नमस्कार मित्रानो ,
थोड्याच दिवसात क्रिकेट टी २० २०१२ विश्वचषक सुरू होतोय .
या वेळी जवळ ज॑वळ सगळ्याच टीम "फेवरीट" आहेत अन नाहीत ही .
नेहमीचे ताकदवान लोक थोडे ढासळलेत , ऑस्ट्रेलीया सावरायचा प्रयत्न करतेय , इंग्लंड KP एपिसोड मधे गंडलय ,
भारताकडे पहिले ४ गोलंदाजच नाहीत , सगळेच 5th bowlers
त्याचवेळी नेहमी कमकुवत समजले जाणारे विंडीज आणी न्युझिलंड (कागदावर तरी) चांगले दिसतायत .
पाकिस्तान नेहमीप्रमाणेच कसा खेळेल हे त्या दिवसापर्यंत कुणीच सांगू शकत नाही
एकूणच सुपर ८ च्या मॅचेस ना धमाल येणार आहे (माझ्या मते गट १ , गट २ पेक्षा थोडा कमकुवत असला तरी)
त्यामुळे थोडा या स्पर्धतला Interest वाढला होता .
आणी त्याचवेळी उदयन यांच्या धाग्यावरील देवचार यांची पोस्ट पाहिली आणी कॉलेज ला असताना खेळलेल SuperSelector आठवल . दिवस दिवस वेगवेगळ्या stratergy वापरून आणी Calculation करून (काय करणार एकूण Points मर्यादीत असतात ना , अर्थात हीच तर त्यातली खरी मजा आहे ) बनवलेल्या टीम्स , वेळोवेळी केलेली substitutions , माझी टीम ढापलीस म्हणून मित्राबरोबर केलेली भांडणे , अमुक एक खेळाडू घेण्यामागच माझ Logic कस बरोबर होत यावरून झालेले वाद (जाता जाता Travis Freind नावाचा एक Zimbabwe चा allrounder होता , खूप कमी किमतीत खूप गुण मिळवून दिले त्याने ) , रोजच प्रत्येकाच लीगमधल आणी एकूण रँकींग बघण , सगळ सगळ आठवल .
नंतर झाल काय तर , दोन टीम्स मधे सीरीज असेल तरी SuperSelector असायच , त्यामुळे त्यातली मजाच निघून गेली .
आज बर्याच दिवसानी तिथे गेलो तर एकदम भारी वाटल . एक म्हणजे पर्याय इतके आहेत की तुम्ही एका दमात काय १०-१२ वेळा प्रयत्न करूनही स्वतःलाच Perfect वाटेल अशी टीम करू शकणार च नाही . प्रत्येक वेळी कुणी ना कुणी तरी राहीलाच अस वाटेल . मी जवळ जवळ ३ तास डोक खर्च करून माझी टीम बनवली आणी मग वाट्ल की आपल्या माबोकरांचीही एक लीग तयार करावी .
यासाठी मी MaayboliT20 नावाची लीग तयार केली आहे .
League PIN: 5303 आहे .
तुमचीही टीम तयार करा आणी या लीग मधे सामील व्हा . पाहूया कुणाची अंदाज आणी Stratergy बरोबर ठरतेय ते
नियम
http://espncricinfo.fantasyleague.com/Article.aspx?id=101
स्कोरींग
http://espncricinfo.fantasyleague.com/Article.aspx?id=103
आज संध्याकाळपासूनच स्पर्धा सुरू होतेय . शक्य झाल्यास त्या आधीच टीम बनवा .
अर्थात भरपूर संघ असलेल्या स्पर्धेत थोड्या उशिरा सामील झाले तर फारसा फरक पडत नाही (उदा : माझ्या टीममधे एक ही लंका किंवा झिम्बाब्वेचा खेळाडू नसल्याने आजच्या मॅचचा मला डायरेक्ट फरक पडत नाही)
तरीही सुरूवातीपासूनच असलेले कधीही चांगलेच .
तेव्हा शक्य तितक्या लवकर टीम बनवा आणी सामील व्हा
विंडीजनं चांगल्या सुरुवातीची
विंडीजनं चांगल्या सुरुवातीची माती केली. या विकेटवर सामना जिंकायचा तर किमान १८० हवेत. त्यात तुम्ही विंडीज असाल तर तुम्हाला आणखी पंधराएक रन्सचं कुशन हवंच. चार्ल्स एकदम अनएक्स्पेक्टेडली पेटलाय. माझ्यामते कीजवेटर आणि बेरस्टो इंग्लंडचे की प्लेयर्स ठरावेत आज.
विंडीजनं चांगल्या सुरुवातीची
विंडीजनं चांगल्या सुरुवातीची माती केली. या विकेटवर सामना जिंकायचा तर किमान १८० हवेत >> झालेत. विसरू नका कि त्यांच्याकडे तीन स्पिनर्स आहेत. That factor can be match turner. (either way )
Performances in a 'Super
Performances in a 'Super Over' do not count.
