मिसळम् पाकम् गट्टम् गट्टम्! - (पाककृती स्पर्धा) (मुदत संपल्यामुळे प्रवेशिका स्वीकारणे बंद करत आहोत)

Submitted by संयोजक on 27 August, 2012 - 19:01

misalm pakam gattam gattam.jpg

साक्षात गणपती बाप्पा पंगतीला म्हणजे... धम्माल! गोड गोड खाण्यापासून तिखट खिरापती पर्यंत बरंच काही. बाप्पा तेच तेच खाऊन कंटाळला असेल. नाही का? काही तरी नवं द्यावंसं वाटतंय? मग सोप्पं आहे!
आमच्या ह्या वर्षीच्या 'मिसळम् पाकम् गट्टम् गट्टम्' मध्ये भाग घ्याच!

मुख्य घटक जिन्नसः-

१) बटाटा
२) तांदूळ
३) सफरचंद

या स्पर्धेचे नियमः-

१) वरचे तीनही मुख्य जिन्नस वापरणे अनिवार्य आहे. हे जिन्नस कुठल्याही स्वरुपात वापरता येतील.
२) पाककृतीत पूरक पदार्थ म्हणून अजून जास्तीतजास्त ४ जिन्नस वापरता येतील. यात भाज्या, फळं, धान्य, डाळी, कडधान्य दूध आणि दुधाचे पदार्थ इ. कुठल्याही स्वरूपात वापरता येतील.
३) या व्यतिरिक्त पाणी, तेल, तूप, मीठ, मसाल्याचे पदार्थ, गुळ, साखर, मध कितीही वापरू शकता.
४) कांदा, लसूण वापरता येणार नाही.
५) सजावटीकरता वापरलेल्या गोष्टी वरील जिन्नसात धरल्या जाणार नाहीत.
६) वरील जिन्नस वापरून गोड किंवा तिखट पदार्थ बनवू शकता.
७) तयार पदार्थाचं प्रकाशचित्र अनिवार्य आहे. कृतीची (पायर्‍यांसहीत) प्रकाशचित्रे द्यायला हरकत नाही.
८) प्रवेशिका भरताना, पदार्थ गोड आहे का तिखट याचा स्पष्ट उल्लेख हवा.
९) एक सभासद दोन प्रवेशिका पाठवू शकेल मात्र त्यापैकी एक गोडाची व एक तिखटाची असायला हवी. एक सभासद दोन्ही गोडाच्या वा दोन्ही तिखटाच्या पाककृती पाठवू शकणार नाही.
१०) एका प्रवेशिकेत एकच पाककृती असावी.

प्रवेशिका कधी, कुठे व कशा पाठवाव्यात?

प्रवेशिका गणेश चतुर्थीपासून,१९ सप्टेंबर २०१२ (भारतीय प्रमाणवेळ) ते अनंत चतुर्दशीपर्यंत, २९ सप्टेंबर २०१२ (अमेरिकेच्या पश्चिम किनार्‍याची प्रमाणवेळ) स्वीकारण्यात येतील. प्रवेशिका पाठवण्याकरता 'मायबोली गणेशोत्सव २०१२' या गृपचे सदस्य असणे आवश्यक आहे. हा गृप सदस्य नोंदणीकरता १९ सप्टेंबरला खुला करण्यात येणार आहे.

