सफरचंद १
उकडलेले बटाटे मध्यम आकाराचे २-३
तांदळाचे पिठ १ वाटी
खोबरे १ वाटी
खजुर ८-१०
मिर्च्या ४-५
लाल मिर्ची पावडर १ चमचा
जिरे १ टेबल्स्पून
कढिपत्ता ६-७ पाने
मुठभर कोथिंबीर बारीक चिरुन
मीठ आणि साखर चवीप्रमाणे
तळण्यासाठी तेल
सफरचंद खोबरे कचोरी म्हणून सखो कचोरी
प्रकाशचित्र डाविकडून उजवीकडे क्रमवार
१. सफर चंद किसून घेतले.
२. एका पॅन मध्ये चमचाभर तेल तापवुन त्यात जिरे बारिक चिरलेल्या मिर्च्या आणि कढिपत्ता टाकुन चुरचुरीत फोडणी केली. त्यात अर्ध्या सफरचंदाचा किस टाकुन जरा सोनेरी रंग येई पर्यंत परतुन घेतले. मग त्यात खवलेले खोबरे घालुन त्यावर चविप्रमाणे मीठ साखर घालुन परतले. मुठभर बारिक चिरलेली कोथिंबीर टाकुन गॅस बंद केला. हे कचोरीचे सारण गार होई पर्यंत पुढे पारी बनवण्याची तयारी केली.
३. उकडलेले बटाटे किसुन त्यात वाटीभरुन तांदळाचे पिठ चमचाभर तेलाचे मोहन, चवीप्रमाणे मीठ आणि लागल्यास थोडेसे पाणी लाउन घट्ट गोळा मळून घेतला.
४. एका बोल मध्ये खजुर घेउन त्यात अर्धी वाटी पाणी टाकून १ मिनिटे हाय वर मायक्रोवेव्ह केले. मग त्यात उरलेल्या अर्ध्या सफरचंदाचा किस, थोडे भाजलेले जिरे आणि चवीप्रमाणे लाल तिखट व मिठ घालून चटणी मिक्सरवर वाटून घेतली. चटणीला एक उकळी काढली.
५. चटणी थंड होई पर्यंत. तेल तापायला ठेउन, पारीसाठी बनवलेल्या गोळ्यातले थोडे पिठ घेउन त्याची हाताने वाटी करुन त्यात एक मोठ्ठा चमचा सारण भरुन गोळे बंद केले. सोनेरी रंगावर सर्व कचोर्या तळून काढल्या.
ह्या कचोर्या तिखट आंबट गोड मस्त चवीच्या होतात.
सफरचंदाची मस्त चव येते.
सारणामध्ये थोडेसे मनुके आणि काजु तुकडे टाकता येतील.
बटाटे उकडण्यापूर्वी त्यावर सुरीने मध्यभागी चिर देउन उकडले (वर फोटो पहा) तर सोलताना एका झटक्यात साल निघुन येते.
तांदळाचे पिठ आणि बटाटा वापरल्याने पारी मस्त खुट्खुटीत होते. (क्रिस्पी + सॉफ्ट पण कडक नव्हे )
व्वॉव!! मस्त दिसतायत सखोज
व्वॉव!! मस्त दिसतायत सखोज
सहीच ! मस्त पदार्थ !
सहीच ! मस्त पदार्थ !
मस्त दिसतायतं !
मस्त दिसतायतं !
मीठ साखर साहित्य मध्ये
मीठ साखर साहित्य मध्ये लिहायला हवे. 'मोहन' का काय शब्द आहे ते म्हणून गरम तेल पारीचा पिठामध्ये घालायचे का? कि तांदूळ चिकट होतो म्हणून तेल घालायचे.
कृतीचे फोटो खूप सुंदर. ज्यांनी काढले त्यांना एक जास्त कचोरी द्या खायला...
मस्तच ..
मस्तच ..
वा! मस्त गं!
