मिसळम् पाकम् गट्टम् गट्टम्-फ्रूट कटलेट-तिखट-जागू

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 September, 2012 - 10:19
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी तांदुळाचा भात
२-३ उकडलेले बटाटे
१ छोटा सफरचंद
डाळींबाचे दाणे
अर्धा वाटी मुगाची डाळ भिजवून
चवीप्रमाणे मिठ
अर्धा चमचा गोडा मसाला
पाव चमचा हिंग
अर्धा चमचा हळद
अर्धा ते १ चमचा मिरची पुड
अर्धा चमचा आल पेस्ट
शॅलो फ्राय करण्यासाठी तेल
४ - ५ चमचे रवा

क्रमवार पाककृती: 

प्रथम एक वाटी तयार केलेला भात मिक्सरमधुन वाटून घ्या. मुगाची डाळ वाटून घ्या. बटाटे स्मॅश करा. सफरचंदाची साले काढून बारीक फोडी करुन घ्या.

आता वरील साहित्यात लिहीलेल्या जिन्नसापैकी रवा आणि तेल सोडून सगळे जिन्नस एकत्र करुन घ्या.

आता आपल्याला आवडतील त्या आकारानुसार कटलेट थापा. हे कटलेट दोन्ही बाजुने रव्यात घोळवा.

आता फ्राय पॅन वर थोडे तेल सोडून कटलेट तळण्यासाठी ठेवा.

५-७ मिनिटे एक बाजू तळून दुसर्‍या बाजुनेही खरपुस तळून घ्या.

आता हे तयार कटलेट सॉस सोबत गट्टम गट्टम करा.

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी ४ तरी लागतील
अधिक टिपा: 

ह्यात तुम्हाला आवडतील ती फळे तुम्ही टाकू शकता.

खरे तर बेबी झाल्यानंतर तब्बल १ महिन्यानंतर मायबोली गणेशउत्सवाच्या पाककला स्पर्धेची स्फुर्ती घेऊन किचनमध्ये प्रवेश केला. बेबीला झोपवून एकीकडे माझी ही पाककृती चालू होती. त्यामुळे मी जास्त कटलेटला शेप देण्याच्या भानगडीत नाही पडले. खरे सांगायचे तर टाइप पण मी घाई घाईतच करत आहे. पण खरच एक अप्रतिम रेसिपी मला मिळाली. माझ्या मोठ्या मुलीला फ्रूट्स आवडतात त्यामुळे फ्रुट कटलेट म्हटल्यावर आणि चव पाहील्यावर तिने ६-७ मागुन मागुन हे कटलेट गट्टम गट्टम केले. धन्यवाद मायबोली गणेशोस्तव टिम.

माहितीचा स्रोत: 
मायबोली गणेशोत्सवातील स्पर्धेच्या टिपा.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागू, किती गं उत्साह अन उरक तुला Happy
मस्त आहे कल्पना, मी पण करेन आता. माझ्याकडे लेकाला फळं आवडत नाहीत. आता अशी देऊन बघेन. धन्स गं Happy

Pages