१. 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सदस्यत्व घ्या. त्याकरता या पानाच्या उजवीकडे दिसणार्‍या 'मायबोली गणेशोत्सव २०१२' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर सामील व्हा या शब्दांवर टिचकी मारा. आता आपण 'मायबोली गणेशोत्सव २०१२' या गृपचे सभासद झाला आहात.
२. याच गृपमध्ये उजवीकडे 'नवीन पाककृती' या शब्दांवर टिचकी मारा. (गणेशोत्सव २०१२ गृपमधले गप्पांचे पान, नवीन कार्यक्रम हे पर्याय वापरायचे नाहीत)
३. नवीन पाककृतीचा धागा उघडला जाईल. त्यात 'शीर्षक' या चौकटीमध्ये खालीलप्रमाणे विषय लिहावा :-
मिसळम् पाकम् गट्टम् गट्टम्! - तुमच्या पाककृतीचे नाव - गोड/तिखट - मायबोली आय डी
४. आहार, पाककृती प्रकार, इ. गोष्टी तुमच्या पाककृतीनुसार निवडा.
५. शब्दखुणा या चौकटीमध्ये मिसळम् पाकम् गट्टम् गट्टम्, मायबोली गणेशोत्सव २०१२ हे शब्द लिहा.
७. मजकुरात प्रकाशचित्र टाकायचे असल्यास मजकुराच्या चौकटीखाली मजकुरात image किंवा link द्या. यातील image शब्दावर टिचकी मारा. एक नवीन खिडकी (विंडो) उघडेल. त्यात वरती दिलेल्या पर्यायांपैकी 'upload' हा पर्याय निवडा. मग 'browse' वर टिचकी मारुन तुमच्या संगणकावरून योग्य ती फाईल upload करा. फाईल अपलोड झाली की खालच्या करड्या चौकटी मध्ये त्याची पावती (मेसेज) दिसेल. मग ही फाईल सर्वात वरती दिलेल्या पर्यायांपैकी 'Send to text area' हा पर्याय वापरून तुमच्या मजकुरात समाविष्ट करा.
प्रकाशचित्र टाकण्याबद्दल अधिक माहितीसाठी येथे टिचकी मारा.
८. नवीन लेखनाच्या धाग्यावर सर्वांत खाली 'Save' या कळीच्या वर गृप असा शब्द दिसेल, त्यावर टिचकी मारा. सार्वजनिक या शब्दाच्या आधी असलेल्या चौकटीवर टिचकी मारा. म्हणजे तुमची प्रवेशिका सर्वांना दिसू शकेल.
९. Save ची कळ दाबा. कधी कधी सेव्ह व्हायला वेळ लागतो, तेवढी कळ काढा ;-). तुमची प्रवेशिका प्रकाशित होऊन सगळ्यांना दिसू लागेल.
१०. जर काही मजकूर लिहायचा राहिला असेल/बदलायचा असेल तर सर्वांत वर दिसणारा 'संपादन' हा पर्याय वापरून प्रवेशिकेत बदल करू शकता.

या स्पर्धेचा अंतिम विजेता मायबोलीचे सभासद मतदान पध्दतीने ठरवतील. या मतदानासाठीचा धागा अनंतचतुर्दशी नंतर उघडण्यात येइल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरच्या सगळ्या पोस्ट्स वाचल्या तरी कन्फ्यूजन आहेच Happy
मंजूडी + १. कांदा-लसूण नाही हे बरोबर आहे. पण गोड पदार्थात जायफळ, वेलची, केशर, दालचिनी, लवंग ह्यातले काहीही वापरायचे झाल्यास हे सगळे मसाल्याचेच पदार्थ आहेत की. ह्यातली फक्त वेलची चालेल असे तुम्ही दिले आहे. चवीसाठी ह्यातले काहीतरी असतेच एरवीही ( अगदी उपासाला सुद्धा ) तसेच जिरे, धने, मिरे आणि इतरही अनेक मसाल्याचे पदार्थ सौम्य आहेत. कांदा-लसूण वगळण्याची अट पटली पण बाकी मसाले ( किंवा बाकी मसाल्यातील कुठलातरी एकच वापरता येईल इतपत तरी ) वापरायची मुभा दिली तर चवीत वैविध्य येईल.

शंकानिरसनासाठी धन्यवाद संयोजक Happy

एक चावटपणा : बाप्पासाठी खिरापत आहे म्हणून कांदा-लसूण वगळा म्हणताय, पण अंडी/ कोंबडी/ मासे आणि इतर प्राण्यांचं काय? Biggrin Light 1

फक्त सजावटी करता.. वापरु शकता. जर पदार्था मध्ये कोणत्याही प्रकारे घातल्यास मग तो जिन्नस ४ ते ७ मध्ये गणला जाईल.<<< फक्त सजावटीकरता म्हणून मग मी काहिही वापरु शकते तर.... Happy

>>तांदुळ भिजवायला आणि बटाटे उकडायला वापरलेले पाणी पण धरणार का मग<<< याचे उत्तर नाही दिलेत Uhoh

शेळी<<< बरोबर.. कारण मग तो एकच पदार्थ होइल... हो की नै Happy

स्पर्धा जबरी पण त्याहीपेक्षा जबरी इथल्या शंकाकुशंका आणि त्यांच्या निरसनासाठीचा संयोजकांचा पेशन्स...

संयोजक ______/\_______ Happy

वरचे नियम वाचून एक खिरापत म्हणून खपेल नाहीतर 'दहीकाला' किंवा सफरचंद-बटाटाची भेळ आली तर नवल वाटू नये. . Proud
Light 1

झटपट सफरचंद, बटाट भेळः
कॅसेरोल घ्या आता त्यात तळाला एक थर सफरचंदाचा, एक भाताचा, त्यावर एक उकडलेल्या बटाट्याचा, त्यावर टॉमॅटो, मग कोथींबीर(ती चालेल ना), मग धना-जीरा पूड, मग आमचूर , मग लिंबू रस.
झाले आठ पदार्थ वापरून एक पदार्थ.