रामदिन ने वाट लावली ईग्लंड
रामदिन ने वाट लावली ईग्लंड ची, भोपळ्यावर दोन विकेट. अनपेक्षित प्लेअर्स चालताहेत आणि नावाजलेले आपटताहेत
मी फारच माती
मी फारच माती खाल्ली....च्यामारी राईट खेळेल असं वाटलेलं तर शून्यावर बाद झाला गडी...आता काय करावे बाबा...एकदम तळच गाठला...
मॉर्गनने जवळजवळ जिंकून दिलेली
मॉर्गनने जवळजवळ जिंकून दिलेली मॅच. कसला खेळलाय राव. सॅमुअल ला शेवटची ओव्हर दिली तेंव्हा वाटले कि सुटले इंग्लंड. सहीच dart balls टाकले त्याने.
अॅलेक्स हेलस ने शेवटी
अॅलेक्स हेलस ने शेवटी त्याच्यावर टाकलेल्या विश्वासाच चीज केल
गेल इज गेल विंडीजने गेल्या काही वर्षात काय मिस केल हे आता त्याना चांगलच जाणवत असेल .
अॅलेक्स हेलस ने शेवटी
अॅलेक्स हेलस ने शेवटी त्याच्यावर टाकलेल्या विश्वासाच चीज केल >> अगदी. आज ल्यूक राईटसोडून बहुतेक सगळ्यांनी भरपूर पाँइट्स दिले ..
विंडीज - इंग्लंड मॅचनंतर
विंडीज - इंग्लंड मॅचनंतर स्टेजवाईज रँकिंग :
Manager Team Name Pts
1 prafulla shimpi KhiladiT20 997
2 Kedar Jadhav Kedar's Eleven 923
3 Nachiket Joshi XIRiders 918
4 Manish Patil Manish XI 885
5 Sujit Pande Galli Team 871
6 Kavita Jadhav Kavitas Team 847
7 Ravindra Ogale Ravstarz2023 832
8 Swaroop Kulkarni Swaroop's Team 830
9 uday inadmar ALIVE ONE 824
10 Bipin Chaudhari asami 821
11 Swapnil Ghayal Ghayal's Warrior 809
12 Prash Patil Prashhhhh 762
13 Himanshu Kulkarni HRK's 11 716
14 Prachi Kulkarni Smart11 672
15 Asmita Bapat Challangers 594
16 Ashish Phadnis Pune Warriors 351
17 Gautam Bagade GDBInt11 155
७ टीम बदल केलेत.........बघु
७ टीम बदल केलेत.........बघु आता काय फरक पडतोय
तुम्हाला अॅलेक्स हेल चे
तुम्हाला अॅलेक्स हेल चे पॉइंट्स मिळाले का??? माझ्या लिस्ट मध्ये दिसतच नाहीयेत.. मी मॅच सुरु होण्याच्या आधी बदल केला होता...
हिम्सकूल , तुम्ही ७:३० च्या
हिम्सकूल , तुम्ही ७:३० च्या आधी बदल केला होता का ?
कारण तिथे अस लिहिलय .
Please note that team changes must be carried out before the scheduled start time of a match to take effect for that game and not the time at which the first ball is actually bowled - which could be significantly later in the case of weather-enforced delays. No team changes will be reimbursed for matches which are abandoned without a ball being bowled.
हो.. ७:३० च्या आधीच केला होता
हो.. ७:३० च्या आधीच केला होता बदल.. पण काल सर्व्हरला प्रॉब्लेम येत होता त्यात गंडलं बहुतेक काहीतरी..
सुपर एट साठी १२ बदल फारच कमी
सुपर एट साठी १२ बदल फारच कमी आहेत. पहिल्या ४-५ मॅच मधून जे काही मिळेल त्याच्यावरच पुढचे अवलंबून आहे आता.
सुपर एट साठी १२ बदल फारच कमी
सुपर एट साठी १२ बदल फारच कमी आहेत. पहिल्या ४-५ मॅच मधून जे काही मिळेल त्याच्यावरच पुढचे अवलंबून आहे आता. >> मान्य आहे मनीष की १२ खूप कमी आहेत .
पण थोडा जास्त विचार करा . प्रत्येक मॅचमधे तुमचे ३-४ खेळाडू खेळतील अशी रणनीती आखा .
प्रत्येक मॅचमधे तुमचे ३-४
प्रत्येक मॅचमधे तुमचे ३-४ खेळाडू खेळतील अशी रणनीती आखा .>> मॅचेसचे schedules बघता हे अतिशय कठीण आहे. त्यासाठी जेव्हढा वेळ घालवायला लागतोय, its not worth it IMHO. माझ्यापुरते मी एक कोअर टीम बनवून गप्प बसलोय.
द आफ्रिकेचे माझे दोन्ही
द आफ्रिकेचे माझे दोन्ही खेळाडु फ्लोप.. कॅलिस आणि डिव्हिलिअर्स
धोनी म्हणतोय
धोनी म्हणतोय ऑस्ट्रेलियाविरूद्ध पाच गोलंदाजांचा वापर करणार पण फलंदाजांमध्ये सेहवाग ला घेणार की युवराजसिंगला, ह्यामध्ये निश्चित नाही.
