साक्षात गणपती बाप्पा पंगतीला म्हणजे... धम्माल! गोड गोड खाण्यापासून तिखट खिरापती पर्यंत बरंच काही. बाप्पा तेच तेच खाऊन कंटाळला असेल. नाही का? काही तरी नवं द्यावंसं वाटतंय? मग सोप्पं आहे!
आमच्या ह्या वर्षीच्या 'मिसळम् पाकम् गट्टम् गट्टम्' मध्ये भाग घ्याच!
मुख्य घटक जिन्नसः-
१) बटाटा
२) तांदूळ
३) सफरचंद
या स्पर्धेचे नियमः-
१) वरचे तीनही मुख्य जिन्नस वापरणे अनिवार्य आहे. हे जिन्नस कुठल्याही स्वरुपात वापरता येतील.
२) पाककृतीत पूरक पदार्थ म्हणून अजून जास्तीतजास्त ४ जिन्नस वापरता येतील. यात भाज्या, फळं, धान्य, डाळी, कडधान्य दूध आणि दुधाचे पदार्थ इ. कुठल्याही स्वरूपात वापरता येतील.
३) या व्यतिरिक्त पाणी, तेल, तूप, मीठ, मसाल्याचे पदार्थ, गुळ, साखर, मध कितीही वापरू शकता.
४) कांदा, लसूण वापरता येणार नाही.
५) सजावटीकरता वापरलेल्या गोष्टी वरील जिन्नसात धरल्या जाणार नाहीत.
६) वरील जिन्नस वापरून गोड किंवा तिखट पदार्थ बनवू शकता.
७) तयार पदार्थाचं प्रकाशचित्र अनिवार्य आहे. कृतीची (पायर्यांसहीत) प्रकाशचित्रे द्यायला हरकत नाही.
८) प्रवेशिका भरताना, पदार्थ गोड आहे का तिखट याचा स्पष्ट उल्लेख हवा.
९) एक सभासद दोन प्रवेशिका पाठवू शकेल मात्र त्यापैकी एक गोडाची व एक तिखटाची असायला हवी. एक सभासद दोन्ही गोडाच्या वा दोन्ही तिखटाच्या पाककृती पाठवू शकणार नाही.
१०) एका प्रवेशिकेत एकच पाककृती असावी.
प्रवेशिका कधी, कुठे व कशा पाठवाव्यात?
प्रवेशिका गणेश चतुर्थीपासून,१९ सप्टेंबर २०१२ (भारतीय प्रमाणवेळ) ते अनंत चतुर्दशीपर्यंत, २९ सप्टेंबर २०१२ (अमेरिकेच्या पश्चिम किनार्याची प्रमाणवेळ) स्वीकारण्यात येतील. प्रवेशिका पाठवण्याकरता 'मायबोली गणेशोत्सव २०१२' या गृपचे सदस्य असणे आवश्यक आहे. हा गृप सदस्य नोंदणीकरता १९ सप्टेंबरला खुला करण्यात येणार आहे.
१. 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सदस्यत्व घ्या. त्याकरता या पानाच्या उजवीकडे दिसणार्या 'मायबोली गणेशोत्सव २०१२' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर सामील व्हा या शब्दांवर टिचकी मारा. आता आपण 'मायबोली गणेशोत्सव २०१२' या गृपचे सभासद झाला आहात.
२. याच गृपमध्ये उजवीकडे 'नवीन पाककृती' या शब्दांवर टिचकी मारा. (गणेशोत्सव २०१२ गृपमधले गप्पांचे पान, नवीन कार्यक्रम हे पर्याय वापरायचे नाहीत)
३. नवीन पाककृतीचा धागा उघडला जाईल. त्यात 'शीर्षक' या चौकटीमध्ये खालीलप्रमाणे विषय लिहावा :-
मिसळम् पाकम् गट्टम् गट्टम्! - तुमच्या पाककृतीचे नाव - गोड/तिखट - मायबोली आय डी
४. आहार, पाककृती प्रकार, इ. गोष्टी तुमच्या पाककृतीनुसार निवडा.
