मला चुकीची ऐकू आलेली गाणी

Submitted by परदेसाई on 15 July, 2008 - 02:53

काही वेळा असं होतं की एकादं गाणं डोक्यात बसतं पण त्याचे काही शब्द कळतच नाहीत. किंवा ऐकू येतात पण वेगळेच येतात आणि ते तसेच आहेत असा आपला समज होतो. इथे आपले गैरसमज लिहावेत.

या आधीची गाणी ईथे पहा.

जिहाले-मस्तीची माहीती...
नवीन चर्चा
जूनी मायबोली

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सैंया झूठों का बडा सरताज निकला

हे गाणं मी लहानपणी

सैंया जूतों का बडा सरताज निकला

असं ऐकायची बरेच दिवस! Sad

वो है मतवाला नीली आंखोवाला
जिसकी दिवानी ब्रिजकी हर बाला

माझा दाक्षिणात्य मित्रवर्य...

वो है मधुबाला कालेबालों वाला

वो है अलबेला मत नैनोंवाला,
जिसकी दिवानी ब्रिज की हर बाला...

जो है अलबेला मद-नैनोंवाला,
जिसकी दिवानी ब्रिज की हर बाला...
वो क्रिश्ना है

असं आहे ते!

चोर बजारी दो नैंनो की पहले ...... या लव आज कल मधल्या गाण्यात एक कोरस आहे तो मला 'दा रे दत्ता रे, दत्ता रे भई दत्ता रे.... असा ऐकू येतो. Uhoh
त्याची नक्की शब्द काय आहेत?

ते मुन्नाभाइ MBBS मधलं 'बन्दे मे था दम-वंदे मातरम" मी कित्येक दिवस 'one day मेघादम- वंदे मातरम" असेच म्हणत होते.. फ़ार फ़ार दिवसांनी बरोबर बोल समजले!

'आकाशी झेप घे रे पाखरा...' मध्ये एक कडवं आहे. 'घामातून मोती फुलले, यमदेव/ श्रमदेव घरी अवतरले...'

हे यमदेव आहे की श्रमदेव ? हे मला अजूनही नीट कळले नाहीये. हेडफोन कानात दाबून ऐकलं तरी 'यमदेव'च ऐकू येतं.
Uhoh

Uhoh

इब्लिस...
कृपया वरच्या गाण्याबद्दल बाकीची माहिती देता येईल का?, ते पहा... (मालवणि भाषेत:- गाण्याचो आवस-बापुस समाजल्या शिवाय गाण्याचां कूळ कसां काय शोधतलंव?... :फिदी:)...
थोडक्यात हे गाणं तुम्ही कुठे ऐकलेलं?... अंदाजे गायक/ गायीका/ संगितकार कोण?... वगैरे... कारण अशी बरीच गाणी आकाशवाणीच्या मराठी कार्यक्रमांतून पूर्वी ऐकायला मिळायची, जी आजकाल खुल्या बाजारात अक्षरशः दूर्मीळ झालेली आहेत...
Happy

विवेक, लहानपणी दुरून लाऊडस्पीकरवर ऐकलेलं ते "गणराज रंगी नाचतो नाचतो" हे गाणं होतं ते.
चुकीचं म्हणजे किती चुकीचं ऐकाव Happy

बरंच क्लिष्ट गाणं होतं ते Wink
नार ऋतुंभरि करीते गायन
अस्लं काय काय होतं त्यात. एकदा नीट शब्द समजल्यावर मीच भरपूर हसलोय स्वतःला.

दुसरं चुकीचं ऐकलेलं म्हणजे,

'हे अधमर तरंजिते' जाऽम समजत नसे काय आहे ते. मग कळलं की ते अधमरक्तरंजिते असं आहे.

मी हे नारद तुंबरू करिती गायन.. असंच म्हणते अजूनही >>> पण वाक्य असेच आहे.......बहुतेक.

>>
होय तसेच आहे ते...
अब ये मत पूछ्ना की तुम्बरू म्हनजे काय ते ..तुंबरू नारदाबरोबर असणारे एक गवई होते.

अब ये मत पूछ्ना की तुम्बरू म्हनजे काय ते .. मला माहीत नाही. >>> तुंबरु हा देवांच्या दरबारातला गायक.

तुंबरु हा देवांच्या दरबारातला गायक...>>>...

@ बाळू जोशी आणि गिरीश...
आज ही नविन माहिती मिळाली... धन्यवाद...
'नारद तुंबरू करिती गायन...' या ओळिचा लहानपणा पासून डोक्यात बसलेला अर्थ - नारदमुनी तंबोरा घेऊन गायनाला बसलेत...
Proud

Three Idiots मधले झूबी डूबी नक्के कसे आहे?

झूबी डूबी नाचे पागल सुलेमान / पागल stupid man / पागल stupid mom???

नारद मुनी आपल्याला ठाऊक आहेत. शेंडी हा यांचा ट्रेडमार्क.
तुंबर / तुंबरू दुसरे तंबोरावाले गायक. यांचे वैशिष्ट्य म्हणजे यांना घोड्याचे तोंड असते.

ती ओळ "नारद तुंबरू करिती गायन" अशीच आहे.
>> नेटावर सापडलेले :

गणराज रंगी नाचतो, नाचतो,
पायि घागर्‍या करिती रुणझुण
नाद स्वर्गी पोचतो !

कटि पीतांबर कसून भर्जरी
बाल गजानन नर्तनास करी
तुंदिल तनु तरि चपल साजिरी
लावण्ये साजतो !

नारद तुंबरु करिती गायन
करी शारदा वीणावादन
ब्रम्हा धरितो तालही रंगुन
मृदंग धिमि वाजतो !

देवसभा घनदाट बैसली
नृत्यगायने मने हर्षली
गौरीसंगे स्वये सदाशिव
शिशुकौतुक पाहतो !
गीत - शान्‍ता शेळके
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर - लता मंगेशक

सासुबाई उंच माझा झोका अगदी न चुकता शीर्षक गीतासाह बघतात, काल त्यांनी विचारले
'त्याच्या किचाट डोळ्यात झुले उंच माझा झोका' यात हे किचाट काय आहे?
जाम हसू आलं. Lol
मग सांगितलं की ते किचाट नसून कृतार्थ आहे..
Lol

Pages