नमस्कार मायबोलीकर्स,
तों.पा.सु., मायबोली गणेशोत्स्व २०१२ या स्पर्धेसाठी मी थीम निवडली आहे "पार्टी टाईम", मग यामध्ये बर्थडे पार्टी, वेडिंग पार्टी किंवा आपले एखादे घरगुती गेटटुगेदर असो, त्यासाठी आपला सर्वसाधारण मेनु असतो केक,मिठाई,स्वादिष्ट जेवण व शेवटी मुखवास म्हणुन पानाचा विडा
मी स्वादिष्ट जेवण वगळता बाकीचे पदार्थ बनवले आहेत, तर सर्व मायबोलीकरांना विनंती कि त्यांनी या चविष्ट व तोंपासु पदार्थाचा मनमुराद आस्वाद घ्यावा ( अर्थात फक्त फोटो पाहुन )
हे पदार्थ बनविण्यासाठी मी वापरलेले साहित्य खालीलप्रमाणे
साहित्य :-
१. क्ले
२. सिल्व्हर फॉईल
३. कार्डपेपर
४. फेव्हिकॉल
५. रंग
६. सुई
कृती :-
१. खालील प्रचिंमधील सर्व पदार्थ क्ले हाताने मळुन, त्याला विविध आकार दिले आहेत.
२. काजुकतलीवरील चकाकीसाठी सिल्व्हर फॉईल बारीक कापुन फेव्हिकॉलने चिकटवली आहे.
३. केकचा बेस बनविण्यासाठी कार्डपेपर हवा असलेल्या आकारात कापुन त्याला सिल्व्ह फॉईलने कव्हर केले आहे.
४.कापलेला केक आतुन जाळीदार करण्यासाठी त्यावर सुई हलक्या हाताने फिरवली आहे.
५. पानाचा विडा बनविताना लवंगेसाठी सफेद क्ले वापरुन त्याला रंगाने शेंडीग केले आहे. विडा खरा वाटण्यासाठी क्लेवर सुईने पानाचे टेक्स्चर दिले आहे
पदार्थांची नावे :-
१. केक्स - वेडिंग केक, लव्ह केक, बर्थडे केक्स
२. पेढे - सफेद व केशरी
३. काजुकतली
४. पानाचा विडा
१.
२.
३.
४.
५.
६.
७.
८.
९.
१०.
११.
१२.
आशा करते की मायबोलीकरांना मी बनवलेले पदार्थ आवडतील व त्याचा मनमुरादपणे ते आस्वाद घेतील
धन्यवाद
-----
वर्षा व्हिनस
अफलातुन. पेढे आणि काजुकतली
अफलातुन. पेढे आणि काजुकतली खरीच वाटतेय.
अहा मस्तच !
अहा मस्तच !
Sahee!!! ViDyala lavalelee
Sahee!!!
ViDyala lavalelee lavang kashee banavalee? agadee kharee vaTatey.
फारच सुरेख!!! पहिला आणि
फारच सुरेख!!!
पहिला आणि कापलेला केक आवडले
सगळेच केक छान आहे.....मला तर
सगळेच केक छान आहे.....मला तर खुप इच्छा झाली आहे खायची
एकसे बढकर एक केक! कापलेला केक
एकसे बढकर एक केक! कापलेला केक अविश्वसनीय. पिवळे पेढेही सोपे पण हुबेहूब.
सुरेख!
सुरेख!
खत्तरनाक. कसले भारी दिसतायेत.
खत्तरनाक. कसले भारी दिसतायेत.
तुमचे कसब भारी आहे, कित्ती
तुमचे कसब भारी आहे, कित्ती बारकावा टिपलाय. खरंच हे असंलं म्हणजे जिवाला त्रास आहे
वरील सगळ्या प्रतिक्रीयांना
वरील सगळ्या प्रतिक्रीयांना +१००
वर्षा निव्वळ सुरेख, तो
वर्षा निव्वळ सुरेख, तो कापलेला केक कसला हुबेहुब बनवलायस वॉव!
आणि पेढे तर खरेच वाटतायत एकदम.
लयी म्हणजे लयी म्हणजे लयी
लयी म्हणजे लयी म्हणजे लयी म्हणजे लयीच भारी
मस्त !
मस्त !
!! !! _/\_ लयी म्हणजे लयी
!! !!
_/\_
लयी म्हणजे लयी म्हणजे लयी म्हणजे लयीच भारी>> +१०००
केक मुळातच आवडत नसल्याने
केक मुळातच आवडत नसल्याने तोंपासु झाले नाही.... पण कलाकारी जबरदस्तच..!!!
केक अगदी हुबेहुब! पेढे आणि
केक अगदी हुबेहुब! पेढे आणि विडाही आवडला.
उत्कृष्ट कलाकारी.
उत्कृष्ट कलाकारी. _______/\___________
धन्य आहेस जबरदस्त काम केल
धन्य आहेस
जबरदस्त काम केल आहेस
फारच बघणीय काम आहे ग
फारच बघणीय काम आहे ग व्हीनस
मेहनतीला सलाम
आहाहा!!आज लंच नंतर डेझर्ट
आहाहा!!आज लंच नंतर डेझर्ट म्हणून, पुन्हा पाहिले फोटोज.. उत्तम कलाकार हैस.. तेराइच पैला नंबर
जिवाला त्रास आहे!
जिवाला त्रास आहे! >>>>>>>>+++++++++++१११११११११११
मस्त
मस्त
वॉव ! एक नंबर ! >>> कापलेला
वॉव ! एक नंबर !
>>> कापलेला केक आतुन जाळीदार करण्यासाठी त्यावर सुई हलक्या हाताने फिरवली <<< सही आयडियाची कल्पना
फारच स्वादीष्ट पदार्थ बनवतेस
फारच स्वादीष्ट पदार्थ बनवतेस तू
पेढ्यावर थोडे डेकोरेशन छान वाट्ले अस्ते. पण आता राहू दे
केक बघतच राहीले. मुलाचा आत्ताच वाढदिवस झाला. आधी माहीत अस्ते तर तुलाच ऑर्डर दिली अस्ती.
भन्नाट. एकदम मस्त.
भन्नाट. एकदम मस्त.
वाह!
वाह!
सगळंच एकदम झकास्...खास करुन
सगळंच एकदम झकास्...खास करुन केक्स्...लेयर्ड केक तर एकदम भारी!!!
वा!!काय मस्त केक बनवलेस आणि
वा!!काय मस्त केक बनवलेस आणि पेढे तर अगदी पणशीकरांच्या दुकानातील वाटायत
वर्षा,तो तिसरा केक कसा बनवलास
वर्षा,तो तिसरा केक कसा बनवलास ??त्या केकच्या आतमध्ये वेगवेगळे रंगं दिसतायत?
नंबरी काम झालय, पेढे तर
नंबरी काम झालय, पेढे तर अप्रतिम
Pages