५. शब्दखुणा या चौकटीमध्ये मिसळम् पाकम् गट्टम् गट्टम्, मायबोली गणेशोत्सव २०१२ हे शब्द लिहा.
७. मजकुरात प्रकाशचित्र टाकायचे असल्यास मजकुराच्या चौकटीखाली मजकुरात image किंवा link द्या. यातील image शब्दावर टिचकी मारा. एक नवीन खिडकी (विंडो) उघडेल. त्यात वरती दिलेल्या पर्यायांपैकी 'upload' हा पर्याय निवडा. मग 'browse' वर टिचकी मारुन तुमच्या संगणकावरून योग्य ती फाईल upload करा. फाईल अपलोड झाली की खालच्या करड्या चौकटी मध्ये त्याची पावती (मेसेज) दिसेल. मग ही फाईल सर्वात वरती दिलेल्या पर्यायांपैकी 'Send to text area' हा पर्याय वापरून तुमच्या मजकुरात समाविष्ट करा.
प्रकाशचित्र टाकण्याबद्दल अधिक माहितीसाठी येथे टिचकी मारा.
८. नवीन लेखनाच्या धाग्यावर सर्वांत खाली 'Save' या कळीच्या वर गृप असा शब्द दिसेल, त्यावर टिचकी मारा. सार्वजनिक या शब्दाच्या आधी असलेल्या चौकटीवर टिचकी मारा. म्हणजे तुमची प्रवेशिका सर्वांना दिसू शकेल.
९. Save ची कळ दाबा. कधी कधी सेव्ह व्हायला वेळ लागतो, तेवढी कळ काढा ;-). तुमची प्रवेशिका प्रकाशित होऊन सगळ्यांना दिसू लागेल.
१०. जर काही मजकूर लिहायचा राहिला असेल/बदलायचा असेल तर सर्वांत वर दिसणारा 'संपादन' हा पर्याय वापरून प्रवेशिकेत बदल करू शकता.
या स्पर्धेचा अंतिम विजेता मायबोलीचे सभासद मतदान पध्दतीने ठरवतील. या मतदानासाठीचा धागा अनंतचतुर्दशी नंतर उघडण्यात येइल.
या स्पर्धेविषयी काही शंका
या स्पर्धेविषयी काही शंका असल्यास ईथे विचारा.
मास्टर शेफ मायबोली..
मास्टर शेफ मायबोली..
एक सुचवायचे होते: या वर्षी तर
एक सुचवायचे होते:
या वर्षी तर नाही, पण पुढच्या वर्षी मात्र अशी पाककला स्पर्धा गणपती आगमनाच्या थोडी आधी घेत जा म्हणजे गणपती आगमनापूर्वी स्पर्धेचा निकाल लागून त्या पाककृती गृहीणी गणपतीच्या काळात करु शकतील.
अरे वा. पाककृती स्पर्धा
अरे वा. पाककृती स्पर्धा नव्या नवा पाकृ. दिसणार आता.
एक प्रश्न आहे कि बटाटा, तांदूळ व सफरचंद या तिन्ही मुख्य जिनसांपैकी तिन्ही वापरायलाच हवेत कि त्यापैकी कोणताही एक / दोन वापरुन सुद्धा चालेल?
सावली बटाटा, तांदूळ व सफरचंद
सावली बटाटा, तांदूळ व सफरचंद या तिन्ही मुख्य पदार्थ वापरायचेच आहेत.
मिनु.. नोंद घेतली गेली आहे.
मिसळम् पाकम् गट्टम् गट्टम् !!
मिसळम् पाकम् गट्टम् गट्टम् !! काय छान नाव आहे स्पर्धेच
पण तिन्ही मुख्य पदार्थाशिवाय (८व्या क्र.) जे पदार्थ दिले आहेत तेच वापरायचे की त्याएवजी दुसरे कुठले पदार्थ वापरले तर चालतील?
लाजो, दिनेशदा, सुलेखा कुठे
लाजो, दिनेशदा, सुलेखा कुठे आहात?
