साक्षात गणपती बाप्पा पंगतीला म्हणजे... धम्माल! गोड गोड खाण्यापासून तिखट खिरापती पर्यंत बरंच काही. बाप्पा तेच तेच खाऊन कंटाळला असेल. नाही का? काही तरी नवं द्यावंसं वाटतंय? मग सोप्पं आहे!
आमच्या ह्या वर्षीच्या 'मिसळम् पाकम् गट्टम् गट्टम्' मध्ये भाग घ्याच!
मुख्य घटक जिन्नसः-
१) बटाटा
२) तांदूळ
३) सफरचंद
या स्पर्धेचे नियमः-
१) वरचे तीनही मुख्य जिन्नस वापरणे अनिवार्य आहे. हे जिन्नस कुठल्याही स्वरुपात वापरता येतील.
२) पाककृतीत पूरक पदार्थ म्हणून अजून जास्तीतजास्त ४ जिन्नस वापरता येतील. यात भाज्या, फळं, धान्य, डाळी, कडधान्य दूध आणि दुधाचे पदार्थ इ. कुठल्याही स्वरूपात वापरता येतील.
३) या व्यतिरिक्त पाणी, तेल, तूप, मीठ, मसाल्याचे पदार्थ, गुळ, साखर, मध कितीही वापरू शकता.
४) कांदा, लसूण वापरता येणार नाही.
५) सजावटीकरता वापरलेल्या गोष्टी वरील जिन्नसात धरल्या जाणार नाहीत.
६) वरील जिन्नस वापरून गोड किंवा तिखट पदार्थ बनवू शकता.
७) तयार पदार्थाचं प्रकाशचित्र अनिवार्य आहे. कृतीची (पायर्यांसहीत) प्रकाशचित्रे द्यायला हरकत नाही.
८) प्रवेशिका भरताना, पदार्थ गोड आहे का तिखट याचा स्पष्ट उल्लेख हवा.
९) एक सभासद दोन प्रवेशिका पाठवू शकेल मात्र त्यापैकी एक गोडाची व एक तिखटाची असायला हवी. एक सभासद दोन्ही गोडाच्या वा दोन्ही तिखटाच्या पाककृती पाठवू शकणार नाही.
१०) एका प्रवेशिकेत एकच पाककृती असावी.
प्रवेशिका कधी, कुठे व कशा पाठवाव्यात?
प्रवेशिका गणेश चतुर्थीपासून,१९ सप्टेंबर २०१२ (भारतीय प्रमाणवेळ) ते अनंत चतुर्दशीपर्यंत, २९ सप्टेंबर २०१२ (अमेरिकेच्या पश्चिम किनार्याची प्रमाणवेळ) स्वीकारण्यात येतील. प्रवेशिका पाठवण्याकरता 'मायबोली गणेशोत्सव २०१२' या गृपचे सदस्य असणे आवश्यक आहे. हा गृप सदस्य नोंदणीकरता १९ सप्टेंबरला खुला करण्यात येणार आहे.
१. 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सदस्यत्व घ्या. त्याकरता या पानाच्या उजवीकडे दिसणार्या 'मायबोली गणेशोत्सव २०१२' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर सामील व्हा या शब्दांवर टिचकी मारा. आता आपण 'मायबोली गणेशोत्सव २०१२' या गृपचे सभासद झाला आहात.
२. याच गृपमध्ये उजवीकडे 'नवीन पाककृती' या शब्दांवर टिचकी मारा. (गणेशोत्सव २०१२ गृपमधले गप्पांचे पान, नवीन कार्यक्रम हे पर्याय वापरायचे नाहीत)
३. नवीन पाककृतीचा धागा उघडला जाईल. त्यात 'शीर्षक' या चौकटीमध्ये खालीलप्रमाणे विषय लिहावा :-
मिसळम् पाकम् गट्टम् गट्टम्! - तुमच्या पाककृतीचे नाव - गोड/तिखट - मायबोली आय डी
४. आहार, पाककृती प्रकार, इ. गोष्टी तुमच्या पाककृतीनुसार निवडा.
५. शब्दखुणा या चौकटीमध्ये मिसळम् पाकम् गट्टम् गट्टम्, मायबोली गणेशोत्सव २०१२ हे शब्द लिहा.
