सफरचंद १
उकडलेले बटाटे मध्यम आकाराचे २-३
तांदळाचे पिठ १ वाटी
खोबरे १ वाटी
खजुर ८-१०
मिर्च्या ४-५
लाल मिर्ची पावडर १ चमचा
जिरे १ टेबल्स्पून
कढिपत्ता ६-७ पाने
मुठभर कोथिंबीर बारीक चिरुन
मीठ आणि साखर चवीप्रमाणे
तळण्यासाठी तेल
सफरचंद खोबरे कचोरी म्हणून सखो कचोरी
प्रकाशचित्र डाविकडून उजवीकडे क्रमवार
१. सफर चंद किसून घेतले.
२. एका पॅन मध्ये चमचाभर तेल तापवुन त्यात जिरे बारिक चिरलेल्या मिर्च्या आणि कढिपत्ता टाकुन चुरचुरीत फोडणी केली. त्यात अर्ध्या सफरचंदाचा किस टाकुन जरा सोनेरी रंग येई पर्यंत परतुन घेतले. मग त्यात खवलेले खोबरे घालुन त्यावर चविप्रमाणे मीठ साखर घालुन परतले. मुठभर बारिक चिरलेली कोथिंबीर टाकुन गॅस बंद केला. हे कचोरीचे सारण गार होई पर्यंत पुढे पारी बनवण्याची तयारी केली.
३. उकडलेले बटाटे किसुन त्यात वाटीभरुन तांदळाचे पिठ चमचाभर तेलाचे मोहन, चवीप्रमाणे मीठ आणि लागल्यास थोडेसे पाणी लाउन घट्ट गोळा मळून घेतला.
४. एका बोल मध्ये खजुर घेउन त्यात अर्धी वाटी पाणी टाकून १ मिनिटे हाय वर मायक्रोवेव्ह केले. मग त्यात उरलेल्या अर्ध्या सफरचंदाचा किस, थोडे भाजलेले जिरे आणि चवीप्रमाणे लाल तिखट व मिठ घालून चटणी मिक्सरवर वाटून घेतली. चटणीला एक उकळी काढली.
५. चटणी थंड होई पर्यंत. तेल तापायला ठेउन, पारीसाठी बनवलेल्या गोळ्यातले थोडे पिठ घेउन त्याची हाताने वाटी करुन त्यात एक मोठ्ठा चमचा सारण भरुन गोळे बंद केले. सोनेरी रंगावर सर्व कचोर्या तळून काढल्या.
ह्या कचोर्या तिखट आंबट गोड मस्त चवीच्या होतात.
सफरचंदाची मस्त चव येते.
सारणामध्ये थोडेसे मनुके आणि काजु तुकडे टाकता येतील.
बटाटे उकडण्यापूर्वी त्यावर सुरीने मध्यभागी चिर देउन उकडले (वर फोटो पहा) तर सोलताना एका झटक्यात साल निघुन येते.
तांदळाचे पिठ आणि बटाटा वापरल्याने पारी मस्त खुट्खुटीत होते. (क्रिस्पी + सॉफ्ट पण कडक नव्हे )
हे एक्दम सही वाटतयं. करुन
हे एक्दम सही वाटतयं. करुन बघायच्या यादीत अॅडिशन!!!
छान
छान
सिमन्तीनी फोटो मीच काढले
सिमन्तीनी फोटो मीच काढले सगळे.. प्रत्येक स्टेप ला हात धुवा कॅमेरा घ्या असे करत होते..
मग कचोरी भरतानाचा माझ्या दोन हातांचा फोटो अहो नी काढलाय >> ते हायकिंग ला जाताना डोक्याला फिट बसेल असा कमेरा घालतात तो तुम्हाला घेऊन द्यायला हवा. आता म्हणजे एका फोटो साठी एक कचोरी द्यावी लागणार...
मामी....!!!!!
मस्तच!
मस्तच!
हे करून पाहाणार.
हे करून पाहाणार.
