कोकणातलो गणपती !

Submitted by Yo.Rocks on 29 September, 2012 - 14:02

प्रचि १ : सुरवात हरतालकेच्या पुजेने..

प्रचि २:

प्रचि ३: श्रीगणेशमुर्तींच्या आगमनापुर्वीची तयारी.. पार्श्वभूमीच्या भिंतीवर चित्र (इयत्ता सातवीत शिकत असलेल्या गावच्या चुलत भावाने काढले आहे) व डोक्यावरची माटी बांधून तयार..

प्रचि ४ : आगमन श्रीगणेशांचे..

प्रचि ५ : मंगलमुर्ती मोरया

प्रचि ६: तयारी नैवेद्याची..

प्रचि ७: बाप्पा आले की बच्चाकंपनी खुष !

प्रचि ८: रात्रीची देवळेतली आरती..

प्रचि ९: व्हळ्यात फुगडया होतातच..

प्रचि १०: भजनी मंडळ तर येतच रवतले.. पण भजन करुचा म्हटला की लहानग्यांची चुळबुळ जास्त...

प्रचि ११: गौरीपुजन

प्रचि १२: मगे इलो महिलापेशल ओसो !

प्रचि १३:सुपातली पाना तुळशीसमोर..

प्रचि १४: आरती

प्रचि १५: गणरायांची गावाक जाउची तयारी..

प्रचि १६:

प्रचि १७: गणपती चालले गावाला..

प्रचि १८:

प्रचि १९:

प्रचि २०:

(उजव्या सायडेक विसर्जन सोहळा बघत दोन माबोकर उभे.. )

प्रचि २१: बाप्पांचे शेवटचे दर्शन..गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या..

प्रचि २२: निरोप गणरायांना..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा ! सुंदर !!
यो, तुझा पुतण्या पण खूपच छान ! त्याला नाही का एखादि उडी शिकवली ? Happy

कोकणात दोनदा गणपतीत जाणे झालेय.. आठवणी जाग्या झाल्या... भजनाची फारशी आवड नसतानाही रात्री जागवल्यात त्या फक्त चहा-चिवडा-पोह्यासाठी.. Happy

सर्वांचे धन्यवाद Happy
त्या चित्रकाराला पुढच्यावेळी गणेशमुर्ती घडवायला नि रंगवायला सांगितली आहे.. Happy

नि तो छोटूदादा - सोहम सध्या आमच्या महाकुटूंबात आकर्षणबिंदू आहे.. Happy
प्रज्ञा.. त्याच्याकडून उडी पुढच्यावेळी.. Happy

काय कलाकार आहे हा ओंकार. त्याला साष्टांग नमस्कार. चित्र वाटतच नाहिये स्वामींचे. कलेतच करीअर घडुन मोठ्ठा कलाकार होऊन जगभर नाव होऊ दे त्याचे.

योगी धन्यवाद सगळ्या फोटोंबद्दल. सोहम आणी बच्चेकंपनी झक्कास. गाव अतीशय सुरेख, लकी आहात.

व्वा! मस्त फोटोज Happy
चुलत भावाने काढलेले पेंटिंग तर अश्क्य सुंदर!!! सातवीतल्या मुलाने काढलय यावर विश्वासच बस्त नाही.....

Pages