७. मजकुरात प्रकाशचित्र टाकायचे असल्यास मजकुराच्या चौकटीखाली मजकुरात image किंवा link द्या. यातील image शब्दावर टिचकी मारा. एक नवीन खिडकी (विंडो) उघडेल. त्यात वरती दिलेल्या पर्यायांपैकी 'upload' हा पर्याय निवडा. मग 'browse' वर टिचकी मारुन तुमच्या संगणकावरून योग्य ती फाईल upload करा. फाईल अपलोड झाली की खालच्या करड्या चौकटी मध्ये त्याची पावती (मेसेज) दिसेल. मग ही फाईल सर्वात वरती दिलेल्या पर्यायांपैकी 'Send to text area' हा पर्याय वापरून तुमच्या मजकुरात समाविष्ट करा.
प्रकाशचित्र टाकण्याबद्दल अधिक माहितीसाठी येथे टिचकी मारा.
८. नवीन लेखनाच्या धाग्यावर सर्वांत खाली 'Save' या कळीच्या वर गृप असा शब्द दिसेल, त्यावर टिचकी मारा. सार्वजनिक या शब्दाच्या आधी असलेल्या चौकटीवर टिचकी मारा. म्हणजे तुमची प्रवेशिका सर्वांना दिसू शकेल.
९. Save ची कळ दाबा. कधी कधी सेव्ह व्हायला वेळ लागतो, तेवढी कळ काढा ;-). तुमची प्रवेशिका प्रकाशित होऊन सगळ्यांना दिसू लागेल.
१०. जर काही मजकूर लिहायचा राहिला असेल/बदलायचा असेल तर सर्वांत वर दिसणारा 'संपादन' हा पर्याय वापरून प्रवेशिकेत बदल करू शकता.
या स्पर्धेचा अंतिम विजेता मायबोलीचे सभासद मतदान पध्दतीने ठरवतील. या मतदानासाठीचा धागा अनंतचतुर्दशी नंतर उघडण्यात येइल.
(No subject)
सगळे सुटलेत नुसते << इथे काय
सगळे सुटलेत नुसते
<< इथे काय वाट्टेल ते वापरुन सुद्धा पदार्थ यायची मारामार >> रैना, जोर्दार अनुमोदन
आपल्या सर्वांचे प्रश्न
आपल्या सर्वांचे प्रश्न विचारात घेऊन आम्ही काही नियम शिथील केले आहेत. कृपया नियम पुन्हा एकदा वाचावेत. अजूनही काही शंका असल्यास त्या इथे जरूर विचारा. आपल्या सर्वांकडून भरघोस प्रवेशिकांची अपेक्षा आहे.
धन्यवाद संयोजक
धन्यवाद संयोजक
नियम बरेच शिथील झाले की,
नियम बरेच शिथील झाले की, धन्यवाद
अरे व्वा! नियम बदलले.... आता
अरे व्वा! नियम बदलले....
आता नियम क्लियर आणि समजायला सोपे आहेत
धन्यवाद संयोजक
आता कस जरा बरं वाटल.....
आता कस जरा बरं वाटल.....
म्हणजे माझ्यासारखी (जिला जास्त काही येत नाही अशी) काहीतरी करु शकते... नाहीतर मला वाटल होत की या वेळी मी फक्त बघ्याची भूमिका घेतेय.पण आता काय बरं कराव अशी विचार करणारी बाहूली
तांदुळाची पिठी (किंवा तत्सम
तांदुळाची पिठी (किंवा तत्सम तांदळापासून केलेलं काहीतरी) आणि तांदूळ हा एक जिन्नस आहे का दोन?
नानबा, हा नियम वाच - १) वरचे
नानबा, हा नियम वाच - १) वरचे तीनही मुख्य जिन्नस वापरणे अनिवार्य आहे. हे जिन्नस कुठल्याही स्वरुपात वापरता येतील..
म्हणजे बहुधा एकच जिन्नस धरणार असतील.
अरे वा!! आता छान चविष्ट
अरे वा!!
आता छान चविष्ट खिरापत करता येईल
धन्यवाद संयोजक!
सूचनांचा विचार केल्याने, खरेच
सूचनांचा विचार केल्याने, खरेच खुप छान वाटले, संयोजक.
सर्व स्पर्धकांना शुभेच्छा !
यावर्षी मला फोटो टाकायचा प्रॉब्लेम आहे. दोन सभासदांनी संयुक्तरीत्या भाग घ्यायची सोय नाही म्हणून, नाहीतर एखादी बरी पाककृती, नक्कीच सूचवली असती..