हा बसेल ना नियमात? (खरी शंका आहे.)

संयोजकानी आता एक पाकृ टाकावीच. नियम कळल्याची खात्री होइल. Wink

(खात्री दोन्ही पक्षांना होइल का नक्की कोणाला ते गुलदस्त्यात... ) Light 1

>>तांदुळ भिजवायला आणि बटाटे उकडायला वापरलेले पाणी पण धरणार का मग<<< याचे उत्तर नाही दिलेत >>>

लाजो, संयोजकांची पानं क्र. १ वरची <<संयोजक | 11 September, 2012 - 23:48 << ही पोस्ट वाच.

मंजुडी, तु ही पोस्ट म्हणत्येय्स का??

>>>हो. तुम्ही वापरलेलं पाणी, ४ ते ७ जिन्नसांमध्ये पकडणार.>> हे तर तुला तांदुळ शिजवताना वापराच्या पाण्याबद्दल होते. त्यानंतर मी त्यांना बटाटे उकडण्याबद्दल आणि तांदुळ धुण्याबद्दल चा प्रश्न विचारला होता...

माझे काही कन्फ्युजन होत असेल तर प्रकाश टाका प्लिज Happy

लाजो Uhoh 'पाणी' हा एकच जिन्नस आहे ना? ते तांदूळ शिजवायला वापरा, नाहीतर सफरचंद/ बटाटे शिजवायला.

असं म्हणतेस.... हम्म... बटाटे मावे/ओव्हन मधे पण बीनपाण्याचे शिजतात परंतु भात शिजवायला पाणी लागतेच... याप्रमाणे मग पाण्यात बटाटा शिजवला तरी पाणी उकडलेल्या बटाट्याचा घटक होऊ शकत नाही पण शिजलेल्या भातात पाणी हा घटक आहे... Uhoh

संयोजक कुठेत????/

होय होय, म्हणूनच मी दिवा दिला आहे Happy एकदा पाणी वापरलं आणि ते ४ ते ७ मध्ये आलं की ते कोणत्याही फॉर्ममध्ये आणि कितीही वेळा वापरलं तरी काय फरक पडतो? मी गंमतीने म्हणाले होते. संपादित करते आहे.

नियमाप्रमाणे काय आहे ते उत्तर संयोजक देतीलच.

तांदूळच पाहिजेत की तांदळाचं कच्चं पीठ / उकड काढून चालेल ?

बटाटाच हवा की बटाट्याचं पीठ ( इथे मिळतं ) सुद्धा चालेल?

संयोजक,

काही खुलासे आवश्यक आहेत. नियमांचा विचार करावा लागेल बहुतेक..

तांदूळाचा कुठलाही रूपात(फॉर्म) असे आहे का?(भात, पोहे, उकड,पीठ वगैरे)
सफरचंद कुठल्या रूपात?(वेफर्स, ताजं, रस नुसता)

(तसे मध व सफरचंद खाणं चांगले नाही असे वाचलेय )
नियम ८. प्रमाणे गूळ म्हणजे गूळच घ्यायचा? ब्रॉउन साखर नाही का?

संयोजक,
नियम शिथिल करा थोडे. इतके काटेकोर ठेवू नका. इथे काय वाट्टेल ते वापरुन सुद्धा पदार्थ यायची मारामार. Proud
फु.स. आहे. पण सहभाग वाढवायचा असल्यास खरंच फेरविचार करा.

संयोजक, तुम्हाला त्रास देणे हा अजिब्बात उद्देश नाही... स्पर्धेचे नियम क्लियर नाहित म्हणुन ते समजवून घेण्याचा प्रयत्न करतोय.... समजुन घ्याल अशी अपेक्षा Happy

Proud काय खरं नाय!! Lol आता माझीही शंका विचारून घेते :

बटाटा - बटाट्याचा कीस, चिप्स, बटाटा पापड अशा फॉर्ममध्ये पाकृत वापरलेला चालेल का?

अकु, यू टू !!!

आता उद्या बटाटा, कच्चाच वापरायचाय कि शिजवला ( पाण्यात हो ) तरी चालेल, असे विचाराल !

मायबोलीकरांनी आत्मीयतेने केलेल्या सुचना लक्षात घेऊन संयोजक मंडळ नियमांचा फेरविचार करत आहे. धन्यवाद.

अकु. दिनेशदा Lol

अकु, बटाटा पापड वापरलास तर मग त्यात येणारे पीठ, पाणी, इ इ जिन्नस ४-७ मधे धरण्यात येतिल Happy आणि त्यात मसाले (तिखट/मिरची) असल्यामुळे नियमात बसणार नाहित Wink

धन्यवाद आणि शुभेच्छा संयोजक Happy

Pages