<<<<पण तिन्ही मुख्य
<<<<पण तिन्ही मुख्य पदार्थाशिवाय (८व्या क्र.) जे पदार्थ दिले आहेत तेच वापरायचे की त्याएवजी दुसरे कुठले पदार्थ वापरले तर चालतील?>>>> क्रं ४ ते ७... हे तुमच्या चॉईस चे पदार्थ आहेत आणि ते वापरायचेच आहेत.
मस्त!! जरा थोडे अधिक
मस्त!!
जरा थोडे अधिक स्पष्टीकरण हवे आहे प्लिज ...
शंका १ :
पाककृतीसाठी वापरायचे पदार्थ -
१. बटाटा
२. तांदूळ
३. सफरचंद
४. ......
५. ......
६. ......
७. ......
नियम:
१. वर दिलेले जिन्नस (बटाटा, तांदूळ व सफरचंद) हे पाककृतीतले मुख्य घटक असावेत. या जिन्नसांबरोबर अजुन ४ वेगळे जिन्नस वापरणे अनिवार्य आहे.
५. एकही जिन्नस नियमा बाहेर वापरल्यास प्रवेशिका बाद होतील.
आणि
<<<<पण तिन्ही मुख्य पदार्थाशिवाय (८व्या क्र.) जे पदार्थ दिले आहेत तेच वापरायचे की त्याएवजी दुसरे कुठले पदार्थ वापरले तर चालतील?>>>> क्रं ४ ते ७... हे तुमच्या चॉईस चे पदार्थ आहेत आणि ते वापरायचेच आहेत.
नियम ५ आणि नियम १ व वरची पोस्ट हे मला जरा कन्फ्युजिंग वाटतय..... जरा नीट खुलासा कराल का प्लिज.
----------
शंका २:
नियम ८. जर तिखट पदार्थ करणार असाल तर - आलं, मिरची, जिरे, मीठ, तेल यापैकी काहीही.
जर गोड पदार्थ करणार असाल तर - तूप, वेलची, मध/गुळ यापैकी काहीही.
याला नियम क्रमांक न देता सुचना/सज्जेशन असे लिहिले तर कदाचित थोडे समजायला सुकर होइल. कारण मलाही मैथिली सारखाच प्रश्न पडला की संयोजकांनी दिलेलेच पदार्थ वापरायचे का?
----------
शंका ३:
आपल्या आवडीच्या ४ पदार्थांऐवजी ३ किंवा २ च वापरले तर?
----------
शंका ४:
तेल / तूप / बटर / मिठ / साखर या आवश्यक घटकांना एक जिन्नस धरणार का?
धन्यवाद
लाजो: (मुद्दाम उलट्या
लाजो:
(मुद्दाम उलट्या क्रमांकांनी उत्तरे देत आहोत, म्हणजे शंका १ चे जास्त स्पष्टीकरण मिळेल. )
शंका ४ >>>
नियम क्र. ८ प्रमाणे, तिखट पदार्थ करणार असाल तर मीठ, तेल वापरायला परवानगी आहे.
तेंव्हा तूप बटर साखर यांना जिन्नस धरणार.
गोड पदार्थ करणार असाल तर तूप वापरायला परवानगी आहे. बाकीचे, जिन्नस म्हणून धरणार.
शंका ३ >>>
नियम क्र. १ प्रमाणे ४ ही जिन्नस वापरणे अनिवार्य आहे.
शंका २ >>>
ही सुचना नव्हे, नियमच आहे.
जर तिखट पदार्थ करणार असाल तर - आलं, मिरची, जिरे, मीठ, तेल यापैकी काहीही. ( किंवा सर्व )
जर गोड पदार्थ करणार असाल तर - तूप, वेलची, मध/गुळ यापैकी काहीही. ( किंवा सर्व)
शंका १>>>
एकही जिन्नस नियमा बाहेर वापरल्यास प्रवेशिका बाद होतील.
याचा अर्थ असा की, तुम्ही आपल्या आवडीचे जे जिन्नस वापराल ते बाकीच्या नियमांमध्ये बसायला हवे.
