१ वाटी तांदुळाचा भात
२-३ उकडलेले बटाटे
१ छोटा सफरचंद
डाळींबाचे दाणे
अर्धा वाटी मुगाची डाळ भिजवून
चवीप्रमाणे मिठ
अर्धा चमचा गोडा मसाला
पाव चमचा हिंग
अर्धा चमचा हळद
अर्धा ते १ चमचा मिरची पुड
अर्धा चमचा आल पेस्ट
शॅलो फ्राय करण्यासाठी तेल
४ - ५ चमचे रवा
प्रथम एक वाटी तयार केलेला भात मिक्सरमधुन वाटून घ्या. मुगाची डाळ वाटून घ्या. बटाटे स्मॅश करा. सफरचंदाची साले काढून बारीक फोडी करुन घ्या.
आता वरील साहित्यात लिहीलेल्या जिन्नसापैकी रवा आणि तेल सोडून सगळे जिन्नस एकत्र करुन घ्या.
आता आपल्याला आवडतील त्या आकारानुसार कटलेट थापा. हे कटलेट दोन्ही बाजुने रव्यात घोळवा.
आता फ्राय पॅन वर थोडे तेल सोडून कटलेट तळण्यासाठी ठेवा.
ह्यात तुम्हाला आवडतील ती फळे तुम्ही टाकू शकता.
खरे तर बेबी झाल्यानंतर तब्बल १ महिन्यानंतर मायबोली गणेशउत्सवाच्या पाककला स्पर्धेची स्फुर्ती घेऊन किचनमध्ये प्रवेश केला. बेबीला झोपवून एकीकडे माझी ही पाककृती चालू होती. त्यामुळे मी जास्त कटलेटला शेप देण्याच्या भानगडीत नाही पडले. खरे सांगायचे तर टाइप पण मी घाई घाईतच करत आहे. पण खरच एक अप्रतिम रेसिपी मला मिळाली. माझ्या मोठ्या मुलीला फ्रूट्स आवडतात त्यामुळे फ्रुट कटलेट म्हटल्यावर आणि चव पाहील्यावर तिने ६-७ मागुन मागुन हे कटलेट गट्टम गट्टम केले. धन्यवाद मायबोली गणेशोस्तव टिम.
मस्त , मस्त. करून बघणार
मस्त , मस्त. करून बघणार जागूताई.
जागू, सलाम तूला !!!
जागू, सलाम तूला !!!
सही वाटतायत, जागू!! नक्की
सही वाटतायत, जागू!! नक्की करुन पाहण्यात येतील.
जागू मस्तच ग आईला एखादी
जागू मस्तच ग![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आईला एखादी रेसिपी सांग म्हणालेले तेंव्हा तिने असच काही तरी करून बघ जमतय का अस सांगितलेलं
अगदी असच नाही पण आयडिया थोडीशी अशीच
आता तू केलस म्हणल्यावर मी नाही करत
पण हा प्रकार करून बघण्यात येईल लवकरच
़जागू, ़किती उत्साह आहे तुला!
़जागू, ़किती उत्साह आहे तुला! इथुनच दंडवत घालते बघ! फोटो आगदी तोंपासु आलेत गं!
वा! वा!!
वा! वा!!
छ्या एवढी छान रेसिपी पण बाद
छ्या एवढी छान रेसिपी पण बाद होणार...लसूण पेस्ट कशाला घालायची !!
जागू, मस्त आहे रेसिपी एकदम
जागू, मस्त आहे रेसिपी एकदम आणि पौष्टीकही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छ्या एवढी छान रेसिपी पण बाद
छ्या एवढी छान रेसिपी पण बाद होणार...लसूण पेस्ट कशाला घालायची !!
>>
खर की काय?
काढून टाक ग ती पेस्ट मग रेसिपीतून
जागू, अगं किती तो उत्साह
जागू, अगं किती तो उत्साह तुला!!..........इतक्या लहान बाळाला सांभाळून स्पर्धेसाठी पदार्थ बनवतियेस म्हणजे सा नम. तुला!!
रेसिपी मस्तच आहे!! पण तुझं कौतुक करावं तितकं थोडंच आहे गं!!:स्मित:
जागू सगळ्यात आधी तुझ्या उदंड
जागू सगळ्यात आधी तुझ्या उदंड उत्साहाला सलाम.
