मिसळम् पाकम् गट्टम् गट्टम्-फ्रूट कटलेट-तिखट-जागू

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 September, 2012 - 10:19
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी तांदुळाचा भात
२-३ उकडलेले बटाटे
१ छोटा सफरचंद
डाळींबाचे दाणे
अर्धा वाटी मुगाची डाळ भिजवून
चवीप्रमाणे मिठ
अर्धा चमचा गोडा मसाला
पाव चमचा हिंग
अर्धा चमचा हळद
अर्धा ते १ चमचा मिरची पुड
अर्धा चमचा आल पेस्ट
शॅलो फ्राय करण्यासाठी तेल
४ - ५ चमचे रवा

क्रमवार पाककृती: 

प्रथम एक वाटी तयार केलेला भात मिक्सरमधुन वाटून घ्या. मुगाची डाळ वाटून घ्या. बटाटे स्मॅश करा. सफरचंदाची साले काढून बारीक फोडी करुन घ्या.

आता वरील साहित्यात लिहीलेल्या जिन्नसापैकी रवा आणि तेल सोडून सगळे जिन्नस एकत्र करुन घ्या.

आता आपल्याला आवडतील त्या आकारानुसार कटलेट थापा. हे कटलेट दोन्ही बाजुने रव्यात घोळवा.

आता फ्राय पॅन वर थोडे तेल सोडून कटलेट तळण्यासाठी ठेवा.

५-७ मिनिटे एक बाजू तळून दुसर्‍या बाजुनेही खरपुस तळून घ्या.

आता हे तयार कटलेट सॉस सोबत गट्टम गट्टम करा.

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी ४ तरी लागतील
अधिक टिपा: 

ह्यात तुम्हाला आवडतील ती फळे तुम्ही टाकू शकता.

खरे तर बेबी झाल्यानंतर तब्बल १ महिन्यानंतर मायबोली गणेशउत्सवाच्या पाककला स्पर्धेची स्फुर्ती घेऊन किचनमध्ये प्रवेश केला. बेबीला झोपवून एकीकडे माझी ही पाककृती चालू होती. त्यामुळे मी जास्त कटलेटला शेप देण्याच्या भानगडीत नाही पडले. खरे सांगायचे तर टाइप पण मी घाई घाईतच करत आहे. पण खरच एक अप्रतिम रेसिपी मला मिळाली. माझ्या मोठ्या मुलीला फ्रूट्स आवडतात त्यामुळे फ्रुट कटलेट म्हटल्यावर आणि चव पाहील्यावर तिने ६-७ मागुन मागुन हे कटलेट गट्टम गट्टम केले. धन्यवाद मायबोली गणेशोस्तव टिम.

माहितीचा स्रोत: 
मायबोली गणेशोत्सवातील स्पर्धेच्या टिपा.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागू मस्तच ग Happy
आईला एखादी रेसिपी सांग म्हणालेले तेंव्हा तिने असच काही तरी करून बघ जमतय का अस सांगितलेलं
अगदी असच नाही पण आयडिया थोडीशी अशीच Happy
आता तू केलस म्हणल्यावर मी नाही करत
पण हा प्रकार करून बघण्यात येईल लवकरच Happy

छ्या एवढी छान रेसिपी पण बाद होणार...लसूण पेस्ट कशाला घालायची !!
>>
खर की काय?
काढून टाक ग ती पेस्ट मग रेसिपीतून

जागू, अगं किती तो उत्साह तुला!!..........इतक्या लहान बाळाला सांभाळून स्पर्धेसाठी पदार्थ बनवतियेस म्हणजे सा नम. तुला!!
रेसिपी मस्तच आहे!! पण तुझं कौतुक करावं तितकं थोडंच आहे गं!!:स्मित:

वा ! जागु खंरच तुझ्या उत्साहाला मनापासुन सलाम! दुसर्‍या लेकी बद्दल अभिनंदन!

जागु ग्रेटेस.....:)

मस्त पदार्थ...अगं बच्चे क्या बच्चे का बाप भी कटलेट्स बोले तो दौडेंगेच नं ग.. Wink

यम्मी Happy

मस्त दिसतायत गं कटलेट्स Happy

बेबी चं पण कौतुक हां, तुला तिने वेळ दिला पाकृ ट्राय करायला Happy

सही..मस्त आहे..इतक्या लहान बाळाला सांभाळुन तू पाकृ साठी विचार करुन, सुंदर असे कटलेट केलेस त्याबद्दल तुझे खूप खूप कौतुक.

सगळ्यांचे धन्स धन्स धन्स. खर तर मलाच किचन मध्ये गेल्याशिवाय चैन पडत नाही. इतक्या दिवसांची सवय कशी जाणार लगेच ? शिवाय मा.बो. ची पण तशीच सवय झाली आहे अगदी इथे लिहीण्याची, पाककृती टाकण्याचिही. ह्या सर्वांमागे तुमचीच प्रेरणा असते. आणि लाजो म्हणते त्याप्रमाणे माझ्या १ महिन्याच्या लेकीलाही धन्स की ती मला हल्ली किचन मध्ये जायला वेळ देते आणि माझ्या मोठ्या मुलीचाही मला विश्वास सांभाळायचा असतो की आई घरात आहे म्हणजे शाळेतून घरी आल्यावर नविन खाऊ मिळणार Happy तिचे ही कौतुक आहे. ती हल्ली अगदी मोठ्या ताई सारखीच वागायला लागली आहे. खुप समजूतदार पणे वागते. मी आता जास्तच बोलत आहे असे वाटते.

तर वरची आल-लसुण पेस्ट काढली तरी चालेल. मी पाककृती मध्ये बदल करते.

सही दिसताहेत कटलेट्स !
बेबी झाल्यानंतर तब्बल १ महिन्यानंतर मायबोली गणेशउत्सवाच्या पाककला स्पर्धेची स्फुर्ती घेऊन किचनमध्ये प्रवेश केला. > -----------^----------- .

छानेय ही पण रेसिपी. रेसिपी केलिस आणि शिवाय इथे टाईप पण केलीस बाळाला सांभाळून. भारीच ! Happy

<<अर्धा वाटी मुगाची डाळ>>
@जागुताई : डाळ वापरण्याचं काही विशेष कारण ? घट्टपणा यावा म्हणून की चवीत मेजर फरक पडतो डाळीनी ?

Pages