धन्यवाद संयोजक पण तरिही माझे
धन्यवाद संयोजक
पण तरिही माझे कन्फ्युजन काहि कमी झलेले नाही... ढ म्हणा हवं तर
मी तिखट पदार्थ करणार असेन तर तांदुळ, बटाटा, सफरचंद यांच्याबरोबर आलं, मिरची, जिरे, मिठ, तेल हे वापरु शकतेच पण त्याशिवाय आणखिन ४ जिन्नस वापरु शकते का???/ म्हणजे समजा बटर, साखर, मैदा, दही...
की आलं, मिरची, जिरे आणि मिठ हेच चार पदार्थ मी वापरायचे??? प्लस तेल वापरायला परवानगी आहे.. पण बटर, साखर, मैदा, दही... हे पदार्थ घातले तर प्रवेशिका बाद होणार????? बरोबर का?
गोडात तांदुळ, बटाटा, सफरचंद यांच्याबरोबर तूप वापरायला परवानगी आहे पण मग वेलची, मध/गुळ... हे तर २/३च जिन्नस झाले ना? मग उरलेले १/२ जिन्नस मनाने वापरायचे का?
एक उदाहरण देऊन स्पष्ट कराल का कृपया?
सॉरी फॉर बिईंग अ बीट अनॉईंग...
पण कन्फ्युजन क्लियर झाले तर सगळ्यांनाच फायदा होइल
धन्यवाद
मी तिखट पदार्थ करणार असेन तर
मी तिखट पदार्थ करणार असेन तर तांदुळ, बटाटा, सफरचंद यांच्याबरोबर आलं, मिरची, जिरे, मिठ, तेल हे वापरु शकतेच पण त्याशिवाय आणखिन ४ जिन्नस वापरु शकते का???/ म्हणजे समजा बटर, साखर, मैदा, दही... >>>> बरोबर.
की आलं, मिरची, जिरे आणि मिठ हेच चार पदार्थ मी वापरायचे??? प्लस तेल वापरायला परवानगी आहे.. पण बटर, साखर, मैदा, दही... हे पदार्थ घातले तर प्रवेशिका बाद होणार????? बरोबर का?............ तुम्ही बटर वापरु शकता पण मग पदार्थ क्रं. ४ ते ७ मध्ये बटर धरल जाईल....
गोडात तांदुळ, बटाटा, सफरचंद यांच्याबरोबर तूप वापरायला परवानगी आहे पण मग वेलची, मध/गुळ... हे तर २/३च जिन्नस झाले ना? मग उरलेले १/२ जिन्नस मनाने वापरायचे का? >>>>. उरलेले क्रं. ४ ते ७ जिन्नस मनाने वापरु शकता.
उदा:१
गोड पाककृतीसाठी वापरायचे पदार्थ -
१. बटाटा
२. तांदूळ
३. सफरचंद
४. मैदा
५. बटर
६. केळी
७. बेकिंग पावडर
८. . तूप, वेलची, मध, गुळ या ४ जिन्नसांपैकी काहीही किंवा सर्व :- मी वापरणार मध, वेलची,
उदा: २.
ति़खट पाककृतीसाठी वापरायचे पदार्थ -
१. बटाटा
२. तांदूळ
३. सफरचंद
४. टोमॅटो
५. काकडी
६. दही
७. सिमला मिरची
८. आलं, मिरची, जिरे, मीठ, तेल या ४ जिन्नसांपैकी काहीही किंवा सर्व : मी वापरणारः तेल मिरची आणि मीठ, आलं
संयोजक, उदाहरणं देता देता
संयोजक, उदाहरणं देता देता लगे हाथ एखादी पाकृ देऊन टाका इथे
है शब्बास!!!! एकदम क्लिअर
है शब्बास!!!! एकदम क्लिअर पिच्कर दिख्या
आता कसं... व्यवस्थित समजावुन सांगितलत
वर केलेले बदल उत्तम
धन्यवाद संयोजक
आता शेवटची १ शंका....
