला मदत होईल
२) तसेपण ते हरायलाच पाहिजेत
ते कळले रे केदार्.....मी आपले
ते कळले रे केदार्.....मी आपले लीग रँकींगच्या दृष्टीने म्हणत होतो!
हॉग आज पण गंडला
वॅटोला आज एकच विकेट आणि एक कॅच .... स्टार्कला घेतलेल्यांची मजा आहे
आता बॅटींग मध्ये वॅटो आणि बेली काय देतात बघू!
नीट खेळले तर १५० किरकोळ आहे ऑसीजना
तसेपण ते हरायलाच पाहिजेत
तसेपण ते हरायलाच पाहिजेत
मनापासून ईच्छा आहे, कुठेतरी वाटते की आहे ईंडिया वर्ल्डकप घेणार बहुधा
स्टार्कला घेतलेल्यांची मजा
स्टार्कला घेतलेल्यांची मजा आहे ... .माझ्या टीम मधे आहे. वॅटो आणि Warner जिंकून द्या रे बाबा !
वॅटोने माती खाल्ली आज
वॅटोने माती खाल्ली आज
आज ऑस्ट्रेलिया हारते की काय
आज ऑस्ट्रेलिया हारते की काय ??????? ५९-४
ऑसी सरळ सरळ रडीचा डाव खेळतायत
ऑसी सरळ सरळ रडीचा डाव खेळतायत . पण चूक आपलीच आहे
ऑसी मुद्दामुन हारत
ऑसी मुद्दामुन हारत आहे...........उगाच त्यांना सेमी मधे भारत नकोय.......... कारण फायनल मधे भारत पोहचला तर त्यांना २०११ च्या वर्ल्ड कप ची पुनराव्रूत्ती नकोय
ऑसी सरळ सरळ रडीचा डाव खेळतायत
ऑसी सरळ सरळ रडीचा डाव खेळतायत .
>> अगदी बरोबर अगदी ठरवून हारताहेत हे स्पष्ट दिसतेय. च्या मारी.....फटके दिले पाहिजेत त्यांच्या..........वर
भारताशी सामना करायला फाटली वाटते, से . फा. मध्ये पाकड्यांची दाबून लागेल.
जर भारताला से.फा. मध्ये जायचे असेल तर किती रनांनी द. आफ्रिकेला हरवावे लागेल की आपले चांसेस पुणपणे संपुष्टात आलेत?
३२ रनानी , जे काही फार नाहीये
३२ रनानी , जे काही फार नाहीये . अफ्रिका आपल्याला बाहेर काढायला खेळणार नाही , जिण्कायला खेळेल , जर १७० काढू शकलो किंवा त्याना १२० मधे ठेऊ शकलो तर चान्स आहे
त्यापेक्षा आधी त्यांना हवे
त्यापेक्षा आधी त्यांना हवे तेव्हढे करु द्यावे..मग कमीत कमी ओवर्स मधे लक्ष्य गाठावे
आजपण वीरू कॅप्टन ! आज होऊनच
आजपण वीरू कॅप्टन ! आज होऊनच जाऊ दे एक वीरू स्पेशल !
माझे स्टार्क आणि हसन दोन्ही
माझे स्टार्क आणि हसन दोन्ही चालले........... पहिल्यांदाच बॉलिंग चालली
द. आफ्रिकेने टॉस जिंकून,
द. आफ्रिकेने टॉस जिंकून, पहिले बॉलिंगचा निर्णय... भारताला सेमीफायनलमध्ये धडक मारण्यासाठी ३१ रनने विजय मिळवणं गरजेचं.
माझा युवी कॅप्टन..... धोनीने
माझा युवी कॅप्टन.....
धोनीने टीम बदलली नाहीये.... भलताच विश्वास दाखवलाय बालाजीवर!
आता बघू काय होतय ते?
Pages