Submitted by परदेसाई on 15 July, 2008 - 02:53
काही वेळा असं होतं की एकादं गाणं डोक्यात बसतं पण त्याचे काही शब्द कळतच नाहीत. किंवा ऐकू येतात पण वेगळेच येतात आणि ते तसेच आहेत असा आपला समज होतो. इथे आपले गैरसमज लिहावेत.
जिहाले-मस्तीची माहीती...
नवीन चर्चा
जूनी मायबोली
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सैंया झूठों का बडा सरताज
सैंया झूठों का बडा सरताज निकला
हे गाणं मी लहानपणी
सैंया जूतों का बडा सरताज निकला
असं ऐकायची बरेच दिवस!
वो है मतवाला नीली
वो है मतवाला नीली आंखोवाला
जिसकी दिवानी ब्रिजकी हर बाला
माझा दाक्षिणात्य मित्रवर्य...
वो है मधुबाला कालेबालों वाला
(No subject)
वो है अलबेला मत
वो है अलबेला मत नैनोंवाला,
जिसकी दिवानी ब्रिज की हर बाला...
जो है अलबेला
जो है अलबेला मद-नैनोंवाला,
जिसकी दिवानी ब्रिज की हर बाला...
वो क्रिश्ना है
असं आहे ते!
कितीही प्रयत्न केला तरी त्या
कितीही प्रयत्न केला तरी त्या मित्रासारखेच होते माझे
चोर बजारी दो नैंनो की पहले
चोर बजारी दो नैंनो की पहले ...... या लव आज कल मधल्या गाण्यात एक कोरस आहे तो मला 'दा रे दत्ता रे, दत्ता रे भई दत्ता रे.... असा ऐकू येतो.
त्याची नक्की शब्द काय आहेत?
दक्षिणा, मला वाटतं, ते
दक्षिणा, मला वाटतं, ते "जाणे,रब जाणे, रब सब जाणे..:"असं आहे...
ते मुन्नाभाइ MBBS मधलं 'बन्दे
ते मुन्नाभाइ MBBS मधलं 'बन्दे मे था दम-वंदे मातरम" मी कित्येक दिवस 'one day मेघादम- वंदे मातरम" असेच म्हणत होते.. फ़ार फ़ार दिवसांनी बरोबर बोल समजले!
one day मेघादम >>>
one day मेघादम >>>
वन डे मुकादम...!!!
वन डे मुकादम...!!!
सखी माऊली दे टाळी मी पण
सखी माऊली दे टाळी
मी पण मेघादम च ऐकत होते
'आकाशी झेप घे रे पाखरा...'
'आकाशी झेप घे रे पाखरा...' मध्ये एक कडवं आहे. 'घामातून मोती फुलले, यमदेव/ श्रमदेव घरी अवतरले...'
हे यमदेव आहे की श्रमदेव ? हे मला अजूनही नीट कळले नाहीये. हेडफोन कानात दाबून ऐकलं तरी 'यमदेव'च ऐकू येतं.

यमदेव घरी आले की संपलंच सगळं
यमदेव घरी आले की संपलंच सगळं
तेव्हा ते श्रमदेवच असावे..
जलदांवरूनी नाचता नाचता असं
जलदांवरूनी नाचता नाचता
असं ऐकलेलं कोणतं गाणं असेल?
इब्लिस... कृपया वरच्या
इब्लिस...

कृपया वरच्या गाण्याबद्दल बाकीची माहिती देता येईल का?, ते पहा... (मालवणि भाषेत:- गाण्याचो आवस-बापुस समाजल्या शिवाय गाण्याचां कूळ कसां काय शोधतलंव?... :फिदी:)...
थोडक्यात हे गाणं तुम्ही कुठे ऐकलेलं?... अंदाजे गायक/ गायीका/ संगितकार कोण?... वगैरे... कारण अशी बरीच गाणी आकाशवाणीच्या मराठी कार्यक्रमांतून पूर्वी ऐकायला मिळायची, जी आजकाल खुल्या बाजारात अक्षरशः दूर्मीळ झालेली आहेत...
विवेक, लहानपणी दुरून
विवेक, लहानपणी दुरून लाऊडस्पीकरवर ऐकलेलं ते "गणराज रंगी नाचतो नाचतो" हे गाणं होतं ते.
चुकीचं म्हणजे किती चुकीचं ऐकाव
इब्लिस... असं आहे होय...!!!
इब्लिस...