नियम ३. कांदा लसुण व मसाल्याचे पदार्थ वापरता येणार नाहीत<< म्हणजे गरम मसाला, गोडा मसाला, दालचिनी, लवंग, तेजपत्ता, कढीपत्त्ता, पाभा मसाला इ इ वापरता येणार नाहित असे का? की फक्त लसूण व कांदा वापरायचा नाही.. हे तर आपण प्रसादाच्या जेवणात वापरत नाहिच?
अक्के आयडियाच्या कल्पना
अक्के
आयडियाच्या कल्पना दिल्यात संयोजकांनी
आश्विनी... हा हा हा
आश्विनी... हा हा हा हा
लाजोतै.. तोच तर चॅलेंज आहे...
लाजोतै.. तोच तर चॅलेंज
लाजोतै.. तोच तर चॅलेंज आहे...<<
आलं, मिरची, जिरे, वेलची हे मसाल्याचेच पदार्थ आहेत की हो पण
क्लिअर लिहा बुवा तुम्ही की वर दिलेल्या मसाल्यांच्या व्यतिरीक्त अन्य मसाले वापरण्यास मनाई आहे
पण धन्यवाद.. शंकानिरसन केल्याबद्दल....
हेहेहेहेहेह.. भारीये हे..
हेहेहेहेहेह.. भारीये हे..
असली पा.क्रु. आले की मी घरी करुन बघेन..
>>>१. बटाटा २. तांदूळ ३.
>>>१. बटाटा
२. तांदूळ
३. सफरचंद
४. मैदा
५. बटर
६. केळी
७. बेकिंग पावडर
८. . तूप, वेलची, मध, गुळ या ४ जिन्नसांपैकी काहीही किंवा सर्व :- मी वापरणार मध, वेलची, <<<
संयोजक,
एक प्रश्ण, नक्की हे पदार्थ किती प्रमाणात व कसे घालून करायचे ते पण जरा खोलात समजावून सांगितले की कल्पना येइल की नक्की काय हवेय ह्या स्पर्धेत. सर्व गोंधळ कमी होइल. इतरांन मदत होइल स्पर्धेचे नियम समजायला.
(तसे.. लगे हाथ रेसीपी दिलीय की वो.. हेच सगळे कालवून शिजवून होइल एक पदार्थ.)
कांदा-लसूण ठीक आहे, पण
कांदा-लसूण ठीक आहे, पण मसाल्याचेही पदार्थ वापरायचे नाहीत असा नियम घालून आमची चांगलीच गोची केली आहे
मस्त आहे स्पर्धा!
एकुण फक्त ८ च जिन्न्स
एकुण फक्त ८ च जिन्न्स वापरायचे आहेत का ?????
काही शंका: १. दिलेल्या
काही शंका:
१. दिलेल्या जिन्नसांमधून एकच पाककृती बनवणं अपेक्षित आहे का?
उदा. दिलेल्या जिन्नसांपैकी तांदूळाचा भात केला आणि बाकी उरलेले सात जिन्नस घालून दुसरा (गोड/ तिखट) पदार्थ केला असे चालू शकणार आहे का?
२. तांदूळ शिजवण्यासाठी पाणी लागणार असेल तर ते क्र. ४ ते ७ मधील जिन्नसांमधे पकडणार का?
२. पदार्थाची सजावट
२. पदार्थाची सजावट करण्यासाठी, दिलेले जिन्नस किंवा इतर काहीही वापरू शकता.>> म्हणजे फक्त आणि केवळ सजावटीचा पदार्थ '१ ते ८' मध्ये धरला जाणार नाही?
दोन पदार्थांबद्दलची शंका मलाही. एक परिपूर्ण डिश म्हणून १ ते ८ एवढेच साहित्य वापरून दोन पदार्थ केले तर नियमात बसेल का? की एकच पदार्थ करायचा आहे?
भंजाळतेय... भंजाळतेय... चालू
भंजाळतेय... भंजाळतेय... चालू द्यात!
--
बाकी स्पर्धा मस्तच आहे!
अनुसया: १ ते ७ मधले जिन्नस
अनुसया:
१ ते ७ मधले जिन्नस वापरायचे(च) आहेत.
८. मधले कितीही वापरू शकता
सजावटीसाठी कितीही वापरू शकता.
