१ वाटी तांदुळाचा भात
२-३ उकडलेले बटाटे
१ छोटा सफरचंद
डाळींबाचे दाणे
अर्धा वाटी मुगाची डाळ भिजवून
चवीप्रमाणे मिठ
अर्धा चमचा गोडा मसाला
पाव चमचा हिंग
अर्धा चमचा हळद
अर्धा ते १ चमचा मिरची पुड
अर्धा चमचा आल पेस्ट
शॅलो फ्राय करण्यासाठी तेल
४ - ५ चमचे रवा
प्रथम एक वाटी तयार केलेला भात मिक्सरमधुन वाटून घ्या. मुगाची डाळ वाटून घ्या. बटाटे स्मॅश करा. सफरचंदाची साले काढून बारीक फोडी करुन घ्या.
आता वरील साहित्यात लिहीलेल्या जिन्नसापैकी रवा आणि तेल सोडून सगळे जिन्नस एकत्र करुन घ्या.
आता आपल्याला आवडतील त्या आकारानुसार कटलेट थापा. हे कटलेट दोन्ही बाजुने रव्यात घोळवा.
आता फ्राय पॅन वर थोडे तेल सोडून कटलेट तळण्यासाठी ठेवा.
ह्यात तुम्हाला आवडतील ती फळे तुम्ही टाकू शकता.
खरे तर बेबी झाल्यानंतर तब्बल १ महिन्यानंतर मायबोली गणेशउत्सवाच्या पाककला स्पर्धेची स्फुर्ती घेऊन किचनमध्ये प्रवेश केला. बेबीला झोपवून एकीकडे माझी ही पाककृती चालू होती. त्यामुळे मी जास्त कटलेटला शेप देण्याच्या भानगडीत नाही पडले. खरे सांगायचे तर टाइप पण मी घाई घाईतच करत आहे. पण खरच एक अप्रतिम रेसिपी मला मिळाली. माझ्या मोठ्या मुलीला फ्रूट्स आवडतात त्यामुळे फ्रुट कटलेट म्हटल्यावर आणि चव पाहील्यावर तिने ६-७ मागुन मागुन हे कटलेट गट्टम गट्टम केले. धन्यवाद मायबोली गणेशोस्तव टिम.
रावी धन्स. शकुन डाळीमुळे
रावी धन्स.
शकुन डाळीमुळे पौष्टीकता वाढते व चवीतही थोडा फरक पडतो.
जागुडे, अगं किती ती हौस..!!
जागुडे, अगं किती ती हौस..!! मस्त रेसीपी..
जागू, शाबास गं बाई तुझी!
जागू, शाबास गं बाई तुझी!
जागू, किती गं उत्साह अन उरक
जागू, किती गं उत्साह अन उरक तुला
मस्त आहे कल्पना, मी पण करेन आता. माझ्याकडे लेकाला फळं आवडत नाहीत. आता अशी देऊन बघेन. धन्स गं
झकास जागुताय... भारीच जमून
झकास जागुताय... भारीच जमून आले आहेत कटलेट..
- पिंगू
जागु......... अॅक्टिव झालीस
जागु......... अॅक्टिव झालीस ना किचन मधे परत.... __/\__
सुप्पर्ब आयडियाज आहेत तुझ्याकडे..
जागू, ग्रेट आहेस! मस्त
जागू, ग्रेट आहेस! मस्त दिसतायत कटलेट.
एकदम तोंपासु.....छोटीला
एकदम तोंपासु.....छोटीला सांभाळुन केलेत म्हणुन अजुन छान
जागु... ये तो मे सारे के सारे
जागु... ये तो मे सारे के सारे खा जाउंगा...
Pages