असं आहे होय...!!!
बरंच क्लिष्ट गाणं होतं ते
बरंच क्लिष्ट गाणं होतं ते
नार ऋतुंभरि करीते गायन
अस्लं काय काय होतं त्यात. एकदा नीट शब्द समजल्यावर मीच भरपूर हसलोय स्वतःला.
दुसरं चुकीचं ऐकलेलं म्हणजे,
'हे अधमर तरंजिते' जाऽम समजत नसे काय आहे ते. मग कळलं की ते अधमरक्तरंजिते असं आहे.
गणराज रंगी नाचतो नाचतो" हे
गणराज रंगी नाचतो नाचतो" हे गाणं होतं ते.>>
नार ऋतुंभरि करीते गायन >> मी
नार ऋतुंभरि करीते गायन >> मी हे नारद तुंबरू करिती गायन.. असंच म्हणते अजूनही

मी हे नारद तुंबरू करिती
मी हे नारद तुंबरू करिती गायन.. असंच म्हणते अजूनही >>> पण वाक्य असेच आहे.......बहुतेक.
मी हे नारद तुंबरू करिती
मी हे नारद तुंबरू करिती गायन.. असंच म्हणते अजूनही >>> पण वाक्य असेच आहे.......बहुतेक.
>>
होय तसेच आहे ते...
अब ये मत पूछ्ना की तुम्बरू म्हनजे काय ते ..तुंबरू नारदाबरोबर असणारे एक गवई होते.
अब ये मत पूछ्ना की तुम्बरू
अब ये मत पूछ्ना की तुम्बरू म्हनजे काय ते .. मला माहीत नाही. >>> तुंबरु हा देवांच्या दरबारातला गायक.
नन्तर सापडले नेटवर
नन्तर सापडले नेटवर
तुंबरु हा देवांच्या दरबारातला
तुंबरु हा देवांच्या दरबारातला गायक...>>>...
@ बाळू जोशी आणि गिरीश...

आज ही नविन माहिती मिळाली... धन्यवाद...
'नारद तुंबरू करिती गायन...' या ओळिचा लहानपणा पासून डोक्यात बसलेला अर्थ - नारदमुनी तंबोरा घेऊन गायनाला बसलेत...
Three Idiots मधले झूबी डूबी
Three Idiots मधले झूबी डूबी नक्के कसे आहे?
झूबी डूबी नाचे पागल सुलेमान / पागल stupid man / पागल stupid mom???
नारद मुनी आपल्याला ठाऊक आहेत.
नारद मुनी आपल्याला ठाऊक आहेत. शेंडी हा यांचा ट्रेडमार्क.

तुंबर / तुंबरू दुसरे तंबोरावाले गायक. यांचे वैशिष्ट्य म्हणजे यांना घोड्याचे तोंड असते.
ती ओळ "नारद तुंबरू करिती गायन" अशीच आहे.
>> नेटावर सापडलेले :
गणराज रंगी नाचतो, नाचतो,
पायि घागर्या करिती रुणझुण
नाद स्वर्गी पोचतो !
कटि पीतांबर कसून भर्जरी
बाल गजानन नर्तनास करी
तुंदिल तनु तरि चपल साजिरी
लावण्ये साजतो !
नारद तुंबरु करिती गायन
करी शारदा वीणावादन
ब्रम्हा धरितो तालही रंगुन
मृदंग धिमि वाजतो !
देवसभा घनदाट बैसली
नृत्यगायने मने हर्षली
गौरीसंगे स्वये सदाशिव
शिशुकौतुक पाहतो !
गीत - शान्ता शेळके
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर - लता मंगेशक
झूबी डूबी नाचे पागल सुलेमान /
झूबी डूबी नाचे पागल सुलेमान / पागल stupid man / पागल stupid mom???
>>>>
पागल स्टुपिड मन???
सासुबाई उंच माझा झोका अगदी न
सासुबाई उंच माझा झोका अगदी न चुकता शीर्षक गीतासाह बघतात, काल त्यांनी विचारले

'त्याच्या किचाट डोळ्यात झुले उंच माझा झोका' यात हे किचाट काय आहे?
जाम हसू आलं.
मग सांगितलं की ते किचाट नसून कृतार्थ आहे..
Pages