Submitted by पुरंदरे शशांक on 31 August, 2012 - 05:01
खळखळणारा अद्भुत श्रावण
नाचत येतो ओला होऊन
रंग फुलांचे अंगी लेवून
गाणे गाई झर्याझर्यातून
हिरवा मरवा गंधित साजण
कृष्ण घनांना थोडे सारून
उन्हात वेडा रंग उधळतो
सप्तरंग देतो फिस्कारून
रेशीम कोवळ हिरवी कांती
सळसळ अंगी किती हा नवथर
रंगबिरंगी हसू ओठींचे
मनामनावर नाजुक फुंकर
असाच वेडा सुखवून जाई
कधी कळेना याचे अंतर
वसुंधरा का राधा वाटे
कृष्ण मोहिनी ही कोणावर
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा, छान रे
वा, छान रे
रेशीम कोवळ हिरवी कांती सळसळ
रेशीम कोवळ हिरवी कांती
सळसळ अंगी किती हा नवथर
रंगबिरंगी हसू ओठींचे
मनामनावर नाजुक फुंकर >> फारच छान, शशांकजी
सुंदर! शेवटचे कडवे फार आवडले.
सुंदर! शेवटचे कडवे फार आवडले.
खुप सुंदर. हिरवा मरवा गंधित
खुप सुंदर.
हिरवा मरवा गंधित साजण
कृष्ण घनांना थोडे सारून
उन्हात वेडा रंग उधळतो
सप्तरंग देतो फिस्कारून............ हे थोडेसे लयबध्दतेने आणि अर्थानेही ही खटकते म्हणून असे केले------>
हिरवा मरवा गंधित साजण
कृष्ण घनांना हळूच सारून
दिशादिशातून रंग उधळतो
मनास जातो धुंद मंतरून
---------------------------------------------------------------
फिस्कारणे = फुस्कारणे, (रागाने) ठिसकारणे
फिस्कटणे = विस्कटणे, इतस्ततः पसरणे, विखुरणे, नियोजन बरगळने,(उदा. रंग फिस्कटून गेले.) इथे आपण फिस्करून गेले असे म्हणू शकत नाही.
कृगैन.
सुंदर श्रावणमोहिनी..
सुंदर श्रावणमोहिनी..
सुरेख!
सुरेख!
सर्वांचे मनापासून
सर्वांचे मनापासून आभार......
सुधाकर - सूचना अगदी योग्य - तुम्ही केलेला हा बदल मला खूपच आवडला....
खूप सुन्दर.
खूप सुन्दर.
मस्तच, वसुंधरा का राधा
मस्तच,
वसुंधरा का राधा वाटे
कृष्ण मोहिनी ही कोणावर
>>> सुन्दर कल्पना
गीत होईल याचे सुरेख. चैतन्य
गीत होईल याचे सुरेख. चैतन्य चाल लाव रे.
(आता चैतन्य हाणेल मला. अजून आमचे जुनेच गीत पूर्ण होते आहे.
पण शशांक, करणार आहोत आम्ही ते पूर्ण. मग हे.. चालेल ना?)
खुपच सुंदर आहे
खुपच सुंदर आहे
वसुंधरा का राधा वाटे कृष्ण
वसुंधरा का राधा वाटे
कृष्ण मोहिनी ही कोणावर.....
खुप सुंदर.. शेवट्चे कड्वे खुप आवड्ले.....
वाह!
वाह!
सर्वांचे मनापासून आभार......
सर्वांचे मनापासून आभार......
कृष्ण मोहिनी छान आहे!
कृष्ण मोहिनी छान आहे!
धन्यवाद, धन्यवाद....
धन्यवाद, धन्यवाद....
छान आहे
छान आहे
वाहव्व... सुंदर आल्हादकारक
वाहव्व... सुंदर आल्हादकारक कविता..
वसुंधरेकरता ,' राधे ची उपमा खूप्पच आवडली
apratim !!!!!!!!! shravanache
apratim !!!!!!!!!
shravanache jya pramane varnan kele ahe tyavarun kavine ( shashank) swataha te sare anubhavlele asalyache janavate .....kavitet asanari nadbaddhata BALKAVI nchi aslyachi janvte .....apratim.....
kavi SUDHAKARANI dileli suchana yathartha vatli parntu tyani keleli durusti thodi khatakali mhanun ase kele.....>
hirava marava gandhit sajan
krushnaghanana haluch sarun
dishadishatun rang udhalato
an tya rangat mi chinb nahato....>
sudhakarani durusti karatana tyanchya shevatachya olit "manas jato dhund mantarun " ase mhatle ahe.
jato=nighun jato.
parantu KAVI SHASHANK yanchya mul kavitet to anand nighun jane abhipret nasun ulat tyachi MOHINI padavi asa ahe.....
.....kru.gai.na.