संयोजक, नियम २ मधे ४ जिन्नस
संयोजक,
शंका काहि संपत नाहित
लाजोतै : आयसिंग शिवाय तो केक
लाजोतै : आयसिंग शिवाय तो केक "आईस्ड केक" वाटेल का ? क्वालिटी चा वाटी केक पण १ अक्खा (एकटा) पदार्थ आहे आणि डायमंड बेकरी ची पायनॅपल पेस्ट्री पण १ अक्खा (च) पदार्थ आहे. त्यावर क्रीम असतं म्हणून ते दोन पदार्थ नाही होत. बनवायला लागणार्या घटक पदार्थांची संख्या वेगळी असणार ह्या २ केक्स ची (तुमच्या चॉकलेत क्रीम च्या शंकेसारखं). पण "एंड प्रॉडक्ट" एक - एक पदार्थ च आहेत दोन्ही केक.
तस्मात : एकच पदार्थ असणार न केक आणि त्यावरचं आयसिंग म्हणजे मला तरी असंच वाटतय.
पण सुरुवातीला शंकानिरसन करून घेणे कधीही चांगलेच
शकुनताई, मी आईस्ड केक हे एक
शकुनताई, मी आईस्ड केक हे एक उदाहरण दिले आहे... तसे बघितले तर आयसिंग आणि केक हे वेगवेगळे पदार्थ सुद्धा होऊ शकतात... केक नुसता देखिल खाऊ शकता आणि आयसिंग बिस्किटावर देखिल लाऊ शकता.. त्यामुळे 'एकच पाककृती' याचे संयोजकांचे काय स्पष्टीकरण आहे ते कळले तर बरे होइल....
बादवे, पायनॅप्पल पेस्ट्री मधले क्रिम आणि आईस्ड केक वरचे आयसिंग यात फरक आहे
पायनॅप्पल पेस्ट्री मधले क्रिम
पायनॅप्पल पेस्ट्री मधले क्रिम आणि आईस्ड केक वरचे आयसिंग यात फरक आहे
अर्थातच. पण तरीही.. आईस्ड केक हा केक आणि आयसिंग मिळून एकच पदार्थ धरला पाहिजे असं मला वाटतं (आणि तसा धरला नाही तर खूप आश्चर्य वाटेल). पाहुया संयोजक काय ठरवतायत. तुमच्या केक किंवा इतर कुठल्याही लज्जतदार पा.क्रु. च्या प्रतिक्षेत आहेच.
लाजो, नियम आता बरेच शिथील
लाजो,
नियम आता बरेच शिथील केले आहेत.
तेंव्हा
१. चॉकलेट सॉस हा एक जिन्नस धरणार.
२. आईस्ड केक ही एक पाककृती धरणार.
धन्यवाद संयोजक
धन्यवाद संयोजक
अरे व्वा!!! मस्त.. आता भरपुर
अरे व्वा!!! मस्त.. आता भरपुर रेसिपीज मिळतील..
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
ही स्पर्धा व 'तों.पा.सु.
ही स्पर्धा व 'तों.पा.सु. स्पर्धा', ह्या दोन्ही मला इतक्या महाभयंकर अवघड वाटल्या होत्या की ह्याला प्रवेशिका येणारच नाहीत असे मला वाटले. अर्थात तो मा.बु.दो. होता.
माबो.करणी जबरदस्त आहेत... काय प्रवेशिका आल्यात एक्सेक!!!! छान स्पर्धा संयोजक.
मजकुरात image किंवा link द्या
मजकुरात image किंवा link द्या हे दिसत नाहिये....
पाकृ टाकायचा वेळ संपलाय का?
saakshi, पाककृती लिहिताना
saakshi,
पाककृती लिहिताना तिथे 'मजकूरात image किंवा link द्या' हा पर्याय दिसत नाही.
'पाककृती लेखनात प्रकाशचित्रांचा समावेश कसा करावा' यासाठी इथे पहा - http://www.maayboli.com/node/27484
धन्यवाद मंजूडी....
धन्यवाद मंजूडी....
मुदत संपल्यामुळे प्रवेशिका
मुदत संपल्यामुळे प्रवेशिका स्वीकारणे बंद करत आहोत. आपल्या भरघोस प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!!!
Pages