मिसळम् पाकम् गट्टम् गट्टम्! - सखो कचोरी - गोड/तिखट - डॅफोडिल्स

Submitted by डॅफोडिल्स on 27 September, 2012 - 21:07
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 


सफरचंद १
उकडलेले बटाटे मध्यम आकाराचे २-३
तांदळाचे पिठ १ वाटी
खोबरे १ वाटी
खजुर ८-१०
मिर्च्या ४-५
लाल मिर्ची पावडर १ चमचा
जिरे १ टेबल्स्पून
कढिपत्ता ६-७ पाने
मुठभर कोथिंबीर बारीक चिरुन
मीठ आणि साखर चवीप्रमाणे
तळण्यासाठी तेल

क्रमवार पाककृती: 

सफरचंद खोबरे कचोरी म्हणून सखो कचोरी

प्रकाशचित्र डाविकडून उजवीकडे क्रमवार

१. सफर चंद किसून घेतले.

२. एका पॅन मध्ये चमचाभर तेल तापवुन त्यात जिरे बारिक चिरलेल्या मिर्च्या आणि कढिपत्ता टाकुन चुरचुरीत फोडणी केली. त्यात अर्ध्या सफरचंदाचा किस टाकुन जरा सोनेरी रंग येई पर्यंत परतुन घेतले. मग त्यात खवलेले खोबरे घालुन त्यावर चविप्रमाणे मीठ साखर घालुन परतले. मुठभर बारिक चिरलेली कोथिंबीर टाकुन गॅस बंद केला. हे कचोरीचे सारण गार होई पर्यंत पुढे पारी बनवण्याची तयारी केली.

३. उकडलेले बटाटे किसुन त्यात वाटीभरुन तांदळाचे पिठ चमचाभर तेलाचे मोहन, चवीप्रमाणे मीठ आणि लागल्यास थोडेसे पाणी लाउन घट्ट गोळा मळून घेतला.

४. एका बोल मध्ये खजुर घेउन त्यात अर्धी वाटी पाणी टाकून १ मिनिटे हाय वर मायक्रोवेव्ह केले. मग त्यात उरलेल्या अर्ध्या सफरचंदाचा किस, थोडे भाजलेले जिरे आणि चवीप्रमाणे लाल तिखट व मिठ घालून चटणी मिक्सरवर वाटून घेतली. चटणीला एक उकळी काढली.

५. चटणी थंड होई पर्यंत. तेल तापायला ठेउन, पारीसाठी बनवलेल्या गोळ्यातले थोडे पिठ घेउन त्याची हाताने वाटी करुन त्यात एक मोठ्ठा चमचा सारण भरुन गोळे बंद केले. सोनेरी रंगावर सर्व कचोर्‍या तळून काढल्या.

वाढणी/प्रमाण: 
खाल तेवढ्या.. :) वर दिलेल्या साहित्याच्या प्रमाणात ११ मोठ्या कचोर्‍या होतात.
अधिक टिपा: 

ह्या कचोर्‍या तिखट आंबट गोड मस्त चवीच्या होतात.
सफरचंदाची मस्त चव येते.
सारणामध्ये थोडेसे मनुके आणि काजु तुकडे टाकता येतील.
बटाटे उकडण्यापूर्वी त्यावर सुरीने मध्यभागी चिर देउन उकडले (वर फोटो पहा) तर सोलताना एका झटक्यात साल निघुन येते. Happy
तांदळाचे पिठ आणि बटाटा वापरल्याने पारी मस्त खुट्खुटीत होते. (क्रिस्पी + सॉफ्ट पण कडक नव्हे )

माहितीचा स्रोत: 
उपवासाच्या कचोरीपासून आयडीया घेउन माझे सत्यासाठी प्रयोग.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मीठ साखर साहित्य मध्ये लिहायला हवे. 'मोहन' का काय शब्द आहे ते म्हणून गरम तेल पारीचा पिठामध्ये घालायचे का? कि तांदूळ चिकट होतो म्हणून तेल घालायचे.
कृतीचे फोटो खूप सुंदर. ज्यांनी काढले त्यांना एक जास्त कचोरी द्या खायला... Happy

धन्यवाद !
सिमन्तीनी फोटो मीच काढले सगळे.. प्रत्येक स्टेप ला हात धुवा कॅमेरा घ्या असे करत होते.. Lol
मग कचोरी भरतानाचा माझ्या दोन हातांचा फोटो अहो नी काढलाय Happy

भारी दिसतायत Happy

सिमन्तीनी फोटो मीच काढले सगळे.. प्रत्येक स्टेप ला हात धुवा कॅमेरा घ्या असे करत होते.. >>> काय उत्साही आहेस Happy

कसल्या यम्मी दिसतायत कचोर्‍या! मस्तच एकदम. कल्पनाही छान आहे. फोटो अप्रतिम. Happy

>>>> उपवाच्या कचोरीपासून आयडीया घेउन माझे सत्यासाठी प्रयोग. >>>>> आवडल्या की नाही मग सत्याला? Proud

मस्त !! खूपच छान ..फोटो क्रमानुसार छान काढले आहेत्..कचोरीची चव ही अफलातुन येईल.शेवटच्या फोटोतील कचोर्‍यांबरोबर चे चटणी चे बदक फार-फार आवडले.

कि ति ... म स्त ...म ज्जा चा लु आ हे ......काय काय मिसळम् पाकम् गट्टम् गट्टम्! - म ध्ये पहायला मिळते आहे ( पण खायला नाहि ........)

भारी आहे पाकृ आणि फोटो पण...>>>++११

Pages