तों.पा.सू. - पार्टी टाईम - वर्षा व्हिनस

Submitted by यशस्विनी on 27 September, 2012 - 09:42

नमस्कार मायबोलीकर्स,

तों.पा.सु., मायबोली गणेशोत्स्व २०१२ या स्पर्धेसाठी मी थीम निवडली आहे "पार्टी टाईम", मग यामध्ये बर्थडे पार्टी, वेडिंग पार्टी किंवा आपले एखादे घरगुती गेटटुगेदर असो, त्यासाठी आपला सर्वसाधारण मेनु असतो केक,मिठाई,स्वादिष्ट जेवण व शेवटी मुखवास म्हणुन पानाचा विडा Happy
मी स्वादिष्ट जेवण वगळता बाकीचे पदार्थ बनवले आहेत, तर सर्व मायबोलीकरांना विनंती कि त्यांनी या चविष्ट व तोंपासु पदार्थाचा मनमुराद आस्वाद घ्यावा Happy ( अर्थात फक्त फोटो पाहुन Proud )

हे पदार्थ बनविण्यासाठी मी वापरलेले साहित्य खालीलप्रमाणे

साहित्य :-

१. क्ले
२. सिल्व्हर फॉईल
३. कार्डपेपर
४. फेव्हिकॉल
५. रंग
६. सुई

कृती :-

१. खालील प्रचिंमधील सर्व पदार्थ क्ले हाताने मळुन, त्याला विविध आकार दिले आहेत.
२. काजुकतलीवरील चकाकीसाठी सिल्व्हर फॉईल बारीक कापुन फेव्हिकॉलने चिकटवली आहे.
३. केकचा बेस बनविण्यासाठी कार्डपेपर हवा असलेल्या आकारात कापुन त्याला सिल्व्ह फॉईलने कव्हर केले आहे.
४.कापलेला केक आतुन जाळीदार करण्यासाठी त्यावर सुई हलक्या हाताने फिरवली आहे.
५. पानाचा विडा बनविताना लवंगेसाठी सफेद क्ले वापरुन त्याला रंगाने शेंडीग केले आहे. विडा खरा वाटण्यासाठी क्लेवर सुईने पानाचे टेक्स्चर दिले आहे

पदार्थांची नावे :-
१. केक्स - वेडिंग केक, लव्ह केक, बर्थडे केक्स
२. पेढे - सफेद व केशरी
३. काजुकतली
४. पानाचा विडा

१.

Cake 1 (800x632).jpg

२.

Cake 2 (800x607).jpg

३.

Cake 3 (800x538).jpg

४.

Cake 4 (800x730).jpg

५.

Cake 5 (800x617).jpg

६.

Cake 6 (800x692).jpg

७.

cake 7 (800x697).jpg

८.

Cake 8 (800x531).jpg

९.

Cake 9 (800x512).jpg

१०.

Cake 10 (800x531).jpg

११.

Cake 11 (800x620).jpg

१२.

Cake 13 (800x591).jpg

आशा करते की मायबोलीकरांना मी बनवलेले पदार्थ आवडतील व त्याचा मनमुरादपणे ते आस्वाद घेतील Happy

धन्यवाद Happy

-----
वर्षा व्हिनस

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Sahee!!!
ViDyala lavalelee lavang kashee banavalee? agadee kharee vaTatey.

वर्षा निव्वळ सुरेख, तो कापलेला केक कसला हुबेहुब बनवलायस Happy वॉव!
आणि पेढे तर खरेच वाटतायत एकदम.

आहाहा!!आज लंच नंतर डेझर्ट म्हणून, पुन्हा पाहिले फोटोज.. उत्तम कलाकार हैस.. तेराइच पैला नंबर Happy

वॉव ! एक नंबर !
>>> कापलेला केक आतुन जाळीदार करण्यासाठी त्यावर सुई हलक्या हाताने फिरवली <<< सही आयडियाची कल्पना Happy

फारच स्वादीष्ट पदार्थ बनवतेस तू Wink
पेढ्यावर थोडे डेकोरेशन छान वाट्ले अस्ते. पण आता राहू दे Happy
केक बघतच राहीले. मुलाचा आत्ताच वाढदिवस झाला. आधी माहीत अस्ते तर तुलाच ऑर्डर दिली अस्ती. Happy

वाह!

Pages