वा! मस्त गं!
डॅफो! सहीच. यम्मी दिस्तायत
डॅफो! सहीच. यम्मी दिस्तायत कचोर्या.
धन्यवाद ! सिमन्तीनी फोटो मीच
धन्यवाद !
सिमन्तीनी फोटो मीच काढले सगळे.. प्रत्येक स्टेप ला हात धुवा कॅमेरा घ्या असे करत होते..
मग कचोरी भरतानाचा माझ्या दोन हातांचा फोटो अहो नी काढलाय
यम्मी यम्मी दिसतयं..यु आर
यम्मी यम्मी दिसतयं..यु आर सिंपली ग्रेट डॅफोडिल्स
डॅफो मस्तच कचोर्या.. एकदम
डॅफो मस्तच कचोर्या.. एकदम तोंपासु..
मस्तच शेवटचा प्रेजेन्टेशनचा
मस्तच
शेवटचा प्रेजेन्टेशनचा फोटो खतरनाक
भारी दिसतायत सिमन्तीनी फोटो
भारी दिसतायत
सिमन्तीनी फोटो मीच काढले सगळे.. प्रत्येक स्टेप ला हात धुवा कॅमेरा घ्या असे करत होते.. >>> काय उत्साही आहेस
मस्त कचोर्या!!
मस्त कचोर्या!!
व्वॉव!! मस्त दिसतायत
व्वॉव!! मस्त दिसतायत
मस्त दिसतायत कचोर्या !
मस्त दिसतायत कचोर्या !
खुपच सुंदर फोटो तर टेम्प्टिंग
खुपच सुंदर
फोटो तर टेम्प्टिंग आहे अगदी
एकदम यम्मी! मस्तच!
एकदम यम्मी! मस्तच!
छान छान..मस्त रेसिपी!
छान छान..मस्त रेसिपी! डिशमध्ये सॉसचं बदक्/पक्षीपण मस्त!
सॉलिड तोंपासू...
सॉलिड तोंपासू...
मी दोन उचलुन खाल्ले पण यम्मी
मी दोन उचलुन खाल्ले पण यम्मी
मस्त ..
मस्त ..
कसल्या यम्मी दिसतायत
कसल्या यम्मी दिसतायत कचोर्या! मस्तच एकदम. कल्पनाही छान आहे. फोटो अप्रतिम.
>>>> उपवाच्या कचोरीपासून आयडीया घेउन माझे सत्यासाठी प्रयोग. >>>>> आवडल्या की नाही मग सत्याला?
भारी आहे पाकृ आणि फोटो पण...
भारी आहे पाकृ आणि फोटो पण...
वेळ एक तास जो दिलाय त्यात
वेळ एक तास जो दिलाय त्यात प्रत्येकवेळी हात धुऊन फोटो काढण्याचा वेळ इन्क्ल्युडेड आहे का?
झकास
झकास
मस्त !! खूपच छान ..फोटो
मस्त !! खूपच छान ..फोटो क्रमानुसार छान काढले आहेत्..कचोरीची चव ही अफलातुन येईल.शेवटच्या फोटोतील कचोर्यांबरोबर चे चटणी चे बदक फार-फार आवडले.
कि ति ... म स्त ...म ज्जा
कि ति ... म स्त ...म ज्जा चा लु आ हे ......काय काय मिसळम् पाकम् गट्टम् गट्टम्! - म ध्ये पहायला मिळते आहे ( पण खायला नाहि ........)
भारी आहे पाकृ आणि फोटो पण...>>>++११
मस्त पाककृती !
मस्त पाककृती !
तोंपासु सखो कचो-या. मस्त
तोंपासु सखो कचो-या. मस्त कल्पना आणि सुरेख सजावट. तो हंस भारी आवडला
मस्त . खूपच छान. नक्की करुन
मस्त . खूपच छान. नक्की करुन बघणार.
Pages