मोरया मंडळी,
मायबोली गणेशोत्सवात आता आपण वळूयात एका अत्यंत जिवलग, उत्साह वाढवणार्या, गमतीच्या खेळाकडे. हा खेळ आहे, 'कानगोष्टी' फक्त थोडासा बदल म्हणून या कानगोष्टी करायच्या आहेत छाया/प्रकाशचित्रांच्या माध्यमातून.
चला तर, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया, तुमचा आमचा सर्वांचा आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी!
हे लक्षात ठेवा:-
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे आवश्यक आहे.
३. तुम्हाला तुमच्या लगेच वर असलेल्या प्रकाशचित्रावर दिलेल्या क्लू ला/ संदर्भाला अनुसरून प्रकाशचित्र द्यायचे आहे. तसेच पुढ्च्यासाठी क्लू/संदर्भ द्यायचा आहे.
असा हा खेळ पुढे नेणे अपेक्षित आहे.
४. दिलेल्या छायाचित्रावर पुढे चाल म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे आणि त्यावरचा एकच क्लू/संदर्भ द्यावा.
५. हे प्रकाशचित्र प्रताधिकार मुक्त असावे.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा चित्र कानगोष्टी करू शकतो/ते, फक्त सलग दोन चित्र कानगोष्टी देऊ शकत नाही. थोडा दुसर्यांनाही कानगोष्टी करायला चानुस गावला पायजेल, न्हवं का?
७. जर दोघा-तिघांनी एकाच वेळी फोटो टाकले आणि वेगवेगळे क्ल्यू दिले तर पुढच्याने, त्यातील एक निवडून खेळ पुढे चालू ठेवावा.
उदाहरणार्थ
जर पहिल्या सभासदाने चित्र क्र. १ टाकले
आणि नवीन क्लू दिला- होडी
तर दुसरा सभासद हे टाकू शकेल
नवीन क्लू आहे क्षितिज (skyline)
चला तर सज्ज व्हा आणि खेळा, प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी...
पहिला प्रतीसाद देणार्यासाठी क्लू आहे क्षितिज (skyline)
*प्रकाशचित्र :- जिप्सी आणि तोषवी कडून साभार
रुमाल टाकताना पुढचा क्लू पण
रुमाल टाकताना पुढचा क्लू पण लिहा म्हणजे फोटो पटकन शोधता येईल...
हे रुमाल प्रकरण नाही पटलं
हे रुमाल प्रकरण नाही पटलं आपल्याला
पावसाळी ढग क्लू आकाश
पावसाळी ढग
क्लू आकाश
घ्या आभाळ फांदी हा क्लू
घ्या आभाळ
फांदी हा क्लू
क्लू = बाभळ????? कसा काय???
क्लू = बाभळ????? कसा काय???
आकाश क्लु बाद
आकाश क्लु बाद
आभाळ होता ना?
आभाळ होता ना?
माझ्या स्क्रिन रेझोवर हिरवीच
माझ्या स्क्रिन रेझोवर हिरवीच दिसतीये.
इथे चक्क निळा आहे...
फांदी कोथिंबिरीची पकडा नाहीतर
फांदी कोथिंबिरीची पकडा नाहीतर बाजूच्या ब्रम्हकमळाची
आणि क्लू घ्या पिंजरा.
रूमाल हा दोन मिनिटांपुरता
रूमाल हा दोन मिनिटांपुरता असतो/ असावा... त्याहून वेळ कोणी का थांबावे.
काय क्लू आहे आत्ताचा?
काय क्लू आहे आत्ताचा?
अरे गौरीने रुमाल टाकून वेल
अरे गौरीने रुमाल टाकून वेल दिला म्हणून माझा फोटो बाद झाला म्हणुन काढला हो माझा फोटो
मंजू माझ्या फोटोत बाभूळाचे दिसत होते
आता मला फोटोच दिसत नाहीयेत
आता मला फोटोच दिसत नाहीयेत
अरे एऽऽऽ xxxनो, क्लू
अरे एऽऽऽ xxxनो, क्लू दिलेल्या पोस्टी का एडीट करताय?????????????
अवलच्या फोटोत कोपर्यात
अवलच्या फोटोत कोपर्यात बाभळीचं झाड होतं. म्हणून बहुतेक क्लू बाभळ असावा.
अगं मंजू हा कुठून आला पिंजरा?
अगं मंजू हा कुठून आला पिंजरा? कुठला क्लू घेतलायस तू?
ए थांबा सगळे. ५ मिनिटं नो फोटो.
माझा पावसाचा फोटो मला काही
माझा पावसाचा फोटो मला काही केल्या दिसत नाहीये इथे. तुम्हाला दिसतोय का?
पिंजरा सदृश क्लु देऊळ
पिंजरा सदृश
क्लु देऊळ
घ्या देऊळ क्लू तुळस
घ्या देऊळ
क्लू तुळस
बदलले आहे
बदलले आहे
नी, अवलने ढगांचा फोटो टाकून
नी, अवलने ढगांचा फोटो टाकून पुढचा क्लू बाभळ दिला होता, ज्यात कुठेही बाभळीचे झाड नव्हते.
मग बित्तुच्या आकाशावर तू रूमाल टाकून क्लू फांदी दिलास, तो मी पकडला, पण तू पोस्ट एडीट केलीस. आता तू तुझा 'फांदी' क्लू वाला फोटो टाक.
आणि बित्तुचे देऊळ पकडून पुढे चला.
बित्तुच्या देवळात दर्शनाला या
बित्तुच्या देवळात दर्शनाला या
कसला कलकलाट चाललाय इथे
कसला कलकलाट चाललाय इथे
ओके टाकते.
ओके टाकते.
देवळात नका जाऊ आता तुळशीला
देवळात नका जाऊ आता तुळशीला आणा.
देवळात याम्हंजे शांत वाटेल
देवळात याम्हंजे शांत वाटेल
तुळस ... क्लू: कोळ्याचं जाळं
तुळस ...
क्लू: कोळ्याचं जाळं
अहो देऊळ क्लु आहे..
अहो देऊळ क्लु आहे..
देऊळ टाकलंय नी ने वरती. आणि
देऊळ टाकलंय नी ने वरती. आणि तुळस क्लू दिलाय.
बित्तूने देवळाला घट्ट पकडून
बित्तूने देवळाला घट्ट पकडून ठेवले आहे
Pages