रेसिपी मस्त वाटतेय. आणि माहितीचा स्त्रोत तर एकदम योग्य!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मम्मी रिटर्न्स
मम्मी रिटर्न्स
मस्त! सही आहे आयडीया
मस्त! सही आहे आयडीया![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
व्वा... झक्कास!!!! सा.न.
व्वा... झक्कास!!!! सा.न.
जागू, सलाम तूला !!! आणि
जागू, सलाम तूला !!!
आणि रेसिपी मस्त
भारीच गं जागू. लेक मागे
भारीच गं जागू. लेक मागे लागलाय हे बनवून बघ म्हणून. बघते कधी जमेल ते.
वा ! जागु खंरच तुझ्या
वा ! जागु खंरच तुझ्या उत्साहाला मनापासुन सलाम! दुसर्या लेकी बद्दल अभिनंदन!
उरक्याची बाय ती! जागू ग्रेट
उरक्याची बाय ती! जागू ग्रेट आहेस!
जागु ग्रेटेस..... मस्त
जागु ग्रेटेस.....:)
मस्त पदार्थ...अगं बच्चे क्या बच्चे का बाप भी कटलेट्स बोले तो दौडेंगेच नं ग..![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
यम्मी मस्त दिसतायत गं
यम्मी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त दिसतायत गं कटलेट्स![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बेबी चं पण कौतुक हां, तुला तिने वेळ दिला पाकृ ट्राय करायला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भाद्रपदेत माश्यांची आठवण
भाद्रपदेत माश्यांची आठवण येणार नाही असे दिसताहेत हां जागू.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चवीष्ट असावेतच.
Jagu, tuzya utsahala
Jagu, tuzya utsahala dandavat!
Chaan pak kruti!
मस्त आहे ..... नक्कीच करुन
मस्त आहे ..... नक्कीच करुन बघेन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच. यम्मी दिसत आहेत
मस्तच. यम्मी दिसत आहेत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जागु सर्वात प्रथम अभिनंदन
जागु सर्वात प्रथम अभिनंदन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रेसिपी तर काय फर्मासच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सही..मस्त आहे..इतक्या लहान
सही..मस्त आहे..इतक्या लहान बाळाला सांभाळुन तू पाकृ साठी विचार करुन, सुंदर असे कटलेट केलेस त्याबद्दल तुझे खूप खूप कौतुक.
जागू मस्तच , hats off to you
जागू मस्तच , hats off to you![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सगळ्यांचे धन्स धन्स धन्स. खर
सगळ्यांचे धन्स धन्स धन्स. खर तर मलाच किचन मध्ये गेल्याशिवाय चैन पडत नाही. इतक्या दिवसांची सवय कशी जाणार लगेच ? शिवाय मा.बो. ची पण तशीच सवय झाली आहे अगदी इथे लिहीण्याची, पाककृती टाकण्याचिही. ह्या सर्वांमागे तुमचीच प्रेरणा असते. आणि लाजो म्हणते त्याप्रमाणे माझ्या १ महिन्याच्या लेकीलाही धन्स की ती मला हल्ली किचन मध्ये जायला वेळ देते आणि माझ्या मोठ्या मुलीचाही मला विश्वास सांभाळायचा असतो की आई घरात आहे म्हणजे शाळेतून घरी आल्यावर नविन खाऊ मिळणार
तिचे ही कौतुक आहे. ती हल्ली अगदी मोठ्या ताई सारखीच वागायला लागली आहे. खुप समजूतदार पणे वागते. मी आता जास्तच बोलत आहे असे वाटते.
तर वरची आल-लसुण पेस्ट काढली तरी चालेल. मी पाककृती मध्ये बदल करते.
सही दिसताहेत कटलेट्स ! बेबी
सही दिसताहेत कटलेट्स !
बेबी झाल्यानंतर तब्बल १ महिन्यानंतर मायबोली गणेशउत्सवाच्या पाककला स्पर्धेची स्फुर्ती घेऊन किचनमध्ये प्रवेश केला. > -----------^----------- .
छानेय ही पण रेसिपी. रेसिपी
छानेय ही पण रेसिपी. रेसिपी केलिस आणि शिवाय इथे टाईप पण केलीस बाळाला सांभाळून. भारीच !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
<<अर्धा वाटी मुगाची डाळ>>
@जागुताई : डाळ वापरण्याचं काही विशेष कारण ? घट्टपणा यावा म्हणून की चवीत मेजर फरक पडतो डाळीनी ?
Pages