आता मी टिममध्ये युवराजसिंगला घेतले आणि जर धोनी ने त्याला बाहेर ठेवले तर एक बदल ही कमी होतो आणि गुण ही मिळणार नाही.
दुसरे असे की हरभजन चे स्पेल प्रेमदासा स्टेडियम वर चांगले आहे
http://stats.espncricinfo.com/icc-womens-world-twenty20-2012/engine/reco...
पण युवराजसिंग ला घेण्याने फलंदाजांमध्ये किंवा गोलंदाजीमध्जी, गुण मिळण्याचे जास्त चान्सेस आहे...
काय करावे. अनुभवी लोकहो जरा मार्गदर्शन .....
युवराज खेळणारच.
युवराज खेळणारच. ऑस्ट्रेलियाविरूद्ध युवराजला बाहेर ठेवून सेहवागला खेळवण्याचा निर्णय आपला कन्झर्व्हेटिव्ह धोब्या घेईलसं वाटत नाही.
मी आत्ताच्या मॅचला काहीतरी
मी आत्ताच्या मॅचला काहीतरी घोळ घातला.. फारच शेवटी बदल केलेत.. बहुतेक धरले जाणार नाहीत.. वाट लागणार पहिल्या मॅच मध्ये..
दुसर्या मॅच चे प्लेयर्स आत्ताच निवडून ठेवायला पाहिजेत.. आणि शेवटचे बदल..
आफ्रिदी आणि जमशेद चालायला
आफ्रिदी आणि जमशेद चालायला हवा..........:(
प्रत्येक मॅचमधे तुमचे ३-४
प्रत्येक मॅचमधे तुमचे ३-४ खेळाडू खेळतील अशी रणनीती आखा >> मॅचेसचे schedules बघता हे अतिशय कठीण आहे. त्यासाठी जेव्हढा वेळ घालवायला लागतोय, its not worth it IMHO. >> अगदी. मी काल जवळ जवळ १ तास घालवला त्यासाठी तरी शेवटी पाहिजे तसे काँबिनेशन जमेना. मग आजच्या आणि पुढच्या मॅचकडं बघून बदल केले. जे काय कमवायचे ते याच २-३ मॅचेसमध्ये. नंतर जे होइल ते होइल
युवराज खेळणारच.
युवराज खेळणारच. ऑस्ट्रेलियाविरूद्ध युवराजला बाहेर ठेवून सेहवागला खेळवण्याचा निर्णय आपला कन्झर्व्हेटिव्ह धोब्या घेईलसं वाटत नाही>>> मेरा भारत महान.. माझाही तोच अंदाज आहे पण आपले अंतर्गत राजकारण नडते म्हणून थोडी धाकधूक
जे काय कमवायचे ते याच २-३ मॅचेसमध्ये. नंतर जे होइल ते होइल >>> खरं आहे. कारण १२ बदल खुप कमी आहेत, प्रत्येक मॅच मध्ये किमान दोन तरी बदल करायला परवानगी द्यायला हवी होती. प्रत्येक खेळाडू चांगला वाटतो. कोणाला घ्यावे आणि कोणाला बाहेर करावे ह्यात खूप गोंधळ उडतो. वरताण म्हणजे ज्याला घ्यावे तो खेळत नाही आणि ज्याला बाहेर ठेवले तो दणादण गुण देतो.....
झक्कास... पाकचे २ उडाले मॅच
झक्कास... पाकचे २ उडाले मॅच रंगणार असे दिसतेय. कोण चोकर्स होणार हे १० ओवर्स नंतर स्पष्ट होईलच
जमशेद च्या बैलाला
जमशेद च्या बैलाला घो.................... शुन्यावर गेला........... मायनस होणार पोईंत्स
प्रत्येक खेळाडू चांगला वाटतो.
प्रत्येक खेळाडू चांगला वाटतो. कोणाला घ्यावे आणि कोणाला बाहेर करावे ह्यात खूप गोंधळ उडतो. वरताण म्हणजे ज्याला घ्यावे तो खेळत नाही आणि ज्याला बाहेर ठेवले तो दणादण गुण देतो..... >> Lottery आहे असे समजा नि करून टाका. एव्हधा विचार करू नका हो.
जमशेद च्या बैलाला
जमशेद च्या बैलाला घो.................... शुन्यावर गेला........... मायनस होणार पोईंत्स >> +१००००००००००००००००
आफ्रिदी आणि जमशेद चालायला हवा
आफ्रिदी आणि जमशेद चालायला हवा >> उदयन.. तुमचा आफ्रिदीपण गेला शून्यावर
जमशेद आणि आफ्रीदी दोघेही
जमशेद आणि आफ्रीदी दोघेही शून्यावर.. .मला डबल तोटा.. जर माझे बदल धरले गेले तर.. नाहीतर एकही गुण मिळणार नाही आजच्या मॅचचा..
हिम्सकूल - आजचे बदल धरू नको
हिम्सकूल - आजचे बदल धरू नको अशी क्रिकइइन्फो कडे प्रार्थना करा फॉर अ चेंज!
Pages