डॅफो, सकाळीच वाचली होती
डॅफो, सकाळीच वाचली होती रेसिपी पण घाईत प्रतिसाद द्यायला जमलं नाही.
फार मस्त रेसिपी आहे. एकदम कल्पक. फोटो अगदी देखणा आलाय. काय सुरेख तोंपासु दिसतायंत कचोर्या
बटाट्याची टिप नक्की फॉलो करणार.
हटके रेसिपी...पटकन उचलून
हटके रेसिपी...पटकन उचलून गट्ट्म करावीशी वाटतेय.
मस्त पाककृती! फोटो देखिल
मस्त पाककृती! फोटो देखिल सुंदर आहेत!
खूप नाविन्य पूर्ण पदार्थ व
खूप नाविन्य पूर्ण पदार्थ व कलात्मक सादरीकरण आहे.
काय तोंपासु दिसत आहेत
काय तोंपासु दिसत आहेत कचोरया.... एकदम यम
ज़बरी!! काय कल्पना आहेत
ज़बरी!! काय कल्पना आहेत एकेक.
मला तर सफ़रच्न्द आणि बटाटा एकत्र घेउन एकही पदार्थ सुचला नव्हता.
तु आता ह्या कचोर्या आणि ते खोटे पण खरे वाटणारे पदार्थ, खरे करून इथे ये बरं
मस्त रेसिपी आणि फोटो.
मस्त रेसिपी आणि फोटो.
मस्त.
मस्त.
सुपर!!
सुपर!!
मस्तच. माबोवर किती सुगरणी
मस्तच.
माबोवर किती सुगरणी आहेत!
रच्याकने, आधी तोंपासु. च्या प्रवेशिका पाहुन तुझी प्रवेशिका पाहिल्यावर 'सत्यात' यायला थोडा वेळच लागला. पहिल्या फोटो मधले सफरचंद कशाने बनवले असेल असा विचार डोक्यात आधी आला.
छानच आहे रेसिपी. मस्त लागली
छानच आहे रेसिपी. मस्त लागली असेल चवीला.
जबरी रेस्पी!! फोटो , सादरीकरण
जबरी रेस्पी!! फोटो , सादरीकरण भारी एकदम..
सॉसचा हंस काय देखणा दिसतोय.. कसा काढला?
पहिल्या फोटो मधले सफरचंद
पहिल्या फोटो मधले सफरचंद कशाने बनवले असेल असा विचार डोक्यात आधी आला>>>
हंस बोटाने काढलाय
सही!
सही!
मस्त वाटतोय हा प्रकार
मस्त वाटतोय हा प्रकार
एकदम तोपासु.
एकदम तोपासु.
वा! मस्त. उपवासाच्या कचोर्या
वा! मस्त. उपवासाच्या कचोर्या माझ्या आवडीच्या त्यामुळे ह्याही नक्की आवडणार.
वॉव ! मस्त डेफो !
वॉव ! मस्त डेफो !
मस्त रेसिपी. करून पाहिलीच
मस्त रेसिपी. करून पाहिलीच पाहिजे!
चमचमीत !!!!
चमचमीत !!!!
डॅफो.. मस्तच.. क्रिस्पी
डॅफो.. मस्तच.. क्रिस्पी दिसतायत.. कृती बरी वाटतेय नि जिन्नसहि रोजच्या वापरातले.. बनवायला हवी कचोरी
मस्त दिसतायत कचोर्या. कव्हर
मस्त दिसतायत कचोर्या. कव्हर तर अगदी क्रिस्पी. तांदळाच्या पीठाची कल्पना भारी ( संयोजकाना पण धन्यवाद. )
वॉव ! काय तोंपासु दिसतायेत
वॉव ! काय तोंपासु दिसतायेत सखो कचोरी.
मस्तच, डॅफो.
मस्तच, डॅफो.
छान आणि रिलेटीवली सोपी
छान आणि रिलेटीवली सोपी रेसिपी. उत्तम फोटो आणि सादरीकरण.
Pages