मंजूडी:
१) १ ते ८ जिन्नस वापरून एकच पाककृती बनवणं अपेक्षित आहे.
तुम्हाला जर गोड आणि तिखट दोन्ही प्रवेशिका पाठवायच्या असतील तर, दोन्ही पदर्थात १ ते ८ जिन्नस वापरायचे आहेत.
२) हो. तुम्ही वापरलेलं पाणी, ४ ते ७ जिन्नसांमध्ये पकडणार.
पौर्णिमा:
तुम्हीच तुमच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.
>>>म्हणजे फक्त आणि केवळ सजावटीचा पदार्थ '१ ते ८' मध्ये धरला जाणार नाही?
बरोबर
>>>१ ते ८ एवढेच साहित्य वापरून
एकच पदार्थ करायचा आहे
>>>पदार्थाची सजावट
>>>पदार्थाची सजावट करण्यासाठी, दिलेले जिन्नस किंवा इतर काहीही वापरू शकता <<, म्हण्जे कोथिंबीर, पुदिना सजावटीकरता वापरु शकतो ना?
कोथिंबीर, पुदिना, कढीपत्ता, रोजमेरी, बेसिल इ इ हे हर्ब्ज्/पाला आहेत आणि मसाल्याचे पदार्थ नाहित त्यामुळे ४-७ मधे वापरु शकतो - हो ना?
भात शिजवायला वापरलेले पाणी पण जिन्नसात धरणार... हम्म्म...... तांदुळ भिजवायला आणि बटाटे उकडायला वापरलेले पाणी पण धरणार का मग
>>> १ ते ८ जिन्नस वापरून एकच पाककृती बनवणं अपेक्षित आहे<<< एकाच पाककृतीचे दोन भाग असतिल म्हणजे समजा सफरचंद पुलाव विथ बटाट्याचा रायता नाही चालणार म्हणताय का??? ... स्फरचंद, बटाटा आणि तांदुळ सगळं पुलावातच घालायच.... थोडक्यात...
लाजो - द शंकासूरीण
संयोजकांना आता एखादी पाकृ
संयोजकांना आता एखादी पाकृ देणं सोप्पं वाटणार बहुधा!
लाजो - म्हण्जे कोथिंबीर,
लाजो -
म्हण्जे कोथिंबीर, पुदिना सजावटीकरता वापरु शकतो ना?.. फक्त सजावटी करता.. वापरु शकता. जर पदार्था मध्ये कोणत्याही प्रकारे घातल्यास मग तो जिन्नस ४ ते ७ मध्ये गणला जाईल.
कोथिंबीर, पुदिना, कढीपत्ता, रोजमेरी, बेसिल इ इ हे हर्ब्ज्/पाला आहेत आणि मसाल्याचे पदार्थ नाहित त्यामुळे ४-७ मधे वापरु शकतो - हो ना? ........ वापरु शकता.
>>> १ ते ८ जिन्नस वापरून एकच पाककृती बनवणं अपेक्षित आहे<<< एकाच पाककृतीचे दोन भाग असतिल म्हणजे समजा सफरचंद पुलाव विथ बटाट्याचा रायता नाही चालणार म्हणताय का??? ... स्फरचंद, बटाटा आणि तांदुळ सगळं पुलावातच घालायच.... थोडक्यात..... नाही चालणार.. एकच पाककृती येथे अपेक्षित आहे.
पण सफरचंदाच्या पुलावर
पण सफरचंदाच्या पुलावर रायत्याचा थर देऊन एकच डिश केली.... पुलाव आणि रायता असे स्वतंत्र म्हणण्याचे टाळले, तर चालायलाहरकत नसावी... की सगळ्या घटकांवर एकाच भांड्यात एकच प्रक्रिया होणे आवश्यक आहे?
जबरी आहे स्पर्धा! मी आपली
जबरी आहे स्पर्धा! मी आपली आलेल्या पाकृ घरी करून पाहीन.
सुगरणींचे/सुगरणांचे डोकं पिंजून काढायला लावणारी स्पर्धा आहे अगदी!
Pages